आनंददायी रहिवास अर्थात होम स्टे (परदेशी घरातील वास्तव्य)

नूतन सावंत's picture
नूतन सावंत in विशेष
8 Mar 2016 - 12:00 am

LekhHeader

body {
background-image: url("https://lh3.googleusercontent.com/-4IV7c0ur4aU/VtIMF96j2AI/AAAAAAAAATs/x...");
background-repeat: repeat;
}
.inwrap {
border: 0.5em solid transparent;
-webkit-border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/p...") 10 round; /* Safari 3.1-5 */
-o-border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/p...") 10 round; /* Opera 11-12.1 */
border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/p...") 10 round ;
}

गेल्यावर्षी ऑस्टेलिया सहलीत सगळी व्यवस्था वर्धनने म्हणजे माझ्या मुलासारखाच असणाऱ्या भाच्याने केली होती. आम्ही अॅडलेड, मेलबर्न आणि सिडनी येथे प्रत्येकी एक आठवडा राहिलो होतो. तिथे राहण्यासाठी घरे भाड्याने घेतली होती. एखाद्या शहरात जास्त दिवस राहायचे असेल तर हॉटेलपेक्षा हा पर्याय मला फार आवडला.

आम्ही त्या पत्त्यावर पोचलो, इतक्यात मालकीणबाई आल्या. त्यांनी आधी मुख्य दरवाजा कसा उघडायचा ते दाखवून, गाडी आत घेऊन, आम्हाला घरात घेत स्वागत केले. सगळीकडे फिरून घर दाखवून, किल्ल्या देऊन त्या गेल्या.

.

एक मजली घर, दोन एंट्रन्स, त्यातला एक गॅरेजमधून पॅसेजमध्ये. तिथून वरच्या मजल्यावर जाणारा जिना आणि दिवाणखाना, डायनिंग रूम, लाँड्रीरूम, स्वयंपाकघर, तीन बेडरूम्स, त्यातली एक खाली आणि वर दोन होत्या. त्यांना लागून एका बाजूला अजून एक दिवाणखाना आणि दुसऱ्या बाजूला एल् आकाराची प्रशस्त गच्ची. स्वयंपाकघराच्या मागच्या बाजूला बार्बेक्यू एरिया. खाली आणि वर दोन बाथरूम्स.

.

.

दोन्ही दिवाणखान्यात सोफासेट आणि दिवाण, शिवाय खुर्च्या अशी बसण्याची सोय होती. तसेच एक टी टेबलही, शिवाय लहान मुलांसाठी विषेश आकाराच्या आणि डिज़ाईनच्या खुर्च्या होत्या. दोन्हीकडे मोठे एल इ डी टीव्ही होते, मुझिक सिस्टीम, निरनिराळी प्रकाशयोजना करणारे दिवे, तसेच पुस्तकांचे कपाट होते.

डायनिंग रूममध्ये सहा खुर्च्यांसह डायनिंग टेबल तसेच वेगवेगळी क्रोकरी असलेले कपाट, टेबलावर सुरेखसा शो पीस, टेबल क्लॉथसह होते. स्वयंपाकघरात कुकिंग रेंज, मायक्रोवेव्ह, फ्रीज, डिशवॉशर, मिक्सर शिवाय स्वयंपाकाची निरनिराळी भांडी, स्वयंपाक करताना वापरायचे, वाढायचे, जेवायचे काटे, चमचे, सुऱ्या, तसेच भाज्या, चिकन, मासे , मटण, कापण्याच्या वेगवेगळ्या सुऱ्या इत्यादी साधनांनी सुसज्ज तर होतेच, शिवाय फ्रीझही दूध, लोणी,फळे आणि निवडक भाज्यांनी भरलेला होता. शेजारीच ब्रेडही ठेवलेला दिसत होता. बार्बेक्यू एरियातही आठ खुर्च्यांसह डायनिंग टेबल, तसेच बार्बेक्यू करण्यासाठी वापरण्यात येणारी विशेष भली मोठी शेगडीही होती. लाँड्रीरुमध्ये दोन वॉशिंग मशीन्स, इस्त्री, इस्त्री टेबल, साबणपावडर इत्यादी सामान होते. खालच्या पॅसेजमधून दोन विरुद्ध दिशांना जाणारे जिने होते, एक वरच्या दिवाणखान्यात जाणारा आणि एक वरच्या बेडरुम्सकडे जाणणारा. आणि गच्चीवर जाण्यसाठी दोन मार्ग, एक वरच्या दिवाणखान्यातून आणि एक पॅसेजमधून. दिवाणखान्यात छान सोफे, टेबल खुर्च्या, एल इ डी टीव्ही, तसेच एक टी टेबलही, शिवाय लहान मुलांसाठी विषेश आकाराच्या आणि डिज़ाईनच्या खुर्च्या होत्या. दोन्हीकडे मोठे टीव्ही होते, मुझिक सिस्टीम, निरनिराळी प्रकाशयोजना करणारे दिवे होते. या दिवाणखान्यातूनही अप्रतिम निसर्ग दर्शन होत होते. दिवाणख्यातून गच्चीत जाणाऱ्या रस्त्त्यावर पुन्हा एक खोली. तिच्या एका बाजूला पूर्ण काचेचे पार्टीशन आणि त्यातही सहा खुर्च्यांसह डायनिंग टेबल होते. तिथून आणि एका बेडरुममधूनही समुद्र दिसत होता. काय अप्रतिम दृश्य होते ते!

