गाभा:
पनामा फाईल्स चा डाटा लीक झाल्यानंतर काही धक्कादायक गोष्टी प्रकाशात आल्या आहे.
त्या निमित्ताने काहि गोष्टींची चर्चा व्हायला हवी.
१. खरच एका ठराविक मर्यादेनंतर पैसा हातात आल्यानंतर आयकर वाचवता येत नाही हे खरे. म्हणून अशा गोष्टींची
चलती आहे का?
२. पनामा फाईल्स ही टिप ऑफ आईसबर्ग आहे का?
३. एका ठराविक मर्यादेपेक्षा पैसा पगार किंवा मानधन म्हणून दिलाच जाऊ नये का?
४. पनामा सार्ख्या कंपन्या आतंक वादाला मदत करतील का?
जाणकारांनी मते मांडावीत.
५. लालच आणि लोभ यातून अशा घटना घडतात का?
६. सगळी कडे भ्रष्टाचार बोकाळला असल्यामुळे आयकर भरणे हे लोकांना मूर्खपणाचे वाटते का?
जाणकारांनी यावर प्रकाश टाकावा.
प्रतिक्रिया
5 Apr 2016 - 2:26 pm | गवि
या विषयावर चर्चा वाचायला आवडेल.
एकूण काळा पैसा हा वाममार्गानेच येतो का? तो निर्माण होण्यात आणि वाढण्यात खुद्द सरकारचा किती सहभाग असतो? (म्हणजे सरकारी लोकांनी घेतलेली लाच इ. नव्हे तर मुळात हे चक्र सुरु कुठून होतं? अशा अर्थी.) शेवटी त्य सरकारने छापलेल्या वैध नोटाच असतात. मग कर चुकवून त्या दडवणं ही प्रक्रिया मुख्यतः कोणत्या वळणावर सुरु होते? मुळात ही रक्कम रीतसर मोबदला म्हणूनच कोणालातरी प्रदान केली गेली असणार. म्हणजे थेट आरबीआयने बाहेर देतेवेळी. मग ती व्यक्ती त्या रकमेला जबाबदार नाही का राहात?
प्रश्न अडाणी आहेत. अगदी खालच्या यत्तेतल्या भाषेत विचारलेत. पण जाणायला आवडेल.
5 Apr 2016 - 2:26 pm | आदूबाळ
हो, अर्थातच.
टिप ऑफ आईसबर्गचा वरचा कण आहे.
हे काय नवीन? प्रश्न कळला नाही.
सांगता येत नाही. पनामा पेपर्स अडीच हजार गिगाबाईट्सचे आहेत. ते अजून पूर्णपणे वाचले गेले नाहीयेत. कालांतराने कळेलच.
आयकर कमी भरावासा वाटणं यात काही गैर नाही. (असं कोर्टंही म्हणतात.) फक्त "वाचवणं", "चुकवणं" आणि "बुडवणं" यात फरक आहे.
लालच आणि लोभ असण्यातही काही गैर नाही असं माझं वैयक्तिक मत आहे.
प्रश्न कळला नाही. समजा, उद्या रामराज्य आलं, तर ही ऑफशोअर टॅक्स हेवन्स बंद होतील असं तुम्हाला वाटतं का? पनामा पेपर्समध्ये पुतीनपासून आईसलँडच्या अध्यक्षापर्यंत सगळ्यांची नावं आहेत.
5 Apr 2016 - 2:51 pm | शान्तिप्रिय
१. एका ठराविक मर्यादेपेक्षा जास्त रक्कम उत्पन्न म्हनुन न दिल्यास आयकर वाढणार नाही मग असल्या
काळ्या धंद्यांवर नियंत्रण येईल. काय विचार?
२. आपल्या आयकराचा उपयोग लोक कल्याणासाठी होणार नाही अशी भारतीयांची ठाम समजुन असलेमुळे मग आपले नुकसान का करावे म्हणून लोक असले उद्योग करतात का?
