ओवेसिंचा गळा

साहना's picture
साहना in काथ्याकूट
17 Mar 2016 - 3:24 pm
गाभा: 

ओवेसी ह्यांची भाषणे मी पहिली आहेत आणि हि व्यक्ती अतिशय अभ्यासू आहे ह्यांत शंकाच नाही.

जेव्हा नक्षलवादी हल्ला करतांत तेंव्हा सगळे म्हणतात कि "we must encoruage naxalites to join mainstream and solve problem democratically ". माझ्या मते ओवेसी सारखा कट्टर मुसलमान संसदेत असणे हि चांगली गोष्ट असून त्याला योग्य तो मान इतरांनी दिला पाहिजे, मन व्यक्तीला असून त्याच्या विचारणा किमत देण्याची गरज नाही. जर संसदेत त्याला बोलायला दिले नाही किंवा जेल मध्ये डांबले तर त्याच्या सारख्या कट्टर लोकांपुढे कायद्याच्या बाहेर जावून आपल्या भावना लोकंवर लादणे हा एकाच पर्याय बाकी राहतो. माझ्या मते ओवेसी म्हणजे एक नक्सल type माणूस आहे ह्याने शस्त्र घेण्याच्या नादात न पडता लोकशाही मार्गाने आपले विचार आणि धोरण प्रकट करण्याचा मार्ग अवलंबला आहे. आणि तो स्तुत्य आहे.

कोन्ग्रेस पार्टी मध्ये हिंदुना जेंव्हा दुय्यम वागणूक मिळत होती तेंव्हा संघा कडे दोन पर्याय होते, लोकशाही मार्गाने पार्टी उभी करून निवडणूक जिंकणे आणि किंवा कायद्याच्या बाहेरून काही तरी भानगडी करणे (उद रामसेना). जे लोक संघाला कट्टर वगैरे समजतात खरे तर त्यांनी संघाच्या निर्णयाचे स्वागत करायला पाहिजे कारण त्यांनी खडतर पण अ-हिंसक मार्ग स्वीकारला. संघाला खरे तर शांततेचा नोबेल मिळायला पाहिजे.

त्याच प्रमाणे मराठी माणसाच्या मनात कोन्ग्रेस विषयी द्वेष आणि स्वता विषई अन्यायाची भावना निर्माण झाली तेंव्हा बाळासाहेब ठाकरे ह्यांनी पक्ष उभारून कोन्ग्रेस ला माती चारली. कायद्याच्या बाहेर जावून ठोकशाही करत त्याना स्वताचे साम्राज्य निर्माण करता आले असते पण त्यांनी सुद्धा खडतर मार्ग पत्करला. शिवसेनेने भलेही अनेक वेळा कायदा तोडला असेल पण तरी सुद्धा काही बेसिक तारतम्य त्यांनी सांभाळले होतेच.

माझ्या मते कट्टरपंथी लोकांनी निवडून येवून संसदेत, वर्तमान पत्रांत इत्यादी आपले कट्टर विचार प्रकट करणे हि चांगली गोष्ट असून त्यात वायीत काहीच नाही उलट संसंद हि त्याच साठी बनवली गेली आहे.

उद्धव ठाकरे ह्यांचे "गळा कापावा" वगैरे बोल केवळ अलंकारिक स्वरूपाचे असावेत असे मला वाटते.

प्रतिक्रिया

ठाणे व मुंबईतील काही ठराविक भाग सोडले तर सेनेला महाराष्ट्रात कोणीही ओळखत नव्हते. भाजपमुळेच महाराष्ट्रात शिवसेनेची वाढ झाली आहे.

चुकीची समजूत आहे. मुंबई पुण्यात बसून केलेला हा विचार आहे.
मी तुम्हाइतकी डिटेल्ड आकडेवारी नाही देऊ शकणार, वादविवादही करु शकणार नाही पण मराठवाडा अन त्याला लगत असलेला प. महाराष्ट्र व इतर भागात लहानपणापासून गावोगावी शिवसेनचे बोर्ड पाहतोय. भाजपाचा एखाद दुक्का कार्यकर्ता असायचा. शिवसेनेच्या बर्‍याच कट्टर शिवसैनिकांमुळे काँन्ग्रेसला/राश्ट्रवादीला अरेला कारे करणारा पर्याय मिळाला. अशी साथ युतीला मिळाल्याने सर्व महाराष्ट्रात भाजप पाय रोवू शकला. नाहीतर नुसत्या तत्वांवर राष्ट्रवादी/काँ शी निवडणुकी लढत घेण्याची एकट्या भाजपाची ताकतच नव्हती.

तर्राट जोकर's picture

18 Mar 2016 - 2:08 pm | तर्राट जोकर

सहमत.

पुण्यामुंबईतली शिवसेना आणि गावाखेड्यातली शिवसेना ह्यात खूप फरक आहे. भाजप शिवसेनेच्या खांद्यावर बसून आयत्या बिळावर नागोबा झाला.

श्रीगुरुजी's picture

18 Mar 2016 - 3:17 pm | श्रीगुरुजी

वस्तुस्थिती बरोब्बर उलट आहे. भाजप हा जन्मापासूनच सेनेपेक्षा जास्त जनाधार असलेला पक्ष होता. २०१४ मध्ये हे पुन्हा एकदा सिद्ध झालं इतकंच.

नाना स्कॉच's picture

18 Mar 2016 - 3:43 pm | नाना स्कॉच

दगडाचा जनाधार!!

मधे ते खुळ काढले होते मिसकॉल द्या अन भाजप मेंबर व्हा! कश्यात काय नाय तर आमच्या नाक्यावर बसणाऱ्या राष्ट्रवादी अन काँग्रेस च्या टग्याना सुद्धा "congratulations" चे मॅसेज आले होते ऑटोमेटेड बीजेपी कडून मेंबर झाल्याबद्दल! अन जनाधार जनाधार कसला सांगताय, किती टक्के मते आली लोकसभेत, बरं ते ही सोडा, जितकी मते मिळाली आहेत ती फ़क्त अन फ़क्त नमो नामक एका सशक्त पर्यायाला मिळाली आहेत! जनाधार होता तर 13 दिवसात सरकार का पडले होते? अन 99 मधेही स्वबळावर का नाही येता आले!? पुर्ण बहुमत यायला 2014 का उजाडावे लागले??

शिवसेना वॉज सेना!! जोवर साहेब होते! नंतर असोच!!

बोका-ए-आझम's picture

18 Mar 2016 - 3:57 pm | बोका-ए-आझम

शिवसेना ही गुंडांनी, गुंडांची आणि गुंडांसाठी चालवलेली संघटना होती आणि आहे. तिला भाजपबरोबर आल्यावर जरा संभावित चेहरा मिळाला. बाकी युती तुटल्यावर शिवसेनेने रंग दाखवलेच की. एवढा जर जनाधार होता शिवसेनेचा तर जेमतेम ६० जण कसे काय निवडून आले? मुंबई महानगरपालिका या एका गोष्टीच्या जोरावर सेनेची मिजास आहे. एकही महत्त्वाचा portfolio नाही, ना राज्यात ना देशात. खिशात नाही आणा तरी बाबुराव म्हणा अशी सेनेची गत आहे. एकदा मुंबई महानगरपालिका हातून गेली की मग सेना किती पाण्यात आहे ते कळेलच.

श्रीगुरुजी's picture

18 Mar 2016 - 5:14 pm | श्रीगुरुजी

+ १

मुंबई महापालिका देखील निव्वळ भाजपच्या मदतीने सेनेच्या ताब्यात आहे. महापालिकेच्या २२८ जागांपैकी २००२ मध्ये शिवसेनेने १००, २००७ मध्ये ८४ आणि २०१२ मध्ये ७५ जागा मिळविल्या. म्हणजे एकदाही पूर्ण बहुमत नाही. भाजपने अनुक्रमे ३२, २८ व २९ जागा मिळविल्याने सेनेचा महापौर होऊ शकला. भाजपने खांद्यावर घेतले नसते तर सेना मुंबईत सत्तेवर येऊ शकली नसती. अगदी १९८५ मध्ये सुद्धा सेनेला १७५ पैकी ७४ जागाच होत्या. २०१७ मध्ये भाजप व सेना एकमेकांविरूद्ध लढले तर सेना नक्कीच ५० च्या खाली उतरेल. कल्याण-डोंबिवली, ठाणे इ. महापालिकेत देखील सेनेला स्वतःला पूर्ण बहुमत नाही. सर्व ठिकाणी भाजपच्या मदतीने महापौर निवडून आणलेला आहे.

कपिलमुनी's picture

19 Mar 2016 - 3:10 pm | कपिलमुनी

सध्या राज्याला लागू होतो का ?

भाजपने खांद्यावर घेतले नसते तर सेना मुंबईत सत्तेवर येऊ शकली नसती

शिवसेनेने खांद्यावर घेतले नसते तर भाजप राज्यात सत्तेवर येऊ शकले नसता

बोका-ए-आझम's picture

19 Mar 2016 - 3:55 pm | बोका-ए-आझम

भाजपने सरकार आधी स्थापन केलं. विश्वासदर्शक ठरावही सहमत झाला. तेव्हा सेना विरोधी पक्षात होती. राष्ट्रवादीने न मागता पाठिंबा दिला होता. नंतर सेना अलगद सरकारमध्ये आली कारण ५ किंवा जी काही असतील तेवढी वर्षे विरोधात बसायची सेनेची तयारी नव्हती. त्यामुळेच सेना भले तडजोड करुन का होईना पण सरकारमध्ये आली. सरकारमध्ये राहण्याची गरज सेनेला जास्त आहे म्हणूनच तर केंद्रात फक्त एक मंत्रिपद आणि राज्यात बिनमहत्त्वाची मंत्रिपदं असूनसुद्धा सेना आज सरकारमध्ये का आहे? आणि तरी तुम्ही म्हणताय सेनेने खांद्यावर घेतलं नसतं तर भाजप सत्तेवर येऊ शकला नसता?

