दुरचा कट्टा (भाग २)

कविता१९७८'s picture
कविता१९७८ in भटकंती
12 Jan 2016 - 4:48 pm

खुप दमल्यामुळे छान झोप लागली तिघींना. दुसरा दिवस उजाडला, उठल्या उठल्या नाश्ता बनवण्याच्या विचारात होते कारण त्यासाठी स्पेशल पराठे तर ठरवले होते पण ऐनवेळी बटाटे विकत घ्यायचे विसरल्याने आता काय नाश्ता करावा या संभ्रमात होते, कारण पोहे, उपमा, इडली यासारखे पदार्थ तर कॉमन आहेत नेहमीच खाल्ले जातात, मला असा काहीसा नाश्ता बनवायचा होता जो या दोघींना खुप आवडेलही आणि बरेच दिवस लक्षातही राहिल. मग सुरुवात केली फक्कड चहाने आणि ब्रेड टोस्टने. सुरंगीताई नॉनवेज असल्याने मस्त माझ्या इनोवेशन स्टाईलने तीला गावठी कांद्याची पात घालुन ऑमलेट बनवुन दिलं. स्वरा साठी काहीतरी नवीन करायचं म्हणुन मग खाकरा भेळ केली. खाकरा भेळ खुप चविष्ट लागते म्हणुन जास्तच बनवली , गप्पा मारत असताना ती अंमळ जास्तच खाल्ली गेली. मग आवरुन गेलो बोईसरच्या मासळी बाजारात.

..

.

.

रावसाचं ओलं खारं घेतल्यावर सुरंगीताईने शिवंड्याकडे मोर्चा वळवला , मग सोललेली छोटी करंदी आणि नंतर जिळा कोलंबी अशी छान खरेदी करुन बाहेर आलो, स्वरा वेज असल्याने तिने मासळी बाजारात पाय टाकण्याचा प्रयत्न तर केला पण तो तिला फार काळ टीकवता आला नाही आणि आम्ही आत मासळीबाजारात बागडत असताना तीने मासळीबाजारातुन काढता पाय घेतला. नंतर स्वारी वळाली आमच्या जुन्या घरी. तिथे आवभगत झाल्यावर गप्पा मारत आम्ही निघालो वसतीस्थानाकडे. तोपर्यंत १२ वाजले होते. आता खरी माझ्या कसोटीची वेळ होती. स्वरामुळे आधी वेज शिजवण्याचा बेत होता, रावसाचं खारं बनवायला बहीणीकडे दिलं होतं , आणि सुरंगीताईने जिळा कोलंबीचं थोडं सुकं बनवते असे सांगितले म्हणजे आता वेज प्रकार चविष्ट बनवण्याची जबाबदारी माझी होती. भराभर हात चालवले, मटारची भाजी , वरण - भात बनवला. तो पर्यंत सुरंगी ताईने सर्व प्रकारची कोलंबी साफ करुन घेतली. मधे मधे ती स्वराला ताजे मासे कसे ओळखावे याचे धडे देत होती जणु काही स्वरा इतक्या कौतुकाने ऐकत होती जशी काही आता लगेचच टोपली - पाटी घेउन बोटीवर मासे विकत घ्यायला जाणार होती.

..

जेवण झाल्यावर वाढुन घेतले, तो पर्यंत बहीणीकडुन रावसाचे कालवण आणि तळलेले तुकडे दोन्ही घेउन आले. जेवायला बसलो, पाने घेतली ती धाकधाकुनेच कारण सुरंगीताई सारख्या सुगरणीपुढे आपण ते काय? काय वाटेल सुरंगीताईला? इथली लोकल पद्धत आवडेल की नाही? या विचारात होते नव्हतेच तोच सुरंगीताईने माझ्या बहीणीने केलेलं रावसाचं कालवण चाखलं आणि...............................................

.

.

.

.

.

.

