मी, प्रवास आणि बरंच काही

किलमाऊस्की's picture
किलमाऊस्की in विशेष
8 Mar 2016 - 12:05 am

LekhHeader

body {
background-image: url("https://lh3.googleusercontent.com/-4IV7c0ur4aU/VtIMF96j2AI/AAAAAAAAATs/x...");
background-repeat: repeat;
}
.inwrap {
border: 0.5em solid transparent;
-webkit-border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/p...") 10 round; /* Safari 3.1-5 */
-o-border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/p...") 10 round; /* Opera 11-12.1 */
border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/p...") 10 round ;
}

फिरायला सगळ्यांना'च' आवडतं (माझ्या नवर्‍याला सोडून) असं माझं ठाम मत आहे. ते मी घरात वेळोवेळी नवर्‍यासमोर हिरीरीने मांडत असते. असं म्हणतात, पायावर तीळ असेल तर प्रवास अगदी पाचवीला पुजलेला असतो. माझ्या दोन्ही तळपायांवर मोठाले दोन तीळ आहेत. आता त्यांना न्याय नको का द्यायला? या दोन तीळांमुळेच अधूनमधून मला ‘Fernweh Attacks’ येत असतात. बिझनेस ट्रीप असो वा व्यवस्थित प्लॅन केलेली सुट्टीतली सहल असो, अचानक ठरलेलेली रोड ट्रिप अथवा अगदी निरुद्देशिय भटकंती असो, सर्व प्रकारचा प्रवास मला आनंद देतो. प्रवास आवडतोच पण त्याचबरोबर प्रवासात वापरायला जी नवनवीन ट्रॅवल गॅजेट्स, अ‍ॅक्सेसरीज, टूल्स बाजारात मिळतात ती देखील आवडतात. या विविध प्रकारच्या टूल्समुळे सहल सुखकर होतेच, त्याबरोबर प्रवासाची लज्जतही वाढते. या लेखात वेळोवेळी माझ्या सहलीची मजा द्विगुणीत करणार्‍या ट्रॅवल गॅजेट्स, अ‍ॅक्सेसरीजची ओळख.

(१) होलोस्पेक्स ३-D ग्लासेस - ३-D सिनेमा पाहातांना आपण सर्रास ३-D चष्मे वापरतो. पडद्यावर दिसणार्‍या चित्राचा त्रिमीतीय अनुभव घेणं या चष्म्यामुळे शक्य होतं. पण एखादं ठिकाण पहातांना या ३-D ग्लासेसच्या वापरामुळे अतिशय वेगळा अनुभव घेता येतो हे काही महिन्यांपूर्वी अनुभवलं. परदेशात ख्रिसमसच्या दिवसात ख्रिसमस लाईट्स हे महत्त्वाचं आकर्षण असतं. यावर्षी ख्रिसमस लाईट्स पहायला फ्लोरीडातल्या ऐतिहासिक शहराला - 'सेंट ऑगस्टीन' ला भेट द्यायचं ठरलं. सुमारे ४५० वर्ष जुनं हे शहर अमेरीकेतली पहिली परकीय वसाहत. या शहराने ऐतिहासिक खुणा जपून ठेवल्या आहेतच, त्याचबरोबर तिथल्या ख्रिसमस लाईटस नॅशनल जिओग्राफिकच्या क्रमवारीत जगातल्या अव्वल १० ठिकाणांमधे गणल्या जातात. १९ नोव्हेंबर ते ३० जानेवारी, दररोज जवळजवळ २० लाखाहून अधिक लाईट्सची रोषणाई सेंट ऑगस्टीन शहराला रात्री ६ वाजल्यापासून झळाळून टाकते. या लाईट्स शहरात पायी फिरुन किंवा ट्राम टूरने पहाता येतात. आम्ही ट्राम टूर घ्यायची ठरवली. या टूरमधे या होलोस्पेक्स ग्लासेसची ओळख झाली. रात्रीच्या गडद अंधारात या लाइट्सने झळाळलेलं शहर पहाणं हा अवर्णनिय अनुभव होताच पण तो द्विगुणीत केला या ३-D चष्म्याने.

