झंडा उँचा रहे हमारा!

नूतन सावंत's picture
नूतन सावंत in विशेष
8 Mar 2016 - 12:15 am

LekhHeader

body {
background-image: url("https://lh3.googleusercontent.com/-4IV7c0ur4aU/VtIMF96j2AI/AAAAAAAAATs/x...");
background-repeat: repeat;
}
.inwrap {
border: 0.5em solid transparent;
-webkit-border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/p...") 10 round; /* Safari 3.1-5 */
-o-border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/p...") 10 round; /* Opera 11-12.1 */
border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/p...") 10 round ;
}

२ डिसेंबर २०१५ ते २२ डिसेंबर २०१५ आमचा न्यूझीलंड-थायलंड दौरा ठरला होता. एका एजंटने थायलंड बुकिंग जसे हवे तसे करून दिले. तिलाच न्यूझीलंडचेही बुकिंग करायला सांगितले. पण आधी ती आणि नंतर मी आजारी झाल्याने ते लांबणीवर पडत गेले. जेव्हा तिच्याकडून न्यूझीलंडचा प्लान आणि थायलंडचे पक्के रिझर्वेशन आले, तेव्हा लक्षात आले की, मी दिलेल्या प्लॅनपेक्षा त्यात बरेच बदल झाले आहेत. थायलंडचे बुकिंग मेक माय ट्रिप या कंपनीतर्फे झालेले दिसत होते.तेव्हा आपण स्वतः जाऊन त्यांना भेटून आपल्याला हवा असलेला प्लान मिळतो का पाहू असे ठरवून मालाड इथल्या त्यांच्या ऑफिसात गेलो. त्यांनी आधी कबूल केले. त्यांच्याशी जवळजवळ पूर्ण दिवसभर चर्चा करून रूपरेषा ठरवली. आठच दिवसात खर्चाची रक्कम ८३,०००० पर्यंत येईल असे त्यांनी कळवले. ही रक्कम आधी त्याच्या ठाण्यातल्या शाखेने दिलेल्या अंदाजापेक्षा २०,००० रुपयांनी जास्त होती, पण आता निघायला महिनाच उरल्याने आम्ही तेही कबूल केले. निम्मी रक्कम रोखीने लगेच भरली. उरलेल्या रकमेचा धनादेशही त्यांनी सांगितलेल्या दिवशी भरला.

काही दिवसांनी त्यांनी फोनवर कळवले की, “दोन हॉटेलांचे बुकिंग पक्के झाले आहे पण उरल्रेल्या दिवसांसाठी खर्च वाढेल”. “किती वाढेल?”, असे विचारल्यावर त्यांनी जो आकडा सांगितला तो ऐकून पायाखालची जमीनच सरकली. मी ओरडलेच, “काय? दोन लाख चाळीस हजार? तुम्ही काय प्रेसिडेंट हाऊसमध्ये बुकिंग करताय की काय आमचं?” “त्याचं काय आहे? तुम्ही इतक्या उशिरा आमच्याकडे आल्याने किंमत वाढतेय.” त्यांनी मला समजावण्याचा प्रयत्न केला. मी रागानेच उत्तर दिले, “तुम्ही जेवढे पक्के केले आहे, तेवढेच पुरे, पुढचे बुकिंग तुम्ही करू नका. मी पाहीन काय ते.”

