डिंकाचे लाडू- हिवाळा स्पेशल

अदि's picture
अदि in पाककृती
15 Jan 2016 - 11:50 am

साहित्यः

खारीक पावडर- २ वाट्या
अक्रोड, काजू, बदाम, पिस्ता पावडर- १.५ वाटी
डिंक- १ वाटी
पिठीसाखर- २ वाट्या
तूप- ३ वाट्या

कृती

अर्धा डिंक तूपामध्ये तळून घ्या व उरलेला अर्धा कच्चा बारीक करून घ्या. सर्व वस्तू एकत्र करून लागेल तसे वितळवलेले तूप घालून लाडू वळून घ्या. लाडू वळताना फुलवलेला डिंक हाताने चुरला नाही तरी चालेल. खाताना मस्त क्रंची लागतो. ह्या पाककृती मधे काहीही भाजून घ्यायचे नसल्याने लाडू अतिशय पटकन होतात. मला थोडं कमी गोड आवडतं, म्हणून मी पिठीसाखर फक्त २ वाट्या घेतली. तुम्ही अजून अर्धी वाटी टाकू शकता. वरील प्रमाणात मध्यम आकाराचे १८-२० लाडू सहज होतात. कालच केले होते :), पण जंग जंग पछाडूनही फोटो टाकता आले नाहीत.. :(
तस्मात मिपावरील मान्यवरांनी बनवून बघावेत व फोटो टाकावेत.. :D

प्रतिक्रिया

पाकृ छानच आहे.फोटो का टाकता आले नाहीत?

अदि's picture

18 Jan 2016 - 10:57 am | अदि

अजयाताई, पिकासा वरुन फोटो टाकायचा प्रयत्न करत होते, पण काही केल्या तो choose file to upload चा ऑप्शनच येइना. मला गणपती स्पर्धेसाठी पण फोटो टाकता आले नव्हते तेव्हा याच कारणामुळे.. :(

अनाहितात मधुराचा धागा बघ.चांगलं लिहिते आहेस तर फोटो यायला हवेत!
किंवा फोटो मेल कर.टाकून देऊ.
किंवा मोबाईलवर postimage.org ला रजिस्टर करुन फोटो सिलेक्ट-अपलोड-डायरेक्ट लिंक- मिपा फोटो एडिटरवर काॅपी पेस्ट असे करता येईल.

अदि's picture

18 Jan 2016 - 1:30 pm | अदि

परत करते प्रयत्न..

दिपक.कुवेत's picture

17 Jan 2016 - 6:31 pm | दिपक.कुवेत

क्रंची लागतो हे मान्य पण उरलेला कच्चाच घालायचा? खाताना दाताला चिकटणार नाहि? आणि मुळात कच्चा खाल्लाच कसा जाईल? कृपया जरा सविस्तर सांगाल का? पाकृ पण फार घाईघाईत लिहिलेय का?

अदि's picture

18 Jan 2016 - 11:05 am | अदि

उरलेला कच्चाच मिक्सरमधे फिरवून बारीक वाटून बाकी मिश्रणात घालायचा, अजिबात खाताना दाताला चिकटत नाही.

अदिती कुंभारवाडाकर (दांडेकरांचे शेजारी).. ;)

दिपक.कुवेत's picture

18 Jan 2016 - 1:49 pm | दिपक.कुवेत

राहतेस?? चला मग ह्या वर्षी तुझी नक्किच भेट घेतली पाहिजे. भेटिप्रित्यर्थ वरील लाडूच तयार ठेव.

अदि's picture

18 Jan 2016 - 3:36 pm | अदि

फक्त कधी येणार तेव्हढे सांगा.. :D

दोन अठवड्यांपूर्वी हे लाडू केलेत पण गुळाच्या पाकातले. यावेळी डिंक बरा मिळाला होता पण फार कचरा आला होता. निवडून घेताघेता कंटाळा आला. डिंक नेहमी स्वच्छ आणला म्हणजे काम सोपे होते.

अदि's picture

18 Jan 2016 - 11:06 am | अदि

असे पण करुन बघ रेवतीतै, आवडतील तुला. :)