मामाच्या पोरींना शिमग्याची भेट!

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जे न देखे रवी...
23 Mar 2016 - 10:48 pm

मामाच्या पोरींना शिमग्याची भेट!

माझ्या मामाला साडेचार पोरी
चार डोमड्या पण एक छोरी गोरी
या छोर्‍यांचं कौतूकं सांगू मी काय
ये माझे शिमगेमाय!

एक नुसताच लंबा बांबू
जणू हाडाचा उभारला तंबू
रक्ता-मासाचा बिल्कूल पत्ताच नाय
ये माझे शिमगेमाय!

एक भलतीच ऐसपैस
जणू पंजाबी मुऱ्हा म्हैस
डोलतडोलत रस्त्यानं चालत जाय
ये माझे शिमगेमाय!

एका छोरीचे फ़ुगलेले गाल
हवा भरलेले जणू फ़ूटबॉल
रोज वेणीला लावते हेअरडाय
ये माझे शिमगेमाय!

एक रुपानं बेलमांजर
बारीक डोळ्यात काजळाचे थर
पण स्वभाव गरीब गोगलगाय
ये माझे शिमगेमाय!

तिचा रुबाब भलताच न्यारा
खाकी रंगाचा लांडोरपिसारा
तिच्या वाटेला अभय तू जायाच नाय
ये माझे शिमगेमाय!

                       - गंगाधर मुटे ’अभय’
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

अभय-लेखनवाङ्मयशेतीकविता

प्रतिक्रिया

संजय पाटिल's picture

23 Mar 2016 - 11:38 pm | संजय पाटिल

आवडली...

गंगाधर मुटे's picture

2 Mar 2018 - 6:59 pm | गंगाधर मुटे

बोंबा ठोकण्यासाठी सर्वांना शिमग्याच्या हार्दिक शुभेच्छा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Mar 2018 - 12:55 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आवडली कविता.

-दिलीप बिरुटे

पैसा's picture

5 Mar 2018 - 11:49 am | पैसा

मजेशीर कविता!