.

सर्व बेडरूम्समध्ये प्रशस्त पलंग आणि त्यावर गुबगुबीत गाद्या, उशा, पांघरुणे, शिवाय बिछान्यांना हीटर जोडलेले. मोठी कपाटे, ड्रेसिंग टेबल, साईड टेबल्स, त्यावर सुरेखसे रात्रदिवे, उत्तम प्रकाशयोजना देणारी छतावरची झुंबरे, खिडक्यांना दोन प्रकारचे पडदे, एका पातळ आणि त्यावर दुसरा जाड कापडाचा पडदा, असा जामानिमा होता. वरच्या खिडक्यातून अप्रतिम निसर्ग दिसत होता.

दोन सुसज्ज बाथरूम्स खाली आणि वर होत्या. टब, शॉवर बेसिन, कमोड एकत्रित आणि एक वेगळा कमोड स्वतंत्र अशी सोय होय होती. सगळ्या नळांना गरम आणि थंड दोन्ही पाण्याची सोय, अगदी स्वयंपाकघरात सुद्धा ही सोय होती.

पुढे असलेल्या अंगणात विविध झाडे होती. अतिशय रसिकतेने बांधलेले आणि सजवलेले घर होते ते, मागच्या पुढच्या अंगणांसह जवळजवळ २५०० चौरसफुटांचे. घराच्या पुढच्या अंगणात आवाराच्या भिंतीला लागून कोपऱ्यात चाकांवर चालणाऱ्या दोन कचराकुंड्या होत्या. एक विघटन होणाऱ्या कचऱ्याची आणि दुसरी पुनर्वापर करता येणाऱ्या कचऱ्याची. सर्व कचरा त्यात टाकायचा होता. घर सोडताना आम्ही त्या आवराबाहेरच्या फूटपाथवर न विसरता ठेवण्याची सूचना मालकीणबाईनी जाता जाता दिली होतीच.

अॅडलेड हे इतर दोन शहरांच्या मानाने स्वस्त होते. तिथे हेनली बीच वर आमचे घर होते. या बीचवर अशी घरे फक्त भाड्याने देण्यासाठी बांधलेली आहेत.

.

.

इथल्या आनंदायी राहिवासच्या जोडीला तिथल्या सुंदर आणि स्वच्छ दिसणाऱ्या बाजारातील, दुकानांमधून खरेदी करून तिथे स्वयंपाक करण्याचीही एक मजा होती. त्यात वर्धन मला पाच वर्षांनी भेटलेला. त्याची होणारी पत्नी, शिवाय त्याचा एक मित्रही त्याच्या पत्नीसह आला होता. त्यांना घरच्या जेवणाची ओढ होती, शिवाय त्यांचे पाक कौशल्यही दाखवण्याची संधी होती. ती आम्ही पुरेपूर उपभोगली. तिथल्या स्थानिक मार्केटमधून खरेदी करणे हाही एक आनंदच होता. कारण इतर पदार्थांच्या जोडीला तिथेच हिऱ्यांच्या दागिन्यांचीही दुकाने होती.

.

