ब्रेडचे तुकडे करुन घ्यावे
कान्दा बारीक चिरुन घ्यावे ,टोमाटो बारीक चिरुन घ्यावे
प्रथम कडईत तेल गरम करुन त्यात जीरे घाला.नन्तर थोडि कोथिम्बीर व कडीपत्ता घाला.
कान्दा लालसर तला.मग टोमटो घाला ,चविप्रमाने तीखट व मिठ घाला.
सगल्यात शेवटि ब्रेड्चे तुकडे घाला.व ५ मिनिटे वाफवुन घ्या.
टी वी पहात हा नाश्ता खावुन पाहा.
प्रतिक्रिया
16 Sep 2008 - 11:02 pm | विसोबा खेचर
आम्ही ह्याला पावाची भाजी किंवा फोडणीचा पाव असे म्हणतो...! :)
आपला,
(फोडणीप्रेमी) झानटामाटिक तात्या.
अवांतर - झानटामाटिक म्हण्जे काय देव जाणे! :)
16 Sep 2008 - 11:08 pm | प्राजु
एक मात्र नक्की की या साध्या रेसिपीला नाव मात्र भारी दिलं आहे तुम्ही.. ;)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
16 Sep 2008 - 11:20 pm | चकली
"टी वी पहात हा नाश्ता खावुन पाहा." - हे आवडले.
यात थोडे शेंगदाणे, चुरलेला पापड, आणि तिखटाऐवजी मिरची घालून एक छान वेरिएशन करता येते. त्याला झांटामाटीक भेळ म्हणता येईल !
चकली
http://chakali.blogspot.com
17 Sep 2008 - 12:53 am | भाग्यश्री
झांटामाटीक म्हणजे काय हो? अफलातून नाव आहे!
आम्हीही याला फोडणीचा ब्रेड म्हणतो.. टोमॅटो न घालता..कोथिंबीर चिरून व लिंबू पिळून घातलं की मस्स्स्त चव येते!
17 Sep 2008 - 1:00 am | विसोबा खेचर
आम्हीही याला फोडणीचा ब्रेड म्हणतो.. टोमॅटो न घालता..कोथिंबीर चिरून व लिंबू पिळून घातलं की मस्स्स्त चव येते!
करेक्ट! :)
17 Sep 2008 - 2:14 am | भडकमकर मास्तर
झानटामाटिक झानटामाटिक झानटामाटिक झानटामाटिक झानटामाटिक झानटामाटिक झानटामाटिक
फ़ार छान शब्द आहे म्हणायला...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
17 Sep 2008 - 2:31 am | चतुरंग
सराव चालू आहे का? नाही, सगळीकडे असले झानटामाटिक शब्द शोधत पुन्हापुन्हा म्हणून बघताय म्हणून म्हणलं! ;)
(खुद के साथ बातां : रंग्या, बेताने बोल दात घशात घालतील. ते दाडॉ आहेत! ;)
चतुरंग
17 Sep 2008 - 3:05 pm | चंबा मुतनाळ
मास्तरांनी बहुतेक बिन दातांच्या बालकांसाठी पाळणाघर सुरु केले असावे!! (ह. घ्यावे) :D
17 Sep 2008 - 3:42 pm | विनायक प्रभू
http://vipravani.wordpress.com/
काय पण एकेक क्रिप्टीक शब्द. को़क्णीत ह्याचा अर्थ भलताच डेंजर आहे.
वि.प्र.
17 Sep 2008 - 3:50 pm | मनस्वी
नाव आवडले! एकदम झानटामाटीक आहे!
मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
17 Sep 2008 - 4:21 pm | विसोबा खेचर
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
का? पण देवानंदात काय वाईट आहे? :)
त्यानेही आपले अवघे आयुष्य हिंदी चित्रपटसृष्टीत कलेची सेवा करण्यातच घालवले आहे ना?
नाही, विवेकानंद हे वंदनीयच आहेत व त्यांचे मोठेपणाची आम्हास कल्पना आहेच, पण ते मोठे आहेत म्हणून देवानंद छोटा आहे आणि कुणी त्याच्यासारखे होऊच नये की काय?
शिवाय, केस वाढवले म्हणजे देवानंदाचे विचार वाढलेले नाहीत असे थोडेच आहे? :)
आपला,
(देवानंदप्रेमी) झानटामाटिक तात्या.
17 Sep 2008 - 4:27 pm | मनस्वी
नाही हो तात्या! जालावर फिरताना सुविचार दिसला. अंमळ मजेशीर वाटला. देवआनंद हा तर माझा आवडता नट आहे.
पण फार दिवस झाले.. आता बदलायला हवा सुविचार!
मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
17 Sep 2008 - 7:54 pm | छोटा डॉन
जाऊ द्या हो तात्या ...
हा टोला डायरेक्ट "आम्हालाच" आहे.
बाकी ते देवानंद आणि विवेकानंद फक्त निमित्तमात्र आहे, काय म्हणतात ना ते " तीर कई सारे है, निशाना सिर्फ हम है" ..
असो. खुप "झानटामाटिक" विषयांतर झाले नाही ...
अंमळ जास्तच केस वाढवणारा - झानटमाटिक छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
17 Sep 2008 - 3:51 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
एक नंबर शब्द, अगदी भगवंतास्टीक हो या पाकृसाठी!
23 Sep 2008 - 7:46 pm | लिखाळ
तात्यांनी आता जो लेख टाकला त्यावरुन शोध घेता झानटामाटिकचा उगम सापडला.
मस्त आहे शब्द :) अर्थ काय याचा?
--लिखाळ.