सिटी पॅलेस - जयपूर

इशा१२३'s picture
इशा१२३ in विशेष
8 Mar 2016 - 12:00 am

LekhHeader

body {
background-image: url("https://lh3.googleusercontent.com/-4IV7c0ur4aU/VtIMF96j2AI/AAAAAAAAATs/x...");
background-repeat: repeat;
}

.inwrap {
border: 0.5em solid transparent;
-webkit-border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/p...") 10 round; /* Safari 3.1-5 */
-o-border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/p...") 10 round; /* Opera 11-12.1 */
border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/p...") 10 round ;
}

राजस्थानच्या सहलीत एक एक ठिकाण पहात आज जयपूर पहायला निघालो होतो. राजस्थानची ही राजधानी प्राचीन इतिहास, कला, संस्कृती, परंपरा सगळ्यात अग्रेसर आहे. अनेकविध पर्यटनस्थळ, ऐतिहासिक वास्तु, लोककला, उत्तम कलाकृती यामुळे पर्यटकांमधे अत्यंत लोकप्रिय असणार हे शहर पहायची उत्सुकता आम्हालाही होतीच. मु़ख्य आकर्षण होते ते तिथले भव्य किल्ले आणि वैभवसंपन्न राजवाडे पाहणे. सिटी पॅलेस हे तिथले मु़ख्य आकर्षण आहे.

ठरल्याप्रमाणे शहरदर्शनाला निघाल्यावर प्रथम अमेर फोर्ट करून पुढच्या राजवाड्याकडे गाडी वळली. अंबर किल्ला अपेक्षेपेक्षा जास्तच भव्य आणि देखणा निघाल्याने आता सिटीपॅलेसबद्दल उत्कंठा वाढली. अंबर किल्ला आता केवळ पर्यटकांसाठी प्रेक्षणीय स्थळ आहे. तिथे आता कोणी राहात नाही. मात्र सिटीपॅलेसचा काही भाग अजूनही राजपरिवाराचे निवासस्थान आहे. सवाई जयसिंग व्दितीय या अमेरच्या राजाने १९३२ साली या राजवाड्याचे बांधकाम केले. नंतर आलेल्या राजांनी त्यात अजून भर घातली.

सकाळी अमेर साठी जाताना ज्या जुन्या जयपूरमधील रस्त्याने ड्रायव्हरसाहेबांनी गाडी नेली होती तोच भाग पुन्हा दिसू लागला. परत तेवढीच वाहतूकीची कोंडी, तीच गर्दी, गोंधळ पाहुन धास्तावलोच. सकाळी समग्र शहरदर्शनाचा ड्रायव्हर साहेबांच्या मनात आलेला विचार पुन्हा आला की काय अशी भीतीयुक्त शंका आली. पण ट्रॅफिकमुळे राजवाड्याच्या आत वळता येत नाही असा खुलासा झाल्यावर हायसं वाटलं. सकाळी आवडलेला हवामहल आता परत दर्शन देउ लागला. राजवाड्याचे प्रवेशद्वार समोर दिसत असूनही तिथल्या रांगेमुळे पोलिसदादा काही आत शिरु देईनात, की रांगेत घेईनात. मग पुन्हा एक फेरी सुरू झाली. जवळपास पाऊण तास मनसोक्त जुन्या शहराचे दर्शन झाल्यावर मात्र धीर खचू लागला. बाल मंडळ चुळबुळ करू लागले अन इकडची स्वारी डायवर साहेंबांबरोबर पुणेरी हिंदीतून पुण्याची ट्रॅफिक आणि जयपूरी ट्रॅफिक यावर तुलनात्मक चर्चा करू लागली. मला मात्र हाताशी असलेला एक दिवस कसा पुरणार याची चिंता वाटायला लागली. एव्हाना दिसेल त्या गल्लीबोळातुन सोयीचा रस्ता शोधत ड्रायव्हरने गाडी पुढं दामटणं सुरू केलं. आता राजवाड्याची मागची भिंत, दुसर्‍या एका बाजूचे प्रवेशद्वार्, भाजी मंडई, होलसेल बाजार सगळ बघून झालं. आता पुरेसं बघून झाल्याने देवाला दया आली आणि राजवाड्यात जायला एकदाचा प्रवेश मिळाला. गाडीतून पटकन उतरून मंडळ आत शिरले. समोरच मुख्य त्रिपोलिया गेट दिसले.

