बचके रेहना रे... अर्थात प्रवासातली सुरक्षितता

अनाहिता's picture
अनाहिता in विशेष
30 Nov 2015 - 12:07 am

Header

body {
background-image: url("https://lh3.googleusercontent.com/-4IV7c0ur4aU/VtIMF96j2AI/AAAAAAAAATs/x...");
background-repeat: repeat;
}
.inwrap {
border: 0.5em solid transparent;
-webkit-border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/p...") 10 round; /* Safari 3.1-5 */
-o-border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/p...") 10 round; /* Opera 11-12.1 */
border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/p...") 10 round ;
}

    हॉटेलमधील वास्तव्य -
  • रहाण्यासाठी हॉटेल सिलेक्ट करताना ते भरवस्तीतले बघावे. थोडे अधिक पैसे गेले तरी चांगले रिव्ह्यू बघून घ्यावे. विशेषतः एकटं रहायची वेळ आल्यास.
  • रुम सर्व्हिससाठी वेटरला एकटी असताना आत रूममध्ये बोलवु नये. आत आल्यास दार उघडे राहू द्यावे.
  • रूमला गॅलरी खिडक्या असल्यास बंद करुन घ्याव्या.
  • एकल प्रवासात तुम्ही दर दिवशी कुठे असालयाची हॉटेल व फोन नं सह यादी घरातील कोणाकडे तरी असावीच.
  • एकटी फिरत असताना शक्यतो पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करावा.
  • देस तसा भेस करावा! उगाच लोकांचे लक्ष वेधून घेणारे तंग कपडे इ. केवळ परदेशी आलोय म्हणून घालू नयेच.
  • भारतात प्रवास करताना गळ्यात एखादे खोटे मंगळसूत्र तसंच देशाबाहेर एखादी खोटी अंगठी पण एक सुरक्षितता हत्यार बनते!!
    नेहमी ठराविक ठिकाणी प्रवास करणाऱ्यांसाठी -
  • नेहमीचेच प्रवासी बर्‍याचदा त्या वेळेला असतात एकमेकांना नेहमी त्याच प्रवासात बघुन ओळख झालेली असते त्यामुळे सुरक्षित वाटते.
  • ऑफिस नंतर किंवा कॉलेज उरकुन निघणार असाल तर गाडीला किती गर्दी असु शकते आणि घरी पोहोचायला किती वाजतील याचा विचार करुन जर उशीर होईल असे वाटत असेल तर रात्री जाण्यापेक्षा सरळ दुसर्‍या दिवशी लवकर जा.
  • नेहमी त्याच बस ने प्रवास सकाळी करणार्‍या एक दोन मित्र मैत्रीणींचे फोन नं जवळ असु द्या म्हणजे ठरवून सोबत निघता येते. तिकिटे काढताना पण समन्वय साधुन एखाद दुसर्‍याला लवकर जाऊन आधी रांगेत उभे राहता येते. आणि मग रांगेत जास्त ताटकळावे लागत नाही.
  • सध्या ऑनलाईन एस्टी तिकिट बुकिंग करता येते त्याचाही फायदा घ्या. वेळ आणि दगदग वाचते.सारखं मोबाइल वर बिझी असू नये. बी अवेअर आजूबाजूला काय चाललय याबाबतीत. बर्याच पिक पॉकेटिंग च्या घटना यामुळे टाळता येतात.
    इतर टिपा -
  • शक्यतो प्रवास दिवसा सुरु करून संध्याकाळपर्यंत संपवणे.
  • शक्यतो प्रवास तुमच्या गावाला असलेल्या नॉन-स्टॉप एस.टी. ने करा. गाडी बंद पडली तरी पर्यायी व्यवस्था करतात.
  • आपले आपल्याला सहजपणे उचलून नेता येईल असे सामान ठेवणे, ज्यायोगे दुसर्‍या मनुष्यास मदतीसाठी बोलावण्याची वेळ येऊ नये.
  • आपले सामान लक्ष न देता टाकून उगाच फिरु नये. तसंच पायाजवळ बॅग टाकून वाचत बसणं हेही धोकादायक.
  • प्रवासात किमती वस्तू जवळ ठेवू नयेत. जर दागिने घेऊन प्रवासात निघण्याची वेळ आलीच तर बरोबर नातेवाईक असल्यास सोय होते. स्वच्छतागृह वापरण्याच्या वेळेस सामानाकडे लक्ष राहू शकते.
  • कोरडे अन्नपदार्थ जवळ ठेवावेत म्हणजे भुकेच्या वेळेस आपली जागा सोडून उठून जावे लागत नाही. पाण्याची बाटलीही घरूनच घेऊन जावी. कोणाचेही अन्न पाणी ड्रिंक्स शेअर करु नये.
  • सहप्रवाश्यांशी ओळख वाढवताना सावधानता बाळगावी. प्रवासात शेजारील व्यक्तीशी फार अघळपघळ बोलून आपल्या पर्सनल डिटेल्स देऊ नयेत किंवा आपण का जातोय, कोणाकडे जातोय, आपला पत्ता इ. माहिती बोलण्याच्या ओघात सांगू नये.
  • चार्ज केलेली पॉवर बँक जवळ असणे जरुरी आहे.शक्य असेल तर दोन सिमकार्डे दोन वेगळ्या हँडसेटमधे घालून ठेवावीत. त्यातला एक बॅटरी भरपूर चालणारा साधा पाहिजे. म्हणजे एक तरी मोबाईल कायम चालू रहातो.
  • रात्री प्रवास करण्याची वेळ आल्यास बस, ट्रेनमधून उतरून रिक्षा, टॅक्सीने इच्छित स्थळी जाताना घरी फोन करून ज्या वाहनात बसतोय तो क्रमांक कळवावा. शक्य असल्यास फोनवर बोलत अथवा मध्येच फोन करून आपण कुठपर्यंत आलोय हे कळवत रहावे.
  • रात्री प्रवास करताना तुम्ही जिथून निघता तिथे आणि जिथे पोचणार तिथे, दोन्ही ठिकाणच्या किमान एका विश्वासू व्यक्तीला याबद्दल माहिती असावी. जीपीएस वरुन जवळच्याना लोकेशन पाठवू शकता. बाकीच्यांना शक्यतो सांगू नये. मोबाईल डिसचार्ज झाला तर अडचण येऊ नये म्हणून महत्वाचे फोन नंबर कागदावरही लिहिलेले असावेत किंवा पाठ करून ठेवावे. म्हणजे ऐन वेळी मोबाईल चोरीला जाणे, बॅटरी लो असणे वगैरे केस मध्ये फजिती होत नाही.
  • एखाद्या नव्या ठिकाणी अगदीच अपरात्री पोहोचण्याची वेळ आली तर पहाट होईपर्यंत स्टेशन्, एअरपोर्टवरच थांबावे.
  • गाडी रात्री तुमच्या गावात पोहोचायला उशीर झाला तर घरून शक्य असेल तर कोणालातरी न्यायला बोलवा.
  • रात्री उशीरा एसटी स्टँडवरुन रिक्शाने जाणार असाल तर रिक्शावाल्या समोरच घरी फोन करुन त्याचा गाडी नं कळवा. रात्रीच्या प्रवासात सावध झोप हवी.