आपल्या फिशमार्केटमध्ये आणि तिथल्या फिशमार्केटमध्ये जमीन अस्मानचा फरक असतो. वेगवेगळ्या प्रकारचे मासे अख्खे आणि स्वच्छ करून ठेवलेले असतातच. पण माश्यांचे तुकडे करून ते बर्फीच्या तुकड्यांमाणे रचून ठेवलेले असतात. कुबट वास, चिखल यांचा तर मागमूसही नसतो. हे एक खरेदीला आनंद देणारे कारण.

.

तसेच मटण, चिकन, बदक, पोर्क हॅम, बीफ इत्यादी स्वच्छ करून वेगवेगळ्या आकारात कापून ठेवलेले असतात. तिथे शहामृग, कांगारू ससे आणि मगरीचे मांसही स्वच्छ करून कापून ठेवलेले आढळले. खिमातर शेवईयंत्रातून काढलेल्या फुलांसारखा दिसत होता. अर्थात आम्ही मासे, चिकन, मटण यापलीकडे फक्त पाहिले.

.

.

.

.

.

फुले, फळे, भाज्या, मसाले, सुका मेवा, चीज, निरनिराळी बेकरी उत्पादने आणि इतर ग्रोसरीही स्वच्छ नि शुद्ध असतं.

.

.

.

.

.

या सर्वच आस्वाद घेण्यासाठी होम स्टे गरजेचा आहे, असे माझे मत झाले आहे. एखाद दुसऱ्या दिवसांसाठी हॉटेल योग्य असले तर आठवडाभरासाठी मात्र ही सोय छानच आहे.

मेलबर्न इथे मेलबर्नचे एक उपनगर बोरोनिया येथे आमचे नवे घर होते. तेथे पोचायला आम्हाला रात्रीचे दहा वाजून गेले होते. रस्त्याच्या एका बाजूला सम क्रामांकाची घरे नि दुसऱ्या बाजुला विषम क्रमांकाची घरे होती. तिथे मुख्य दरवाजाबाहेरचा लाईट लावलेला होता. बाकी दर बंदच होते. घरमालकाला फोन केल्यावर त्यांनी सांकेतिक क्रमांक सांगून तिथे असलेले इलेक्ट्रिक मीटर उघडायला सांगितले. तसे केल्यवर मुख्य दरवाजाची किल्ली तिथे ठेवलेली सापडली. ती घेऊन घर उघडले.

.

हे घर फक्त तळमजल्याचे होते. इथे सहा शयनकक्ष बाथरुम्ससह होते. स्वयंपाकघरातच जेवणघर जोडलेले होते. बारा खुर्च्यांसह डायनिंग टेबल, क्रॉकरी, तसेच वर लिहिलेल्या सर्व उपकरणांसह, भांड्यासह सुसज्ज स्वयंपाकघर. लाँड्री रुमही वर सांगितल्याप्रमाणे सुसज्ज होते. पुढे चार बाय आठची बाग होती. मागे मोठे अंगण होते. त्यात लिबू, संत्री, आदी झाडे होती. त्यातही खुर्च्या टेबलासह मांडलेल्या होत्या. दिवाणखाण्यात एका टेबलावर, घर वापरत असताना काय करावे आणि काय करू नये याच्या सूचना लिहिलेली फाईल होती. आणि भली मोठी लोखंड आणि पितळेची फायरप्लेस होती.

सकाळी उठल्यावर आजूबाजूचा परिसर पाहून खूपच आनंद झाला. रस्त्याच्या आजूबाजूला हिरवळ तसेच निलगिरीची झाडे होती. झाडांखालच्या मातीवर लाकडाचा बारीक चुरा पसरला होता. त्यामुळे माती धूळ रस्त्यांवर दिसतच नव्हती. आमचे घर एका बाजूने हायवेला लागून आणि दुसऱ्या बाजूने हायवेवरून आत जाणारी गल्ली, यांच्या कोपऱ्यावर होते. गल्लीतच गाड्या पार्क केलेल्या होत्या. गल्लीतही छान फुलझाडांचे ताटवे जागोजागी दिसत होते. घराच्या एका बाजूला रस्त्यावरच दोन कचरा कुंड्या होत्याच.

.

इथल्या सुप्रसिद्ध क्वीन व्हिक्टोरिया मार्केटमध्ये तर पुस्तकेही भाज्या फळे, चीज, सुका मेवा, तयार खाद्यपदार्थांच्या जोडीला बसली होती. इथेच अतिशय उत्तम पिवळे कलिंगड पाहायला आणि खायला मिळाले.

.