तर्राट जोकर's picture

19 Mar 2016 - 4:05 pm | तर्राट जोकर

मुंबैत सेना-भाजपच्या जागा अशा

१०० | ३२
८४ | २८
७५ | २९

असे असतांना भाजपाने सेनेला खांद्यावर घेतले अशी भाषा जर गुरुजी वापरतात तर तेव्हा तीच भाषा सेनेसाठी वापरली तर बिघडले कुठे. मुळात सेनेशिवाय भाजप सरकार आले असते काय हा प्रश्न आहे

श्रीगुरुजी's picture

19 Mar 2016 - 5:43 pm | श्रीगुरुजी

मुंबईत महापालिका निवडणुकीत भाजपचा पाठिंबा नसता तर शिवसेनेचा महापौर होऊच शकला नसता.

याउलट २०१४ मध्ये शिवसेना विरोधात असूनही भाजपने सरकार स्थापन केले होते. सेनेशिवाय भाजपचे सरकार आलेलेच होते. सेनेतील अंतर्गत दबावामुळे व सत्तेसाठी अत्यंत कासावीस झाल्याने सेनेला शेवटी मिळेल ती बिनमहत्त्वाची मंत्रिपदे स्वीकारून सत्तेत यावे लागले.

तर्राट जोकर's picture

19 Mar 2016 - 6:56 pm | तर्राट जोकर

विश्वास प्रस्तावाला सामोरे जायची काय तयारी होती?

बोका-ए-आझम's picture

19 Mar 2016 - 7:37 pm | बोका-ए-आझम

यावरून कळतंच ना की तयारी होती. कसं आहे - विरोधच करायचा आणि वस्तुस्थितीकडे पूर्ण दुर्लक्ष करणं हे आता तुमच्या अंगवळणी पडलेलं आहे. त्यामुळे असले प्रश्न अपेक्षित आहेत. त्याने वस्तुस्थिती बदलत नाही.

तर्राट जोकर's picture

19 Mar 2016 - 8:08 pm | तर्राट जोकर

इथे विरोध काय केलाय ते सांगाल काय जरा? ऐकुन घेतोय म्हणुन आता तुम्ही वाट्टेल ते बोलणार आहात काय?

श्रीगुरुजी's picture

19 Mar 2016 - 7:53 pm | श्रीगुरुजी

विश्वास प्रस्ताव जिंकलेला होता. याविषयी सविस्तर चर्चा एका धाग्यात झालेली आहे. त्यावेळी तुम्ही मिपावर नव्हता.

समजा भाजपकडे बहुमत नाही/नव्हते असा शिवसेनेसकट सर्व विरोधी पक्षांचा विश्वास होता/आहे, तर आजतगायत अविश्वास ठराव का मांडलेला नाही? शिवसेना एक-दीड महिना विरोधी पक्षनेतेपद उपभोगत होती. त्या काळात तरी अविश्वास ठराव मांडता आला असता. त्या काळात जेव्हा सुरवातीच्या काळात सभापतींची निवड होणार होती, तेव्हा राणा भीमदेवी थाटात घोषणा करून शिवसेनेने सभापतीपदासाठी आपला उमेदवार दिला होता. जर भाजपकडे बहुमत नसते तर शिवसेनेचा उमेदवार सभापतीपदी निवडून आला असता. ते न करता शिवसेनेने आयत्यावेळी आपला उमेदवार मागे घेतला. त्यामागे सभापतींची निवड बिनविरोध करण्याचा उद्देश होता का सभापतीपदाच्या निवडणुकीच्या मतदानात आपल्याच पक्षाची मते फुटतील याची भीति होती हे ज्याने त्याने शोधून काढावे.

तर्राट जोकर's picture

19 Mar 2016 - 7:51 pm | तर्राट जोकर

गुरुजी, भाजपा सोडुन तुमच्या लेखी सगळ्या पार्ट्या कःपदार्थ, सत्तेला चटावलेले, सत्तेसाठी कासावीस होणारे, शय्यासोबत वैगरे करणारे असेच आहेत का?

श्रीगुरुजी's picture

19 Mar 2016 - 7:54 pm | श्रीगुरुजी

सगळ्या पार्ट्या?

अभ्या..'s picture

19 Mar 2016 - 7:57 pm | अभ्या..

राजकीय पक्ष असे असावे ते.
प्रश्न माझा नसला तरी प्रश्नाचे उत्तर मलाही हवेय.

तर्राट जोकर's picture

19 Mar 2016 - 8:11 pm | तर्राट जोकर

हो राजकिय पक्षच. सरळ प्रश्नावर फाटे फोडणारा क्षुल्लक प्रश्न विचारुन गुरुजींनी उत्तर टाळले असं दिसतंय.

श्रीगुरुजी's picture

19 Mar 2016 - 8:22 pm | श्रीगुरुजी

फार व्यापक प्रश्न आहे. एकतर सगळ्या पक्षांचा विचार करायचा (भारतात ७०० हून अधिक नोंदणी झालेले राजकीय पक्ष आहेत) आणि तो पक्ष भाजपच्या तुलनेत कःपदार्थ आहे का, सत्तेला चटावलेला आहे का, सत्तेसाठी कासावीस झालेला आहे का, सत्तेसाठी कोणासोबतही शय्यासोबत करतो का ई. निकषांवर त्या पक्षाचा अभ्यास करून प्रतिसाद लिहायचा. फार मोठे काम आहे. जमलं तर लिहितो.

तर्राट जोकर's picture

19 Mar 2016 - 8:34 pm | तर्राट जोकर

सगळ्या सोडा हो, ज्यांच्या बद्दल आजवर तुमच्या प्रतिसादांमधून लिहलंय त्यांच्याबद्दल अभ्यास करुनच असले शब्द वापरत असाल ना? तेवढ्यांचंच सांगितलं आता तरी चालेल.

श्रीगुरुजी's picture

20 Mar 2016 - 12:36 pm | श्रीगुरुजी

आधी म्हणालात सगळ्या पार्ट्या आणि आणि आता म्हणताहात सगळ्या सोडा हो. एकदा नक्की काय ते ठरवा.

तर्राट जोकर's picture

20 Mar 2016 - 1:06 pm | तर्राट जोकर

गोल गोल फिरणे सोडा. विचारलेला प्रश्न काय आहे ते तुम्हाला कळलाय, उत्तर तर स्पष्ट आहे. कबूल करायला फक्त आढेवेढे घेणं चाललंय. ठिक आहे. तुम्हाला हौसच आहे तर घ्या हा सुधारित प्रश्न.

तुमच्या प्रतिसादांतून भाजप सोडून दुसर्‍या राजकिय पक्षांच्या सत्ताकारणाबद्दल तुम्ही उल्लेख करता तेव्हा सत्तेसाठी कासावलेले, शय्यासोबत करणारे, उतावीळ झालेले, असले तुच्छतादर्शक शब्द वापरता, तेव्हा तुम्ही उल्लेख करता ते सर्व पक्ष सत्तेसाठी हपापलेले, कासावीस झालेले, शय्यासोबत करणारे आहेत पण भाजप तसा नाही असे तुम्हाला म्हणायचे असते का? तसे असेल तर मग केवळ भाजप जनतेवर उपकार केल्यासारखे राजकारण करतो, केवळ भाजपच जनतेच्या भल्यासाठी सत्ताकारण, सत्ता स्थापना करतो असे आहे काय?

ह्या प्रश्नाचे उत्तरावर बरंच अवलंबून असणार आहे. त्यामुळे उत्तर द्याल अशी आशा करतो. अनावश्यक प्रतिप्रश्न टाळाल तर खरंच उपकार होतील.

श्रीगुरुजी's picture

20 Mar 2016 - 1:17 pm | श्रीगुरुजी

मूळ धाग्याचा आणि या प्रश्नाचा सुतराम संबंध नाही. इथे उत्तर देत बसलो तर मूळ विषय पूर्णपणे भलतीकडेच भरकटेल. तसे होऊ नये म्हणून या विशिष्ट विषयावर एक वेगळा धागा काढा. तिथे सविस्तर उत्तर देईन.

तर्राट जोकर's picture

20 Mar 2016 - 1:21 pm | तर्राट जोकर

हो अथवा नाही एवढंच उत्तर अपेक्षित आहे. तेवढं द्या. त्यावर पुढे एकही प्रश्न या धाग्यावर यानंतर तुम्हाला विचारणार नाही. बाकी दिलेल्या उत्तराच्या स्पष्टीकर्णासाठी तुम्हाला धागा काढायचं स्वातंत्र्य आहे.

श्रीगुरुजी's picture

20 Mar 2016 - 1:39 pm | श्रीगुरुजी

उत्तर तयार आहे. पण ते याच धाग्यावर द्यावे का याविषयी साशंक आहे. कारण त्या उत्तरावरून पुढे अनेक प्रतिसादांची मालिका सुरू होईल व त्यामुळे मूळ विषय भरकटेल. आणि पुढील प्रतिसादांना उत्तर देण्याचे टाळले तर मला कसे गप्प केले किंवा मी या धाग्यावरून काढता पाय घेतला असे प्रतिसाद यायला लागतील. म्हणजे उत्तर दिले तर धागा भरकटतो आणि नाही दिले तर मी पळून गेलो असे गैरसमज होतील. त्यापेक्षा एक वेगळा धागा काढा. तिथे सविस्तर उत्तर देतो.

तर्राट जोकर's picture

20 Mar 2016 - 2:21 pm | तर्राट जोकर

भरकटला तर काय फरक पडतो गुरुजी, तसेही ओवेसीच्या वक्तव्यावरच्या धाग्यावर शिवसेना-भाजपच्या ताकदीबद्दल बरेच भरकटणं झालंच आहे. त्यात अजुन थोडी भर. जर इथे नसेलच द्यायचे उत्तर तर, तुम्हाला कोणी उत्तर देण्यापासून पळाले, गप्प बसले असे म्हणू नये असे वाटत असेल तर, तुम्हीच हा प्रश्न आणि त्यावर तुमचे उत्तर असा धागा काढा, मिपाला काही नविन नाही हा प्रकार. उत्तर द्यावे की नको, कुठे द्यावे, कसे द्यावे ह्याचे तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य आहे. प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा नाही जितके उत्तर देणे न देणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे मी धागा काढण्यापेक्षा तुम्हीच काढलेला संयुक्तिक व उचित ठरेल. शेवटी उत्तर महत्त्वाचे, इथे काय अन् कुठे काय.