वाह , मस्त असे उद्गार निघाले तिच्या तोंडातुन, एवढे बरे वाटले म्हणुन सांगु. ती तर एकदम फॅनच झाली, म्हणाली पुढच्या वेळी तुझ्या बहीणीच्या बाजुला उभी राहुन शिकुन घेईन ही पद्धत. एका सुगरणीकडुन मिळालेले अ‍ॅप्रिसिएशन काही औरच! माझ्या सुदैवाने वेज प्रकार ही चांगला झाला होता आणि सुरंगी ताई ने बनवलेले जिळ्याचे सुके ही अप्रतिम झाले होते. यथेच्छ ताव मारला आम्ही तिघींनी जेवणावर. जेवण संपल्यावरही बराच वेळ तिथेच बसुन आम्ही खुप गप्पा मारल्या अगदी उष्टा हात सुके पर्यंत. ३ वाजले मग उठलो कारण ४ वाजता दोघींना परत जायचे होते, मग तयारी करुन बॅगा भरुन खाली उभ्या असलेल्या गाडीत सामान भरुन निघालो माझ्या बहीणीकडे. तिथे कॉफी घेउन मग निरोप समारंभ झाला. जड मनाने निरोप दिला. पण स्वरा आणि सुरंगी ताईने पुन्हा येउच असे सांगितल्याने बरे वाटले. माझ्या कडुन त्यांच्या सरबराईत काही कमी पडले असेल तर............................................................................. त्यांनी ते अज्जिब्बात सांगु नये. नाहीतर पुढच्या वेळेस स्वराला नॉनवेज आणि सुरंगीताईला वेज खायला लावीन. समजलं काय??????????????????

प्रतिक्रिया

फोटु काही दिसेचिना!! :(

कविता१९७८'s picture

12 Jan 2016 - 5:07 pm | कविता१९७८

दिसतायत मला तर

पिलीयन रायडर's picture

12 Jan 2016 - 5:29 pm | पिलीयन रायडर

वा!! छान वॄतांत! मजा केली एकंदरित! आधीच कट्टा आणि त्यात मुक्कामाचा म्हणजे धमालच!

स्लर्र्र्र्र्र्र्प!

नूतन सावंत's picture

12 Jan 2016 - 5:44 pm | नूतन सावंत

कविताची आक्का सुगरण आहेच,अगदी मिटक्या मारुन जेवले.स्वरालाही आपण एका चविष्ट खाद्यसंस्कृतीला आपण मुकतो आहोत का असा प्रश्न पडला होता.

नूतन सावंत's picture

12 Jan 2016 - 5:51 pm | नूतन सावंत

कवितानेही वेज छानच बनवला होताच पण मासे नेहमीच बाजी मारून जातातच.तेही इतके स्वादिष्ट.

नीलमोहर's picture

12 Jan 2016 - 6:00 pm | नीलमोहर

छान वृत्तांत आणि फोटो !!

पियुशा's picture

12 Jan 2016 - 9:04 pm | पियुशा

चलो बोईसर कट्टा करेंगे, चविष्ट कट्टा झालाय एकदम :)

पैसा's picture

12 Jan 2016 - 10:13 pm | पैसा

बोईसरला येणार नक्की!

फोटू व वर्णन चांगले झाले आहे. आता फारवेळा चांगले म्हणवणार नाही. जळजळ होईल. ;)

अजया's picture

13 Jan 2016 - 6:48 am | अजया

रेवाक्काशी बाडिस!

प्रीत-मोहर's picture

13 Jan 2016 - 8:33 am | प्रीत-मोहर

मस्त मस्त कट्टा. आता कवीकडे जावच लागतय.

स्नेहल महेश's picture

13 Jan 2016 - 1:41 pm | स्नेहल महेश

आई ग कसले भारी फोटो आहेत

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Jan 2016 - 3:43 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्त मजेत झालेला कट्टा ! त्यात समुद्राच्या फळांच्या खादाडीची चंगळ, म्हणजे सोनेपे सुहागा ! आत्ताच तळलेले खापरी पापलेट चापलेले असल्याने केवळ जळजळ झाली नाही :)

मस्त वृत्तांत. मजा केलीत कि