एका भागात टेबल खुर्च्या ठेवून तयार खाद्यपदार्थांची विक्री चालू असते. तिथेच बसून त्याचं आस्वाद घेता येतो. खरेदी करून झालेल्या श्रमांचा परिहार करणारे ठिकाण म्हणजे इथली मार्केट्स.

.

शिवाय जवळपासच्या शेतकऱ्याच्या शेतातली उत्पादने, तसेच घरी बनविलेल्या वस्तू जसे की, वेगगेगळ्या प्रकारचे जॅमस्, लोणची,वाईन्स, केकस्, मध, सॉसेजेस, अंडी इ. उत्पादनेही होती. शिवाय भाज्या, मासे, मांस स्वच्छ करून विक्रीला ठेवल्याने तो कचराही कमी होतो. आणि हा कचरा खतकंपन्या घेऊन जात असल्याने त्याचेही उत्पन्न मिळते हा दुहेरी फायदा. काहीजण स्वतःच्या शेतातच खतासाठी तो कचरा वापरतात. त्यामुळे बाजार आणि शहर स्वच्छ राहण्यास मदतही होते.

सिडनीला मात्र खूप महागाई आहे त्यामुळे इथले आमचे घर डार्लिंग हार्बर येथे होते. एकमजली असले तरी दिवाणखाना, छोटेसे स्वयंपाकघर, त्याला लागूनच दोनच माणसे जेवायला बसू शकतील अशी एक फळी आणि त्याखाली दोन उंच टेबले. तरीही कुकिंग रेंज, फ्रीज, मायक्रोवेव्ह ओव्हन, स्वयंपाकाची भांडी, काटे, चमचे, क्रोकरी इ.साधनांनी परिपूर्ण होते. या घराला तळघर होते, त्यात लाँड्रीरूम होती. पहिल्या मजल्यावर एक बेडरूम आणि गच्ची होती.

तिथे सहा खुर्च्यांचे डायनिंग टेबल आणि बार्बेक्यूचा सरंजाम होता.त्याशिवाय या घरात वायफायही सुविधा होतीच,पण तीन लॅपटॉप; त्यातला एक एल इ डी टीव्ही स्क्रीनला जोडलेला होता. बाथरूम वरच्या मजल्यावर होती आणि खालच्या दिवाणखान्यातला सोफा नुसता सोफा नसून सोफा कम बेड होता.
सिडनीमध्ये कर पार्किंगचा प्रश्न फार बिकट आहे पार्किंगचे दर चढे दर पाहता ( एका ठिकाणी तर २४ तासांसाठी ६० ऑस्ट्रेलीयन डॉलर्स होते.) इथे रेल्वे आणि बसने फिरणे संयुक्तिक होते. त्यामुळे रेडफर्न रेल्वेस्टेशनजवळचे हे घर तुलनेने लहान असले तरी फिरण्यासाठी सोयीचे होते.

.

(एखाद्या टुमदार घराप्रमाणे दिसणारे हे रेडफर्न रेल्वे स्टेशन. चिमुकले दिसत असले तरी त्याला १९ प्लॅटफॉर्मस् आहेत.)

इथे आम्ही चौघेच राहणार होतो. शेवाटचे दोन दिवस मात्र वर्धनचा एक लहानपणापासूनचा मित्र आम्हाला भेटायला येणार होता. त्यामुळे हे घर पुरेसे होते, शिवाय एक्स्ट्रा बेड आणि उशा, अंथरुणे, पांघरुणेही जिन्याखालच्या जागेत केलेल्या कपाटात होती. पुस्तके होती. शिवाय या घरमालकाने, जे सायकॉलॅजीचे प्र्याध्यापक होते त्यांनी आम्हाला चार पास दिले होते त्यात गरजेपुरते डॉलर्स भरून ते पास रेल्वे, बस आणि ट्राम तिकिटांसाठी, सवलतीच्या दराने वापरता येत असत. त्यामुळे बरीच बचत झाली. एका स्टेशनाच्या अंतरावर चायना टाऊन मार्केट आणि दोन स्तेशनांच्या अंतरांवर सुप्रसिद्ध सिडनी ओपेरा हाउस, हार्बर ब्रिज आणि टोरांगा झू होते. अर्थात तिथे जाण्यासाठी बोटीने पुढे जावे लागते. पोलीस स्टेशनही जवळच होते. या घराबाहेर रस्त्यावरच दोन कचराकुंड्या होत्या. तशा त्या प्रत्येक घरासमोर दिसत होत्या. दोन्हीतला कचरा वेवेगळ्या गाडीने नेला जात असे.