श्रीगुरुजी's picture

20 Mar 2016 - 5:58 pm | श्रीगुरुजी

मूळ लेखातच शिवसेनेचा उल्लेख होता. त्यावर एक प्रतिसाद आल्यावर प्रतिसादांची मालिका सुरू झाली. तुमच्या प्रश्नांचा आणि मूळ लेखाच्या विषयाचा संबंध नाही. त्यामुळे त्यावर इथे उत्तर देणे प्रशस्त वाटत नाही. अर्थात तुम्हाला माझ्या उत्तराची उत्सुकता आहे असं दिसतंय. माझ्याकडे उत्तर तयार आहे. त्यामुळे या धाग्याऐवजी वेगळ्या ठिकाणी उत्तर देईन.

तर्राट जोकर's picture

20 Mar 2016 - 6:27 pm | तर्राट जोकर

उत्तर तयार आहे हे उत्तर नाही. त्यामुळे हा धागा काय किंवा न्वीन धागा काय, उत्तर द्यायची गरज तुम्हाला आहे. अन्य्था तुम्ही उत्तर देण्यापासून पळताय असाच अर्थ निघेल.

श्रीगुरुजी's picture

20 Mar 2016 - 7:34 pm | श्रीगुरुजी

तुम्ही कसाही अर्थ काढा. तुमच्या प्रश्नाचे उत्तर द्यायची ही जागा नाही.

तर्राट जोकर's picture

20 Mar 2016 - 7:48 pm | तर्राट जोकर

तुम्ही उत्तर देत नाही आहात हे सत्य आहे. दिले तर ते (श्रीगुरुजींनी उत्तर दिले) सत्य असेल. नाही दिले तर ते (श्रीगुरुजींनी पलायन केले) सत्य असेल. तीनपैकी कोणते सत्य कायम ठेवायचे ह्याचे तुम्हाला स्वातंत्र्य आहे. मी काय अर्थ काढतो ह्याच्याशी काय घेणे-देणे मूळ प्रश्नाचे?

श्रीगुरुजी's picture

20 Mar 2016 - 10:32 pm | श्रीगुरुजी

मी उत्तर देणार आहे, पण ते या धाग्यावर नाही. मुळात मूळ प्रश्नाचाच धाग्याशी काहीही संबंध नाही, त्यामुळे तुम्ही काय अर्थ काढत आहात याने मला फरक पडत नाही.

उत्तर तयार आहे हे उत्तर नाही. त्यामुळे हा धागा काय किंवा न्वीन धागा काय, उत्तर द्यायची गरज तुम्हाला आहे. अन्य्था तुम्ही उत्तर देण्यापासून पळताय असाच अर्थ निघेल.

तुमचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. धाग्याशी संबंध नसलेला प्रश्न तुम्ही मला विचारलात आणि वारंवार उत्तर द्या, उत्तर द्या असे मागे लागला आहात. उत्तर ऐकण्याची गरज तुम्हाला आहे, उत्तर देण्याची मला गरज नाही. काय उत्तर द्यायचे, कधी उत्तर द्यायचे, कोणत्या धाग्यावर उत्तर द्यायचे, उत्तर द्यायचे का नाही हे मी ठरविणार.

अभ्या..'s picture

20 Mar 2016 - 10:57 pm | अभ्या..

अग घे ना नाव
नको बाई
अग घे ना
लाज वाटते बाई
अग घे ना
सगळ्या जणीत नको ना
अग घे ना
तू घे बाई आधी
इश्श लाज वाटते बाई
अग घे ना आता
नको गं बाई
मगाशी मला आग्रह करत होतीस की
अग ते वेगळे ग बाई
मग घे बरे
आधी तू घे
बघ हं
हो हो
बघ हं. परत म्हणायचं नाही
अग घे गं
नीट एकायचं हं
हो ग बाई. घे तर.
कसंय?
काय?
उखाणा?
कधी घेतला?
तू एकला नाही?
नाही?
शी बाई. परत परत नाही आता.

तर्राट जोकर's picture

20 Mar 2016 - 11:02 pm | तर्राट जोकर

असं कसा संबंध नाही? मुळ धाग्यात तर भाजपचा भ सुद्धा नाही तरी आपण इथे भाजपची आरती वोवाळायला प्रतिसादामागे प्रतिसाद टंकत गेले. सेनेपेक्षा भाजप कसा भारी हेच ह्या धाग्यावर तुम्ही सांगत आहात. भाजप ह्या पक्षाची ह्या धाग्यावर भलामण करत आहात. कोणी भाजपविरूद्ध बोलले तर त्याला आकडेवारी निशी उत्तर देत आहात. तुमचे ह्या धाग्यावरचे सगळे प्रतिसाद फक्त भाजपशीच संबंधित आहेत, फक्त भाजपबद्दलच आहेत. मूळ धाग्यातल्या मूळ विषयाबद्दल एक अक्षरही आपण ह्या धाग्यावरच्या कुठल्याच प्रतिसादात टंकलेले नाही. परत एकदा आठवण करुन देतो, चेक करा. मूळ धाग्यात भाजपबद्दल काहीच नव्हते. तरी आपण इथल्या चर्चेत भाग घेऊन भाजपचे गुणगान केले. तुम्ही ह्या धाग्याचा वापर भाजपचा प्रचार करण्यासाठी करत आहात.

भाजपला मोठं दाखवण्यासाठी तुम्ही शिवसेनेसाठी सत्तेसाठी कासावीस झाले असा तुच्छतादर्शक शब्दसमुच्चय वापरला. आता माझा प्रश्न त्या तुमच्या ह्याच धाग्यावरल्या प्रतिसादावर आहे. इतर अनेक ठिकाणी तुम्ही अशाच प्रकारची टिप्पणी करत आहात ह्याचा संदर्भ दिलाय.

श्रीगुरुजी's picture

20 Mar 2016 - 11:23 pm | श्रीगुरुजी

मुळ धाग्यात तर भाजपचा भ सुद्धा नाही तरी आपण इथे भाजपची आरती वोवाळायला प्रतिसादामागे प्रतिसाद टंकत गेले.

परत एकदा आठवण करुन देतो, चेक करा. मूळ धाग्यात भाजपबद्दल काहीच नव्हते.

तुम्ही मूळ लेख वाचलेला दिसत नाही म्हणूनच हे लिहिलेले दिसते.

खालील परिच्छेद वाचा. या परिच्छेदात भाजपच्या पूर्वावताराचा म्हणजेच जनसंघाचा अप्रत्यक्ष उल्लेख आहे.

कोन्ग्रेस पार्टी मध्ये हिंदुना जेंव्हा दुय्यम वागणूक मिळत होती तेंव्हा संघा कडे दोन पर्याय होते, लोकशाही मार्गाने पार्टी उभी करून निवडणूक जिंकणे आणि किंवा कायद्याच्या बाहेरून काही तरी भानगडी करणे (उद रामसेना). जे लोक संघाला कट्टर वगैरे समजतात खरे तर त्यांनी संघाच्या निर्णयाचे स्वागत करायला पाहिजे कारण त्यांनी खडतर पण अ-हिंसक मार्ग स्वीकारला. संघाला खरे तर शांततेचा नोबेल मिळायला पाहिजे.

हाही परिच्छेद वाचा. इथे तर शिवसेनेचा स्पष्ट उल्लेख आहे.

त्याच प्रमाणे मराठी माणसाच्या मनात कोन्ग्रेस विषयी द्वेष आणि स्वता विषई अन्यायाची भावना निर्माण झाली तेंव्हा बाळासाहेब ठाकरे ह्यांनी पक्ष उभारून कोन्ग्रेस ला माती चारली. कायद्याच्या बाहेर जावून ठोकशाही करत त्याना स्वताचे साम्राज्य निर्माण करता आले असते पण त्यांनी सुद्धा खडतर मार्ग पत्करला. शिवसेनेने भलेही अनेक वेळा कायदा तोडला असेल पण तरी सुद्धा काही बेसिक तारतम्य त्यांनी सांभाळले होतेच.

नंतर या प्रतिसादात प्रथमच शिवसेनेच्या उल्लेखासंदर्भात सर्वसाक्षी यांनी उत्तर दिले व त्यानंतर शिवसेना-भाजपचा संदर्भ असलेल्या प्रतिसादांची मालिका सुरू झाली.

शिवसेना-भाजप संबंधित प्रतिसादाची सुरूवात मी केलेली नाही. ज्यांनी केली त्यांच्याकडे स्पष्टीकरण मागावे ही नम्र विनंती.

कोणी भाजपविरूद्ध बोलले तर त्याला आकडेवारी निशी उत्तर देत आहात.

मी आकडेवारी देऊनच बोलतो. दुसर्‍यांच्या नावाने खोटे खपवित नाही.

भाजपला मोठं दाखवण्यासाठी तुम्ही शिवसेनेसाठी सत्तेसाठी कासावीस झाले असा तुच्छतादर्शक शब्दसमुच्चय वापरला. आता माझा प्रश्न त्या तुमच्या ह्याच धाग्यावरल्या प्रतिसादावर आहे. इतर अनेक ठिकाणी तुम्ही अशाच प्रकारची टिप्पणी करत आहात ह्याचा संदर्भ दिलाय.

कासावीस होणे हा अत्यंत योग्य व संसदीय शब्द आहे. त्यात तुच्छतापूर्ण काहीही नाही. मराठी वृत्तपतातून, नियतकालिकातून, लेखनातून हा शब्द अगदी सहज वापरला जातो. त्याबद्दल कोणीही कधीही आक्षेप घेतलेला नाही. बादवे, शिवसेनेपेक्षा भाजप मोठा आहेच हे वेगळे सांगायला नकोच.

