लोनाड (जानवल) ची बौद्ध कालीन लेणी आणि शिवमंदिर .

शान्तिप्रिय's picture
शान्तिप्रिय in भटकंती
19 Jan 2016 - 12:54 pm

मित्र मैत्रिणींनो,

मिपावरील आजकाल होत असलेले वितंडवाद पाहुन मन खिन्न होते.
म्हणून असे पर्यटनाचे लेख लिहितानाच बरे वाटते. असो .

मागील शनिवारी लोनाड येथे जाउन एक छोटे डोंगरात कोरलेले शिवमंदिर पाहण्याचा योग आला. या मंदिरात छोटी बौद्ध लेणीही आहेत. लोनाड हे मुंबई नाशिक महामार्गावर ठाण्याच्या ईशान्येला भिवंडीपासून १२ किमी आहे. पिसे किंवा भातसा धरणापासून मुंबईला पाणी पोहोचवणारी पाइप लाइन या मार्गावर दिसते. या ठिकाणी जाण्यास भिवंडीतील वंजारपट्टी येथून रिक्षाची सोय आहे (लोनाड किंवा जानवल येथे उतरणे) . किंवा अगदी मर्यादित बसॆस भिवंडी स्थानकातून मिळतात. येथून पिसे धरणाला जाणारी बस पकडून लोनाड किंवा जानवल (लोनाड पासून पिसे धरणाच्या दिशेने केवळ १०० मीटर अंतरावर) येथे उतरावे . याशिवाय लाल चौकी कल्याण येथे उतरून सावदे येथे रिक्षाने जाऊन नंतर दुसऱ्या रिक्षाने जानवल येथे जाता येते. येथे उतरून एका छोट्याश्या टेकडीवर चढून गेल्यावर हे मंदिर आहे. हे अतिशय छोटे मंदिर असून , याच्या पायथ्याला बहुधा व्हर्लपूल कंपनीचे गोडाऊन आहे. वारसा स्थळाची औपचारिकता पूर्ण न केल्यास हे मंदिर अतिक्रमणाच्या भक्ष्यस्थानी पडण्याची भीती आहे. मंदिराबाहेर जातककथा हे लेणे असून काही लेणी मन्दिराच्या सभामंडपावर कोरली आहेत. मंदिराबाहेर एक छोटे कुंड पाहावयास मिळते. प्रकाशचित्रे डकवत आहे. शांत परिसर !

L1

l2

l3

l4

l5

l6

l7

l8

l9

l10

l11

l12

l13

l14

प्रतिक्रिया

पैसा's picture

19 Jan 2016 - 2:24 pm | पैसा

या लेण्यांबद्दल कधी ऐकलेही नव्हते! खरंच अशी असंरक्षित आहेत?

शान्तिप्रिय's picture

19 Jan 2016 - 2:31 pm | शान्तिप्रिय

असंरक्षित असतिल असे माझे मत आहे. काही ट्रेकर्स येथे अधून मधून येतात. पण फारसे माहित नसलेले असे
हे ठिकाण आहे. ज्याअर्थी सरकारने तेथे कोणतीही माहितिपर पाटी लावली नाहि त्याअर्थी अतिक्रमण फारसे
अवघड नाही असे माझे वैयक्तिक मत आहे.

पैसा's picture

19 Jan 2016 - 2:37 pm | पैसा

आता शेंदूर फासला आहे आणि काहीतरी लिहिलेले दिसते आहे. मोडतोड होण्याची बरीच शक्यता आहे.

प्रचेतस's picture

19 Jan 2016 - 4:23 pm | प्रचेतस

ऑफबीट लेणं. साधारण ६ व्या/ ७ व्या शतकात कोरलं गेलेलं महायानपंथीयांचं लेणं. जातककथांमधला प्रसंग वेस्संतर जातक दिसतोय. वेस्संतर (विश्वंतर राजाच्या रूपात पूर्वजन्मीचा बोधीसत्व) आणि हाती मद्याचा पेला असणारी त्याची राणी मद्दी.