https://lh3.googleusercontent.com/-Ah7ZUEgUwj4/Vryis6o5VVI/AAAAAAAAFUM/29QD4BQ2a_E/s800-Ic42/3d_glass2.png
(होलोस्पेक्स ३-D ग्लासेस)

हा चष्मा डोळ्यावर चढ्वता क्षणी भोवतालच्या लाईट्स स्नोफ्लेक आकारात बदलल्या. आपण शेकडो रंगीबेरंगी स्नोफ्लेक्सच्या जगात उभं असल्याचा भास होऊ लागला. हे कसं शक्य झालं? तर या होलोस्पेक्स ३-D चष्म्यात कॉम्प्युटर जनरेटेड नागमोडी रेषांचे पॅटर्न असतात. डीफ्रॅक्शन, नोड्स व अँटीनोडस (Defraction, nodes, antinodes) - साधं सरळं भौतिकशास्त्र वापरुन तयार केलेली लेन्स. या लेन्सचा वापर करुन लाईट्सकडे पाहीलं असता साध्या, छोट्याश्या बल्बमधून बाहेर पडणारा प्रकाश स्नोफ्लेक आकारात दिसू लागतो.

https://lh3.googleusercontent.com/-418jkW3tJUg/Vr0K1G62L4I/AAAAAAAAFVE/CA_f4oPoH9U/s512-Ic42/holospex_collage.png

(होलोस्पेक्स ग्लासेस वापरुन स्नोफ्लेक्स आकारात दिसणार्‍या ख्रिसमस लाईट्स)

याच तत्वाचा उपयोग करुन विविध आकार तयार करता येतात. असे हे चष्मे पार्टी, पिकनिक्सना वापरतात. हे चष्मे न वापरताही ख्रिसमस लाईट्सचा आनंद घेता आला असता, पण या चष्म्याच्या वापराने वेगळ्याच दुनियेत नेलं. या चष्म्याबद्दल अधिक माहिती इथे पहाता येईल. होलोस्पेक्सच्या वेबसाईटवरही हे चश्मे वापरुन व न वापरता चित्रं कसं दिसत हे पहाता येईल.

२. गो-प्रो कॅमेरा – “आपण झीप लाईनिंग करायला जाऊया!” मला अनेकदा अचानक झटके येत असतात त्यातलाच एक सकाळी उठल्या उठल्या आलेला हा नवीन झटका. “तुला जमणार आहे का? तिकडे गेल्यावर उंची बघून मग नको म्हणशील.” इति नवरा. हे नेहमीचंच. प्रत्येक गोष्टीत शंका-कुशंका काढणे हे माझ्या 'कन्या' राशी शंकासुर नवर्‍यला चांगलं जमतं. पण मी काय कमी आहे होय! आपलं घोडं कसं दामटत ठेवायचं मला चांगलं माहीतीय. "आपण येत्या शनिवारी जातोय झीप लायनिंग करायला!" मी (नेहमीप्रमाणे) ठरवून टाकलं. झीप लायनिंगचं बुकिंग करतेवेळी वेबसाईटवर दोन ऑप्शन्स दिले होते - गो-प्रो कॅमेरा सकट अथवा गो-प्रो कॅमेराविना. “काय करायचाय कॅमेरा? आहे की आपल्याकडे” माझा आपला आगाऊ भाबडा प्रश्न. “अगं तो साधा कॅमेरा नाहिये, गो-प्रो कॅमेरा आहे.” असं म्हणत नवर्‍याने गो-प्रो कॅमेर्‍याची वेबसाईट दाखवली.

गो-प्रो कॅमेरा अर्थात एच-डी क्वॉलिटी, वॉटरप्रूफ, शॉकप्रूफ व्हिडीओ रेकॉर्ड करण्याचं यंत्र. या कॅमेर्‍याची खुबी म्हणजे याचा आकार, वजन आणि यात रेकॉर्ड होणार्‍या व्हिडियो रेकॉर्डींगची सुस्पष्ट व उत्तम गुणवत्ता. हाताच्या मुठीत मावणारा हलका असा हा कॅमेरा बरेचदा बंजी जंपिंग, स्काय डायविंग, स्किइंग असे प्रोफेशनल अँडवेंचर स्पोर्ट्स खेळणारे रेकॉर्डींगसाठी वापरतात. गो - प्रो नक्की काय प्रकार आहे समजल्यावर अर्थातच कॅमेर्‍यासकट बुकिंग केलं. झीप लाईनिंग करतांना डोक्यावरच्या हेल्मेटवर हा कॅमेरा बसवण्यात आला.