बोका-ए-आझम's picture

19 Mar 2016 - 8:39 pm | बोका-ए-आझम

जशी कुठलीही कंपनी ही फायद्याकरता काम करते तसंच कुठलाही राजकीय पक्ष हा सत्तेकरता काम करतो. लोकांची कामं निरपेक्ष हेतूने करणं हे समाजकारण आहे. राजकीय सत्तेसाठी ते करणं हे राजकारण आहे. सगळेच पक्ष ते करतात. याचा अर्थ सगळेच सत्तेसाठी हपापलेले (तुमचा शब्द) किंवा उत्सुक (माझा शब्द) असतात. तसे जर नसतील तर ते राजकीय पक्षच नव्हेत. त्यामुळे भाजप किंवा इतर कुठलाही पक्ष हा सत्तेसाठी हपापलेला असतोच. त्यात चुकीचं काहीही नाही. जसा देव भावाचा भुकेला तसा पक्ष सत्तेचा भुकेला. आता ही सत्ता कुठला पक्ष कशा पद्धतीने राबवतोय त्यात फरक असणारच. ती पद्धत आवडणारे आणि नावडणारेही असणारच. सत्तेसाठी राजकीय पक्ष कोलांट्याउड्या मारतात, कारण सत्तेमध्ये असल्यामुळे जे फायदे मिळतात त्याची भुरळ प्रत्येकाला पडते.

तर्राट जोकर's picture

19 Mar 2016 - 9:26 pm | तर्राट जोकर

हा प्रश्नच काय हो, समग्र तर्राट जोकरच चुकीचा आहे व नेहमीच असतो. असो.

सत्तेसाठी हपापलेले हा शब्द मी कुठेही वापरलेला नाही त्यामुळे तुमचा शब्द असे म्हणुन माझ्या तोंडी कोंबण्याची पत्रकारी कोलांटीउडीची गरज नाही. मी विचारलेल्या प्रश्नात गुरुजी इतर पक्षाम्साठी जे शब्द वापरतात ते आहेत. गुरुजींच्या प्रतिसादांमधे भाजप सोडुन दुसर्‍या पक्षांच्या सत्ताकारणासाठी असले शब्द वापरलेले बघितले आहेत. जर सगळे पक्ष सत्ताकारणासाठी झटतात तर सर्वांना समान न्याय व आदर दिला पाहिजे. शय्यासोबत, कासावीस होणे, इत्यादी शब्द इतर पक्षांबद्दल वापरतांना मात्र भाजप जणू जनतेवर उपकार केल्यासारखे सत्ताकारण करतोय असा आविर्भाव असणे दुटप्पीपणा आहे. गुरुजींना भाजप प्रिय असेल तो असो, पण असे तुच्छता दर्शवणारे शब्द इतर राजकिय पक्षांबद्दल वापरण्याबद्दल इथे फार विरोध होतांना दिसला नाही. ज्याने विरोध केला त्यालाच कॉर्नर करणे मात्र बघितले आहे.

गुरुजी, भाजपा सोडुन तुमच्या
तर्राट जोकर - Sat, 19/03/2016 - 19:51
गुरुजी, भाजपा सोडुन तुमच्या लेखी सगळ्या पार्ट्या कःपदार्थ, सत्तेला चटावलेले, सत्तेसाठी कासावीस होणारे, शय्यासोबत वैगरे करणारे असेच आहेत का?

तुमचे शब्द हे आहेत. मी तुमच्या तोंडी हपापलेला असा पुष्कळ चांगला शब्द टाकला होता. ज्याचा अर्थ साधारणपणे तुम्ही जे इथे म्हणाला आहात तोच होतो.

श्रीगुरुजी's picture

20 Mar 2016 - 1:04 pm | श्रीगुरुजी

यातला कःपदार्थ शब्द मी एखाद्या पक्षाच्या बाबतीत वापरलेला नाही. सत्तेला चटावलेले असा शब्द देखील वापरल्याचे माझ्या स्मरणात नाही.

तर्राट जोकर's picture

20 Mar 2016 - 1:14 pm | तर्राट जोकर

जे शब्द वापरले, वापरता त्याबद्दल बोला मग. रडीचे डाव बंद करा. वेड पांघरुन पेडगावला जाताय.

तर्राट जोकर's picture

20 Mar 2016 - 1:13 pm | तर्राट जोकर

प्रश्नाचा मतितार्थ कळतोय ना? त्याबद्दल बोला. विचारलेल्या प्रश्नाचं गांभिर्य अनावश्यक फाटे फोडुन कमी होणार नाही हे लक्षात असु द्या. थेट प्रश्नाला थेट उत्तर द्यायचे सोडून असे रडीचे डाव खेळणे योग्य नाही.

बोका-ए-आझम's picture

21 Mar 2016 - 12:18 am | बोका-ए-आझम

समग्र तर्राट जोकरच चुकीचा आहे व नेहमीच असतो

हे तुम्हीच कबूल केल्यामुळे आता तुम्हाला उत्तरं द्यायला कोणीही बांधील नाही.

तर्राट जोकर's picture

21 Mar 2016 - 12:31 am | तर्राट जोकर

इतके बालीश व हास्यास्पद प्रतिसाद देण्यातून तुमची कबुली मिळाली. ;-)

त्यामुळे लहान बाळांना आमचा प्रतिसाद बालिश वाटू शकतो. तो दोष त्यांच्या बालबुद्धीचा आहे, आमचा नाही.

गॅरी ट्रुमन's picture

18 Mar 2016 - 4:47 pm | गॅरी ट्रुमन

शिवसेना वॉज सेना!! जोवर साहेब होते! नंतर असोच!!

कमाल आहे. केंद्रात पूर्ण बहुमत यायला भाजपला २०१४ साल का उजाडले असे एकीकडे म्हणायचे आणि त्याचबरोबर महाराष्ट्रात शिवसेनेला २०% पेक्षा जास्त मते आणि ७३ पेक्षा जास्त जागा कधीच मिळाल्या नव्हत्या याकडे दुर्लक्ष करून परत शिवसेना वॉज सेना म्हणायचे.. कमाल आहे.

नाना स्कॉच's picture

21 Mar 2016 - 7:07 am | नाना स्कॉच

गॅरी साहेब, आपणही सेलेक्टिव रीडिंग करू लागलात की काय!

नसता आपणही

"जोवर साहेब होते"

हे वाक्य सोडले नसते!!

बाकी असोच्!!! तांत्रिक डिटेल्स मान्य करायला आम्हालाही हरकत नाही! कारण आम्ही तर्ककर्कश्य नाही! नीट मांडल्यास मुद्दे आत्मसात करतो. :)

फ़क्त ते सेलेक्टिव रीडिंग सोडा तुम्ही गुर्जी नाही गॅरी आहात! ;)

श्रीगुरुजी's picture

18 Mar 2016 - 5:08 pm | श्रीगुरुजी

दगडाचा जनाधार!!

मधे ते खुळ काढले होते मिसकॉल द्या अन भाजप मेंबर व्हा! कश्यात काय नाय तर आमच्या नाक्यावर बसणाऱ्या राष्ट्रवादी अन काँग्रेस च्या टग्याना सुद्धा "congratulations" चे मॅसेज आले होते ऑटोमेटेड बीजेपी कडून मेंबर झाल्याबद्दल! अन जनाधार जनाधार कसला सांगताय, किती टक्के मते आली लोकसभेत, बरं ते ही सोडा, जितकी मते मिळाली आहेत ती फ़क्त अन फ़क्त नमो नामक एका सशक्त पर्यायाला मिळाली आहेत! जनाधार होता तर 13 दिवसात सरकार का पडले होते? अन 99 मधेही स्वबळावर का नाही येता आले!? पुर्ण बहुमत यायला 2014 का उजाडावे लागले??

शिवसेना वॉज सेना!! जोवर साहेब होते! नंतर असोच!!

तुम्ही बर्‍याच मुद्द्यांची सरमिसळ करीत आहात. मूळ मुद्दा असा होता की शिवसेनेमुळे महाराष्ट्रात भाजप वाढला असा एक समज आहे. मी आकडेवारी देऊन हे दाखवून दिले आहे की वस्तुस्थिती याच्या बरोब्बर उलट आहे. मिसकॉल देऊन मेंबरशिप, देशात किती मते मिळाली, पहिले सरकार १३ दिवसात का पडले, ९९ मध्ये स्वबळावर का नाही आले इ. गोष्टींचा मूळ मुद्द्याशी कणभरही संबंध नाही. शिवसेनेने स्वतःबद्दल हा गोड गैरसमज जाणीवपूर्वक/अजाणता जोपासलेला आहे की शिवसेनेने महाराष्ट्रात भाजपला मोठे केले. काही माध्यमांनीही याच गैरसमजाला खतपाणी घातले आणि मिपावरील काही जणांचे तेच मत आहे. परंतु वस्तुस्थिती तशी नाही. भाजपमुळे शिवसेना ठाणे/मुंबईच्या बाहेर पोहोचली ही वस्तुस्थिती आहे. गावोगाव बोर्ड लावले म्हणजे मते मिळतातच असे नाही किंवा पक्ष तळागाळात पोहोचला असेही नाही. महाराष्ट्रात कोणाचा जनाधार जास्त आहे (अगदी मुंबईत सुद्धा) हे ऑक्टोबर २०१४ मध्ये पुन्हा एकदा सिद्ध झाले इतकंच.

श्रीगुरुजी's picture

18 Mar 2016 - 3:15 pm | श्रीगुरुजी

शिवसेनेचे तसे बोर्ड अनेक ठिकाणी होते. पण एक पक्ष म्हणून शिवसेनेला मुंबई/ठाण्यातील काही भाग सोडले तर उर्वरीत महाराष्ट्रात जनाधार नव्हता. शिवसेनेने काँग्रेसच्या अरेला कारे करायला सुरूवात केली ती भाजपने सेनेबरोबर १९८९ पासून युती केल्यानंतरच. त्यापूर्वी सेना काँग्रेसच्या फारशी विरोधात नव्हती. १९७९ च्या निवडणुकीत तर शिवसेनेने चक्क काँग्रेसशी युती करून निवडणुक लढविली होती. १९७९ च्या दसरा मेळाव्यात बाळासाहेबांनी घोषणा केली होती, "इंदिराजींच्या हाताला साथ आणि इतर पक्षांना मारा सणसणीत लाथ". काँग्रेसची प्रचंड लाट असूनसुद्धा व काँग्रेसबरोबर युती असूनसुद्धा शिवसेनेला एकही खासदार निवडून आणला नव्हता.