5 Apr 2016 - 2:58 pm | गवि
यात काहीतरी तर्कदुष्ट वाटतंय पण काय ते मांडता येत नाही. म्हणजे टू सिंपल टु बी अ सोल्यूशन असंही आणि याद्वारे इकॉनॉमीची वाढ कशी होणार? थर्मामीटरला ९९ डिग्रीपर्यंतच खुणा ठेवाव्यात म्हणजे ९९ पेक्षा जास्त ताप होणारच नाही अशाशी समांतर उपाय भासतोय का हा?
5 Apr 2016 - 3:25 pm | अन्या दातार
हहपुवा. भन्नाट स्ट्रोक.
आता मूळ प्रश्नाकडे.
कंपनी व व्यक्ति (इंडीविजुअल) या वेगळ्या एन्टीटीज आहेत, भिन्न आहेत असं जवळपास सर्व देशातील कायदे मानतात. कंपनीचे उत्पन्न दडवून वा दुसर्या (डमी) कंपनीच्या नावे दाखवून ते बाहेरच्या देशात नेले जाते.
उदा. एखादी कंपनी प्लँट टाकते तेंव्हा कॅपिटल कॉस्ट भरमसाठ वाढवून दाखवू शकते. १०० रुपयाच्या वस्तूची किंमत ११० दाखवून पैकी १० रुपये (कॅश अथवा अन्य मार्ग) दुसर्या कंपनीच्या नावे दाखवते. हे चक्र अमर्याद वाढवता येईल. अगदी लोन व्यवहारातही.
आता यात तुमचा प्रश्नच गैरलागू ठरतो ना. उत्पन्न थोडीच मिळालय कंपनीला, उलट खर्च जास्त दाखवला गेला शिवाय दुसर्या मार्गे पैसेही मिळाले (कागदोपत्री दुसर्या कंपनीला, पण प्रत्यक्षात कंपनीच्या डायरेक्टर्सना अथवा मालकाला)
6 Apr 2016 - 5:03 am | साहना
आय वर एक मर्यादा टाकावी असे म्हणणे आहे का ?
असे केले तर ज्या लोकांची जास्त कमावण्याची ताकत आहे त्यांनी काय करायचे ? एक तर देश सोडून जायचे किंवा काही तरी बेकायदेशीर करून आय दाखवायची नाही.
5 Apr 2016 - 4:47 pm | आदूबाळ
मला अजूनही नीटसं समजलं नाही. उत्पन्न हे शेवटी डिमांड-सप्लायवर अवलंबून असणार ना? मग नेमक्या कोणत्या पद्धतीने डिमांड-सप्लायवर नियंत्रण ठेवता येईल? (नोटः साम्यवादी राजवटीत केलेले असे प्रयोग फसले आहेत.)
समजा, मी गंगावनांचं दुकान चालवतो आहे, आणि मला अमिताभ बच्चनला ब्रँड अँबॅसिडर म्हणून घ्यायचं आहे. त्याने त्यासाठी पाचशे कोटी मागितले. त्याखाली तो तयार होणार नाही. मग कसं करावं?
समजा, अशी समजूत झाली उद्या, तरीसुद्धा हे प्रकार थांबणार नाहीत. दुसरं असं की पनामा पेपर्समध्ये अभारतीय लोकही आहेत. एकूण काय, हावरेपणा हा आंतरराष्ट्रीय गुण आहे.
6 Apr 2016 - 12:17 am | ट्रेड मार्क
हे तुम्ही नोकरदारांविषयी बोलताय का? ते तरी कसे आणि का आणावे? बहुतांशी नोकरदार हे कर वाचवणारे असतात, त्यांना कर चुकवता अथवा बुडवता येत नाही.
बिझनेस करणाऱ्यांवर असे बंधन कसे लावणार? प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या वकुबाप्रमाणे पैसे मिळवतो. ते सरळ मार्गाने मिळवतो का वाममार्गाने हा वेगळा प्रश्न झाला. वाममार्गाने मिळणाऱ्या पैश्यांवर पूर्णपणे नियंत्रण आणले गेले पाहिजे परंतु सरळमार्गाने मिळवलेले पैश्यांवर फक्त कर बरोबर भरलाय की नाही हा मुद्दा उरतो.
5 Apr 2016 - 3:30 pm | शान्तिप्रिय
गवि थर्मामीटरच्या तुमच्या उल्लेखाची उपमा मस्त आहे. :)
आयकर मर्यादा कमी करुन हे प्रश्न सुटतील का?
