ट्रॅव्हल टिप्स

अनाहिता's picture
अनाहिता in विशेष
8 Mar 2016 - 12:00 am

TravelTipsHeader

body {
background-image: url("https://lh3.googleusercontent.com/-4IV7c0ur4aU/VtIMF96j2AI/AAAAAAAAATs/x...");
background-repeat: repeat;
}

.inwrap {
border: 0.5em solid transparent;
-webkit-border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/p...") 10 round; /* Safari 3.1-5 */
-o-border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/p...") 10 round; /* Opera 11-12.1 */
border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/p...") 10 round ;
}

    महत्वाची कागदपत्रे, पैसे - -
  • पासपोर्ट, तिकिटे, हॉटेल बुकिंग
  • आंतरराष्ट्रीय प्रवासात पासपोर्ट आणि व्हिसाच्या फोटोकॉपी प्रत्येक बॅग मध्ये असू द्याव्यात. भारतात प्रवास करतानाही ओळखपत्राची फोटोकॉपी ठेवू शकता. काही अडचण आली तर उपयोग होतो.
  • आंतरराष्ट्रीय प्रवासात इन्शुरन्सच्या कॉपीज देखील आवश्यक आहेत.
  • लांबची सहल करताना पूर्ण सहलीच्या प्लॅनच्या दोन कॉपीज तरी सोबत ठेवाव्या, ज्यात हाॅटेल्सचे पत्ते- फोन नंबर इत्यादी सगळी माहिती आहे. एक कॉपी मुख्य बॅगेत आणि एक रोज फिरताना सोबत ठेवावी.
  • सगळे पैसे एकाच जागी ठेवू नयेत. क्रेडिट /डेबिट कार्ड्स, थोडे पैसे वेगळ्या पाऊचमधे बॅगेत सुरक्षित ठेवावे.
  • पैशांसाठी कमरेला आतून बांधायची पिशवी मिळते, ती मिळाली तर घेऊ शकता. काही खास पासपोर्ट साठीची पाउच मिळतात जी गळ्यात अडकवून त्यात पासपोर्ट, पैसे इत्यादी ठेवता येतं.
    प्रवासात आवर्जून लागणार्‍या वस्तू -
  • मोबाईल आणि कॅमेरा चार्जर, कॅमेरा साठी जास्तीचे मेमरी कार्ड, चश्मा, गॉगल केस, लॅपटॉप चार्जर, असल्यास मोबाईलची जास्तीची बॅटरी.
  • छोटी कात्री, सुईदोरा, टॉर्च, डासांसाठी गुडनाईट.
  • मेणबत्ती-काड्यापेटी, कापूस, दोरी, प्लास्टिक पिशव्या, कुलुप-साखळ्या, पेन आणि लहान डायरी/वही/नोटपॅड.
  • छोटा वॉटर हीटर/इलेक्ट्रिक कप.
  • प्लास्टीकचा एक डबा, चमचा, ग्लास, ताटली.
  • छत्री, रेनकोट.
  • खरेदी करणार असाल (हा काय प्रश्न झाला का ;) ) तर त्यासाठी एखादी फोल्डेबल पिशवी.
  • प्रसाधनवस्तू (टॉयलेटरीज) - टुथ ब्रश, टुथ पेस्ट,
    बॉडी वॉश, फेस वॉश, शॉवर जेल, वेट वाईप्स, सनस्क्रीन लोशन, विंटर लोशन, शेव्हिंग कीट, डिओ, परफ्युम, कंगवा, केसांचे तेल, शाम्पु, कंडीशनर (शक्यतोवर लहान पाऊच), हँड सॅनिटायजर, इअर बड्स, कापूस, लहान मुलांचे डायपर्स
    खास स्त्रियांसाठी -
  • सार्वजनिक स्वच्छतागृह वापरल्याने इन्फेक्शन होऊ नये या दृष्टीने लायनर्स, टिश्यूपेपर्स, पेपरसोप, हँड सॅनिटायजर.
  • सॅनिटरी नॅपकिन्स, डिस्पोजेबल इनरवेअर.
  • क्लिप्स, पिना, सेफ्टी पिन, पेपर स्प्रे.