आधी लिहिल्याप्रमाणे सेनेला आपल्या स्थापनेपासून पहिल्या २३ वर्षात फक्त २ आमदार निवडून आणता आले होते व एकही खासदार निवडून आणता आला नव्हता. याउलट एप्रिल १९८० मध्ये स्थापना झाल्यावर केवळ दीड महिन्यात स्वबळावर निवडणुक लढवून भाजपने महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून १२ आमदार निवडून आणले होते. सेना फक्त मुंबई/ठाण्यात होती, भाजप थोड्या प्रमाणात का होईना पण महाराष्ट्राच्या जवळपास सर्व भागात होता. संघाच्या शाखा महाराष्ट्रात सर्वत्र होत्या व भाजप संघाचेच अपत्य असल्याने भाजपला आपले अस्तित्व दाखविण्याची वेगळी गरज पडली नाही. सेना मात्र मुंबई/ठाण्याबाहेर नव्हती.

भाजपमुळेच मुंबईपुरत्या मर्यादीत असलेल्या सेनेची उर्वरीत महाराष्ट्राला ओळख झाली ही वस्तुस्थिती आहे.

संघाच्या शाखा महाराष्ट्रात सर्वत्र होत्या व भाजप संघाचेच अपत्य असल्याने भाजपला आपले अस्तित्व दाखविण्याची वेगळी गरज पडली नाही.

छ्या.... संघ आणि भाजपाचा संबंध नाहि या माझ्या थेअरीची वाट लागली. =))

कपिलमुनी's picture

19 Mar 2016 - 3:16 pm | कपिलमुनी

स्थापनेनंतर वर्षातच राकॉं चे बरेच (७०+?) आमदार निवडून आले होते, काका भाजपपेक्षा पॉवरफुल होते तर

श्रीगुरुजी's picture

19 Mar 2016 - 5:39 pm | श्रीगुरुजी

चुकीची माहिती.

जून १९९९ मध्ये स्थापना झाल्यावर ऑक्टोबर १९९९ मधील निवडणुकीत राकाँचे ५८ आमदार निवडून आले होते. नंतर २००४ च्या निवडणुकीत ७१, २००९ च्या निवडणुकीत ६२ व २०१४ च्या निवडणुकीत ४१ आमदार निवडून आले होते.

प्रदीप साळुंखे's picture

19 Mar 2016 - 6:24 pm | प्रदीप साळुंखे

शिवसेनेवर एक वेगळा धागा काढा,
विषय काय?? चाललयं काय??

श्रीगुरुजी's picture

19 Mar 2016 - 6:30 pm | श्रीगुरुजी

मूळ लेखातच ओवेसीशी संबंध नसलेला खालील परिच्छेद होता.

त्याच प्रमाणे मराठी माणसाच्या मनात कोन्ग्रेस विषयी द्वेष आणि स्वता विषई अन्यायाची भावना निर्माण झाली तेंव्हा बाळासाहेब ठाकरे ह्यांनी पक्ष उभारून कोन्ग्रेस ला माती चारली. कायद्याच्या बाहेर जावून ठोकशाही करत त्याना स्वताचे साम्राज्य निर्माण करता आले असते पण त्यांनी सुद्धा खडतर मार्ग पत्करला. शिवसेनेने भलेही अनेक वेळा कायदा तोडला असेल पण तरी सुद्धा काही बेसिक तारतम्य त्यांनी सांभाळले होतेच.

त्यावर एक प्रतिसाद आल्यावर मग नंतरच प्रतिसादांची मालिका सुरु झाली.

कपिलमुनी's picture

20 Mar 2016 - 12:50 am | कपिलमुनी

माहीती बद्दल खात्री नव्हती म्हणून ? टाकला होता. तर मुद्दा स्थापनेनंतर आमदार निवडुन यायचा आहे. भाजपा काही नवीन स्थापन झाला नव्हता . फक्त नाव बदलला होता.
The BJP's origins lie in the Bharatiya Jana Sangh, formed in 1951 by Syama Prasad Mookerjee. After the State of Emergency in 1977, the Jana Sangh merged with several other parties to form the Janata Party; it defeated the incumbent Congress party in the 1977 general election. After three years in power, the Janata party dissolved in 1980 with the members of the erstwhile Jana Sangh reconvening to form the BJP.

सेनेला आपल्या स्थापनेपासून पहिल्या २३ वर्षात फक्त २ आमदार निवडून आणता आले होते व एकही खासदार निवडून आणता आला नव्हता. याउलट एप्रिल १९८० मध्ये स्थापना झाल्यावर केवळ दीड महिन्यात स्वबळावर निवडणुक लढवून भाजपने महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून १२ आमदार निवडून आणले होते.

हे कौतुक चुकीचा आहे. बाकी चालू द्या

श्रीगुरुजी's picture

22 Mar 2016 - 1:57 pm | श्रीगुरुजी

तसं पाहिलं तर नवीन कोराकरकरीत पक्ष अपवादानेच सापडेल. १९८२ मध्ये स्थापन झालेला तेलगू देसम हा कोराकरकरीत पक्ष म्हणता येईल. बाकी महाराष्ट्रात मनसे, राष्ट्रवादी इ. पक्षातले नेते आधी दुसर्‍या पक्षात होतेच. जनसंघ १९७७ मध्ये जनता पक्षात विसर्जित झाला व त्याचे स्वतंत्र अस्तित्व संपले. त्यानंतर ३ वर्षांनी १९८० मध्ये पूर्वाश्रमीच्या जनसंघीयांनी फुटलेल्या जनता पक्षातून बाहेर पडून भाजप हा नवीन पक्ष स्थापन केला. भाजप हा पक्ष जुना मानायचा असेल तर हरकत नाही, पण नवीन पक्ष (निदान महाराष्ट्रात तरी) कोणताही नाही.

श्रीगुरुजी's picture

22 Mar 2016 - 1:58 pm | श्रीगुरुजी

तेलगू देसम प्रमाणेच २०१२ मध्ये स्थापन झालेला आम आदमी पक्ष हा सुद्धा नवीन कोराकरीत पक्ष आहे.

बोका-ए-आझम's picture

18 Mar 2016 - 3:35 pm | बोका-ए-आझम

पण मुंबईत आणि ठाण्यात जेवढी होती तेवढी बाहेर नव्हती. कोकणात ब-यापैकी होती. बाकी मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात सेना पायरोवा करु शकली नव्हती. सेनेची मुंबई - ठाण्यातली ताकद आणि भाजपचा विदर्भ - मराठवाड्यातला जोर हे एकमेकांना पूरक असल्याचं हेरून प्रमोद महाजनांनी युती घडवून आणली आणि शिवसेनेच्या, विशेषतः बाळासाहेबांच्या स्वभावाकडे बघून थोडी पडती बाजू स्वीकारली. पण भाजप शिवसेनेच्या जोरावर वाढला असं अजिबात नाही. संघ नागपुरात १९२५ पासून आहे, जेव्हा बाळासाहेबही शाळेत वगैरे होते. जनसंघाचा प्रभाव विदर्भात आणि मराठवाड्यात संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाल्यापासून आहे. शिवसेना १९६६ मध्ये स्थापन झाली, मुंबईतल्या कामगार चळवळींवरचा कम्युनिस्ट प्रभाव मोडून काढणं हा सेनेच्या स्थापनेमागचा एक प्रमुख हेतू होता. मराठी माणसाचे न्याय्य हक्क वगैरे गप्पा सेनेने लोकांची धूळफेक करण्यासाठी भरपूर मारल्या. त्याला तेव्हा लोक भुलले. आता भुलणार नाहीत अशी अपेक्षा आहे. ज्या मराठी माणसासाठी सेना उभी राहिली आहे असे सेनेचे लोक म्हणतात त्या सेनेने १९८२ चा मिल संप होऊ दिला, एवढंच नव्हे तर नंतरची मिल टू माॅल संस्कृतीही चालू दिली. व्हॅलेंटाईन डे ला मोठं marketing occasion बनवण्याचं श्रेय सेनेलाच जातं. असो.

कम्युनिस्ट आणि परप्रांतीय हे मुद्दे उर्वरीत महाराष्ट्रात त्यावेळी नव्हतेच. मराठवाड्यात जगन्नाथरावांनी केलेली भाजपाची पेरणी महाजन मुंडे स्वरुपाने उपयोगी ठरली असली तरी गावोगाव जो जनाधार लागतो तो मराठवाड्यात नव्हता. तरुण पिढीला फारसे तत्ववादी वाटणारे कार्यक्रमापेक्षा अ‍ॅ़टिव्ह ठेवणारे कार्यक्रम हवेसे असायचे. मराठवाड्यात संघाच्या शाखा गाओगावी चालत असेही चित्र नव्हते. बुध्दीपेक्षा आवेशाने राजकारण करणार्‍या बहुजन तरुण वर्गाला काँग्रेसपेक्षा चांगला पर्याय शिवसेनेने दिला.
सामंतांंचे संप मोडून काढणे, मिलच्या जागा वगैरे इश्श्यु या भागाला माहीत नसायचेच. कारण कोकणासारखा इथला माणूस मुंबईत जास्त विस्थापित झालेला नसायचा. त्यांना बाळासाहेबांचा आवेश, आख्यायिका अन लोकल असणारे कट्टर शिवसैनिक नेते ह्यातच जास्त इंटरेस्ट. वलंटाइन दिनाचे कौतुक अन विरोध त्यावेळी सुध्दा पुण्या मुंबैतच. नंतर अनुकरणाने ही संस्कृती सगळीकडेच पसरली यात सेनेचा दोष नाही.
त्तरीही आपण सारे जाणकार आहात. माझे आकलन कमी असेल. चर्चा करावी एवढे माझे ज्ञान नाही. धन्यवाद.

नाना स्कॉच's picture

21 Mar 2016 - 6:57 am | नाना स्कॉच

कोणी काहीही म्हणो रे भावा सेना काय होती हे सांगायला लाखो शब्दांपरी एक (व्यंग)चित्र पुरेसे आहे प्रख्यात "आर के लक्ष्मण" ह्यांचे !!

असो!! :D

श्रीगुरुजी's picture

21 Mar 2016 - 6:05 pm | श्रीगुरुजी

हे व्यंगचित्र सेना कशी होती हे सांगत नसून बाळासाहेब कसे होते व महाजन कसे होते हे सांगत आहे.

