मदत हवी आहे - मायक्रोव्हेव ओवन खरेदी

अमृत's picture
अमृत in तंत्रजगत
27 Jan 2016 - 2:00 pm

नमस्कार. मिपावर वा इतरही ठिकाणी बर्याच पाककृती बघुन करण्याची इछा होते पण बरेचदा काही पाकृ मायक्रोव्हेव नसल्याने करता येत नाहीत. तरी नविन मायक्रोव्हेव खरेदी करण्याचा विचार आहे तेव्हा थोडं मार्गदर्शन मिळू शकेल काय. मित्र परीवारात थोडी चर्चा केली असता अगदी टोकाची मतं ऐकायला मिळालीत उदा. कुणी सल्ला दिला की सोलो प्रकारातील घ्यावा तर कुणी कोन्वेक्शन धेण्याचं सुचविलं.मला खालील शंका आहेत

१. कोणता प्रकार घ्यावा. सोलो/ग्रील/कन्वेक्शन?
२. कंपन्यांची प्राधान्य क्रमवारी
३. मासिक वीजबिलात किती वाढ अपेक्शित आहे? समजा रोज १५मि वापर केल्यास
४. एकंदरीत उपयोगीता व फायदे/तोटे
५. बजेट - १२ हजार पर्यंत
६. कसा घ्यावा - ऑनलाइन / दुकानातून
७. क्षमता - ३ते४ जणांकरीता किती लिटर योग्य आहे
८. इतर काही विचारार ठेवण्याचे मुद्दे

मार्गदर्शनाच्या प्रतिक्षेत.

प्रतिक्रिया

आणखी एक पुनःपुनः विचारला जाणारा प्रश्न: मायक्रोवेव्हमुळे कर्करोग होतो का?

मला स्वतःला हा प्रकार अवडत नसल्याने गेली तीन वर्षे ओनिडाचा मायक्रोवेव लॉफ्ट्वर बसून आहे!भल्ता अवजड आहे लेकाचा.

पद्मावति's picture

30 Jan 2016 - 1:43 am | पद्मावति

कॅन्सरचं माहीत नाही पण मायक्रोवेवचा अतिरिक्त वापर टाळावा असे म्हणतात. अन्न गरम करायला ठीक आहे पण बरेच लोक त्यात अन्न शिजवतात ते अपायकारक आहे असे ऐकलंय. तसेच मायक्रोवेव मधे प्लास्टिक कंटेनर्स मधे अन्न गरम केल्यामुळे अपाय होतो (कॅन्सर माहीत नाही).

नाही. मायक्रो व्हेव मुले कर्करोग होत नाही. निश्चिंत असावे

तुषार काळभोर's picture

27 Jan 2016 - 5:48 pm | तुषार काळभोर

माझ्याकडे सोलो मावे (बहुतेक) पडून असतो. गार झालेले पदार्थ गरम करणे, याखेरीज क्वचितच उपयोग केला गेला आहे
१. कोणता प्रकार घ्यावा. सोलो/ग्रील/कन्वेक्शन? तुम्हाला त्यात काय बनवायचंय त्यावर. तरी शक्यतो क्न्वेक्शन-मावे घ्या. दोन्ही पर्याय उपलब्ध राहतात. (ग्रिल हवं की नको: तुम्हाला कबाब/तंदूर किती आवडते, त्यावर ठरवा)
२. कंपन्यांची प्राधान्य क्रमवारी आयएफबी.......व इतर
३. मासिक वीजबिलात किती वाढ अपेक्शित आहे? समजा रोज १५मि वापर केल्यास मावे ९००/१२०० वॉटचा असतो. म्हणजे तासाला अंदाजे १ युनिट. दिवसाला १५ मिनिटे=महिन्याला ७.५ युनिट्स.
४. एकंदरीत उपयोगीता व फायदे/तोटे भारतीय पद्धतीच्या स्वयंपाकासाठी फारच मर्यादित.
५. बजेट - १२ हजार पर्यंत
६. कसा घ्यावा - ऑनलाइन / दुकानातून.. मी फ्लिपकार्ट्/अमेझॉनवर बिन्धास्त खरेदी करतो. तुम्हाला क्म्फर्टेबल वाटत असेल तर फ्लिपकार्ट्/अमेझॉनवर बिन्धास्त घ्या. (फ्लिपकार्ट अ‍ॅड्वान्टेज/अमेझॉन फुलफिल्ड जरूर बघा. खात्रीशीर विक्रेते असतात.) किंवा ऑनलाईन मॉडेल्स (ओवनचे ) पाहा आणि दुकाना जाऊन घ्या.
७. क्षमता - ३ते४ जणांकरीता किती लिटर योग्य आहे. त्यात किती मोठं भांडं वापरणार त्यावर ठरेल. २५-२८ लिचा पुरेसा होईल भौतेक
८. इतर काही विचारार ठेवण्याचे मुद्दे. १) मावेमुळे कर्करोग होत नाही २) ओवनमध्ये 'रेसिपीज' करण्याचा उत्साह (डिपेंडिंग ऑन योर एन्थुझियास्म) १-६ महिने टिकतो. त्यानंतर रात्रीच्या शिल्लक पोळ्या/भाजी गरम करण्यापलिकडे उप्योग होत नाही. ३) किचनओट्यावर डेडिकेटेड जागा ठेवा, नाहीतर दुसरीकडे जाऊन वापरणे/दुसरीकडचा ओवन ओट्यावर आणणे, याचा कंटाळा केला जाऊन, तो 'पडीक' होतो.