https://lh3.googleusercontent.com/-HHO1QiTkF9M/Vr0Oulhx4vI/AAAAAAAAFVg/MZIbXalTauc/s239-Ic42/FB_IMG_1455230446544-1.jpg

(हेल्मेटवर बसवलेला गो-प्रो कॅमेरा)

आपल्याला हवा तेव्हा कॅमेरा ऑन-ऑफ करायचा आणि सहलीतली हवे तितके क्षण या कॅमेरात पकडून ठेवायचे. अतिउंच ते अतिरुंद, अरुंद, भरधाव अशा विविध प्रकारच्या आठ झीप लाईन्स आम्ही पार केल्या. पहिली लाईन क्रॉस करतांना थरथरणारे माझे हात, कापरा आवाज ते शेवट शेवटच्या लाईन्स क्रॉस करतांना (अति?)आत्मविश्वास, अत्यानंद, अगदी एक्सपर्ट असल्याच्या आवेशात नवर्‍याला केलेल्या अनाहूत सूचना, अगदी प्रत्येक क्षण या कॅमेर्‍याने टिपले. भीती, अत्यानंद, आश्चर्याने भारलेल्या झीप लायनिंगचे दोन तास अविस्मरणीय होतेच परंतु हे क्षण पुन्हा पुन्हा जगण्याची सोय करुन दिलेल्या त्या गो-प्रो कॅमेरालाही अनेकानेक धन्यवाद!

३. नॅशनल पार्क पासपोर्ट - "National Parks Passport cancellation Station. Cancel your National Park Passports here!" सिअ‍ॅट्लच्या क्लोंडायक गोल्ड रश नॅशनल पार्क गिफ्ट स्टोअरमधला वॉलिंटीअरींगचा पहिला दिवस. स्टोअर मॅनेजर दुकानाची माहिती देत असतांना आम्ही वरचं वाक्य लिहिलेल्या एका टेबलापाशी आलो. पासपोर्ट कॅन्सलेशन? इथे? कशाला? आधीच स्टोअरमधल्या अनेक वस्तू, पुस्तकं, दुकानातली रोजची कामं बघून गोंधळात पडलेले मी, त्यात हा नवा गोंधळ. पासपोर्ट इथे कशाला कँसल करायचा? पासपोर्ट असा कँसल करता येतो? अनेक प्रश्नांची एकाच वेळी डोक्यात गर्दी. तेवढयात मॅनेजरने माहिती द्यायला सुरवात केली.

पर्यावरण संरक्षण व संवर्धन याकरीता १९१६ साली अमेरिकन सरकारने स्थापन केलेली NPS अर्थात 'नॅशनल पार्क सर्विसेस' ही संस्था यावर्षी १०० वर्ष पूर्ण करीत आहे. NPS जवळजवळ ३९६ नॅशनल पार्क, मॉन्युमेंट्स, ऐतिहासिक जागा यांची देखरेख करते. या उपक्रमाला सरकारकडून आर्थिक पाठबळ मिळतंच परंतु पैसा उभा करण्यासाठी दरवर्षी NPS तर्फे अनेक उपक्रम राबवले जातात. त्यापैकी एक नॅशनल पार्क पासपोर्ट."Passport to your National Park" ही टॅगलाईन मिरवणारा NPS तर्फे राबवला जाणारा माझा हा सर्वात आवडता उपक्रम. नॅशनल पार्क पासपोर्ट हे १०० पानी ६ बाय ३.५ इंची छोटेखानी पुस्तक.

https://lh3.googleusercontent.com/-wYZUiJNypco/VrykQG-KhvI/AAAAAAAAFUg/p7dXVmOQaSQ/s512-Ic42/29000.jpg

एखाद्या ठिकाणची आठवण म्हणून आपण तिथली खासियत असलेली वस्तू विकत घेतो. त्याच प्रमाणे नॅशनल पार्कमधे गेल्यावर तिथली आठवण म्हणून या पासपोर्टमधे त्या त्या ठिकाणचे मी स्टँप्स जमवते. :-)