अॅडलेड येथे असताना आम्ही कांगारू आयलंड या निसर्गरम्य जागेला भेट दिली. तिथेही दोन दिवसांसाठी असेच घर भाडयाने घेतले होते. उंचावर असलेले हे घर बैठे, लांबलचक एकमजली कौलारू असे होते. पुढे व्हरांडा आणि मागे एका बाजूने सुसज्ज स्वयंपाक घरापासून सुरु झाले ते जेवणघर, दिवाणखाना आणि दुसऱ्या बाजूने तीन सुसज्ज बेडरुमसने संपत होते. शिवाय व्हरांड्यात बर्बेक्युची शेगागी न वेगळे डायनिंग टेबल बसायच्या बाकांसह होते.

सर्व घरातून अतिशय सुंदर देखावा दिसत असे. एकाच दिवसात निसर्गाने एखाद्या मॉडेलने कपडे बदलून फोटोला उभे राहावे त्याप्रमाणे आसमंत बदलून आम्हाला निरनिराळे नजारे दाखवत फोटो काढायला मजबूर केले.

.

.

एखाद्या फार्महाउससारखे भवताली खूप मोकळी जागा आणि सुरेख फुलझाडे होतो. मोठा माणसांसाठी झोपाळा होता, लहान मुलांसाठी वेगळी खेळण्याची जागा होती. आणि निलगिरीची अपार झाडे असलेले होती. हे घर मर्मबंधातल्या ठेवीप्रमाणे मनात जपले आहे. परत जायचे झाले तर मला याच घरात राहायला आवडेल. तसे म्हटले तर कांगारू आयलंड हा स्वतंन्त्र लेखाचाच विषय आहे पण इथे फक्त राहिवासापुरती माहिती नि फोटो दिले आहेत.

.

नेटवर शोध घेऊन घरमालकाशी पत्रव्यवहार करून किमतीत घासाघीस करून आपल्याला आवडणारे आणि परवडणारे घर आपण राहण्यासाठी निवडू शकतो. स्वत:च्या मालकीचे अलिशान बंगले असल्यासारखे राहू शकतो. तिथल्या देखण्या आणि कमालीच्या स्वच्छ दुकानातून आवश्यक गोष्टींची खरेदी करून आपल्याला हवे तसे जेवण बनवू शकतो. कारण आपल्या देशातून दुसऱ्या देशात जाताना, तिथल्या अन्नाशी जिभेला जमवून घेता आले नाही तर ते पर्यटन मौजेचे ठरत नाही. त्यामुळे अशा, माझ्या नवऱ्यासारख्या लोकांसाठी आणि माझ्यासारख्या स्वत: खरेदी करून, स्वयंपाक करून, इतरांना जेऊ घालाण्यात रमणाऱ्या व्यक्तीसाठी, हा रहिवास आनंददायक होतो यात शंका नाही.

(चित्र- किलमाऊस्की)
https://lh3.googleusercontent.com/-30BrcUCiylI/Vse9f0jd4uI/AAAAAAAAAFQ/OPRqSDu-re8/s788-Ic42/footer.png

प्रतिक्रिया

पूर्वाविवेक's picture

9 Mar 2016 - 9:43 am | पूर्वाविवेक

सुरंगी ताई, इतक्या छान घरात राहून , मज्जा करून आलीस ग. मला आता इनो घ्याव लागणार आहे. :)
ताज्याताज्या फळ-भाज्या, चीज आणि ब्रेडचे वेगवेगळे प्रकार पाहून तोंडाला पाणी सुटले.
मस्त लिहिलेस!

वेल्लाभट's picture

9 Mar 2016 - 11:30 am | वेल्लाभट

क्या 'चीज' है..... तोंपासु!

गिरकी's picture

9 Mar 2016 - 11:51 am | गिरकी

फार सुंदर घरे आणि वर्णन सुद्धा… ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि युरोपचा असाच निवांत दौरा करायचा आहे कधीतरी.

मधुरा देशपांडे's picture

10 Mar 2016 - 7:27 pm | मधुरा देशपांडे

सगळी तपशीलवार माहिती आवडली.
होम स्टे हा आमचाही आवडता प्रकार. हॉटेल पेक्षा कधीही हे आम्ही प्रीफर करतो. अर्थात युरोपात आजवर इतकी मोठी घरं जी पाहिली आहेत ती मोठ्या फॅमिली साठी असतात. बाकी सहसा १ किंवा २ खोल्या. पण खायला सतत बाहेर जाण्यापेक्षा घरी बरं वाटतं. ग्रुप असेल तर खर्चाचीही बचत होते.

