सिद्धाश्रम किंवा ज्ञानगंज - हिमालयातील गुप्त स्थान

साहना's picture
साहना in काथ्याकूट
10 Apr 2016 - 3:43 am
गाभा: 

हिमालयाच्या उदरात अनेक रहस्ये आहेत. त्यापैकी सिद्धाश्रम हि एक आहे. पृथ्वीवरील अनेक चिरंजीव लोक जसे हनुमान वगैरे हिमालयातील ह्या गुप्त शहरांत राहतात अशी समजूत आहे. फक्त प्रचंड ज्ञान प्राप्ती केलेल्या लोकांनाच इथे प्रवेश आहे. हे स्थान अश्या प्रकारे वसवले गेले आहे कि अगदी उपग्रहातून सुद्धा ते स्पष्ट दिसू शकत नाही.

तिबेट आणि भारतातील अनेक साधू भिक्षु लोकांनी सिद्ध्लोकाबद्दल लिहून ठेवले आहे आणि काही जन आपला मृत्यू जवळ येताच तिथे निघून गेले आहेत. हिमालयांत दुर्ग्रोहण करणाऱ्या लोकांना येती किंवा इतर सिद्ध लोक खूप वेळा दिसून येतात पण नंतर शोडले असता ते सापडत नाहीत.

हनुमाना शिवाय इथे वसिष्ठ, विश्वामित्र, भीष्म, कृपाचार्य, शंकराचार्य, कणाद, परशुराम इत्यादी विभूती ध्यान मग्न आहेत. सदर शहराचे रक्षण व्हावे म्हणून ४ प्रकारचे जीव गस्ती वर असतात. येती शिवाय अर्ध मानव आणि अर्ध पक्षी प्रकारचे जीव सुद्धा ह्या कामात आहेत.चुकून एखादा मानव तिथे पोचलाच तर त्याला त्या शहरांतच सर्व सुख सुविधा घेवून जीवन व्यतीत करावे लागते अशी सुरक्षा योजना आहे. दर रात्री अश्या मानवांची स्मरणशक्ती रिसेट होते आणि त्यांना वाटते कि ते आजच सिद्ध लोकांत पोचले आहेत. शेकडो वर्षे पर्यंत हे मानव त्याच शहरात अडकून राहतात.

मनोरंजक माहिती म्हणून इथे टाकले आहे. प्रतिसादांत कृपया तारतम्य दाखवावे.

पूर्व प्रकाशित

प्रतिक्रिया

:)

प्रतिसादांत कृपया तारतम्य दाखवावे. (म्हणून ^^ एव्ह्ढाच प्रतिसाद ^^)

तर्राट जोकर's picture

10 Apr 2016 - 7:19 am | तर्राट जोकर

प्रतिसादांत कृपया तारतम्य दाखवावे.

ओके. तुमची इच्छा पूर्ण करणेत येत आहे.

1

थ्यान्क्स तो बनता है. =))

धन्यवाद. विनाकारण कीस न पाडता काही तरी वाह्यात प्रतिसाद लोकांनी टाकावा आणि मनोरंजन करून घ्यावे हाच उद्देश होता, हातभार लावल्या बद्दल धन्य्स.

तर्राट जोकर's picture

11 Apr 2016 - 9:56 am | तर्राट जोकर

जसा लेख तशा प्रतिक्रिया. सो थ्यान्क्स बट नो थ्यान्क्स.

एस's picture

10 Apr 2016 - 7:27 am | एस

छान मनोरंजन.

प्रतिसादात तारतम्य राखते आहे.
अवांतर - आता लेखनात तारतम्य दिसेल अशी अपेक्षा करावी की नको हे कळत नाही. माझं अज्ञान, दुसरं काही नाही.

सतिश गावडे's picture

10 Apr 2016 - 8:55 am | सतिश गावडे

करेल मनोरंजन जो जनांचे, जडेल नाते प्रभूशी तयाचे.

नाना स्कॉच's picture

10 Apr 2016 - 9:06 am | नाना स्कॉच

भीष्म तर ते शरपंजरी पहुडल्या नंतर उत्तरायण यायची वाट पाहून मग उत्तरायणात प्राण त्यागणारे वगैरे होते न? मग ते चिरंजीव लोकांत कसे काय आले म्हणे??