हे ठसे कुठे मिळतात ? NPS च्या अधिकाराखाली येणार्‍या प्रत्येक नॅशनल पार्कमधल्या विझीटर सेंटरमधे हे कॅन्सलेशन ठसे मिळतात. ते आपल्या पासपोर्टवर छापून घ्यायचे. हे पासपोर्ट पुस्तक विकत घ्यावं लागतं, पण स्टँप्स अर्थातच फुकट असतात.

https://lh3.googleusercontent.com/-RcfRcFwsP_Y/Vr0iE1Ckr5I/AAAAAAAAFV0/om6TpDpieiI/s512-Ic42/passport2.png

नॅशनल पार्कला गेल्यावर तारीख-वार, जागेचं नाव, चिन्ह असलेले हे स्टँप्स पासपोर्ट वर मारून घेणं माझ्या अतिमहत्त्वांच्या कामामध्ये येतं (मी हे स्टँप मारायलाच नॅशनल पार्कला भेटी देत असते असं नवर्‍याचं मत आहे.)

असो, तर नॅशनल पार्क गिफ्ट स्टोअरमधे वॉलिंटियरींग करत असतांना या पासपोर्ट संबंधीचे दोन अनुभव.

एकदा दोन मुली दुकानात शिरल्या. दुकान फिरत असतांना स्टँपपाशी आल्या. स्टँप्स बघताच बॅगेतून चटकन पासपोर्ट काढला. तारीख अ‍ॅडजस्ट करुन ठ्सा मारणार इतक्यातच कॅश काउंटरुन माझं लक्ष गेलं. लाल रंगाचा पासपोर्ट? हाय रे कर्मा? काय ते माझ्या लक्षात आलं, माझ्यासारखाच त्यांचा घोटाळा झालेला. त्या खर्‍या पासपोर्टवर स्टँप मारत होत्या. वेळीच त्यांना मी अडवलं. हा स्टँप कशासाठी आहे ते समजावलं आणि अनर्थ टळला.

https://lh3.googleusercontent.com/-cg0IVttr-l4/Vr-5uEAylcI/AAAAAAAAFW8/9quqFooQIs8/s512-Ic42/passportstamp.png

असाच एकदा एक गलेलठ्ठ अमेरिकन स्टँपची चौकशी करीत दुकानात आला. अगदी जर्जर झालेल्या त्याच्या पासपोर्टवर माझं लक्ष गेलं. (माझं बरोब्बर इतरांच्या पासपोर्टसवर लक्ष असतं. "भला मेरे पासपोर्ट्से ज्यादा स्टँप्स उसके पासपोर्टपे कैसे?") पान आणि पान भरलेलं. "पासपोर्ट बघू का?" असं विचारताच उत्साहाने त्याने माझ्या हातात पासपोर्ट दिला. हा पठ्ठा अगदी कैरो पसुन ते संपूर्ण उत्तर दक्षिण अमेरिकेतल्या अनेक नॅशनल पार्कमधे फिरलेला. प्रत्येक ठिकाणचे स्टँप्स नेटाने जमवलेले. सांभाळून ठेवलेले. बोलता बोलता अजून कोणाचं तरी नाव घेउन म्हणाला, त्या माणसाचा रेकॉर्ड आहे कितीतरी स्टँप्सचा तो तोडाचाय त्याला. मी त्याला आनंदाने शुभेच्छा देत पासपोर्ट परत केला.

हे स्टँप्स माझ्यासाठी फक्त स्टँप्स नाहीत तर अनेक आठ्वणींचा कोलाज आहे. मिपावर क्लोंडायक गोल्ड रश मालिका लिहितांना माहीती जमवण्यासाठी गोल्ड रश म्युझियमला दिलेली पहिली भेट असो, वा नोकरी मिळाल्यावर या म्युझियममधल्या वॉलिंटीयरिंग कामाचा शेवटचा दिवस असो, 'लेक २२' ची धापा टाकत ३ तासाची अवघड चढण असो वा अचाकन आलेल्या पावसाने पचका केलेली माउंट रेनियरची सहल असो. या आठ्वणी स्टँप्सच्या रुपात साठवल्या आहेत. माझ्या खर्‍या खुर्‍या भारतीय पासपोर्टच्या बरोबरीनेच हाही पासपोर्ट माझ्यासाठी तितकाच महत्त्वाचा आहे.