गणपती आणि महिषासुरमर्दिनी साधारण १७/१८ व्या शतकातली स्थानिक रुपात (लोकलाईज्ड फॉर्म).

शान्तिप्रिय's picture

19 Jan 2016 - 4:30 pm | शान्तिप्रिय

धन्यवाद प्रचेतस . सुन्दर माहिति.
इतिहास हा तुमचा प्याशन दिसतोय.

प्रचेतस's picture

19 Jan 2016 - 4:31 pm | प्रचेतस

:)

तुम्ही चांगल्या जागा शोधून सांगता.इतक्या जवळ असून गेलो नाही.
जातक कथांवर दोन पुस्तके आहेत फ्री पिडिएफ http://esahity.com वर.

छान माहिती व छायाचित्रे.

शान्तिप्रिय's picture

19 Jan 2016 - 5:27 pm | शान्तिप्रिय

धन्यवाद कंजूस .
निरनिराळी ठिकाणे हुड्कुन ती पाहणे हा एक छोटासा छंद आहे माझा.
बहुतेक वेळी मी एकटाच अशा ठिकाणी जाऊन येतो.

नवीच माहिती कळते तुमच्या धाग्यांतून.धन्यवाद.

मनिमौ's picture

19 Jan 2016 - 8:01 pm | मनिमौ

कोरीव काम सुरेख आहे. तुमच्या छंदाला सलाम

मदनबाण's picture

19 Jan 2016 - 8:07 pm | मदनबाण

बर्‍याच दिवसांनी रुइचे झाड फोटोमुळे पाहण्यात आले.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- हम तेरे बिन कही रह नहीं पाते ... :- Sadak

रुई ची झाड आमच्या गावात ''माय्यीनाती''

कंजूस's picture

20 Jan 2016 - 10:35 pm | कंजूस

________________________________________
शान्तिप्रिय यांचेकडून स्फूर्ती घेऊन लोनाडला आज संध्याकाळी भेट दिली.
त्याचे काही फोटो-
१ ) या रस्त्यावर आहे


२ ) दालन

३) खांब

४ )उजवीकडचे एक मोठे शिल्प

५ ) काय उपदेश देतोय?

६) लेण्यासमोर उभे लिहिले तर

शान्तिप्रिय's picture

21 Jan 2016 - 10:26 am | शान्तिप्रिय

व्वा व्वा.
कंजूसजी ............. मस्त प्रकाश चित्रे.
मला आपल्याला एकदा भेटायलाच हवे. गुढीपाडव्यानंतर जमते का बघू.

यशोधरा's picture

21 Jan 2016 - 10:34 am | यशोधरा

चांगली माहिती.

स्वच्छंदी_मनोज's picture

21 Jan 2016 - 1:32 pm | स्वच्छंदी_मनोज

शांन्तिप्रियजी आणी कंजूसजी मस्तच फोटो.

यावरून मी या लेण्यांना आणी गावातल्या मंदीराला ७ वर्षांपुर्वी भेट दिली होती त्याचा आठवणी ताज्या झाल्या, वर पैसातै म्हटल्याप्रमाणे या तश्या पुर्णपणे संरक्षीत लेण्या नाहीयेत आणी ASI ने त्यांचा तो नेहेमीचा नीळा बोर्ड लावून ठेवलाय बाकी संरक्षण आणी मेंटेनन्सच्या नावाने बोंबच आहे :(

पण अत्यंत्य दुर्लक्षीत असल्याने लेण्या आणी गावातले मंदीर ह्याची अक्षरशः भग्नावस्था झालेय. वरच्या लेखात आणी प्रतीसादात लेण्याला रंगवून टाकलेले दिसते आहे पण ते अलीकडले आहे कारण आम्ही सात वर्षांपुर्वी गेलो होतो तेव्हा असे रंगकाम नव्हते. माझ्याकडे ह्याचे बिनारंगकामवाले फोटो आहेत. शोधून इथे डकवतो.