"काथ्याकूट सुरु किया जाय"

हे सगळे समजण्या साठी आपली अध्यात्मिक पातळी कि काय ते उच्च दर्जाचे असले पाहिजे …

अत्रे's picture

10 Apr 2016 - 10:46 am | अत्रे

अहाहा!

दर रात्री अश्या मानवांची स्मरणशक्ती रिसेट होते आणि त्यांना वाटते कि ते आजच सिद्ध लोकांत पोचले आहेत

लेख कोणी लिहिला आहे बरे?

काही सिद्ध पुरुषांनी लिहिला आहे म्हणे. ( सिद्ध सगळे पुरूषच का असतात हे मला समजले नाही, कधी सिद्ध बाई असे कुणी लिहिल्याचे आठवत नाही ).

विजय पुरोहित's picture

11 Apr 2016 - 11:33 am | विजय पुरोहित

सिद्ध ही विशिष्ट सांप्रदायिक संकल्पना आहे.
त्या ऐवजी जर ईश्वरी कृपेला पात्र महिला म्हणायच्या तर अनेक आहेतच की.
अगदी वेदांतच वागांभृणी या साक्षात्कारी स्त्रीने रचना केलेले गहन अर्थाचे देवीसूक्त अवश्य वाचावे ही विनंती.
शिवाय मुक्ताबाई, कान्होपात्रा यासारख्या वारकरी सांप्रदायिक संत आहेतच.

सिद्ध सगळे पुरूषच का असतात हे मला समजले नाही, कधी सिद्ध बाई असे कुणी लिहिल्याचे आठवत नाही

कारण स्त्रियांना सगळ्या गोश्टी झेपतीलच असे नाही. ;)

असो टूकार जोक्स अपार्ट स्त्रिया या शक्तीचे प्रतिक म्हणतात म्हणून जेंव्हा त्या सिध्द बनतात तेंव्हा त्या स्त्रि रहात नाहीत त्यांना देवी परिणामी सर्वोच्च मातेचा दर्जा दिला जातो. उदाहरणार्थ शारदा मा. अथवा मा आनंद्मयी. ज्यांच्यात इतरांना सिध्द बनवायची क्षमता असते. म्हणून हे पद सिध्द स्त्रि पेक्षा वरच्या (अध्यात्मीक) दर्जाचे आहे. पण सिध्द पुरुषांबाबत असे म्हणता येत नाही ते इतरांवर (गुरु)क्रुपेचा वर्षाव करु शकतात पण ते स्वतः शक्तीरुप नसतात तर शक्ती धारणकर्ते असतात म्हणून निव्वळ सिध्द म्हणतात. माझे विवेचन किंचीत गोंधळ वाटेल पण सोप्या शब्दात बोलायचे तर लोहचुंबक असणे/बनणे वेगळे आणी ते धारण केलेले असणे वेगळे.. परीणामी सिध्द स्त्रिपुरुषांना वेगवेगळ्या उल्लेखाने संबोधले जाते.

विजय पुरोहित's picture

12 Apr 2016 - 6:33 am | विजय पुरोहित

अप्रतिम विवेचन...

दुर्गविहारी's picture

10 Apr 2016 - 11:06 am | दुर्गविहारी

हसून लोळलो. साहना ताइ आपल्याला महाभारताच्या अधिक अभ्यासाची गरज आहे. किवा तुम्हीच महाभारताची एक नवी प्रत लिहा, आम्हाला तरी नव्या द्रूष्टीकोणातून महाभारत कळेल.

असल्या विषयांवर अभ्यास करायला सांगणे म्हणजे अर्नब गोस्वामीला शांत पणे बोलाल्याला सांगण्यासारखे आहे.

विवेक ठाकूर's picture

10 Apr 2016 - 12:07 pm | विवेक ठाकूर

जे पोहोचले त्यांची मेमरी रोज रिसेट होत असेल तर हा लेख कसा लिहीला ? त्यांना तर आपण आत्ताच गुप्तस्थानी आलोत असं वाटत असणार. मृत्यू जवळ आलेल्या लोकांना या स्थानाची खबर कुठून मिळते ? हनुमान, वशिष्ठ, विश्वामित्रादी मंडळी तिथे नक्की काय करतात ?