४. सेल्फ गाईडेड ऑडीयो टूर डिवाईस - "इथल्या प्रत्येक विभागाला क्रमांक दिलेले आहेत. एक क्रमांकापासून सहल सुरु होते व २२ व्या क्रमांकावर संपते. हे तुमचे सेल्फ गाईडेड ऑडीयो टूर डिवाईस. यावर १-२२ क्रमांक आहेत. ज्या ब्लॉकमधे तुम्ही उभे असाल तिथला क्रमांक दाबला की त्या विभागाविषयी माहीती या यंत्राद्वारे हेडफोनच्या सहाय्याने ऐकता येईल. माहिती पुन्हा पुन्हा ऐकण्यासाठी # दाबू शकता. 'विया झोरायदा' अनोखं जग आहे. तुम्हाला नक्कीच आनंद देईल. 'विया झोरायदा' मधे तुमचं स्वागत आहे!" सेंट ऑगस्टीन शहर फिरतांना तिथला प्रसिद्ध वाडा 'विया झोरायदा' चुकवून चालणार नव्हता. विझीटर सेंटर मधला मनुष्य वाड्याची संक्षिप्त माहीती देत होता. 'सेल्फ गाईडेड ऑडीयो टूर डिवाईस' बद्दल ऐकून होतो परंतु कधी वापरण्याचा योग आला नव्हता. हा योग जुळून आला हे म्युझियम पहातांना आला.

रिमोटच्या आकाराचं छोटंसं, हलकं खिशात मावेल व हाताळायला सोप्पं असं यंत्र. हेड्फोन जोडलेले. आवाज कमी जास्त करायला बटनं. स्पॅनिश, इंग्लिश, फ्रेंच या तीन भाषेत वाड्याचा इत्यंभूत इतिहास अगदी मजेशीर रितीने, निरनिराळे संदर्भ देउन सोप्या भाषेत ऐकता येत होता. वेळोवेळी हवं तसं रेकॉर्डींग मागेपुढे करता येत होतं आवडलेल्या जागी किंचित जास्त वेळ रमता येत होतं. सेल्फ गाईडेड ऑडीयो टूर डिवाईसमधलं सांद्र संगीत भूतकाळात नेत होतं.

https://lh3.googleusercontent.com/-dqk72Rie3ts/Vryf4zZ3WdI/AAAAAAAAFTs/Tf62Eil3kV4/s576-Ic42/IMG-20160210-WA0005.jpg
(चित्र आंतरजालावरुन साभार. संदर्भ - filmpark)
हा वाडा म्हण्जे स्पेन मधील प्रसिद्ध 'ला ग्रानादा' येथील 'अलांब्रा पॅलेस'ची छोटी आवृती. १८८३ साली हिवळ्यात रहाण्यासाठी फ्रँक्लिन स्मिथने बांधलेला हा वाडा पुढे अब्राहम मुस्स्लेम याने विकत घेतला. वाड्याच्या दोन्ही मालकांनी त्यावर निरातिशय प्रेम केलंच, पण वेळोवेळी या वाड्याच्या संग्रहात अनेकानेक सुंदर वस्तूंची भर घातली. इथेच २५०० जुनी इजिप्शियन मांजराच्या केसापसून बनवलेली पर्शियन रग पहायला मिळाली. विविध वस्तूंनी नटलेल्या अतिशय देखण्या अशा या वाड्यात दोन तास या यंत्राच्या सहाय्याने मंत्रमुग्ध केलं. वाड्याची सफर या यंत्राशिवाय ही करता आली असती, परंतु सोबतीला असा माहितीचा खजिना घेउन केलेली सफर नक्कीच लक्षात रहाण्यासारखी होती.