p

भव्य प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर राजवाड्याची इमारत दिसली. लाल रंगाच्या या पॅलेसचे बांधकाम वास्तुशास्त्राप्रमाणे केल गेलंय. पुढे त्याच्या चारही बाजूंनी शहर वसत गेलं. चंद्रमहल, मुबारकमहल, सुरजमहल, तारकटोरा, हवामहल, चांदनी चौक, जंतर मंतर, जलेब चौक आणि चौगान स्टेडियम अशा अनेक वास्तु या सिटी पॅलेसमधे अंतर्भूत आहेत. सध्या मात्र यातील चंद्रमहालात राजपरिवाराचे वास्तव्य आहे, तर बा़की भागात वस्तुसंग्रहालय आहे. इतर भाग शहरात समाविष्ट केलाय. हे वस्तुसंग्रहालय व थोडा भाग पर्यटकांसाठी खुला ठेवलाय.

.
(जालावरून साभार - Reference - http://static.thousandwonders.net)

राजवाड्याच्या आत प्रवेश केल्यावर समोर दिसतो तो मुबारक महल.

.
मुबारक महल
(जालावरून साभार - Reference - http://images.travelpod.com)

राजपरिवाराला भेटायला येणार्‍या पाहुण्यांसाठी या महालाचा वापर केला जायचा. गुलाबी दगडातील अप्रतिम कारागिरी केलेली ही इमारत आकर्षक दिसते. रजपुत, मुघल आणि युरोपियन पद्धतीने याचे बांधकाम केलेलं आहे. सध्या याच वास्तूत राजकुटूंबियांच्या वस्तूंचं संग्रहालय आहे. महाराणी गायत्रीदेवींनी निवडलेल्या सुंदर वस्त्र, शस्त्र, आभुषणं आणि इतर अनेक आकर्षक गोष्टी या संग्रहालयात मांडलेल्या आहेत. यात पहिल्या दालनात राजा, राणी व इतर राजसदस्यांची वस्त्रे ठेवलेली आहेत. राजाचे बारीक नक्षीकाम केलेले अंगरखे, सवाई मानसिंग यांचा पोलो ड्रेस, सोन्याच्या तारेत गुंफलेले, जरीकाम असलेले त्यावर मोती, कुंदनचे काम केलेले राण्यांचे घागरे, साड्या सगळंच देखणं. नजर ठरणार नाही असं बारीक भरतकामाचे नमुने अत्यंत सुरेख. असली अवजड वस्त्रे कसे वापरत असतील देव जाणे. सवाई माधोसिंगांचा अवाढव्य अंगरखा अन तुमानीने तर एक आख्खी भिंत अडवली आहे. सवाई माधोसिंग उंचपुरे आणि दणकट शरीरयष्टी असणारे होते. २५० किलो वजन असलेला हा उंचपुरा राजा त्याचे कपडेही तसेच प्रचंड असणारच म्ह्णा. बघुन अचंबित व्ह्यायला होतं. बाकी इतर कपड्यात किमती पश्मिना शाली, संगमनेरी ब्लॉक प्रिंटींगचे नमुने, अंगरखे अशी सगळीच निवडक सुंदर वस्त्रप्रावरणे आहेत. एक एक दालन निरखून बघण्यात वेळ कसा गेला समजलेही नाही. इतरही अनेक वस्तू, शस्त्रं, दागिने सारंच नेटकं मांडुन ठेवलंय.

त्यांनंतरची इमारत म्हणजे दिवान-ए-खास. राजाच्या खाजगी वापराचे दालन. संगमरवरी फरशी, नक्षीदार कमानी, लाल गुलाबी छ्त, भिंतीवर केलेली पांढर्‍या रंगातील नक्षी सारंच राजमहालाला साजेसं. छतावरच्या मोठ्या झुंबरांनी महालाला देखणं केलय. एक एक झुंबर मोठं आणि सुंदर.

d
(जालावरून साभार - Reference - http://siyag.net)

त्याहूनही लक्ष जाते ते या महालाच्या प्रवेशद्वारापाशी ठेवलेल्या प्रचंड मोठ्या चांदीच्या पात्रांकडे. गंगाजली असा उल्लेख आहे तिथे त्याचा. या गंगाजली अस्सल चांदीच्या बनवल्या गेल्या. तब्बल ४००० लिटर पाणी सामावणार्‍या ५.२ उंचीच्या या गंगाजली प्रत्येकी ३४० किलो वजनाच्या आहेत. ही छान चकचकीत पात्र काचेच्या आत सुरक्षित ठेवलेत. त्यामुळे नीट पाहताही येतात.