टिप्स - अनाहिता | संकलन - मधुरा देशपांडे | चित्र - किलमाऊस्की

© प्रस्तुत लेखातील कुठलाही भाग, कुठल्याही स्वरुपात पूर्व परवानगीशिवाय वापरता येणार नाही.
Footer

प्रतिक्रिया

सामान्य वाचक's picture

7 Mar 2016 - 10:45 pm | सामान्य वाचक

महत्वाच्या टिप्स आहेत
फक्त बायकानाच नाही तर बर्याच टिप्स पुरुषांना सुद्धा उपयोगी आहेत

अनन्न्या's picture

7 Mar 2016 - 10:51 pm | अनन्न्या

अगदी महत्त्वाच्या टीप्स!

चलत मुसाफिर's picture

7 Mar 2016 - 11:26 pm | चलत मुसाफिर

घरच्यांना सुरक्षितता वाटणे हेही महत्त्वाचे असते. मी ट्रेनने लांबचा प्रवास करताना गाडीचे पूर्ण वेळापत्रक घरच्या व्यक्तींना कायअप्पा सेवेद्वारे आगाऊ कळवून ठेवतो. तसेच प्रवासात अधूनमधून गाडी अमक्या स्टेशनहून अमके वाजता निघाली, असे कळवत राहतो.

पैसा's picture

12 Mar 2016 - 7:46 pm | पैसा

उपयुक्त सूचना.

जुइ's picture

6 Apr 2016 - 6:37 am | जुइ

सहमत आहे!

कविता१९७८'s picture

12 Mar 2016 - 8:04 pm | कविता१९७८

उपयुक्त माहीती

सूचना हॅाटेल वास्तव्याच्या जरा घाबरावणाय्रा वाटताहेत.
काही फारच हाइटेक आहेत.दोनतीन हँडसेट वगैरे.

मदनबाण's picture

6 Apr 2016 - 6:43 am | मदनबाण

उपयुक्त माहिती...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ए सनम आँखों को मेरी खुबसुरत साज दे... :- रंगा पतंगा

उपयुक्त सूचना आहेत. विशेषतः संपूर्ण प्रवासात नेहमी सावध (सतर्क) असणे अत्यावश्यक आहे.

गरिब चिमणा's picture

6 Apr 2016 - 12:33 pm | गरिब चिमणा

सूचना स्वागतार्ह आहेत.पण एक प्र्श्न,ईतक्या साशंक मनाने कुणी पर्यटनाचा आनंद घेऊ शकेल का?,त्यामुळे नाईट स्टे असेल तर शक्यतो पुरुष जोडीदाराशिवाय बाहेर पडू नये.मी काही सूचना करतो

१.परक्या शहरात फिरताना शक्यतो झोपडपट्टी एरीयापासून लांब राहावे,नजिकच्या काळातील बलात्काराच्या घटनांमध्ये प्रामुख्याने नजीकच्या झोपडपट्टीतील गुन्हेगार सापडले आहेत.
२.male dominated field मध्ये काम करणार्या पुरुषांपासून विषेश खबरदारी घ्यावी,FBI च्या क्रिमीनल प्रोफालर्य्सनुसार असे पुरुष व्यसनी व क्रिमिनल टेंडन्सीचे असतात,जमल्यास लिंक देईन
३.दिल्लीत उबर कॅब सर्विसचा एक ड्रायव्हर बलात्काराच्या अनेक घटनांमध्ये सापडला होता,त्यामुळे या सर्विसवर डोळे झाकून विश्वास ठेऊ नये.
४. कोणत्याही खाजगी वाहनात कधीच बसू नये,कीतीही सेफ वाटलं तरीही

श्रीरंग_जोशी's picture

7 Apr 2016 - 12:07 am | श्रीरंग_जोशी

खूप महत्त्वाच्या सूचना आहेत या सर्व. बॅटरीवर चालणारी उपकरणे ऐनवेळेवर दगा देऊ शकतात. त्यामुळे लांबच्या प्रवासात महत्वाचे पत्ते व संपर्क कागदावर लिहून घेणे किंवा प्रिंट घेऊन ठेवणे इष्ट.