वेल्लाभट's picture

27 Jan 2016 - 5:54 pm | वेल्लाभट

१. कोणता प्रकार घ्यावा. सोलो/ग्रील/कन्वेक्शन?
ओटीजी/कन्व्हेक्शन वेगळा घ्या असं सुचवेन. तेही त्याचा पुरेपूर वापर होणार असेल तर. मायक्रोवेव्ह सोलो+ग्रील वाला घ्यावा.
२. कंपन्यांची प्राधान्य क्रमवारी - एलजी, इलेक्ट्रोलक्स
३. मासिक वीजबिलात किती वाढ अपेक्शित आहे? समजा रोज १५मि वापर केल्यास - विशेष नाही. दोन तीन युनिट्स महिन्याला
४. एकंदरीत उपयोगीता व फायदे/तोटे - केला तर खूप उपयोग होतो. म्हटलं तर सर्व स्वयपाक मायक्रोवेव्ह मधे करता येतो. साबुदाणा खिचडी तर क्लास होते.
५. बजेट - १२ हजार पर्यंत - खूप झालं.
६. कसा घ्यावा - ऑनलाइन / दुकानातून - दुकानातून.

कंपन्यांच्या वेबसाईट वर माहिती घ्या पण दुकांनातूनच घ्या. ऑनलाइन घेतले तरी तुम्हाला बिल दुसऱ्याच कंपनीचे येणार. कोण व्हेंडर कसा माल पाठवतो यावर ऑनलाइन कंपन्यांचा वचक नसतो. जरी पैसे परत मिळाले तरी वाहतुकीचा खर्च परत मिळत नाही. शेवटी हजार पंधराशे रुपये जातातच. माझा फ्लिपकार्ट, स्नॅपडील , रिडिफ यांचा अनुभव चांगला नाही. आठ दहा हजार रुपयांसाठी आपण काही कोर्टात जात नाही.

१. पहिले पदार्थ ठरवा कुठले करणार त्यात ते, त्यावरून कुठल्या टाइपचा घ्यायचा ते ठरवणं योग्य. केक, बिस्किटे, इ. अनेक प्रकार कन्वेक्शनमध्येच परफेक्टली होउ शकतात. एकदाच घेतली जाणारी वस्तु आहे. बजेटही दिसतंय. कंवेक्शन घ्या. विक्रेते सांगतात की संपूर्ण स्वयंपाक कन्वेक्शन ओवन मध्ये होउ शकतो.
२. पास.
३. ओवन वापरायला लागल्यापासून अडीचशे ते तीनशे रुपयांनी आमचं वीजबिल वाढलंय.( -पण मी भरपूरच वापरतो.)
४. उपयोगी आहे. पण निगा, स्वच्छता राखावी लागते. इन्स्टॉलेशनचा विचार केला आहे का? मोकळी जागा सोडावी लागते ओवनमागे. कंवेक्शन वापरताना तो बाहेरून चांगलाच गरम होतो. मुलांपासून थोडा जपावा लागतो.
५. बजेट कंवेक्शन येइल.
६. ऑनलाइन घेणारे म्हणतील ऑनलाइन घ्या. दुकानातून घेणारे म्हणतील दुकानातून घ्या. तरीही दुकानात बघून ऑनलाइन घेतलेलं बेस्ट. वॉरंटीची खात्री करून घ्या ऑनलाइन घेताना.
७. ३-४ लोकांना २१-२५ लिटर पुरतो. पाचवा अॅड झाला तर २८ बरा.
८. बजेटमध्ये इन्स्टॉलेशन संबंधित वीज/जागेची तजवीज, वेंटीलेशनची सोय धरा. शिवाय वेगवेगळी भांडी गोळा करत रहायला लागतंय. काही प्लॅस्टीकची चालतात, पण बोरोसिलीकेट असेल तर सगळ्यात बेस्ट. तोही एक खर्च होतो. स्टार्ट अप किट मध्ये मिळणारी भांडी सुरुवातीला मजा आणतात. पण अगदी थोडे दिवस.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

27 Jan 2016 - 10:03 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

अमृत थोडं बजेट वाढवा आणि २७-३० लिटरच्या च्या रेंजमधे बघा म्हणजे पाहुणे आले की सोयीचा पडतो. मी नुकताचं २-३ महिन्यांपुर्वी घेतला मायक्रोवेव्ह पॅनासोनिकचा NN-CD684B हे मॉडेल. १७ कि १८ हजाराला मिळाला. नंतर साधारण १२०० रुपयांची वगैरे भांडी घेतली. स्टार्टिंग किटची भांडी बेसिक स्वयपाकाला पुरतात. सॅमसंगचा ह्याचं लिटर रेंजमधला मा.वे. साधारण त्यावेळी १४ हजाराला होता पण त्याची ग्रिल कॉईल आणि भांड्यामधे जेमतेम अंतर होतं त्यामुळे पॅनासोनिकचा निवडला.