u

त्यामागची कथाही नवलाची. सवाई माधोसिंगराजे हे फक्त गंगेचे पाणी पित असत. १९०१ मधे राजाला इंग्लंडचा राजपुत्राचे राज्यरोहणानिमित्त इंग्लंडला येण्याचे आमंत्रण मिळाले होते. आता परदेशात जायचं तर हा नियम मोडणार. मग ही गंगाजलीची शक्कल लढवण्यात आली. बरं हे राजाचे जलपात्र! साधंसुधं कसं असणार? म्हणून तात्काळ चांदीची १४००० नाणी वितळवण्यात आली आणि ही दोन जलपात्र बनवुन जहाजाने पाठवली गेली. ही सुंदर घाटदार जलपात्र आहेत मात्र छान. गिनिज बुकमधे सर्वात मोठी चांदीचे पात्र अशी त्यांची नोंद आहे. अशी किती किमती भांडी काळाच्या ओघात हरवली गेली असतील अस मात्र वाटुन गेलं.

यापुढचा दिवान-ए-आमही (सभा निवास) खासच. इथल्या भिंती, छ्त अजूनच सुंदर. सगळीकडे लाल सोनेरी रंगाने केलेल नक्षीकाम अप्रतिमच. आता या महालाचा कलादालन म्हणून उपयोग केला जातोय. चारही बाजूंना राजाच्या पूर्वजांची भव्य तैलचित्रं लावलेली आहेत. सवाई माधोसिंग, सवाई मानसिंग व्दितीय इ.राजांची चित्रं आहेत. शिवाय जुनी पेंटिंग, वस्त्रं, जुनी हस्तलिखितं इ. ठेवलेली आहेत. राजस्थानी, पर्शियन, मुघल मिनिएचर पेंटिंगसुध्दा कमालीची सुंदर आहेत. अगदी आजच सजवून ठेवल्यासारखा वाटतो हा भाग. नीट काळजीपूर्वक जतन केल्याने समाधान वाटते. किती अमूल्य खजिना होता या राजघराण्याकडे. तो व्यवस्थित जपलाय हे विशेष.

aa
(जालावरून साभार - Reference - http://mw2.google.com)

त्याहून खास म्हणजे राजाचे तख्त ए रावल. राजाची लोकांना भेटायला जाताना हत्तीवर बांधायचे हे आसन. पालखीसारखाही याचा उपयोग केला जायचा.

k
(जालावरून साभार - Reference - http://www.rajasthanvisit.com)

महाराणी पॅलेस हा अजुन एक सुंदर भाग. राण्यांचे निवासस्थान असलेला हा भाग आता शस्त्रांच्या संग्रहायासाठी वापरले जाते. यात सवाई रामसिंगना राणी विक्टोरिया कडुन मिळालेली रत्नजडित बंदुक ठेवली आहे. नजर ठरणार नाही अशा एकएक वस्तू पाहुन आता राजवाड्यातील अजुन मुख्य वास्तूकडे आम्ही वळलो. राजाच्या खाजगी वापराचा महाल, चंद्रमहल! सातमजली असलेल्या या इमारतीत आता राजाचे सध्याचे वंशज राहतात. खालचा मजला फक्त पर्यटकांना पहायला खुला आहे.