5 Apr 2016 - 4:12 pm | राही
गेल्या आठवड्यात हिन्दुस्तान टाइम्सने भारतातल्या बुडित कर्जाची एक यादी प्रसिद्ध केली होती. त्यात चाळीस हजार कोटी रुपयांपासून सुरुवात होती. विजय मल्ल्यावर तर याहून कितीतरी कमी रकमेचा ठपका आहे. आश्चर्य वाटले.
6 Apr 2016 - 10:27 am | अनुप ढेरे
अगदी! ४० हजार करोडवाले पण उद्योग आहेत. मल्यांच्या मागे हात धून लागलेत लोक कारण मल्यांनी निर्लज्जपणे जे प्रदर्शन मांडल होतं म्हणून. या माणसाने फेब्रुवारी २०१६ मध्ये वेस्ट इंडीज लीगमध्ये कुठल्या तरी टीममध्ये स्टेक घेतला.
त्याहुन अधिक बुडित कर्ज हा गुन्हा नाही. पण मल्यांनी कामगारांचा PF देखील हडप केला. TDS कापला पण सरकारकडे भरला नाही वगैरे वगैरे गुन्हे आहेत
6 Apr 2016 - 3:05 pm | राही
कर्ज फेडता न आल्याने ते बुडित खाती ढकलले जाणे हा गुन्हा नाही. कबूल. पण जेव्हा ऊर्जानिर्मितीतली देशातली सगळ्यात मोठी खाजगी कंपनी, खाद्यतेल उत्पादनातली देशातली सर्वात मोठी कंपनी अशा सहभागी कंपन्या असलेल्या देशातल्या प्रथम क्रमांकाच्या काँग्लॉमरेटच्या नावावर चाळीस हजार कोटी बुडिताचा शिक्का बसावा हे थोडे विचित्र वाटते.
5 Apr 2016 - 4:48 pm | प्रसाद गोडबोले
ह्याला एकमेव उपाय म्हणजे इनकम त्यॅक्स पुर्णपणे बंद करुन त्याच्या जागी एक्पेन्दीचर ट्यॅक्स लागु करणे. तुम्ही किती कमावता आहात ह्यावर टॅक्स न लावता तुम्ही किती खर्च करता ह्यावर त्यॅक्स लावणे !!
5 Apr 2016 - 4:54 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
पण त्याने सगळ्याचं गोष्टी महागतील. आत्त्ताही ह्या पद्धतीने सर्व्हिस टॅक्स + स्वच्छ भारत अधिभार वगैरे डोक्यावर बसतोच आहे की.
5 Apr 2016 - 5:01 pm | गवि
टॅक्स वसुलीची अंमलबजावणी कडकपणे करणं हा सरळ पण अशक्य अवघड उपाय.. तो सर्वात मोठ्या उत्पन्नवाल्या मोठ्यांकडून लहानांकडे अशा प्राधान्याने व्हायला हवा.. खरंतर सर्वांकडून इक्वली, पण अगदीच शक्य नसेल तर आधी वरचा जास्त देय असलेल्यांचा, आणि मग खाली कमी आर्थिक स्तरावरचा.
आता हे जमत नसल्याने उगीच जे (आणि फक्त जेवढे) ऑलरेडी टॅक्स भरताहेतच, किंबहुना सोर्समधेच कापून घेतला जातोय त्या लोकांना अधिकाधिक भयभीती घालणार्या भेवडवणार्या जाहिराती आणि वसुलीचा आव आणला जातो.
आमचं तुमच्या व्यवहारावर लक्ष आहे. तुम्ही कार घेतलीत तर.. तुम्ही ढमुक मेंबरशिप घेतलीत तर.. तुम्ही फॉरेनटूर केलीत तर.. इ इ. या सर्व व्यवहारांकडे आमचं लक्ष आहे. बिग बॉस वॉचिंग..
अरे जिथे सहजच मिळते तिथे चिल्लर गोळा करण्यासाठीही भीती घालण्यापेक्षा कायदेशीर इच्छाशक्ती दाखवून थकबाकी वसुलीचं धाडस दाखवा की. कदाचित एकेका उद्योगातून वसुली एकेका शहरातल्या पगारी लोकांच्या एकूण टॅक्सइतकी होईल.