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Mar 2016 - 10:23 pm | डॉ सुहास म्हात्रे

अरे वा ! ही मज्जाही केली होय क्रिकेटच्या मॅचेस पाहता पाहता :) मस्तं मजा केली हे दिसते आहेच !

मुक्त विहारि's picture

11 Mar 2016 - 9:23 am | मुक्त विहारि

तुमच्या ह्या ट्रिप बद्दल अजून वाचायला आवडलेच.

"तसे म्हटले तर कांगारू आयलंड हा स्वतंन्त्र लेखाचाच विषय आहे पण इथे फक्त राहिवासापुरती माहिती नि फोटो दिले आहेत."

ह्या वाक्याने थोडा जीवात जीव आला.

कांगारू आयलंडच्या लेखाच्या प्रतिक्षेत.

नीलमोहर's picture

11 Mar 2016 - 9:34 am | नीलमोहर

सुंदर घरे आणि वर्णन !
मला फक्त एकाच गोष्टीसाठी प्रदेशात जाऊन राहण्याची इच्छा होईल - स्वच्छता !!
तिथले लख्ख रस्ते आणि परिसर पाहून मन प्रसन्न होते, तिथे राहणार्‍यांचा हेवा वाटतो.

इशा१२३'s picture

11 Mar 2016 - 3:32 pm | इशा१२३

अहा! किति सुंदर अनुभव ताई.मस्त लेख.
पिवळे कलिंगड पाहुन गंमत वाटली.

पद्मावति's picture

11 Mar 2016 - 3:57 pm | पद्मावति

फारच सुंदर अनुभव. लेख आवडला खूप.

पैसा's picture

11 Mar 2016 - 10:22 pm | पैसा

मस्तच सफर झाली तुझी! तिथल्या घरांतून रहायला मिळाले हे फारच छान!

अस्वस्थामा's picture

15 Mar 2016 - 8:16 pm | अस्वस्थामा

तसेच मटण, चिकन, बदक, पोर्क हॅम, बीफ इत्यादी स्वच्छ करून वेगवेगळ्या आकारात कापून ठेवलेले असतात. तिथे शहामृग, कांगारू ससे आणि मगरीचे मांसही स्वच्छ करून कापून ठेवलेले आढळले. खिमातर शेवईयंत्रातून काढलेल्या फुलांसारखा दिसत होता. अर्थात आम्ही मासे, चिकन, मटण यापलीकडे फक्त पाहिले.

हम्म.. विंटरेश्टींग.. :)
जायला हवं.

प्रीत-मोहर's picture

16 Mar 2016 - 9:39 am | प्रीत-मोहर

सुंदर घरे!!! आणि वर्णनही तितकच छान :)

नाही तर बायका अशा पर्यायांना सक्त नामंजूर करतात . घरी करतो तेच सगळं ट्रीपमधे करायला जस्ट नो !

२-४ दिवसांसाठी, आपल्याच देशात खरंच होम स्टे नको वाटतो कारण काम बरंच असतं नाही म्हणलं तरी. पण परदेशात सहसा तिन्ही त्रिकाळ बाहेर जेवणं हाच एक त्रासदायक प्रकार ठरु शकतो. शाकाहारी असाल तर जास्त च. त्यामध्ये होम स्टे मध्ये खुप आरामात राहता येतं, पटकन काही तरी जेवण बनवता येतं (वन डिश मील किंवा अगदी अपूर्वाईचं काही तरी पिकनिक ला आल्या सारखं). आणि लोकं जास्त असतील तर बाहेर जा,ऑर्डर द्या, त्या ही आधी सगळ्यांचं आवरुन बाहेर निघा आणि जेवा यापेक्षा एकिकडे आवरा आवरी चाललेली असताना निम्म्या लोकांनी शॉर्टकट का होईना स्वैपाक करणं आणि ज्याचं जसं होईल तसं खाऊन घेणं हे वेळेच्या दृष्टीने खुप किफायतशीर असतं. उरलेला सगळा वेळ मग शहर बघण्यात घालवता येतो. आम्ही मोठ्या गृप मध्ये जातो तेंव्हा एक सकाळचं ब्रंच असं करतो मग पूर्ण दिवस मिळतो बाहेर आणि येताना निवांत डिनर करुन यायचं . तिथले पदार्थ पण चाखुन होतात आणि नीट फिरायला पण मिळतं. सवय होते आणि त्याची लवकर. शहर सोडताना सगळ्यांनी सगळीकडुन आवरायचं - १५ मिनिटात होतं !