cc

इथे जाण्यासाठी प्रीतम चौकातुन जावे लागते. मनात खूप पूर्वीपासुन फोटोत पाहिलेली एक गोष्ट इथे पहायला मिळाली. ते म्हणजे अप्रतिम सुंदर मयुर द्वार. हे इथेच आहे हे आधी माहित नव्हते. गाईडने हा भाग न दाखवताच आमची वरात तिथल्या दुकानात नेलेली. तिथून बाहेर आल्यावर सरळ बाहेर जायचा रस्ता त्याने गाठुन दिला. बाहेर पडताना काहीतरी राहिल्याचे वाटायला लागले पण नेमके काय ते सांगता येइना. एवढी माहिती गोळा करून अगदी ट्रिप आखलेली अन नेमकं हेच सांगता येईना. शेवटी चौकशी कक्षाकडे विचारलं की अजुन काही महाल आहेत का जयपूरात. पण तोही बाबा विचारत पडला. तेवढ्यात भिंतिवर लावलेल्या फोटोकडे लक्ष गेले आणि हेच ते पहायचे होते. आता तो बाबा हसला म्हणाला वो तो पिकॉक गेट अंदरही है देख लिजीये. आता तिकिट परत काढायच की काय? आत सोडतील कसं असा विचार डोक्यात आला. पण उदारपणे बिचार्‍याने जाइये जाइये केलं. पुन्हा आत शिरलो तर तो मघाचा गाइड उभाच त्याला म्हणालो, की हे कोण दाखवणार? दुकानाची घाई केलीस. मग परत चंद्रमहालाच्या दिशेने वळलो. आत प्रवेश केला तोच मुळी पिकॉक गेटनी. अप्रतिम सुंदर नक्षीकाम केलेल हे प्रवेशद्वार उत्सुकतेन निरखलं आणि केलेला खटाटोप सार्थकी लागला.

p

तेवढे एकच नाही तर अशी अजून तीन प्रवेशद्वारं तिथे पहायला मिळाली. चौकातील एकाबाजूला दोन व त्यांच्यासमोर अजून दोन अशी चार प्रवेशद्वार आहेत. ही छोटेखानी दारं सुरेख राजस्थानी कलाकुसरीने नटवली आहेत. एक एक नक्षीकाम जवळून पाहण्यासारखं आहे. जरा घाईतच असल्याने भराभरा फोटो काढले गेले. अजुन नेटके काढायला हवे होते असे नंतर वाटू लागले. पण तरी प्रत्यक्ष पहायला मिळाले ते बरे. हे राहिले असते तर नक्कीच रूखरूख लागली असती. राजाच्या खाजगी महालाकडे जाणारी ही चार प्रवेशद्वारं वैशिष्ठ्यपूर्ण आहेत. वर्षातील चारी ऋतु सुसह्य व्हावेत यासाठी चार महाल बांधले गेलेत. चारी प्रवेशद्वारांना वर सज्जे आहेत. त्यातून आजुबाजुचा सुंदर परिसर पहाता येतो. अर्थात वर सज्जात जायला पर्यटकांना प्रवेश नाहीच. खालचा चौक मात्र पहायला मिळतो.

g
(लोटस गेट व उजवीकडचे लहेरिया गेट)

gg
(रोझ गेट व पिकॉक गेट)

यातील सुंदर मोराची नक्षी असलेले पिकॉक गेट शरद ऋतुसाठी, लाटांचे अनुभव देणारे लहेरिया गेट वसंत ऋतुसाठी, गुलाबपुष्प नक्षीचे रोझ गेट आणि कमळ असलेले प्रवेशद्वार उन्हाळ्यासाठी बांधलेल्या महालाच्या प्रवेशासाठी आहे. अप्रतिम कलाकुसर त्याकाळातील कलेची, वैभवाची साक्ष देणारी. त्या कुशल कारागिरांचे आणि त्यांच्या कलेला योग्य वाव देणार्‍या रसिक राजपुत राजांचे आभारच ज्यामुळे हे आज सर्वसामान्याना अनुभवायला, पहायला मिळतंय.

pp

यानंतर बाहेर पडताना आधीच पाहिला होता तो बग्गीखाना भाग. त्याकाळातील बग्ग्या, पालख्या तसेच १८७६ साली राजपुत्र वेल्स याने भेट दिलेली व्हिक्टोरिया बग्गी तिथे ठेवली आहे.

baggi

एकाबाजुला त्याकाळातील तोफा रांगेत ठेवल्या आहेत.

tofa

त्या भागातच पारंपारीक कठपुतळीचा कार्यक्रम चालू होता. रंगीबेरंगी नाचणार्‍या बाहुल्या बघण्यात मुलं रंगून गेली.

kathputali

त्या कलाकारांच्या कलेला योग्य दाद देउन तृप्त मनाने बाहेर पडलो. सुंदर राजवाडा आता बघून झाला होता मात्र एक विचार मनात आलाच. देखभालीच्या खर्च काळाच्या ओघात अवा़क्याबाहेर गेल्याने या संस्थानिकांनी आपले महाल सरकारच्या ताब्यात देउन जनतेसाठी खुले केले. त्यांच्या मनाला किती यातना झाल्या असतील? अवघडच आहे असा निर्णय घेणे. महाराणी गायत्रीदेवींच्या आत्मचरित्रात त्या आठवणींबद्दल वाचल्याने हे जास्तच जाणवले असावे.