  • एक हँडबॅगेत राहिल असं पाऊच - ह्यात फेसवॉश, कंगवा, पावडर, वेट वाईप्स, डिओ, सेफ्टी पिन्स, टिकल्या, इतर आवडीप्रमाणे सौंदर्य प्रसाधने, दागिने इत्यादी.
    लहान मुलं सोबत असतांना -
  • लहान मुलं असल्यास पाठीवरची सॅक पर्सपेक्षा बरी.
  • रोजच्या साईटसीईंगसाठी एक कप्पे असलेली बॅग. पाण्याच्या बाटल्या, टोपी, गॉगल, कॅमेरा, एक्स्ट्रा बॅटरी, स्कार्फ, खाऊ ई. साठी.
  • महत्वाची औषधे थोडी वरच्या बॅगमध्येही ठेवावीत नाहीतर दिवसभर बाहेर फिरताना गरज पडल्यास औषधं हॉटेलवर राहिल्याने पंचाईत होते.
  • मुलांसाठी पट्टा असलेली वॉटरबॉटल म्हणजे चालत्या गाडीत पण पाणी पिता येईल.
  • मुलांच्या अंगावर पटकन पांघरता येईल अशी शाल/स्ट्रोल
  • सुटसुटीतपणा सगळ्यात महत्त्वाचा. ट्रान्सपरंट, चेन असलेले पाऊचेस अशा वेळी बरी पडतात.
  • लहान मुलांची खेळणी, पझल्स, छोटं चित्र काढायचं पुस्तक + ३-४ क्रेयॉन्स सोबत ठेवू शकता, म्हणजे मुलांनापण त्याच त्याच गोष्टींचा कंटाळा येत नाही.
    प्रवासात लागणारे कपडे -
  • जिथे जाणार आहात तिथल्या हवामानाचा अंदाज घेऊन प्रत्येक व्यक्तीचे रोजचे कपडे सोबत न्यावेत.
  • हिवाळ्यासाठी लोकरी टोप्या, स्वेटर्स, मोठे जॅकेट्स. शक्यतोवर लेयर्स मध्ये कपडे घ्यावे म्हणजे अचानक थंड-गरम वाटल्यास उपयोग होतो.
  • टॉवेल किंवा पंचा, अंतर्वस्त्रे, नॅपकिन.
  • सफारी, जंगलातले ट्रेक किंवा दुर्गम जागचे प्रवास असतील तर आवश्यक तेवढेच कपडे जे आपल्याला उचलता येतील असे कपडे.
  • फ्लोटर्स, स्पोर्ट्स शुज, हॉटेलवर घालायला स्लीपर्स, एक मल्टिपर्पज स्कार्फ्/स्टोल, शाल.
  • रात्रीचा प्रवास असेल तर पांघरूण, अंथरूण.
  • खास प्रवासासाठी मिळते तशी हवेची उशी.
  • वापरलेले कपडे ठेवण्यासाठी एखादे साडी कवर किंवा चांगल्या प्लास्टिक बॅग्स, जेणेकरून इतर कपड्यांना वापरलेल्या कपड्यांची वास लागत नाही.
  • शक्य असेल तर रोजच्या कपड्यांची १ अशा प्रत्येक दिवसाच्या प्लास्टिकच्या पिशव्या करायच्या. म्हणजे सगळे सामान उघडावे लागत नाही. आदल्या दिवशीचे कपडे त्या दुसर्‍या पिशवीत ठेवायचे.
    प्रवासातला खाऊ –
  • कोरडा खाऊ - खाकरा, कणिक/राजगिरा/बेसन इत्यादी मधील १-२ प्रकारचे लाडू, चुरमुर्‍यांचा चिवडा, ज्वारी लाह्यांचा चिवड़ा, वाटी केक्स, लिमलेटच्या गोळ्या, सुका मेवा, बिस्किट्स, टोस्ट.
  • डब्यात नेण्यासाठी खाऊ - तूप पराठा रोल, तूप-साखर / गुळ-तूप पोळी रोल. पिचकू आणि जॅमचे पाउच सोबत ठेवायचे. मुलं बरेचदा खायला नाटकं करतात तेंव्हा निदान पोळी सोबत हे खाऊ शकतात.
    तिखटमिठाच्या पुर्‍या, पराठे, झुणका, पिठलं, फोडणीचा भात.
  • खाऊची लहानलहान पाकिटं करायची, रोज एक घेऊन बाकीचं रूमवर ठेवता येईल, म्हणजे वजन होणार नाही आणि सगळाच खाऊ एकावेळी उघडायची गरज नाही.
  • सूंठ, गूळ, तूप एकत्र करून छोट्या गोळ्या सोबत ठेवू शकता. रोज सकाळीही गोळी घ्यायची लहान मोठे सगळ्यांनीच. हवाबदलाचा फार त्रास होणार नाही.