एका मनुष्याची डायरी सापडली होती. प्रत्येक पानावर तेच तेच लिहिले गेले होते. त्या माणसाचे नाव गजनी असे होते.

लेख मनोरंजना साठी आहे कीस पाडण्या साठी नाही - धन्यवाद!

अनंत छंदी's picture

10 Apr 2016 - 12:55 pm | अनंत छंदी

लेखकाने लोब्सांग राम्पा किंवा अरूणकुमार शर्मा यांची पुस्तके वाचली असावीत.

अ-मॅन's picture

11 Apr 2016 - 7:55 am | अ-मॅन

लेखिका पौंगडावस्थेत नसावी.

साहना's picture

10 Apr 2016 - 1:32 pm | साहना

ते सगळे ठीक आहे WiFi आहे का असे अजून कुणी कसे विचारले नाही ?

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Apr 2016 - 10:02 pm | डॉ सुहास म्हात्रे

मनोरंजनासाठी लेखाची लांबी खूपच कमी झाली... कल्पनेच्या अजून बर्‍याच भरार्‍या शक्य होत्या ;) =))

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 Apr 2016 - 12:08 pm | डॉ सुहास म्हात्रे

रच्याकने, आम्ही शांग्रिला नावाच्या रहस्यमय जागी सदेह जाऊन परत आलेलो आहोत ! :)

टवाळ कार्टा's picture

11 Apr 2016 - 1:59 pm | टवाळ कार्टा

हेच का ते? ;)

shangrila

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 Apr 2016 - 2:08 pm | डॉ सुहास म्हात्रे

बनावट शांग्रिला नव्हे तर खर्‍या-खर्‍या शांग्रिलाला जाऊन आलो आहे. हा घ्या तिथला फोटो...

आणि अधिक माहिती इथे मिळेल...
ड्रॅगनच्या देशात ११ - शांग्रीला (पृथ्वीवरचा स्वर्ग) : पुडाकुओ राष्ट्रीय उद्यान, सोंगझानलीन लामासरी आणि ड्रीम शांग्रीला

होबासराव's picture

11 Apr 2016 - 2:10 pm | होबासराव

रच्याकने, आम्ही शांग्रिला नावाच्या रहस्यमय जागी सदेह जाऊन परत आलेलो आहोत ! :)
ईए काका आणि आम्हि जनरल डाँग ह्याच्या डोंग्रिला (हिमालयात कुठेतरी) येथे जाउन जनरल डाँग चा देह घेउन परत आलेलो आहोत :) :)

महाविद्यालयिन जिवनात 'तहलका' सारखे टुकार चित्रपट सुद्धा बघणारा
होबासराव

नाना स्कॉच's picture

11 Apr 2016 - 5:55 pm | नाना स्कॉच

डोंग्रिला

डोंगरी मालवणी कु आजकल हिमालय का पिनकोड लगाते क्या भाईजान :P

होबासराव's picture

11 Apr 2016 - 5:59 pm | होबासराव

नई मियाँ ये ना तो मालवणि डोंग्रिला हय नाहि आपना कांजुर-डोंग्रि पाडा हय...क्या यारो 'तहलका' फिलम नहि देखे तुम :)

बोका-ए-आझम's picture

12 Apr 2016 - 1:16 am | बोका-ए-आझम

ज्यावरुन हाॅलिवूडने Where Eagles Dare चोरला?

डॉक्टर साहेब, कल्पनेची भरारी मिपा वाल्यांनी प्रतिसादांत घ्यावी अशी अपेक्षा आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 Apr 2016 - 2:09 pm | डॉ सुहास म्हात्रे

कल्पनेची भरारी नाही. खरी शांग्रिला पाहून आलोय. वरच्या प्रतिसादात अधिक माहिती मिळेल :)

संजय पाटिल's picture

10 Apr 2016 - 10:17 pm | संजय पाटिल

मी येथे कित्येक शतकं रहातोय . तंतोतंत वर्णन जुळतंय, फकस्त रात्री मुक्कमाला गावात नसतो. त्यामुळे ते रिसेट का फॉर्म्याट कधि करून नाय घेतलं

दर रात्री बाहेर राहता ? हे वागण बर नव्ह पाटील साहेब.