पण एक झाले की त्यामुळे या भव्य वास्तू सुरक्षित आणि सुस्थितीत दिमाखात उभ्या आहेत. अपेक्षेप्रमाणेच अजुन एक सुरेख राजवाडा पाहुन परत बाहेरच्या गर्दीत मिसळलो. पण मिळालेल्या आनंदापुढे या गर्दीचे आता काहीच वाटत नव्हते.

Note: Some photos are from Internet and the purpose is only for Reference. We sincerely thank the sources mentioned above for these photos.

(चित्र- किलमाऊस्की)
https://lh3.googleusercontent.com/-30BrcUCiylI/Vse9f0jd4uI/AAAAAAAAAFQ/OPRqSDu-re8/s788-Ic42/footer.png

प्रतिक्रिया

मृत्युन्जय's picture

8 Mar 2016 - 12:05 pm | मृत्युन्जय

राजस्थानातले महाल म्हणजे नयन सुख. निव्व्ळ राजेशाही. दशकभर आधी तिकडे जाउन आलो आहे. परत नव्याने ती अनुभूती घेतली . लेख मस्त जमला आहे .

सस्नेह's picture

8 Mar 2016 - 12:12 pm | सस्नेह

आणि फोटो.

प्रीत-मोहर's picture

8 Mar 2016 - 12:15 pm | प्रीत-मोहर

__/\__

राजस्थान बघितला की 'इतिहास जतन करणे' म्हणजे काय ते कळते !!!
सुंदर कलाकुसर आणि सुंदर जपणूक…

तुझ्या लेखाने परत एकदा भेट देऊन आल्यासारखं वाटलं :)

अगदि खरय!इतके सुंदर राजवाडे अतिशय काळजीपुर्वक जपलेत.आणि पर्यट्कांना खजिना खुला केलाय बघायला.निव्वळ प्रेक्षणीय वास्तु आहेत.

पद्मावति's picture

8 Mar 2016 - 2:07 pm | पद्मावति

अद्भुत आहे हे.

छानच झालाय लेख..तुझ्याबरोबर आम्हीसुद्धा सफर करुन आलो..

वेल्लाभट's picture

8 Mar 2016 - 6:15 pm | वेल्लाभट

राजस्थान............
पुन्हा पुन्हा पुन्हा जिथे जाऊ शकतो अशी जागा...

छान लेख

कंजूस's picture

8 Mar 2016 - 7:01 pm | कंजूस

धन्यवाद!

कविता१९७८'s picture

9 Mar 2016 - 10:58 pm | कविता१९७८

मस्त लिहीलयस, प्र.चि. ही छानच

व्वा !! अप्रतिम कलाकुसर आहे सगळी ,पिकॉक गेट क्लास्स :)

छान जमलाय लेख.परत जावेसे वाटायला लागले.

सविता००१'s picture

10 Mar 2016 - 4:15 pm | सविता००१

सुंदर फोटो आणि मस्त लेख. अगदी मेजवानी

मधुरा देशपांडे's picture

10 Mar 2016 - 7:14 pm | मधुरा देशपांडे

वाह!! खूप छान वर्णन.

स्नेहल महेश's picture

11 Mar 2016 - 2:35 pm | स्नेहल महेश

छानच झालाय लेख..तुझ्याबरोबर आम्हीसुद्धा सफर करुन आलो..

अगदी राजस्थानात फिरून आल्यासारखं वाटलं.

पैसा's picture

11 Mar 2016 - 3:47 pm | पैसा

अप्रतिम लिहिलंस! नशीब की हे सगळं जतन झालंय. महाराष्ट्रातल्या ऐतिहासिक वास्तू मात्र बर्‍याचशा दुर्दैवी ठरल्या.

खरच नयनरम्य, सुंदर वास्तू आहेत सगळ्या. लेखही छान लिहिलायस!

मितान's picture

14 Mar 2016 - 8:59 pm | मितान

क्या ब्बात है !!

आरोही's picture

25 Mar 2016 - 2:55 pm | आरोही

अप्रतिम !!!