तर्राट जोकर's picture

21 Mar 2016 - 6:16 pm | तर्राट जोकर

म्हणजे आज बाळासाहेब, महाजन असते तर सेनेचाच मुख्यमंत्री झाला असता. फक्त आज बाळासाहेब नैत म्हणून...

श्रीगुरुजी's picture

21 Mar 2016 - 6:19 pm | श्रीगुरुजी

नाही. आज बाळासाहेब, महाजन असते तर काँग्रेस + राकाँचीच सत्ता राहिली असती.

तर्राट जोकर's picture

21 Mar 2016 - 6:26 pm | तर्राट जोकर

बाकी काही म्हणा. भाजपच्या महाराष्ट्रातल्या आजवरच्या यशामागे सेनेने केलेले ग्राउंडवर्क भाजप जर नाकारत असेल तर हा कृतघ्नपणा आहे. हे ग्राउंडवर्क कोणत्याही आकडेवारीत येणे शक्य नाही.

भाजपच्या महाराष्ट्रातल्या आजवरच्या यशामागे सेनेने केलेले ग्राउंडवर्क भाजप जर नाकारत असेल तर हा कृतघ्नपणा आहे.

डांगे अण्णा शीं सहमती.

तर्राट जोकर's picture

21 Mar 2016 - 6:49 pm | तर्राट जोकर

महोदय, मला वारंवार डांगे असे संबोधून आपण जे काय करत आहात ते मिपाधोरणात बसतं का हे एकदा तपासा.

श्रीगुरुजी's picture

21 Mar 2016 - 7:04 pm | श्रीगुरुजी

सेनेने केलेले ग्राऊंडवर्क? कसले ग्राऊंडवर्क आणि कधी केले सेनेने ग्राऊंडवर्क? ठाणे व मुंबईत सुद्धा सेनेला सर्व भागात पाठिंबा नव्हता. उर्वरीत महाराष्ट्रात सेनेला हिंग लावून कोणी विचारत नव्हते. अगदी १९७८ मध्ये सुद्धा शिवसेनेने विधानसभा निवडणुकीत ३५ मतदारसंघात उमेदवार उभे केले होते. त्यातला एकही निवडून आला नव्हता (मुंबई/ठाण्यात सुद्धा) व २% पेक्षा कमी मते होती. १९९० पासून भाजपमुळे शिवसेना ठाणे/मुंबईच्या बाहेर महाराष्ट्राला माहिती झाली. भाजपने वर्षानुवर्षे बांधलेले काही मतदारसंघ सेनेने आयते घशात घातले होते (उदा. शिवाजीनगर). खरं तर सेनेच्या यशामागे भाजपने केलेले ग्राऊंडवर्क आहे.

१९९० पासून भाजपमुळे शिवसेना ठाणे/मुंबईच्या बाहेर महाराष्ट्राला माहिती झाली.

श्रीगुरुजी, अत्यंत खेदपूर्वक नमूद करतो. तुमच्यावरचा विश्वास उडाला. :(

तर्राट जोकर's picture

21 Mar 2016 - 8:38 pm | तर्राट जोकर

गुरुजींनी आपले हे विचार मांडून चांगलेच केले. माझा मुद्दा स्पष्ट झाला. ;-)

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

22 Mar 2016 - 1:33 pm | निनाद मुक्काम प...

उद्धव ह्यांनी राष्ट्रवादीच्या बालेकील्याला खिंडार पाडले
हे उभ्या हयातीत कोन्ग्रेज ला आणि मुंडे महाजन बालासाहेब ह्यांना जमले नव्हते
महाजन अडवाणी बाळासाहेब असते तर विरोधकांना त्यांना धर्मांध ठरवून कॉर्नर करणे सहजशक्य झाले असते
ह्या लोकांच्या जीवावर नाकर्ते आघाडी सरकार सत्ता टिकवून होते
जनतेला दुसरा समर्थ पर्याय नव्हता
मंदिर वही बनायेंगे पार डेट नही बतायेंगे
सततचे सोपान चढायला ह्याची राजकीय समज व मजल एवढीच होती म्हणूनच जनतेने एकदा संधी दिल्यावर मग परत दिली नाहि
ती येण्यास मोदीपर्वाची वाट पहावी लागली.
उद्धव ह्यांनी एकहाती ६० आमदार निवडणून आणले हे कौतुकास्पद आहे त्यासाठी त्यांनी जसे सेनेने सुरवातीच्या काळात कोन्ग्रेज व मुस्लिम लीग शी युती केली तशी इतराशी केली नाहि
मात्र यंदाच्या मुंबई महानगर पालिकेत सेनेच्या मदतीने भाजपचा महापौर होणार हे नक्की
मनसे चे वादळ मागच्या निवडणुकीत सेनेने भाजपच्या मदतीने थोपवले , सध्या मनसे जरी थंड पडलेली असली
तरी ते सेनेला पर्याय नक्कीच आहेत
अमराठी मते एकगठ्ठा भाजपला मिळणार हे उघड गुपित आहे
समाजवादी व दोन्ही कोन्ग्रेज ची पुंगी वाजवायला ओविसी आहे

साहना's picture

18 Mar 2016 - 7:20 am | साहना

माझ्या ह्या rambling ला इतका प्रतिसाद मिळत आहे ते पाहून मन प्रसन्न झाले. इथे काही प्रगल्भ वगैरे विचार करण्याचा प्रयत्न नव्हता, लेखनात अनेक त्रुटी आहेत. Ignore कराव्यात

महासंग्राम's picture

18 Mar 2016 - 9:47 am | महासंग्राम

बाकी काय नाय ओ तुमचा धागा हायजाक झालाय असे दिसते.

प्रकाश घाटपांडे's picture

18 Mar 2016 - 10:24 am | प्रकाश घाटपांडे

अजून समान नागरी कायद्यावर विषय आला नाही वाटत? मग या कार्यक्रमाला जरुर या!
समान नागरी कायदा अपेक्षा आणि वास्तव
या प्रा. शमशुद्दिन तांबोळी. मुस्लिम सत्यशोधक मंडळ लिखित पुस्तकाचे प्रकाशन
दि.२० मार्च २०१६
स्थळ- राष्ट्रसेवा साने गुरुजी स्मारक पर्वती पायथा पुणे
वेळ- सायं ५.००
प्रमुख पाहुणे- निखिल वागळे

त्यांच्या बद्दल इतरांना काय माहित नसले पाहिजे असे त्यांना वाटते हा फर्स्ट पोस्ट मधील अजाझ अश्रफ यांचा एमाआयएम आणि ओवेसींबद्दलचा लेख दखल घेण्या जोगा आहे. यांच्या वाढी मागे काँग्रेसचे राजकीय तात्विक अपयश कारणीभूत नाही हे कसे म्हणावे ?

गामा पैलवान's picture

18 Mar 2016 - 4:44 pm | गामा पैलवान

तर्राट जोकर,

तुम्ही दिलेल्या गुहांच्या वक्तव्याच्या दुव्याबद्दल आभार. वरवर चाळला. त्यातल्या काही निरीक्षणांशी मी सहमत आहे. त्यांवर टिपणी करेन म्हणतो.

१.
>> ... demonisation of those Indians who had the misfortune of not being born into the Hindu fold.

यात काय चुकीचं आहे? पाकिस्तानी सत्ताधारी बलुची मुस्लिमांना ज्या रीतीने वागवतात त्यास demonic हे विशेषण फारंच सपक ठरेल.

२.
>> He identifies three major "Internal Threats: I: The Muslims; II: The Christians; III: The Communists".

यात काय चुकीचं आहे? ईशान्येत ख्रिश्चन तालिबान माजलेत. त्यांनी तिथल्या स्थानिकांना कसं वेठीस धरलंय ते सांगायला नको. मुस्लिमांनी अकीस्तान मागून घेतला पण सांभाळायची अक्कल आहे का?

कम्युनिस्टांविषयी बोलायलाच नको. १९७० पासून फक्त केरळात संघाच्या कार्याकार्यांच्या २५०+ हत्या झाल्या आहेत. कम्युनिस्ट साम्यवादी आणि नक्षल्यांच्या गळ्यात गळे घालून हिंडतात. हे दिवटे देशाच्या स्थैर्यास धोका नाही तर दुसरं काय आहेत?

३.
>> .... extols the code of Manu, whom Golwalkar salutes as "the first, the greatest, and the
>> wisest lawgiver of mankind".

आंबेडकरांचे मनुबद्दल असेच मत होते (संदर्भ : https://www.facebook.com/AntiSambhajiBriged/photos/a.378785998832203.954...)

असो.

एकंदरीत, गोळवलकर द्रष्टे होते यात शंकाच नाही.

आ.न.,
-गा.पै.

नाना स्कॉच's picture

21 Mar 2016 - 7:44 am | नाना स्कॉच

यात काय चुकीचं आहे? पाकिस्तानी सत्ताधारी बलुची मुस्लिमांना ज्या रीतीने वागवतात त्यास demonic हे विशेषण फारंच सपक ठरेल.

काय बोलून गेला आहात ह्याची जाण असेल अशी अपेक्षा आहे!! :D :D

यात काय चुकीचं आहे? ईशान्येत ख्रिश्चन तालिबान माजलेत. त्यांनी तिथल्या स्थानिकांना कसं वेठीस धरलंय ते सांगायला नको. मुस्लिमांनी अकीस्तान मागून घेतला पण सांभाळायची अक्कल आहे का?

ईशान्य भारतात स्त्री जननदर हा सर्वाधिक हेल्दी आहे, शिक्षण प्रचंड जास्त आहे ! इतके सगळे असूनही त्यांच्यावरचा आदिम पगडा मात्र कमी झालेला नाहीये, सेमिटिक धर्माचा भारतात आल्यावर होतो तसला खेळ झालाय त्यांचा, आजही नागा लग्ने करतात तेव्हा (समक्ष पाहिले आहे) त्यांच्या निसर्गपूजक विधी वापरुन करतात नंतर फ़क्त ब्लॅक ब्लेजर व्हाइट गाउन घालुन फ़ोटो सेशन करतात, मग नेमके कसे अन कुठे माजले आहेत क्रिस्चियन तालिबानी?? उगाच काहीतरी अर्धवट ऐकून मते ठोकुन द्यायची?