म्हणजे पात्रतेच्या निकषावर एकच मिपा आयडी उतरतो तर !

रच्याकने हे येती कोण ? ते येती का? जाती का? म्ह्न्त्यात बोलि भाषेत ते तर नव्ह.

अज्ञान आमचे दुसरे काय !

असे कोणतेही स्थान हिमालयात अस्तित्वात नाही हे मी नम्रपणे नमुद करु इछ्चितो.

बोका-ए-आझम's picture

11 Apr 2016 - 8:10 am | बोका-ए-आझम

तुमचा पहिला - शिक्षणाच्या मूलभूत हक्कांबद्दलचा लेख खूप चांगला आणि माहितीपूर्ण होता. बीबीसीवरुन एकदम इंडिया टीव्हीवर का येताय?

तर्राट जोकर's picture

11 Apr 2016 - 9:52 am | तर्राट जोकर

त्यांनी सांगितलंय राव, त्या कॉपीपेस्ट करतात म्हणुन. बाकी समझल्योव.

मी काही चांगले लेख टाकले पण त्यावर विशेष प्रतिक्रिया लोक देत नव्हते म्हणून काही बाष्कळ लेख लिहिले आणि त्यांना अगदी भर भरून प्रतिसाद लाभतो आहे. :)

पण जास्त चांगले माहिती पूर्ण लेख सुद्धा येतील. BBC ची तुलना बरोबर वाटत नाही फारच वर्णद्वेषी वाटतो मला तो.

तर्राट जोकर's picture

11 Apr 2016 - 2:21 pm | तर्राट जोकर

....तर ट्यार्पी मिळवणे हा तुमचा उद्देश दिसतोय.

कंजूस's picture

11 Apr 2016 - 8:10 am | कंजूस

मिपावरचे येती लवकर या.

अशक्य महान विभूती यती वगैरे मिपावरच सापडत असल्याने मिपाच आमचा सिध्दलोक आहे हे सिध्द झाले!

विजय पुरोहित's picture

11 Apr 2016 - 11:24 am | विजय पुरोहित

=))

टवाळ कार्टा's picture

11 Apr 2016 - 2:00 pm | टवाळ कार्टा

ठ्ठोSSSSSSSS

सस्नेह's picture

11 Apr 2016 - 11:55 am | सस्नेह

काय हे ? सिद्धलोकाची सफर करून मनोरंजन करून घेण्याची लेखिकेनी दिलेली महान संधी तुम्ही करंटे मिपाप्रेमी लोक्स वाया घालवता आहात !

अप्पा जोगळेकर's picture

11 Apr 2016 - 12:51 pm | अप्पा जोगळेकर

मी गेल्याच आठवड्यात सिद्धलोकात जाउन आलो. तिथे हनुमंत भेटले.
त्यांना म्हटले 'काय हणमंता, बरा आहेस ना ? ' त्यावर त्याने पाठीत एक गुद्दा मारला.
अप्प्या, हे तू मला विचारतोस ? चल तुला सिद्धलोकाची सैर करून आणतो. मग मी त्याच्या पाठीवर बसून निघालो.
थोड्या वेळाने एक मोठे मैदान लागले तिथे आयपील्चे सामने चालू होते. भीष्म, अर्जून,परशुराम, महारथी कर्ण, कृपाचार्य आदी लोक टीम पाडून खेळत होते. आणि आपले भगवान श्रीकृष्ण सामनाधिकारी हे पाहून मी चाटच पडलो. बाजूलाच शकुनी, दुर्योधनआदी मंडळी बेटिंग करत होती. रंभा, उर्वशी जोरजोरात चिअर करुन खेळाडूंना प्रोत्साहन देत होत्या.
- टु बी कंटिन्यूड

क्रेझी's picture

11 Apr 2016 - 4:44 pm | क्रेझी

+१ खासच!
पुढचा भाग लवकर टाका ;)

पुढचा भाग येणार नाही कदाचित. मेमोरी रिसेट झाली असावी.

अ-मॅन's picture

11 Apr 2016 - 10:37 pm | अ-मॅन

टॉम क्रुजच्या एज ऑफ टुमारो ची आठवण करुन देते बगा.

पैसा's picture

11 Apr 2016 - 11:33 pm | पैसा

=)) =))