अॅबाकस (सोरोबन) शिका, स्मरणशक्ती वाढवा !! (भाग २)

राजकुमार१२३४५६'s picture
राजकुमार१२३४५६ in काथ्याकूट
12 Mar 2016 - 3:20 pm
गाभा: 

अॅबाकस (जपानी भाषेत सोरोबन)

मागच्या भागात जाण्यासाठी ......
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
मागच्या भागात आपण संख्या कश्या रीतीने मांडल्या ते आपण पाहिले. आता या भागात सोरोबन वापरून बेरीज कशी करायची ते शिकणार आहोत.
आता इथे जे सांगेल ते तुम्ही स्वतः घरी करून पाहिले तर अ‍ॅबाकस शिकणं किंवा समजणं सोपं जाईल.
त्यासाठी तुम्हाला अ‍ॅबाकस खरेदी करण्याची काही गरज नाही. तुम्ही तुमच्या मोबाईल वरती सुद्धा सराव करू शकता. त्यासाठी तुमचा मोबाईल अ‍ॅनड्रोइड चा असणं गरजेचं आहे. विनडोस किंवा आयफोन वापरल्या नसल्यामुळे त्यावर ऐप मिळते का ते माहित नाही. पण जर आपापल्या मोबाईल वरील ऐप च्या दुकाना (App Store) मध्ये शोधलं तर नक्की मिळेल.

अ‍ॅनड्रोइड मोबाईल असणाऱ्यांनी "सिम्पल सोरोबन (Simple Soroban )" या नावाचे ऐप डाउनलोड करा.

जर आपल्याला सोरोबन खरेदी करायचे असेल तर फ्लिपकार्ट वरून मागू शकता. २०० रुपयाच्या आसपास किंमत आहे. शिपिंग चार्जेस पकडून खालील लिंक वर क्लिक करा.
Sae Fashions Brown 17 Rod Abacus Kit With Box
आणि जर तुम्हाला ओरिजनल जपान वरून मागवायचे असेल तर खालील लिंक्स वर क्लिक करा.
इथे फक्त क्रेडीट कार्ड वापरून खरेदी करू शकता. जपान पोस्ट मार्फत ते १५ ते २० दिवसात घरी येते.
Tomoe Soroban Co. Ltd

टीप: वरील लिंक्स ह्या माहिती साठी आहेत. या लेखाशी कोणते हि देणे घेणे नाही. खरेदी केली तर आपापल्या जबाबदारीवर करावी.

बेरीज (सोरोबन वापरून) :

आता सोरोबन वर बेरीज कशी करायची ते शिकणार आहोत. आता इथे कॅल्क्युलेटर आणि सोरोबन ची तुलना करू नये. या दोन्ही वस्तू खूप भिन्न आहेत. कॅल्क्युलेटर मुळे बुद्धी ला आराम मिळतो. याउलट सोरोबन मुळे बुद्धीला ताण पडून बुद्धी तल्लख होते. त्यामुळे सोरोबन हे कॅल्क्युलेटर सारखेच आहे या भ्रमात राहू नये.
सोरोबन मध्ये सोप्या अंकाची बेरीज होत नाही. कारण त्याचे उत्तर आपल्याला माहित असते. उदाहरणार्थ २+२ याचे उत्तर आपणास सर्वाना माहित आहे ४ आहे. त्यामुळे हे गणित सोरोबन वर सोडवणे मूर्खपणाचे ठरेल.
सोरोबन वरती बेरीज करताना एक गोष्ट लक्ष्यात ठेवा कि, एकेरी संख्यांची बेरीज हि मनातल्या मनात करायची आहे आणि उत्तर फक्त सोरोबन वर मांडायचे आहे. उदाहरणार्थ ३५ + ३२ हे गणित सोडवताना एकक स्थानच्या संख्या ५ + २ याची मनातल्या मनात बेरीज करून ७ हि संख्या सोरोबन वर मांडायची आहे.
style="margin-center: auto; margin-right: auto;
आता आपण ३० + १५ यांची बेरीज सोरोबन वर करणार आहोत.
प्रथम "सिम्पल सोरोबन" ऐप ओपन करा. त्यावर "फ्री मोड" वर क्लिक करा. तुम्हाला असं चित्र दिसेल.


ह्या चित्रामध्ये सोरोबन हा "०" स्थिती मध्ये आहे. म्हणजेच जर तुम्हाला कोणी शुन्य संख्या सोरोबन वर मांडायला सांगितली, तर तुम्ही काहीच करायचे नाही. कोणताच मणी हलवायचा नाही. सोरोबन आहे तसेच ठेवायचे.