पाकिस्तान सांभाळायची अक्कल आहे का <<<<<<<<< अहो आत्ताच तर पाकिस्तानी नेते बलूची नेत्यांशी कसे वागतात ते पहा वगैरे वेलिडेशन केले की हो तुम्ही वरच्या वाक्यांत , म्हणजे ते तसे वागू शकतात तर आम्ही (पक्षी गोळवलकर) का नाही, हा सुर, सीरियसली आपण काय बोलतोय ह्याचे भानच नाही ठेवायचंय का आपणाला? श्री गुरूजी (इथले नाही मुळचे) ह्यांची वाक्यं सार्थ ठरवायला पाकिस्तानी इंस्टान्सेस वापरणे अन इतके करून त्यांना सांभाळायची अक्कल आहे का हे विचारायचे म्हणजे कमाल आहे.

१९७० पासून फक्त केरळात संघाच्या कार्याकार्यांच्या २५०+ हत्या झाल्या आहेत. कम्युनिस्ट साम्यवादी आणि नक्षल्यांच्या गळ्यात गळे घालून हिंडतात

हे खरे आहे एकंदरित, पण एक सांगा 1970 मधे कम्युनिस्ट शासन जेव्हा केरळ मधे आले तेव्हा ते "वर्ल्डस फर्स्ट डेमोक्रेटिकली एलेक्टेड कम्युनिस्ट गवर्नमेंट" का म्हणवले गेले होते बुआ?? आजही सर्वोत्तम जीवनमान, सरासरी आयुष्य, शिक्षण, वैद्यकीय सेवा, मानवी विकसन गुणांक (ह्यूमन डेवलपमेंट इंडेक्स), फॉरेन रेमिटेंस, पोषण, अत्यंत कमी नागरी भ्रष्टाचार वगैरे मधे हे "कम्युनिस्ट राज्य" सगळ्यांच्या नाकावर टिच्चून का नंबर वन वर आहे?? का हे सगळे पाहून लक्ष फ़क्त संघ कार्यकर्त्यांचे खून इतक्याकडेच ??? हेच सगळे ऐकवेळ बंगाल बद्दल बोलले असते तर मान्यही केले असते कारण त्यात सत्यांश आहे पण मानवी आयुष्य सुकर करणारे अन केरळ ला नंबर वन वर नेणारे वेगळ्या धाटणीचे लोक आहेत इतके लक्षात घ्या!

आंबेडकरांचे मनुबद्दल असेच मत होते (संदर्भ : https://www.facebook.com/AntiSambhajiBriged/photos/a.378785998832203.954...)

ठ्ठोssssssssssss अहो फेसबुक पेज चे "दाखले" देताय!! किती हसे करून घेणार अजून स्वतःचे!!!!

होबासराव's picture

18 Mar 2016 - 7:58 pm | होबासराव

ओवेसी ह्यांची भाषणे मी पहिली आहेत आणि हि व्यक्ती अतिशय अभ्यासू आहे ह्यांत शंकाच नाही.

ड्वाळे पाणावले आन पुढच नाय वाचल्या गेल.

अनंत छंदी's picture

18 Mar 2016 - 9:02 pm | अनंत छंदी

ओवैसीच्या धाग्यावर संघ आणि श्री गुरुजींच्या बाबतीत वादावादी??? नक्कीच संघाचा हात असावा.... :प

आजानुकर्ण's picture

18 Mar 2016 - 9:59 pm | आजानुकर्ण

तजो तुमचे प्रतिसाद आवडले. दगडावर कितीही डोके आपटले तरी तुमचे मत इथे अनेकांना मान्य होणार नाही. संघाचे खायचे आणि दाखवायचे दात वेगवेगळे आहेत. संघाच्या संकेतस्थळावर अधिकृत भूमिका वेगळी असली तरी खरी भूमिका ही सरसंघचालक आणि स्वयंसेवक यांच्याशी चर्चेतून किंवा त्यांच्या पुस्तकांतून कळते. वर कुणालातरी संघाच्या मुसलमानविषयक भूमिकेचा विदा हवा होते तिथे मी संघस्वयंसेवकाने लिहिलेल्या (आणि संघाचे महाराष्ट्र प्रदेश प्रमुख असलेल्या लेखकाच्या) 'स्मरणशिल्पे'चा संदर्भ दिला आहे. त्यात देवरस यांचे आणखी एक वाक्य आहे.

"संघाचे फक्त एकच तत्त्व आहे; हिंदुस्थान हा हिंदूंचा आहे, म्हणजेच हे हिंदू राष्ट्र आहे. एकदा हे झाले, की मग ‘भगवा ध्वज हा राष्ट्रध्वज हे आपोआपच समोर येते. "

गोळवलकर, करंदीकर, देवरस यांच्या भूमिकांमध्ये संपूर्ण सुसंगतपणा आहे. कुणीही आधीच्या संघचालकापेक्षा वेगळी भूमिका खाजगीत मांडलेली नाही. त्यामुळे संघाची ती खरी भूमिका आहे असे मानण्यास हरकत नाही. 'भारतमाता की जय' हे न म्हणणारा देशद्रोही हे सगळ्यांना लगेच मान्य असते. मात्र तिरंग्याऐवजी भगवा ध्वज हा राष्ट्रध्वज आहे अशी सुप्त इच्छा बाळगणारे देशभक्त मानले जातात ही आपल्या देशाची शोकांतिका आहे. संघाची आर्थिक धोरणांसंदर्भात भूमिका तर अत्यंत हास्यास्पद आहे. त्यामुळे सामाजिक दुही आणि आर्थिक दिवाळखोरी ह्या दोन्ही कारणांसाठी संघाचा प्राणपणाने विरोध करणे अतिशय आवश्यक आहे.

प्रदीप साळुंखे's picture

18 Mar 2016 - 11:40 pm | प्रदीप साळुंखे

संघाची ती भूमिका कधीच बदललेली आहे.
आहात कुठे?

संघाचे फक्त एकच तत्त्व आहे; हिंदुस्थान हा हिंदूंचा आहे, म्हणजेच हे हिंदू राष्ट्र आहे.

ते त्याला हिंदू संस्कृती असे म्हणतात,अन त्यामध्ये मुसलमान सुद्धा येतात.

आजानुकर्ण's picture

18 Mar 2016 - 11:54 pm | आजानुकर्ण

ते त्याला हिंदू संस्कृती असे म्हणतात,अन त्यामध्ये मुसलमान सुद्धा येतात.

काय सांगता!! मग सरळ भारतीय संस्कृतीच म्हणायचं ना!

प्रदीप साळुंखे's picture

19 Mar 2016 - 12:02 am | प्रदीप साळुंखे

तेवढं हुणार की राव!
बादवे हिंदू या शब्दाबद्दल काय आक्षेप?ती देण त्यांचीच हाय कि!
भारतात राहणारे सगळे हिंदूच.
हिंदू=सिंधूच्या पलीकडे राहणारे,
त्यात सगळेच येतात.

अभ्या..'s picture

19 Mar 2016 - 12:05 am | अभ्या..

हिंदू=सिंधूच्या पलीकडे राहणारे,

आपन पाकीस्तानी बांधवांना पन हिंदूच म्हणायचे आता. ;)

आजानुकर्ण's picture

19 Mar 2016 - 12:08 am | आजानुकर्ण

एकदम बरोबर! भारतातल्या हिंदू मुस्लिम दंगलींना आता हिंदूंच्याच दोन गटांतील दंगली असं म्हणायचं. राम मंदीर आणि बाबरी मशीद या देखील हिंदूंच्याच.

प्रदीप साळुंखे's picture

19 Mar 2016 - 12:25 am | प्रदीप साळुंखे

दंगल म्हणजे भावनांचा विस्फोट नुस्ता.
भांडणं तर पिता-पुत्रांची पण होतात,पार खून करण्यापर्यंत भावनांची मजल पोहचते.
आणि भावना ही धर्म,जात,प्रांत यांच्या दावणीला बांधलेली असते.
--------------------------------------
हिंदू,मुसलमान,ख्रिश्चन हे शब्द आहेत नुस्ते.
माणसाच्या दोनच जाती नर आणि मादी.

च्यायला ह्या लॉजिकने बर्‍याच बेसिक प्रश्नांची उत्तरे मिळतील असे वाटू लागलेय.

गामा पैलवान's picture

19 Mar 2016 - 3:14 am | गामा पैलवान

आजानआजानु,

>> हिंदूंमध्ये आहे का राष्ट्र ही संकल्पना? असल्यास ती कुठं धर्मग्रंथात, भगवद्गीतेत, पुराणात, उपनिषदात,
>> वेदात लिहिली आहे ते सांगा.

ऋषींच्या त्याग व तपातून जे ओज उत्पन्न झालं त्यातून राष्ट्राची निर्मिती झाली असं अथर्ववेदात सांगितलं आहे.

आ.न.,
-गा.पै.

गामा पैलवान's picture

19 Mar 2016 - 3:15 am | गामा पैलवान

आजानुकर्ण, वरील प्रतिसादात तुमचं नाव चुकीचं पडलं आहे. त्याबद्दल क्षमा असावी.
आ.न.,
-गा.पै.

hmangeshrao's picture

21 Mar 2016 - 9:48 am | hmangeshrao

कुणीतरी त्याग व तप केला की राष्ट्र बनते ?

बाकी १५० राष्ट्रांच्या निर्मितीसाठी कोण तपाला बसले होते ?

राष्ट्र हे कर्मवादी बहु-जनांमुळे बनते. विमानातून उडणार्‍या एका ब्रह्मचार्यामुळे नव्हे !

माहितगार's picture

22 Mar 2016 - 8:56 am | माहितगार

शिवाजी महाराजांचे धुरीणत्व कोणत्या गटात ठेवायचे ?

गामा पैलवान's picture

24 Mar 2016 - 2:17 am | गामा पैलवान

एच्चमंगेशराव,

१.
>> राष्ट्र हे कर्मवादी बहु-जनांमुळे बनते. विमानातून उडणार्‍या एका ब्रह्मचार्यामुळे नव्हे !

ही अक्कल जपान्यांना शिकवा. त्यांच्या मते स्वर्ग आणि पृथ्वी निर्माण करणाऱ्याने जपान राष्ट्राची निर्मिती केली.

२.
>> बाकी १५० राष्ट्रांच्या निर्मितीसाठी कोण तपाला बसले होते ?