नंतर बरेच काही रामायण घडले पण तो या लेखाचा विषय नाही फक्त पूर्वकल्पना येण्यासाठी थोडी माहिती दिली. पाच दिवसांचे पक्के आरक्षणही त्यांनी आम्ही घरातून निघताना आमच्या हातात ठेवले आणि आम्ही धाडस करून पाच दिवसांच्या थायलंडच्या आरक्षणाच्या जोरावर उरलेल्या पाच दिवसांचे आरक्षण नसतानाही न्यूझीलंडच्या दौऱ्यावर निघालो. पाच दिवसांनी हॅमिल्टनमध्ये उतरलो तेव्हा आमच्याकडे कुठल्याही हॉटेलचे आरक्षण नव्हते. तिथल्या बसस्टेशनवर बसून नेट धुंडाळले. माझ्या यादीतील हॉटेलांपैकी 'हॉटेल आयबिस' मध्ये त्या दिवशी जागा उपलब्ध नव्हती. मग दुसरे हॉटेल होते, 'अॅबटस' हॅमिल्टन! तिथे जागा दिसत होत्या. शिवाय दीड कि.मी अंतरावरच ते होते. आता तिथे जाऊन पाहू असे ठरवले, कारण दोन देशांचा दौरा होता. एक लग्न न्यूझीलंडमध्ये आणि त्याच लग्नाचे रिसेप्शन थायलंडमध्ये असल्याने आणि न्यूझीलंडमध्ये उन्हाळा असला तरी आपल्यासाठी ती थंडीच असते. त्यामुळे सामान भरपूर होते. कुठेतरी तात्पुरता आसरा तरी पाहणे गरजेचे होते. तिथेच एका बाजूला टॅक्सीस्टँड होता. तिथे जाऊन टॅक्सी करून अॅबटस, हॅमिल्टनला पोचलो.

तिथली व्यवस्थापक एक मुलगी होती, अगदी विशीबाविशीची. तिच्याशी बोलायला सुरुवात केली. चेक इन टाईम होता दोनचा. आता दहाच वाजले होते. ज्या खोलीचे मला मेक माय ट्रिपने १८० न्यूझीलंड डॉलर्स सांगितले होते त्याप्रकारातली खोली पहिल्या मजल्यावर असून भाडे ८९ असे सवलतीचे होते. शिवाय दुसऱ्या दिवशी राहिले तर १० डॉलर्स अजून कमी होणार होते. आम्ही तळमजल्याची रूम पसंत केली. ज्यात सोयी आम्हाला हव्या तशा होत्या आणि खोली मोठीही होती. तिचे भाडे होते १०९ डॉलर्स. शिवाय या रूमलाही दुसऱ्या दिवसापासून १० डॉलर्स कमी होणार होते. त्या रस्त्यावरच्या ९०% इमारती म्हणजे हॉटेल्स आणि मोटेल्स होती. त्या मुलीने स्वत: जाऊन रूम तयार करून दिली. अगदी जशी फोटोत दिसत होती तशीच. आम्ही तिथे दोन दिवसांचे आरक्षण करून टाकले. बाकीच्या सोयी कशा आहेत ते पाहून नंतर बदल करू किंवा इथेच रहायचे तर आरक्षण वाढवू, असे ठरवले.

Flagचौकशी करताना समजले की हॉटेल मालक चीनी असून सर्व कर्मचारीवर्गही चीनी होता. तिथेच जेवणाचीही सोय होती, नाश्ता राहण्याच्याच किमतीत समाविष्ट होता. थोड्या वेळाने जरा आराम करून फिरायला निघालो. बाहेर पडताना दिसले की, त्या हॉटेलच्या मुख्य इमारतीवर निरनिराळ्या देशांचे दहा बारा झेंडे फडकत होते. त्यात चीनी झेंडा होता, तसेच आपलाही झेंडा होता. परंतु न्यूझीलंडच्या वादळी वाऱ्याच्या जोराने ते सर्व फाटलेले दिसत होते आणि तसेच चिंध्यासकट फडफडत होते. आपल्या झेंड्याच्या थोडा तिरकस असल्याने एक दोनच चिंध्या निघाल्या होत्या.