५. डॅश कॅम - डॅश कॅम अर्थातच डॅश बोर्ड कॅमेरा. चारचाकीच्या डॅशबोर्ड्वर हा कॅमेरा चिकट्वता येतो. हा कॅमेरा चालत्या कारच्या विंंड्स्क्रिन मधून दिसणारया गोष्टी टिपत असतो. घाटाचा वळणावळणाचा अवघड रस्ता वा निसर्गरम्य सागरीमार्ग अनेकदा रोड ट्रिप करत असतांना चालत्या गाडीत रेकॉर्डिंग करायला या कॅमेर्‍यचा वापर होतो.

(डॅशकॅमचा वापर प्रामुख्याने रस्त्यावरील अपघात रेकॉर्ड करण्यासाठी करतात.)

६. किंडल पेपरव्हाईट - ऑफिसच्या कामासाठी वरचेवर ट्रिप्स कराव्या लागतात. बरेचदा विमानं उशीरा अवतरणं, दुरुस्तीसाठी उशीर होणं, हवामानामुळे प्रवासात होणारा उशीर यामुळे कधी कधी विमानतळावर मुक्काम ठोकावा लागतो. अशावेळेस माझ्या मदतीला धावून येतो तो प्रवासातला माझा दोस्त, सखा, सोबती - किंडल पेपरव्हाईट.

https://lh3.googleusercontent.com/-Ro-6CjiyRlU/VrykoPikGdI/AAAAAAAAFUo/Soh9JMnj6ac/s512-Ic42/kindle.png

सहा इंची छोट्या पुस्तकाच्या आकाराचा हलका असा इ - रिडर. ऑफिसमध्ये कामाच्या संदर्भातली जाडजूड पुस्तक असोत वा कथा-कादंबर्‍या असोत, क्रोशाचे निरनिराळे पॅर्टन्स असोत, अनेक पिडिएफ्स, वेळोवेळी मी यात भरत असते. अगदी हलक्या पुस्तकासारखा, पुस्तकासारखेच इ-इंक फाँट्स असणारा किंडल एकदा चार्ज केला की महिनाभराची निश्चिंती. यातली खास डोळ्यांसाठी बनवलेली बॅकग्राउंड लाईट अंधारात विशेषतः विमानात सहप्रवासी झोपला असतांना वाचण्यासाठी उत्तम. खुणेसाठी बुकमार्क जवळ बाळगायची गऱज नाही. महत्त्वाच्या ओळी हायलाईट करुन ठेवायला हायलायटर्स. गरज लागेल तेव्हा सतत सेवेत हजर असणारा इन-बिल्ट शब्दकोष. किंडलवर एकदा का पुस्तक उतरवून घेतलं की पुस्तक वाचण्यासाठी इंटरनेटची गरज नाही. मराठी पुस्तकं फारशी उपलब्ध नाहीत अजून किंडलवर पण इंग्रजी पुस्तकं वाचणार्‍यांसाठी किंडल लायब्ररी हा खजिनाच. प्रवासासाठी सामन भरतांना लॅपटॉप, चार्जर, ऑफिसची कागदपत्रं याच बरोबर बॅगेत कोंबला जाणारा किंडल पेपरव्हाईट हा माझा प्रवासातला सुखनिधीच!

७. मंडला कलरींग बुक्स - विमानातल्या कंटाळवाण्या प्रवासात किंडलच्या बरोबरीने सोबत करणारी अजून एक गोष्ट म्हणजे मंडला कलरींग बुक्स. बॅगेत या पुस्तकांसाठी रंगीबेरंगी पेन्सिल्स, खडू, स्केचलेन्ससाठी हक्काचा कप्पा असतोच. कित्येकदा महत्त्वाच्या कागदपत्रांना कोपर्‍यात ढकलून मंडला कलरींग बुक्स बॅगेत जागा करुन घेतात. लांब कंटा़ळवाण्या प्रवासात रंगकाम करत बसणं हे माझं अत्यंत आवडतं काम. मंडलाची रंगकामाची ही छोटीशी झलक.

https://lh3.googleusercontent.com/-aqOXqDiOYJQ/Vr_hsTvHo0I/AAAAAAAAFXw/QS6-ZIag3t0/s912-Ic42/mandalalekhcollage.png

खरं तर या सर्व निर्जीव वस्तू पण प्रवासाचा प्रत्येक क्षण सजीव करणार्‍या, आठवणी जपणार्‍या. मी जेव्हा अगदी जख्ख म्हातारी होईन, अगदी चालता फिरता ही यायचं नाही, तेव्हा या सर्व आठवणीचा जिग्सॉ पझल समोर उघडून, तारीख वार या सहीत साठवून ठेवलेले हे क्षण जुळवत बसेन!