सुरंगी ताई लेख नेहमीप्रमाणेच अप्रतिम. तू परदेशातल्या वास्तव्यात तिथली जीवनशैली छान अनुभवलीस ते खास आवडलं. नाही तर नुसतंच साईट सीइंग होतं.

रायनची आई's picture

16 Mar 2016 - 4:01 pm | रायनची आई

मला एक डाउट आहे..ज्या प्रमाणे होटेल्स मधे आपण सकाळी बाहेर गेल्यावर रुम सर्विस वाले येउन क्लिनिन्ग करतात तस होम स्टे ला नसत ना? म्हणजे आपणच क्लिनिग आणि बाकी रुम नीटनेटकी ठेवायची ना?

विवेक ठाकूर's picture

16 Mar 2016 - 5:15 pm | विवेक ठाकूर

कारण तोही एक मोठा लफडा आहेच !

नूतन सावंत's picture

17 Mar 2016 - 6:26 pm | नूतन सावंत

तुझं बरोबर आहे.स्वच्छता आपली आपल्याला करावी लागते.ओला आणि सुका कचरा तसेच पुनर्वापर होणारा टिन.प्लास्टिक बाटल्या ई.कचरा वेगळा करून वेगवेगळ्या डब्यात टाकून डबे कचरागाडी येणाऱ्या दिवशी निश्चित केलेल्या जागेवर ढकलून ठेवावे लागतात .त्या सूचना तोंडी किंवा लेखी दिलेल्या असतात.
प्रत्येक ठिकाणच्या सूचना वेगवेगळ्या असू शकतात.

मितान's picture

16 Mar 2016 - 4:28 pm | मितान

मस्त लेख सुरंगी ताई :)
मी स्वित्झरलन्ड मध्ये असाच सुम्दर अनुभव घेतला आहे. येत्या उन्हाळ्यात व्हिएतनामी घरात राहणार आहे. तुझा लेख वाचून अधिक उत्सुकले :)

रेवती's picture

17 Mar 2016 - 12:07 am | रेवती

फोटू व लेखन आवडले.

पिलीयन रायडर's picture

17 Mar 2016 - 2:09 pm | पिलीयन रायडर

ही फार उपयुक्त माहीती आहे. मला होम स्टे बद्दल फारशी कल्पना नव्हती. लेख आवडलाच ग ताई!

एखाद्या शहरात होम स्टेची व्यवस्था कुठे होऊ शकेल हे शोधायला एखादी साईट आहे का? कुणाला माहिती असल्यास कृपया इथे माहिती द्यावी.

दी हॉलिडे ह्या चित्रपटामधे हिच कल्पना दाखवली आहे. दोन हिरोईन्स एकमेकींच्या घरी राहायला जातात आणि त्यांचं आयुष्य बदलतं वगैरे..
मला पण नक्कीच आवडेल अशा सुंदर घरांमधे राहायला :)

नूतन सावंत's picture

17 Mar 2016 - 6:31 pm | नूतन सावंत

पिरा,ज्या ठिकाणी किंवा ज्या देशात जायचे असेल त्याचे नाव टाकून पुढे homestay असे टंकून पहा.

रायनची आई's picture

17 Mar 2016 - 5:19 pm | रायनची आई

पिरा.. होम स्टे साठी फेमस साईट म्ह्णजे "airbnb.com"

पिलीयन रायडर's picture

17 Mar 2016 - 5:23 pm | पिलीयन रायडर

ह्या साईट बद्दल गेले काही दिवस ऐकतच होते सारखं.. पण कधी चेक केलं नव्हतं की काय आहे.
आता नक्कीच बघेन! धन्यवाद!

एस's picture

17 Mar 2016 - 6:30 pm | एस

लेख आवडला!

अप्रतिम सुख म्हण्जे आणखि काय असतं.

कौशिकी०२५'s picture

29 Mar 2016 - 5:52 pm | कौशिकी०२५

मस्त अनुभव ताई...लेखपण छानच आहे