फाटलेला झेंडा लावणे हा झेंड्याचा अपमान आहे, त्यातून मालक चीनी म्हटल्यावर मी गप्प बसणे शक्यच नव्हते. स्वातंत्र्यसैनिक कै. सी. व्ही.वारद हे दर १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीच्या नंतर भारतभरात घडलेल्या झेंड्याच्या अपमानाबद्दल जागरूक राहून सरकारकडे तक्रारी नोंदवीत असत. त्यानुसार कारवाई करून वेळ पडलीच तर फौजदारी कारवाई करावी लागत असे. नवरा म्हणाला, “थोडे सबुरीने घे.आपण परदेशात आहोत.” “पण आपण भारतीय पासपोर्टवरच आलोय आणि इथे आपल्याला ओळखणारे खूप लोक आहेत. वेळ पडली तर.” असे त्याला सांगून मी त्या व्यवस्थापक मुलीला बोलावून तिला ते झेंडे दाखवून सांगितलं, “This is wrong, You can’t put my flag like this torn status. This is an insult of me, my flag, my nation too” ती गडबडली,म्हणाली, “I am sorry. I will call my master.
You call him here. I will talk to him, because this is an International issue.” मी ठणकावले.

अर्ध्य तासातच मालक आले. मी त्यांना ते फटके झेंडे दाखवून पुन्हा आधीचेच वाक्य थोडीशी भर घालत म्हटले, “This is wrong, You can’t put my flag like this torn status. This is an insult of me, my flag, my nation too. This is a treasonable offence.” त्यावर त्यांनी उत्तर दिले, “This is only for decoration and we have windy weather in Newzealand here.” आता माझी सटकली. “Look MR. national flags are not things of decoration. They are Pride points. If you want to decorate your hotel by national flags, you should paint them on the wall or you should stick them on the wall properly. But when you unfurl them on flagpole you must conduct the flag code. Each country has flag code and any country does not allow to unfurl torn flag. Not even your country .See, your flag is also torn. If you are not concerned about your flag, I don’t mind, but I mind well about my pride point. My flag! So please change it immediately or if you can't change it now please remove it at first."

मी एका दमात एवढे सांगितल्यावर त्या सद्गृहस्थाने आपल्या कर्मचाऱ्यांना, जे आधीच तिथे उभे होते, त्याच्या भाषेत काहीतरी सांगितले आणि मला सांगायला आनंद वाटतो की त्या चीनी माणसाने तो झेंडा बदललाच पण आपल्या भारतीय झेंड्याला सॅल्यूटही ठोकला. वर मला हात जोडून भारतीय पद्धतीने नमस्कार करून 'नमास्टे' म्हटले. शिवाय भाडे न घेता पाच दिवस आमचा पाहुणचार केला. एवढेच नव्हे तर पुन्हा कधी आलात तर असेच त्यांच्याकडे रहाण्याची ऑफरही दिली आहे, शिवाय चीनला त्यांच्या घरी येण्याचे अगत्यपूर्वक आमन्त्रणही दिलेय.

“साहसे श्री प्रतिवसति”, असे म्हणतात, ते अगदी खरे आहे. मेक माय ट्रिप वरच्या रागाने केले धाडस अंगाशी न येता उलट पैसे आणि आत्माभिमान मिळवून देणारे ठरले. जवळजवळ ५०० न्यूझीलंड डॉलर्स रहाण्याचे आणि खाण्यापिण्याचे तीन/ चारशे न्यूझीलंड डॉलर्स वाचले. अजून एका ट्रिपची सोय झाली नाही का?

चित्र- किलमाऊस्की
https://lh3.googleusercontent.com/-30BrcUCiylI/Vse9f0jd4uI/AAAAAAAAAFQ/OPRqSDu-re8/s788-Ic42/footer.png

प्रतिक्रिया

भिंगरी's picture

7 Mar 2016 - 11:23 pm | भिंगरी

वा,सुरंगी,म्हणूनच दबंग म्हणतात.
झेंड्याबरोबर तुलाही सॅल्यूट.

प्रीत-मोहर's picture

8 Mar 2016 - 7:24 am | प्रीत-मोहर

भिंगरीताईशी अतिशय सहमत. उगाच नाही आम्ही तुला दंबगताई म्हणत

Maharani's picture

8 Mar 2016 - 3:35 pm | Maharani

+१००
मस्तच ताई..