(Note: Some photos are from Internet and the purpose is only for Reference. We sincerely thank the sources mentioned above for these photos.)

(चित्र- किलमाऊस्की)

https://lh3.googleusercontent.com/-30BrcUCiylI/Vse9f0jd4uI/AAAAAAAAAFQ/OPRqSDu-re8/s788-Ic42/footer.png

प्रतिक्रिया

अरे वा.. सगळ्याच वस्तु मस्तच. हे पासपोर्टचे तर मला महितच नव्हते. पहिल्यांदाच वाचले.
तो ३D ग्लासेस मधुन लाईट्स बघायचा अनुभव सही असेल.

ती ओरिगामी तयारी आणि ही खरी.दोन्ही अतिशय आवडल्या आहेत!

मधुरा देशपांडे's picture

10 Mar 2016 - 7:36 pm | मधुरा देशपांडे

सगळ्या वस्तू, त्याबद्दलची माहिती, इतर अनुभव सगळंच किती छान मांडलं आहेस. शेवट तर फारच आवडला.

काळी मावशी's picture

10 Mar 2016 - 7:44 pm | काळी मावशी

हे म्हंजे येकदम ब्येश्ट पघा.मी बी गावाला जाताना घ्युन जाइन तो चष्मा.लै भारीये बरका तुमी किलमाऊस का काय ते तायी.

शान्तिप्रिय's picture

10 Mar 2016 - 7:45 pm | शान्तिप्रिय

थ्रीडी चष्म्याचा असाही उपयोग पहिल्यांदा समजला.
कुठलेही वास्तव द्रुश्य पाहणेसाठी या चष्म्याचा उपयोग होतो की ते द्रुश्य विशिष्ठ प्रकारचे असले पाहिजे?

किलमाऊस्की's picture

11 Mar 2016 - 9:47 pm | किलमाऊस्की

नाही कुठलही वास्तव दृष्य या चष्म्यातून 3D दिसत नाही. त्यासाठी 'ब्राईट पॉईंट ऑफ लाईट' असावी लागते. हा चष्मा घालून घरातल्या लाईटकडे पहिलं तरी दिसणारं दृष्य नेहमीसारखंच असतं.

या चष्म्यामधे काँप्युटर जनरेटेड 'फारफिल्ड' होलोग्राम असतात. हा चष्मा जवळून काळजीपूर्वक पाहीला असता, पारदर्शक चौकोन दिसतात. जेव्हा प्रकाश पारदर्शक चौकोनतून या चष्म्याद्वारे डोळ्यांपर्यंत पोहोचतो तेव्हा यात असलेला होलोग्राम त्यातल्या प्रीजनरेट्ड इमेजनुसार परावर्तीत होऊन पॅटर्न दिसतात.

प्रीत-मोहर's picture

10 Mar 2016 - 11:54 pm | प्रीत-मोहर

Mast

नीलमोहर's picture

11 Mar 2016 - 10:20 am | नीलमोहर

होलोस्पेक्स ३-D ग्लासेस बद्दल पहिल्यांदाच वाचले. मस्त कल्पना आहे ही.
पासपोर्टवरील स्टॅम्प्सही भन्नाट !

पैसा's picture

11 Mar 2016 - 10:20 pm | पैसा

भन्नाट! काय काय शोधत असतेस ग तू!

जुइ's picture

30 Mar 2016 - 2:34 am | जुइ

पासपोर्ट फारच आवडले.

धागा आवडला. असंकाही डोक्यात आलं नव्हतं. कारण एकच म्हणजे मलाही फिरायला अजिबात आवडत नाही. गॅजेटसचा उपयोग प्रवास इंटरेस्टिंग करण्यास केल्यास कदाचित मत बदलू शकेल ही आशा आहे.

किंडलबद्दल अगदी, अगदी आणि मम.
गो प्रो आहे लिस्टीवर.