ह्या लेण्यात नंतरच्या काळात स्थानीक लोकांकडून खंडेश्वरी देवीची स्थापना झाल्याने स्थानीक लोक ह्याला खंडेश्वरीच्या लेण्या म्हणतात.

प्रचेतस's picture

21 Jan 2016 - 2:11 pm | प्रचेतस

लोनाड गावातले शिवमंदिर शिलाहारकालीन आहे. तिथे एक गधेगाळ सापडला होता.

शान्तिप्रिय's picture

21 Jan 2016 - 2:08 pm | शान्तिप्रिय

धन्यवाद या सुंदर माहितिबद्दल मनोज.
खंडेश्वरीच्या लेण्या .... लक्षात ठेवायला हवे.

आणखी काही फोटो आहेत ते इथे देऊ का?

यशोधरा's picture

21 Jan 2016 - 9:51 pm | यशोधरा

द्या की.

कंजूस मामांचे फोटो बी भारी...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Just Can't Get Enough... :- The Black Eyed Peas

शान्तिप्रिय's picture

22 Jan 2016 - 11:34 am | शान्तिप्रिय

जरूर द्या.

राही's picture

1 Feb 2016 - 7:08 pm | राही

शिलाहार राजा अपराजित (Aparajita) ह्याच्या एका दानपत्रात लवणेतट (Lavanetata), सध्याचे लोनाड येथील लोनादित्य मंदिरास भूमिदान दिल्याचा उल्लेख आहे असा संदर्भ मिळाला. हे एक आदित्य मंदिर असावे.

प्रचेतस's picture

1 Feb 2016 - 7:23 pm | प्रचेतस

सहमत आहे.
भडान (भिवंडी) ताम्रपट बहुधा. लोनाडच्या लोणादित्यास धूप दीपाची सोय करून दिल्याचा त्यात उल्लेख आहे.

बाकी कंजूसकाकांनी लोनाड लेणी आणि शिवमंदिर ह्या धाग्यात मंदिराचे अधिक फोटो टाकलेले आहेत.

बोरिवलीच्या कान्हेरी लेण्याला पूर्वी खूपदा गेलेलो आहे.त्यावेळी रे स्टेशनवरूनच बेस्टची बस मिळायची.गेटवर एक कर्मचारी प्रवेशफी घ्यायचा आणि सकाळ ते संध्याकाळ पाचपर्यंत मनसोक्त भटकता यायचे.आता फक्त कारवाल्यांनाच आत जाता येते.एकट्या दुकट्यास वाहन नसलेल्यांची फारच गैरसोय केली आहे.प्रथम गेटमधून वीस रु भरून आत जा,यग एक काडेपेटीछाप जाळ्या लावलेली बस(!) येते एक तासातासाने.त्यात तेराजणच बसतात(!).चवथीतली मुलं बसू शकतील अशा सीट्स आहेत.आठ किमीचे पंचवीस रु तिकिट आहे.

प्रचेतस's picture

1 Feb 2016 - 9:36 pm | प्रचेतस

आत खाजगी जीप सुद्धा पुष्कळ आहेत हो. आम्हाला फार वेळ थांबावे नव्हते लागले. ५/१० मिनिटात खाजगी वाहन मिळाले होते.

स्वच्छंदी_मनोज's picture

2 Feb 2016 - 1:23 pm | स्वच्छंदी_मनोज

कंजूसजी आता परत कान्हेरी लेण्याला भेट द्या आणी आता त्यासाठी कारणपण झकास आहे. दोनेक आठवड्यापुर्वी कान्हेरी लेणी समुहामध्ये नवीन सात लेण्यांचा शोध लागला आहे.

ही बातमी -

http://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/Seven-ancient-Buddhist-ca...