यशोधरा's picture

8 Mar 2016 - 7:31 am | यशोधरा

ये ब्बात! जय हो सुरंगीताई!

सायकलस्वार's picture

8 Mar 2016 - 7:56 am | सायकलस्वार

निव्वळ वृषभविष्ठा!
चीनी मालक नको तितका सभ्य होता म्हणायला पाहिजे!

मधुरा देशपांडे's picture

8 Mar 2016 - 11:26 pm | मधुरा देशपांडे

तुम्हाला लेख आवडला नाही हे तुमचे वैयक्तीक मत मान्य. पण ते सांगण्याची ही पद्धत नाही. प्रतिसादातली भाषा पटली नाही. असो.

सायकलस्वार's picture

9 Mar 2016 - 1:19 am | सायकलस्वार

तुम्हाला वृषभविष्ठा शब्द आवडला नसेल तर मी तो परत घेतो. पण निषेध नोंदवण्याची त्यांची आततायी पद्धत मलाही योग्य वाटली नाही. फाटका झेंडा लावलेला पाहून कुणाला दुःखाचा उमाळा येऊ शकतो हे मान्य. पण जे खेळीमेळीने सांगता येऊ शकलं असतं त्यासाठी केलेला त्रागा आणि वापरलेली भाषा मला overbearing आणि rude वाटली. रेसिझमचं प्रदर्शनही (मालक चिनी होता म्हणून त्यांची जास्त सटकली असं त्यांनीच लिहिलं आहे) खटकलं.
पण प्रामाणिक प्रतिसादामुळे तुमच्या सुंदर अंकाला गालबोट लागत असेल तर प्रतिसाद उडवून लावायला माझी हरकत नाही.

मधुरा देशपांडे's picture

9 Mar 2016 - 1:26 am | मधुरा देशपांडे

तुमच्या मताबद्दल प्रॉब्लेम नाही. पण वृषभ विष्ठा हा शब्द अयोग्य आहे.

नूतन सावंत's picture

9 Mar 2016 - 10:55 am | नूतन सावंत

फाटका झेंडा लावलेला पाहून कुणाला दुःखाचा उमाळा येऊ शकतो हे मान्य.

मला दु:खाचा उमाळा आला नव्हता हो राग आला होता.

म्हणजे कसं बुवा?

ही (मालक चिनी होता म्हणून त्यांची जास्त सटकली असं त्यांनीच लिहिलं आहे)

माझी सटकली ते त्याने दिलेल्या उत्तरामुळे. (“This is only for decoration and we have windy weather in Newzealand here.” आता माझी सटकली.)याकडे तुमचे दुर्लक्ष झाले असावे.

वेल्लाभट's picture

9 Mar 2016 - 12:16 pm | वेल्लाभट

म्हणजे कसं बुवा?

हे हाय हाव यू डूइन मॅन...
दॅट फ्लॅग लूक्स अमेझिंग व्हेन इट्स टॉर्न हा हा हा हा
ब यू नो व्हॉट... इत विल्ल लूक ईव्हन बेटर व्हेन नॉट टॉर्न हा हा हा
आर यू गॉना क्लाईंब दॅट पोल युअरसेल्फ अँड चेंज इट ऑर शॅल आय थ्रो यू अप देअर टू डू द जॉब बडी?
हा हा हा

खेळीमेळी.
असं असेल बहुदा मनात.

वेल्लाभट's picture

9 Mar 2016 - 12:17 pm | वेल्लाभट

फाटका झेंडा लावलेला पाहून कुणाला दुःखाचा उमाळा येऊ शकतो हे मान्य

नशीबच म्हणायचं.

वेल्लाभट's picture

9 Mar 2016 - 12:21 pm | वेल्लाभट

साहेब प्रामाणिक प्रतिसाद 'या' वरील प्रतिसादाला म्हटलं जाऊ शकतं. तुमचा पहिला प्रतिसाद प्रामाणिक नव्हता, तो rude होता.