6 Apr 2016 - 2:30 am | उगा काहितरीच
काळ्या पैशाच्या बाबतीत एक अतिशय बेसीक(कदाचित फारच अडाणी) प्रश्न :
सरकारने छापलेल्या प्रत्येक नोटेचा माग का नाही ठेवता येत ? नोटेऐवजी कॕशलेस व्यवहाराला प्रोत्साहन देऊन सरकार पैशाचा माग ठेवू शकते ना ! मग अशा प्रकारे माग का नाही ठेवल्या जात? (मला वाटते सरकारला नेमकं माहीत असावं की नेमक्या किती नोटा छापल्या आणी किती नोटा बाजारात आहेत ? )
6 Apr 2016 - 3:06 am | आदूबाळ
काळा पैसा नगद स्वरूपातच असला पाहिजे असं नसतं. उदा - स्पेक्ट्रम तुमच्या नावे करतो, तुम्ही त्या मोबदल्यात क्ष कोटी रुपये ब्रिटिश व्हर्जिन आयलंडच्या बँक खात्यात जमा करा.
मग तो भारतात आणताना गोरा करायचे वेगळे मार्ग असतात.
6 Apr 2016 - 9:17 am | उगा काहितरीच
अच्छा !मी विदेशातील खात्यांचा विचार केला नव्हता. पण समजा "स्पेक्ट्रम तुमच्या नावे करतो, तुम्ही त्या मोबदल्यात क्ष कोटी रुपये SBI बँक खात्यात जमा करा." असे केले तर सरकार सरळ सरळ जाब विचारू शकते ना ?
6 Apr 2016 - 9:36 am | आदूबाळ
हो. म्हणूनच असं सहसा करत नाहीत. किंवा त्याचं स्वरूप बदलतात. उदा - हे टेंडर तुला देतो. त्याबदल्यात तुझ्या कंपनीने माझ्या बायकोला 'बागकाम सल्लागार' म्हणून नेमलं पाहिजे. मग एक दिवस साहेबांच्या बायकोचं इनवोईस येतं, रीतसर टीडीएस वगैरे कापून त्यांच्या (भारतीय) बँक अकाउंटमध्ये पैसे भरले जातात वगैरे.
6 Apr 2016 - 10:21 am | उगा काहितरीच
ओके , म्हणजे मी समजत होतो तितकं सोपं नाही आहे तर हे प्रकरण! :-(
6 Apr 2016 - 6:20 am | मदनबाण
पनामा फाईल्स हे सिलेक्टिव्ह लिक आहे.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ए सनम आँखों को मेरी खुबसुरत साज दे... :- रंगा पतंगा
6 Apr 2016 - 5:08 pm | 'पिंक' पॅंथर्न
सहमत.. अमेरीकेतील कुणाचेचं नावं नाही.
एवढे धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहेत का अमेरिकेतली मंडळी ???
6 Apr 2016 - 12:36 pm | झेन
इ-पैसा आणि आधार बहुतांश ठीकाणी अनिवार्य केल्यास काही परमाणात फरक पडेल, बाकी जग जवळ आल्याने फ्लॅट च्या विक्रीतील काही टक्के कोणत्या चलनात परदेषात देवू असे विचाणारे सुध्दा आपल्या अवती भवती असतातच
6 Apr 2016 - 6:46 pm | राघवेंद्र
शेल कंपनी कशी बनवायची आणि कशी चालते हे समजण्यासाठी या दोन पोड-कास्ट जरूर ऐका.
http://www.npr.org/sections/money/
Episode 390: We Set Up An Offshore Company In A Tax Haven
Episode 403: What Can We Do With Our Shell Companies?
6 Apr 2016 - 9:13 pm | त्रिवेणी
एक थोडा वेगळा प्रश्न मला पडला आहे.तसेही या विषयात मला गती नाही.
हा जो स्वछ भारत टैक्स आहे तो कुठे आणि कसा वापरला जाणार आहे?आणि आपल्याला कसे कळेल की x y z काम या टैक्स मधून झालीत.मग आपण जो प्रोपेर्टी टैक्स भरतो त्याचे काय.