टिप्स - अनाहिता | संकलन - मधुरा देशपांडे | चित्र - किलमाऊस्की
© प्रस्तुत लेखातील कुठलाही भाग, कुठल्याही स्वरुपात पूर्व परवानगीशिवाय वापरता येणार नाही.
Footer

प्रतिक्रिया

अनन्न्या's picture

7 Mar 2016 - 11:08 pm | अनन्न्या

काही विसरायला होणार नाही,खूप उपयोग होईल प्रवासाला जाताना.अगदी सुखाचीहोईल ट्रीप!

स्नेहल महेश's picture

8 Mar 2016 - 9:55 am | स्नेहल महेश

अगदी असच म्हणते
वाचानखूण साठवली आहे

बाबा योगिराज's picture

7 Mar 2016 - 11:19 pm | बाबा योगिराज

बढिया माहिती है यह.

लगेच वाखु साठवून ठेवली आहे.

मितान's picture

8 Mar 2016 - 6:37 am | मितान

चांगलं संकलन !

प्रस्तुत लेखातील कुठलाही भाग, कुठल्याही स्वरुपात पूर्व परवानगीशिवाय वापरता येणार नाही.

आता काय करायचं?

-------

छान टिप्स.

जेपी's picture

8 Mar 2016 - 10:37 am | जेपी

छान टिप्स..

सस्नेह's picture

8 Mar 2016 - 10:42 am | सस्नेह

उत्तम संकलन.

Mrunalini's picture

8 Mar 2016 - 3:55 pm | Mrunalini

छान आहेत टिप्स.

मोदक's picture

8 Mar 2016 - 4:08 pm | मोदक

चांगले संकलन.

>>>रात्रीचा प्रवास असेल तर पांघरूण, अंथरूण. - यापेक्षा एखादी बेसिक स्लिपींग बॅग घ्यावी.

बॅगांबद्दल - नक्की कोणत्या मटेरीयलच्या, कशा आकाराच्या बॅगा सोबत घ्याव्यात, सॅक घ्यायची असेल तर कोणत्या प्रकारच्या सॅक सोयीच्या पडतात कोणत्या प्रकारच्या सॅक सोबत घेवू नयेत वगैरे माहिती आली तर आणखी फायदा होईल.

प्रीत-मोहर's picture

8 Mar 2016 - 8:57 pm | प्रीत-मोहर

हाही अतिशय उपयुक्त लेख. वाखु साठवली आहेच आणि प्रिंट पण भटकंतीच्या फाईल ला टग केलीय.
धन्यु अनाहिता

खूप छान टिप्स ... प्रवासाला निघण्यपुर्वी याप्रमणेच सर्व यादी बनवून चेकलिस्ट तयार केली पाहिजे.

पैसा's picture

9 Mar 2016 - 1:13 pm | पैसा

उपयोगी संकलन!

रंगासेठ's picture

9 Mar 2016 - 4:21 pm | रंगासेठ

आवडेश.
>>शक्य असेल तर रोजच्या कपड्यांची १ अशा प्रत्येक दिवसाच्या प्लास्टिकच्या पिशव्या करायच्या. म्हणजे सगळे सामान उघडावे लागत नाही. आदल्या दिवशीचे कपडे त्या दुसर्‍या पिशवीत ठेवायचे.<< हे आवडलं.

तर्राट जोकर's picture

9 Mar 2016 - 7:25 pm | तर्राट जोकर

छान टिप्स. उत्तम संकलन!!

जुइ's picture

10 Mar 2016 - 4:29 am | जुइ

काही विसरायला होणार नाही. map back packing

कविता१९७८'s picture

10 Mar 2016 - 7:50 am | कविता१९७८

उपयुक्त टिप्स

सविता००१'s picture

10 Mar 2016 - 12:03 pm | सविता००१

सुरेख माहिती

भुमी's picture

10 Mar 2016 - 12:32 pm | भुमी

उपयुक्त लेख, काही विसरायला होणार नाही आता!

भुमी's picture

10 Mar 2016 - 12:32 pm | भुमी

उपयुक्त लेख, काही विसरायला होणार नाही आता!

श्रीरंग_जोशी's picture

11 Mar 2016 - 3:07 am | श्रीरंग_जोशी

सर्वच टिपा एकदम उपयुक्त आहे.

माझ्याकडून एक टिप -
अमेरिकेत चारचाकी गाडीने प्रवास करताना सुट्ट्या पैशांची नाणी जवळ बाळगावी. त्यांचे काही उपयोग

  • काही टोल प्लाझांवर केवळ नाणी टाकूनच पुढे जाता येते. तिथे कुणी माणूस नसतो. एखाद दुसराच टोल लागणार असल्यास आपण रेंटल कारचा प्लेट पास वापरणे टाळून पैसे वाचवू शकतो.
  • शहरांमध्ये रोडसाइड पार्कींग करताना दर वेळी कार्ड पेमेंटचीच यंत्रे असतील असे नाही.
  • बर्‍याच सार्वजनिक ठिकाणी २४ तास वेंडिंग मशिन्स मधून पेय, स्नॅक्स वगैरे नाणी टाकून किंवा १ व ५ डॉलर्सच्या नोटा वापरून घेता येतात. कार्ड पेमेंटचा पर्याय असणारी वेंडिंग मशिन्स प्रत्येक ठिकाणी उपलब्ध असतीलच असे नाही.

ही उदाहरणे जरी अमेरिकेतली असली तरी नाणी व सुटे पैसे प्रवासादरम्यान जवळ बाळगणे कुठेही सोयीचेच असते.

सगळ्या टिप्स आवडल्या. सुंठ, गूळ, तूप पुढीलवेळी बरोबर ठेवणार.

मीता's picture

29 Mar 2016 - 12:45 pm | मीता

खूप छान टिप्स..

कवितानागेश's picture

31 Mar 2016 - 6:49 am | कवितानागेश

वाचनखूण साठवली आहे.

कपिलमुनी's picture

31 Mar 2016 - 10:06 am | कपिलमुनी

हा विभाग राहीला आहे का ?
काही बेसिक औषधे जुलाब , उलटी , ताप, पाय मुरगळणे (मूव्ह , आयोडेक्स ) यांवरची औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याने जवळ बाळगावित