सायकलस्वार's picture

10 Mar 2016 - 1:44 am | सायकलस्वार

उचकवण्याचे सर्व प्रयत्न फाट्यावर मारले आहेत. धन्यवाद.

वेल्लाभट's picture

10 Mar 2016 - 7:41 am | वेल्लाभट

असं होय..मग हा प्रतिसाद का बरे दिला गेला.. :)

नूतन सावंत's picture

9 Mar 2016 - 10:40 am | नूतन सावंत

चिनि लोकही सभ्य असू शकतात.

बाजीप्रभू's picture

8 Mar 2016 - 8:26 am | बाजीप्रभू

आनंद वाटला तुमचा देशाभिमान पाहून… सध्याच्या गरळ ओकणाऱ्या JNU च्या बातम्यांच्या भडिमारात हि तुमची राष्ट्रवादी दबंगगिरी वाचून बरं वाटलं.

जेपी's picture

8 Mar 2016 - 10:42 am | जेपी

+११११

एकनाथ जाधव's picture

8 Mar 2016 - 5:54 pm | एकनाथ जाधव

सलाम

अत्रे's picture

8 Mar 2016 - 8:54 am | अत्रे

“You call him here. I will talk to him, because this is an International issue.”

हाहाहा!

भाऊंचे भाऊ's picture

8 Mar 2016 - 10:55 am | भाऊंचे भाऊ

असा प्रश्नच मनात उत्पन्न होत नाही.

अभ्या..'s picture

8 Mar 2016 - 11:04 am | अभ्या..

हेहेहेहे भारीच.
.
बादवे जरा धाग्यातल्या ध्वजाकडेही पहा ना जरा. प्रमाण आणि अशोकचक्र चुकीचेय हो. ;)

पिलीयन रायडर's picture

8 Mar 2016 - 12:48 pm | पिलीयन रायडर

मला वाटतं की हे चित्र फक्त प्रतिकात्मक आहे. रंग, प्रमाण, अशोकचक्र इ चे नियम झेंडा फडकवल्यास लागु असावेत.
मी फ्लॅग कोड ही पुर्वी वाचलेला आहे. हौशी चित्रकलेत असे नियम लागु असल्याचे वाचनात वाचनात नाही.

रंग चुकीचे वापरणे, उलटे दाखवणे, अपमानास्पद वापर चितारणे इ कोणतेही गंभीर गुन्हे नसल्यास हा झेंडा हरकत घेण्याजोगा नसावा असे मा वै म.

सस्नेह's picture

8 Mar 2016 - 3:51 pm | सस्नेह

हे चित्र म्हणजे काही लोगो नव्हे, ते प्रतीकात्मक आहे.
जसे की व्यंगचित्रातल्या व्यक्ती फोटोसारख्या दिसत नाहीत, ती खऱ्या व्यक्तिमत्वांचे प्रतिक असतात.

अभ्या..'s picture

8 Mar 2016 - 6:36 pm | अभ्या..

असो.
लोगो, प्रतिके, फोटो आणि व्यंगचित्रे यात मलाच अधिक अभ्यासाची गरज आहे.

पिलीयन रायडर's picture

8 Mar 2016 - 8:57 pm | पिलीयन रायडर

जरुर करा.तुमच्या व्यवसायाला पुरकही आहे.