कोणती राष्ट्रे? नावे कळतील का?

आ.न.,
-गा.पै.

श्री गावसेना प्रमुख's picture

20 Mar 2016 - 12:12 pm | श्री गावसेना प्रमुख

सत्ते साठी हपापलेले तर आताचे कोंग्रेसी वाटताहेत जसे त्यांचे युवा कोंग्रेस चे अध्यक्ष कोणीही मोदींना विरोध केला की हे त्याला समर्थन द्यायला जातात त्यावरून तरी असा निष्कर्ष निघु शकतो।

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

22 Mar 2016 - 1:45 pm | निनाद मुक्काम प...

हा प्रतिसाद दुसर्या धाग्यावर दिला असला तरी तो खरा येथे योग्य आहे
माझ्यामते लेखकाला आपली बाजू मांडता आली नाही मात्र त्या मूळ मुद्दा विचार करण्यासारखा आहे.
खुद अमित शहा ह्यांनी ओविसी ला देशद्रोही मानले नाही मात्र त्यांना समजवायची गरज आहे.
हे नक्की

मूळ प्रतिसाद
भाजपने समर्थन देओ अगर न देओ ओविसी आपले राजकारण करणार
त्याने कोन्ग्रेज चे नुकसान होणार असेल तर भाजपने त्याचा का उपयोग करू नये
भ्रष्टाचार न करणारा ओविसी कोन्ग्रेज हून अधिक वाईट आहे का
त्याने मुस्लिमांचे ध्रुवीकरण केले व संघाचा तो कट्टर विरोधक आहे म्हणून मी त्याला देशद्रोही मनात नाही
मुस्लिम समाजाला पूर्वी पर्याय नव्हते आता ओविसी ची कट्टर विचारसरणी व मोदींच्या विकासाचे राजकारण असे दोन नवीन पर्याय आहेत.
नुकतेच संपन्न झालेले सुफी संमेलन त्यात मोदींचा सहभाग त्याला मिळणारा प्रतिसाद नक्कीच आशादायक आहे.
मात्र ओविसी पेक्ष्या धर्मनिरपेक्ष राजकारणी खरे धोकादायक आहेत,
ओविसी चा इतिहास पहिला तर लोकशाही पद्धतीने तो त्याचे वडील पिढ्यानपिढ्या त्याच्या मतदारसंघातून निवडणून येतात.
तेव्हा जसे समाजातील एक गट संघ म्हणजे गोडसे संघ म्हणजे कट्टर पंथीय असा पूर्वग्रह बाळगतात तसा मी ओविसी बद्दल बाळगत नाही.
त्यांच्या विचारधरेशी मी असहमत असलो तरी तो येचुरी हून खूप बरा

येचुरी देशहित धाब्यावर बसवून चीनी निष्ठा राबवतो एका कार्यक्रमात भारत अमेरिकेसोबत चीनशी उगाच पंगा घेत आहे चीन भारताचा शत्रू नाही चीन पासून भारताला धोका नाही अशी मुक्ताफळे उधळत होता, राष्ट्रवादाच्या संकल्पना अनेक असू शकतात मात्र राष्टीय हिताची एकच असते , चीन च्या विरोधात विएतनाम जपान अमेरिका फिलिपिन्स सोबत भारत संयुक्त लष्करी सराव करतो हे आपले राष्ट्रीय धोरण आहे जे युपिए ने सुद्धा पाळले , येचुरी ची चीनी निष्ठा भारताच्या मुळावर येणार हे नक्की
त्यामानाने ओविसी पाकिस्तान मध्ये पाकिस्तानी मुसलमानांना सुनावतो. कार्यक्रमाची पूर्ण लिंक येथे आहे व तो नक्कीच पाहण्याजोगी आहे.
अय्यर व कीर्ती पेक्ष्या ओविसी उजवा व सरस आहे.
येथे एक आवर्जून सांगितले पाहिजे आपल्या भारतीय उपखंडात पाकिस्तान बांगलादेश येथील राजकीय परिस्थिती बाबत त्याची माहिती व समज भारतातील बहुतांशी राजकारणी नेत्याहून जास्त आहे,
सदर कार्यक्रमात भाजपाने कीर्ती आझाद ला पाठवले होते
ह्या गुळाच्या गणपतीला पाठीशी घालून ओविसी ने भारतीय किल्ला लढवला पाकिस्तान शी बोलती बंद केली
गुजरात आमचा अंतर्गत प्रश्न आहे तुम्ही तुमचे पहा
असे सांगणारा ओविसी टिपिकल राजकारणी नाही आहे,
त्याच्या विचारधारेला भाजपने किंवा इतर राजकारणी लोकांनी विकासाचे राजकारण करूनच लढा दिला पाहिजे
आणि एकदा मोदी ह्यांनी सबका साथ सबका विकास म्हंटले आहे मग ओविसी ला त्याच्या पाठीराख्यांना अस्पृश्य का ठरवावे.
त्याने जाहीररीत्या म्हटले आहे हज ची सबसिडी बंद करा तो पैसा मुस्लिम मुलींच्या शिक्षणावर खर्च करा
एवढे बोलून सुद्धा हैद्राबादी व काही मुसलमान त्याला पाठिंबा देतात ते का ह्याचे कारण शोधले पाहिजे

नाना स्कॉच's picture

22 Mar 2016 - 2:03 pm | नाना स्कॉच

सहमत

नाना स्कॉच's picture

23 Mar 2016 - 6:20 pm | नाना स्कॉच

तावातावाने सगळे राजकाराणावर अन समाजावर काथ्या कूटत बसतात आज

"शहीद दिवस आहे" सगळेच विसरले??? अरेरे

असो!, माझ्यातर्फे तरी मी शहीद भगतसिंह , शहीद सुखदेव थापर अन शहीद शिवराम हरी राजगुरु ह्या तीन शहीदांना आदरांजली वाहतो

____/\____

.

चित्र जालावरून साभार

श्रीगुरुजी's picture

23 Mar 2016 - 7:28 pm | श्रीगुरुजी

या महान देशभक्तांना आदरांजली! यांच्यासारख्या हुतात्म्यांमुळेच आपण स्वतंत्र झालो.

गामा पैलवान's picture

24 Mar 2016 - 12:42 am | गामा पैलवान

अर्धवटराव's picture

24 Mar 2016 - 3:57 am | अर्धवटराव

.

भंकस बाबा's picture

24 Mar 2016 - 10:28 pm | भंकस बाबा

थोड्या काळाने कन्हैयाचा फ़ोटो टाकून उद्याचे क्रांतिकारी असा काही सन्देश टाकू नका.
नाय त्याला भगतसिंगच्या कैटेगरित बसवायचा प्रयत्न चालला आहे म्हणुन म्हटले!

तर्राट जोकर's picture

25 Mar 2016 - 2:00 pm | तर्राट जोकर

ह्या हायजॅकिंगबद्दल काय मत आहे?

rss

श्रीगुरुजी's picture

25 Mar 2016 - 2:36 pm | श्रीगुरुजी

हे चित्र कोठे मिळाले? स्वतः संघानेच हे तयार केले का अजून कोणी?

श्रीगुरुजी's picture

25 Mar 2016 - 2:35 pm | श्रीगुरुजी

आसाममधील विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने रोहित वेमुला व ककु यांची चित्रे पक्षाच्या फलकांवर चितारली आहेत.

गामा पैलवान's picture

4 Apr 2016 - 2:05 am | गामा पैलवान

स्कॉचनाना,

तुमचा इथला प्रतिसाद वाचला. माझी मतं उशीराने मांडतोय त्याबद्दल क्षमस्व.

१.
>> काय बोलून गेला आहात ह्याची जाण असेल अशी अपेक्षा आहे!! :D :D

जरा स्पष्ट करून सांगतो. पाकिस्तानचे सत्ताधारी लोकं बलुचीस्थानातल्या मुस्लिम लोकांना ज्या भयंकर रीतीने वागवतात त्यास demonic हे विशेषण फारंच सपक ठरेल.

२.
>> मग नेमके कसे अन कुठे माजले आहेत क्रिस्चियन तालिबानी?? उगाच काहीतरी अर्धवट ऐकून मते ठोकुन द्यायची?

हे काय आहे मग ? : https://en.wikipedia.org/wiki/Christian_terrorism#India

३.
>> पण एक सांगा 1970 मधे कम्युनिस्ट शासन जेव्हा केरळ मधे आले तेव्हा ते "वर्ल्डस फर्स्ट डेमोक्रेटिकली
>> एलेक्टेड कम्युनिस्ट गवर्नमेंट" का म्हणवले गेले होते बुआ??

हे फक्त भारतातच घडू शकते. हिंदू सोशिक आहेत.

४.
>> आजही सर्वोत्तम जीवनमान, सरासरी आयुष्य, शिक्षण, वैद्यकीय सेवा, मानवी विकसन गुणांक (ह्यूमन डेवलपमेंट
>> इंडेक्स), फॉरेन रेमिटेंस, पोषण, अत्यंत कमी नागरी भ्रष्टाचार वगैरे मधे हे "कम्युनिस्ट राज्य" सगळ्यांच्या
>> नाकावर टिच्चून का नंबर वन वर आहे?? का हे सगळे पाहून लक्ष फ़क्त संघ कार्यकर्त्यांचे खून इतक्याकडेच ???

संघाच्या कार्यकर्त्यांचे खून पाडल्याची कबुली कम्युनिस्ट नेते जाहीर सभेत देतात. याला मोगलाई म्हणतात. कायदा आणि सुव्यवस्था हवी ना? नसेल तर मग इतकी आकडेप्रगती काय कामाची? शिवाय केरळची अर्थव्यवस्था बऱ्याच मोठ्या प्रमाणावर आखाती पैशावर अवलंबून आहे, ज्यात कम्युनिस्टांचे काहीच योगदान नाही.

५.
>> ठ्ठोssssssssssss अहो फेसबुक पेज चे "दाखले" देताय!! किती हसे करून घेणार अजून स्वतःचे!!!!

तुम्ही जर तो लेख वाचला तर त्यात ठिकठिकाणी दिलेले संदर्भ सापडतील. अन्यथा ignorence is bliss.

आ.न.,
-गा.पै.