आता मा.वे. घेताय तर प्रत्यक्ष मॉडेल बघुन घ्या ऑनलाईन मागवु नका. ज्या व्यक्तीचा मा.वे. शी संबंध येणारे त्या व्यक्तीला पाहु दे घ्यायच्या आधी.

मॉडेलवर दिलेली लिटर कपॅसिटी अगदी १०० लिटरची का असेना चारही बाजुकडुन तुमच्याकडच्या मोठ्यात मोठ्या मा.वे. भांड्यापेक्षा किमान १५-२० मिमि जागा जास्तं हवी. वरच्या हिटिंग रेंजपासुन किमान तळहाताच्या जाडीपेक्षा थोडी जास्तं जागा हवी.

घेताना शक्यतो टच स्क्रीन घेउ नका. बटणं वाला मायक्रोवेव्ह सर्व्हिसिंगच्या दृष्टीने किफायतशिर ठरतो. टचस्क्रीन उडाला तर आख्खं पॅनेल बदलावं लागतं. बटणं गेलं तर तेवढचं बदलुन पुन्हा नव्यासारखं काम करु शकतो.

वॉरंटी एक्सटेंड करुन घ्या. साधारण ५००-७०० रुपये जास्तं जातील पण एकुण तीन वर्ष डोक्याला कटकट नाही आणि परत घरपोच सर्व्हिसिंग.

घरामधे १६ अँपिअरचं एक सॉकेट स्वयपाकघरामधे वेगळं करुन घ्या (तुमच्या नेहेमीच्या पॉवर पिनमधे मा.वे. ची पिन बसणार नाही आणि जुगाड करुन बसवलीत तर घराचा मेन फ्युज उडेल) आणि त्याला फ्युजही त्या क्षमतेचा बसवा.

https://www.panasonic.com/in/consumer/home-appliances/microwave-ovens/co...

@खेडुत नाही मायक्रोवेव्ह मुळे कर्करोग होत नाही. मायक्रोवेव्ह मधे अन्नामधे कुठलाही पदार्थ मिसळला जात नाही. फक्तं गरम होतो. फक्तं हिट ट्रान्सफरचा मोड वेगळा आहे.

अजुन काही मदत लागली कळवा.

सुरेख प्रतिसाद, माहितीपूर्ण. धन्यवाद!

प्रसाद भागवत १९८७'s picture

5 Feb 2016 - 3:03 pm | प्रसाद भागवत १९८७

“घरामधे १६ अँपिअरचं एक सॉकेट स्वयपाकघरामधे वेगळं करुन घ्या”
--- कृपया हा मुद्दा जरा स्पष्ट करता का समजला नाही मला नॉर्मल पौवेर प्लूग सोकेट चालेल का ?
अजून काही प्रश्न होते
अजून कोणत्या तांत्रिक बाबी लक्ष्यात घ्याव्या ?
समसुंग व LG बद्दल आपले काय मत आहे ?

अमृत's picture

29 Jan 2016 - 3:27 pm | अमृत

सर्व प्रतिक्रिया व मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद.... _/\_

फारसा उपयोगि नाहि. किंवा आपण उपयोग करत नाहि. जस फुड्प्रोसेसर बघतांना वाट्तो उपयोग होईल पण नंतर फक्त मिक्सर च वापरला जातो तस.

मराठी कथालेखक's picture

5 Feb 2016 - 3:18 pm | मराठी कथालेखक

मायक्रोवेव ओवन जास्त करुन पदार्थ पुन्हा गरम करण्यासाठीच वापरला जातो.
काही प्रमाणात ओट्स , नॉरचे सूप ई साठी.
माझ्याकडे मायक्रोवेव्ह, ग्रिल , कॉन्वेक्शन अशा सगळ्या सुविधा असलेला २८ लिटरचा मोठा ओवन आहे. पण गेले चार वर्षात ९९.९९% वेळा मायक्रोवेव्हच वापरले गेले.
बजाज ,विडिओकॉन वगैरे कंपनीचा कमी लिटरचा (१८-२०) चार-पाच हजारात येईल तो घ्या पैसे आणि जागा वाचवा.
बाकी कधीतरी पिझ्झा /केक खाण्यासाठी बाहेरुन मागवणे परवडते. मायक्रोवेव्ह मोडवर केक देखील चांगला बनतो.