अहो तेच उत्तर तर त्या चिनी मालकाने दिलेय. "इटस ओन्ली फॉर डेकोरेशन" आपल्या सुरंगीताई म्हणून तर चिडल्यात.
भारतातल्या व्यक्तीने तसे म्हणले तर वेगळा न्याय आहे का?
बादवे
ध्वजाच्या चित्राच्या बाबतीतः कोड म्हणते 'सार्वजनिक स्थान (जनता द्वारा उपयोग हो या जनता की पहुंच हो. (यात लहानमुलाच्या चित्रांच्या वह्या येत नाहीत, संस्थळ येते) ) राश्ट्रीय ध्वज की अभिव्यक्तीमे कोई भी तस्वीर, ड्रॉईंग, पेन्टींग या फोटोग्राफ के द्वारा विकृत, विरुपित, दूषित, कुरुपित अथवा नष्ट करता है तो तीन साल तक के कारावाससे या जुर्मानेसे, या दोनोसे दंडीत किया जायेगा.

पिलीयन रायडर's picture

9 Mar 2016 - 3:17 pm | पिलीयन रायडर

विरुपित म्हणजे deformed / कुरुप. वरील चित्र १००% प्रमाणात नसले तरी Deformed नाही. तिरंगा शक्य तितका प्रमाणातच काढायला हवा, पण वरचे चित्र कुरुप / विरुपित आहे आणि म्हणुन दंडनीय अपराध ह्या सदरात येते असे खरेच तुमचे म्हणणे आहे का?

प्रमाण आणि अशोकचक्र चुकीचेय हो. ;)

तिरंगा शक्य तितका प्रमाणातच काढायला हवा,

आता हेच मला एकवताय

पिलीयन रायडर's picture

9 Mar 2016 - 3:54 pm | पिलीयन रायडर

"शक्य तितका" राहिलं का वाचायचं? वरचे चित्र अगदी १००% प्रमाणबद्ध नसले तरी कुरुप, विरुपित, दंडनीय अपराध व्हावा असे आहे का? कारण हे ही तुम्हीच लिहीलेले आहे.

हे "प्रतिकात्मक" चित्र आहे आणि ते फुटपट्टी घेऊन मापात काढ्लेले नसले तरी विरुपित नाही. लेखाचा भाव व्यक्त करण्यापुरते आहे आणि राष्ट्रध्वजाचा अपमान होइल असे नाही. पण पराचा कावळा करायचे ठरवलेच असेल तर काय बोलणार..

नाना स्कॉच's picture

9 Mar 2016 - 4:01 pm | नाना स्कॉच

अभ्या +1 (माफ करा भाऊ तुमचे पुर्ण नाव माहीती नाही म्हणून फ़क्त अभ्या असा उल्लेख करतोय)

आमच्या कार्यालयीन ठिकाणी एकदा झेंडा (प्रमाणात असूनही) उलट फड़कवला म्हणून प्रिंसिपल सरांना डायरेक्ट कलेक्टर साहेबांची "शो कॉज" आली होती (नंतर अर्थात सरांनी फिजिकल एजुकेशन प्रभारी अन शिपायाला फड़कावला होता ), धाग्यातील झेंड्याचे प्रमाण 3×2 आहे की नाही ते तपासायला हवे आहे, माझ्या निरीक्षणानुसार अशोकचक्राला सुद्धा 24 आरे दिसत नाहियेत, हा प्रकार झेंडा उलटा फड़कवने सारखा गंभीर असेल काय ह्याचे कायदेशीर ज्ञान मला नाही. पण मनात ते चुकीचे वाटले.

भूलचुक माफी

नाना

बाकी एकंदरित लेखा मागची प्रमाणिक भावना नीट पोचली आहे हे वेगळे सांगणे न लगे

सस्नेह's picture

9 Mar 2016 - 4:47 pm | सस्नेह

मला वाटतं, इथे ध्वजाचा अपमान होत नाही आहे. तसेच सदर चित्र ही संस्थळाची अभिव्यक्ती नसून एका ललित लेखातील चित्र आहे.
ललित लेखनासारखी ललित चित्रकला असते का हे माहिती नाही. पण जर दोन वक्र रेषांनी गणेश काढला तर तो गणेशाचा अपमान होत नाही, तद्वत इथे ध्वजाचे सूचक चिन्ह काढल्याने ध्वजाचा अपमान होत नसावा.
आपण सर्व मिपाकर सुजाण आहोत. तरी हा विषय इथेच थांबवावा आणि एका चांगल्या लेखाला गालबोट लागू देऊ नये अशी संबंधितांना विनंती आहे.