आता ३० हि संख्या सोरोबन वर मांडू. प्रथम एकक स्थानी असलेला ० मांडताना कोणताच मणी हलवायचा नाही पण दशक स्थानी असलेला ३ मांडताना सोरोबन वरील उजवीकडून दुसर्या उभ्या मांडणी मध्ये खालून ३ मणी वर सरकवायचे. खालील चित्रात पहा.


० मांडताना कोणताच मणी हलवायचा नाही पण ३ मांडताना खालून ३ मणी वर सरकवायचे

आता १५ हि संख्या मिळवताना प्रथम ५ हि संख्या ० मध्ये मिळवू. मग आपल्या डोक्यामध्ये आकडे मोड करा ०+५ = ५ उत्तर ५ आले. म्हणून ५ हि संख्या सोरोबन वर मांडू. आपण एकक स्थानाची बेरीज केली असल्याने उत्तर मांडताना ते उजवीकडून पहिल्या उभ्या मांडणी मध्ये मांडावे. आता ५ हि संख्या मांडायची कशी? मागच्या भागात सांगितल्या प्रमाणे वरचा एक मणी हा ५ मूल्याचा असतो म्हणून वरचा एक मणी खाली सरकवा. खालील चित्रा मध्ये पहा.


वरचा एक मणी हा ५ मूल्याचा असतो म्हणून वरचा एक मणी खाली सरकवा

पुढे आता १ हि संख्या ३ मध्ये मिळवू. म्हणून डोक्यामध्ये आकडे मोड करा १+३ = ४ उत्तर ४ आले. मग हि ४ संख्या उजवीकडून दुसर्या उभ्या मांडणी मध्ये मांडा. कारण आपण दशक स्थाना वरील संख्येची बेरीज करतोय. आता आपण आधीच ३ मणी सरकवले आहेत त्यामुळे आता फक्त एक मणी वर सरकवा म्हणजे ३ मध्ये १ मिळवले असे होईल. हे आले आपले उत्तर ४५. तुम्हाला दशक स्थानी ४ मणी वरती आणि एकक स्थानी वरून एक मणी खाली म्हणजे तो ५ आहे. खालील चित्रा मध्ये पाहा.


फक्त एक मणी वर सरकवा म्हणजे ३ मध्ये १ मिळवले असे होईल आणि हे आले आपले उत्तर ४५.

आता २५ + २४ यांची बेरीज करू. मी काही न लिहिता यांची बेरीज चित्रं रूपाने दाखवणार आहे. खालील चित्रा मध्ये पाहा.


सोरोबन ० या स्थिती मध्ये .


एक मिळवला .


दोन संख्या मिळवली .


परत ४ मिळवले.


परत २ मिळवले आनि हे आले उत्तर ४९.

निरीक्षण :

आता ज्यांना जास्त डोकं आहे त्यांनी खालील विदिओ पाहून निरीक्षण करा.
ह्या विदिओ मध्ये ५२८६ + ३१९७ + ७८२९ ह्या गणिताची बेरीज करताना दाखवली आहे. त्या संख्या मांडल्या कश्या? किती मणी वर सरकवले आणि वरून खाली घेतले? याचे बारकाईने निरीक्षण करा. निरीक्षण हा स्वत शिकण्याचा पाया आहे.

विदिओ पाहून निरीक्षण करा.

आज या भागात सोप्या संख्येची बेरीज कशी करायची ते शिकलो आता पुढच्या भागात यापेक्षा थोडी कठीण संख्येची बेरीज कशी करायची ती पाहूया.

(क्रमश:)

प्रतिक्रिया

रॉजरमूर's picture

19 Apr 2016 - 10:35 pm | रॉजरमूर

पुढचा भाग येऊ द्या लवकर ..........

खटपट्या's picture

20 Apr 2016 - 2:24 am | खटपट्या

मजा येतेय... पुढचा भाग येउद्या

उत्तम माहिती आणि खूप सध्या पद्धतीने केलेलं मार्गदर्शन.... त्याबद्दल धन्यवाद
अबकस चे पुढील टप्पे जास्त आव्हानात्मक असावे असे वाटते आहे...

गुल्लू दादा's picture

9 Aug 2017 - 9:52 pm | गुल्लू दादा

पुढचा भाग?