गणेशाच्या चित्राला प्रोटोकॉल नाही. ध्वजाला लिखित प्रोटोकॉल आहे. संबंधित लेख हा प्रोटोकॉल पाळला गेलेला नाही म्हणून दाखवलेल्या डेरिंगचे अन देशप्रेमाचे वर्णन आहे म्हणूनच प्रतिसाद लिहिला. माझ्याकडून हा विषय थांबलाच आहे. ह्यापुढेही आपणास काही चित्र संदर्भात बोलायची/सांगायची गरज नाही. आपण सूज्ञ आहात. धन्यवाद

एखाद्या व्यक्तीचा विनापरवानगी मुखपृष्ठासाठी फोटो वापरताना काही प्रोटोकाॅल असतो का? का धुसर वगैरे करुन डायरेक्ट वापरता येतो?

माहितगार's picture

8 Mar 2016 - 1:27 pm | माहितगार

लेख आवडला

वेल्लाभट's picture

8 Mar 2016 - 3:48 pm | वेल्लाभट

क्लास अ‍ॅक्ट !
सल्यूट तुम्हाला.
बेकार हाणलात.

कैलासवासी सोन्याबापु's picture

8 Mar 2016 - 3:51 pm | कैलासवासी सोन्याबापु

“This is wrong, You can’t put my flag like this torn status. This is an insult of me, my flag, my nation too”

ह्याच्यापुढे काय वाचलेच नाही हो तै!! डोळे भरून आले! Thanks for motivating me ! And I mean it :)

नूतन सावंत's picture

9 Mar 2016 - 11:02 am | नूतन सावंत

सोन्याबापू,तुमच्यासारख्या तळहातावर शिर घेऊन लढणाऱ्यांना मी काय मोटिवेट करणार. झालेच असले तर तुमच्या लिखाणामुळे मीच मोटिवेट झाले असेन.माझ्या कृतीचे मोल तुमच्यासारख्या प्रत्यक्ष रणांगणात जीवाची बाजी लावून झेंड्याची प्रतिष्ठा सांभाळणाऱ्या लोकांना जास्त समजेल,यात शंका नाही.

सस्नेह's picture

8 Mar 2016 - 3:52 pm | सस्नेह

जय हो सुरंगीताई.

प्राची अश्विनी's picture

8 Mar 2016 - 6:06 pm | प्राची अश्विनी

__/\__

अजया's picture

8 Mar 2016 - 6:44 pm | अजया

जय हो!

पद्मावति's picture

8 Mar 2016 - 6:52 pm | पद्मावति

क्या बात है!

झेंड्याबरोबर तुलाही सॅल्यूट.

+१००००

वा! अभिमान दाटून आला!

आकाश खोत's picture

9 Mar 2016 - 11:31 am | आकाश खोत

छान. आपल्या झेंड्याचा मान राखणे आवश्यकच आहे.
काही लोक हे गांभीर्याने घेत नाहीत. प्रत्येक देशात त्यांच्या झेंड्याबद्दल पाळायचे वेगळे संकेत असतात, आणि त्यांच्या भावनांचा आदर राखला गेला पाहिजे. ती सजावटीची वस्तू नाही हे खरेच आहे.
परदेशी लोकांना याची माहिती नसेल आणि त्यामुळे मुद्दाम जरी नाही, तरी नकळत अनादर होत असेल तर त्याची जाणीव करून देण्यास काहीच हरकत नाही. ते स्तुत्य आहे.

काही लोकांनी या प्रसंगाबद्दल विनाकारण विरोधाचा सूर आवळला आहे ते पटले नाही. त्यात काय एवढे? हि मनोवृत्ती असल्यामुळे आपल्याकडे सार्वजनिक मालमत्ता, रस्ते, बस, रेल्वे या सगळ्या गोष्टींचा गैरवापर होतो. संतापात नासधूस होते. त्यात काय एवढे म्हणून आपण सोडून देतो.

आज झेंड्याबद्दलसुद्धा तशीच वृत्ती आहे असे दिसले.

गिरकी's picture

9 Mar 2016 - 11:35 am | गिरकी

खूप छान सुरंगी तै :)
देशाभिमान असावा तर असा !!

पियुशा's picture

9 Mar 2016 - 11:41 am | पियुशा

___/\___

वैदेहिश्री's picture

9 Mar 2016 - 2:07 pm | वैदेहिश्री

तुम्ही भारीच आहात सुरंगी काकू

पिशी अबोली's picture

9 Mar 2016 - 4:51 pm | पिशी अबोली

सुरंगीताई, भारी! :)

पैसा's picture

9 Mar 2016 - 5:18 pm | पैसा

लेखातली भावना आवडली! बाकी ट्यार्पीसाठी सर्वांना धन्यवाद म्हणायला विसरू नको हं!

प्रश्नलंका's picture

9 Mar 2016 - 5:58 pm | प्रश्नलंका

खूप छान सुरंगी तै :)
___/\___

स्मिता श्रीपाद's picture

9 Mar 2016 - 6:30 pm | स्मिता श्रीपाद

सुरंगी ताई.....फार फार मस्त लेख आहे...असे धाडस तुच करु जाणे..

तर्राट जोकर's picture

10 Mar 2016 - 2:15 am | तर्राट जोकर

सुरंगी, कडक काम केले तुम्ही. एक सलाम तुम्हालाही.

रच्याकने, अभ्या.. यांचे म्हणणे बरोबर असूनही त्यांच्याबरोबर विनाकारण वाद घालण्याचे कारण कळले नाही. झेंडा चुकीचा आहे, बदलुन घ्यायला इंटरनेटवर खूप आहेत. अभ्या.. यांना धन्यवाद म्हणून झेंडा बदलला असता तर खूप आवडले असते. राष्ट्रीय ध्वजापेक्षा इगो जास्त महत्त्वाचा नसावा. अंक सुंदर झालाय. गालबोट लागु देऊ नका.

रवीराज's picture

12 Mar 2016 - 5:26 pm | रवीराज

हा प्रतिसाद मनापासुन आवडला.
पण एकंदरित लेखसुद्धा मनापासुन आवडला.

मधुरा देशपांडे's picture

11 Mar 2016 - 4:23 pm | मधुरा देशपांडे

___/\___

सर्वसाक्षी's picture

11 Mar 2016 - 11:48 pm | सर्वसाक्षी

कौतुक आणि अभिनंदन. योग्य तेच केलत.

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 Mar 2016 - 12:03 am | डॉ सुहास म्हात्रे

जय हो ! तुमच्या देशप्रेमाबद्दल आणि परदेशात तो दाखवताना दाखविलेल्या धाडसाबद्दल आदर वाटला !!

सुरंगीताई, तुमचे माहेरचे नाव "दुर्गा" असे होते का ?! :)

मुक्त विहारि's picture

12 Mar 2016 - 8:10 am | मुक्त विहारि

तिकडे गावातला भाई आणि इथे चिनी भाई

सगळ्यांना भारी सुरंगी ताई.

इडली डोसा's picture

12 Mar 2016 - 8:49 am | इडली डोसा

तुम्ही लयभारी आहात.

भुमी's picture

12 Mar 2016 - 3:41 pm | भुमी

सुरंगीताई_/\_

स्वाती दिनेश's picture

12 Mar 2016 - 9:09 pm | स्वाती दिनेश

डिसेंबर च्या कट्ट्याला हा अनुभव तू शेअर केला होतास तेव्हाच तुझा सॉलिड्ड अभिमान वाटला होता. वाचून परत एकदा झंडे को सलामी दी..
स्वाती