गिल्बर्ट टेकडी गावदेवी दुर्गादेवि मंदीर अंधेरी पश्चिम.

शान्तिप्रिय's picture
शान्तिप्रिय in भटकंती
28 Dec 2015 - 7:31 pm

करड्या रन्गाच्या जटा आणि सफेद दाढी सोडुन गुगलेमहाराज शन्ख वाजवित्त बसले होते. त्यान्च्या त्या भयानक डोळ्यांकडे पाहुन मी म्हणालो महाराज किती बकाल झाली आहे ही मुम्बई? जिकडे तिकडे टोलेजन्ग इमारती, अतिक्रमणे , रहदारीतील अमाप वाढ आणि घाण. ह्या मुम्बईत समुद्र सोडुन काही प्राचीन आहे का?

माझ्या या बोलण्याकडे पाहात गुगले बाबा भेसुर हासले आणि म्हणाले अजाण बालका,.......या मुम्बईत अशि एक टेकडी आहे जी कित्येक दशलक्ष वर्षान्पासुन उभी आहे. किती अतिक्रमणे , आणि काय काय पाहिले असेल या टेकडीने! गिल्बर्ट टेकडी! हा हा हा हा हा हा हा हा ! एकदा जाउन पाहाच. पण ही टेकडी पाहायला जाताना तुला खुप संयम ठेवला पाहिजे. म्हणजे समजेल. एवढे बोलुन ते आपल्या कुटीत विश्रान्तीला गेले........(काल्पनिक )

बरेच दिवस जालावर (गुगले महाराज) वाचलेल्या गिल्बर्ट टेकडी या ठिकाणी जायचे ठरवून ठेवले होते. अखेर २४ डिसेम्बर ला हा योग आलाच.

अंधेरी पश्चिमेला वीर देसाई रस्त्याला जाताना भुवन्स महाविद्यालयाजवळ ही अतिप्राचीन टेकडी आहे. सुमारे ६६ दशलक्ष वर्षापूर्वी ज्वालामुखीतून निर्माण झालेली
ही बेसाल्ट दगडापासून तयान झालेली ही टेकडी केवळ प्रेक्षणीय आहे. टेकडीवरून मुंबईचे विहंगम दृश्य दिसते. शिवाय घार , गरुड हे पक्षी जवळून पाहायचे असल्यास
यासारखे ठिकाण नाही. हे पक्षी मी पाहिले पण प्रकाशचित्रे घेवू शकलो नाहि. अतिक्रमणापासून ही टेकडी वाचली आहे हे मुंबईकरांचे भाग्य!

टेकडीवर गावदेवीचे एक सुंदर मंदिर आहे. या मंदिरामुळेच ही टेकडी अतिक्रमणापासून वाचली आहे असे म्हणणे वावगे ठरू नये.

टेकडीला जाण्यासाठी अंधेरी पश्चिम वरून २५४ क्रमांकाची बेस्ट बस घावी आणि भुवन्स महाविद्यालयाजवळ उतरून चालत जावे. टेकडी ला जाताना अरुंद रस्ते ,नाला आणि घाणीचे साम्राज्य असल्यामुळे मनाची चिडचिड होते आणि कुणीतरी सूडबुद्धीने आपल्याला फसवण्यासाठी उगाचच हे ठिकाण सांगितले आहे असे वाटते. मी गेलो त्या दिवशी ईद ए मिलाद असल्यामुळे , या अरुंद रस्त्यांवर खूप गर्दी होतॆ. तरीही विचारत विचारत(गुगले बाबांच्या संयम ठेवण्याच्या सल्ल्याप्रमाणे) मी या ठिकाणी पोहोचलो आणि जेव्हा मी या ठिकाणी पोहोचलो तेव्हा अशा रस्त्यावरून केवळ पाचशे मीटर चालून आलेली शिण आणि चिडचिड कुठल्या कुठे पळाली. सुमारे दोनशे पायऱ्या (दहा मजले) एवढ्या उंचीवर ही टेकडी आहे. वर गेल्यावर मुंबईचे विहंगम किंवा वास्तव(?) दृश्य दिसते. टोलेजंग इमारतीत लुप्त झालेले हे ठिकाण पाहण्यासारखेच. हे एक पर्यटनस्थळ म्हणुन विकसित करण्याचा महाराष्ट्र सरकारचा प्रयत्न आहे. मी दुपारी गेलो होतो. सकाळी येथील वातावरण आणखीनच प्रसन्न असेल . (संयमी) रसिक मिपाकरांनी या ठिकाणास जरूर भेट द्यावी. काही प्रकाशचित्रे देत आहे. मंदिराचे आणि गावदेवीचेही प्रकाश चित्र आहे.

खालून दिसणारी टेकडी.

Gilbert

पायर्‍या सुरु

Gibert

Gilbert

Gilb

Gilb

Gilb

मन्दीर

Gilb

गाभारा

Gilb

स्वचित्र

Gilb

मुंबई चे हे रुप

Gilb

आणि हेही

Gilb

या प्रकाशचित्रात समुद्र (अन्धुक) दिसतो आहे.

Gilb

प्रतिक्रिया

मोहनराव's picture

28 Dec 2015 - 8:07 pm | मोहनराव

फटु दिसत नाहीत.

मदनबाण's picture

28 Dec 2015 - 8:09 pm | मदनबाण

फोटू ?

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Dhimmathirigae... ;) :- Srimanthudu

शान्तिप्रिय's picture

28 Dec 2015 - 8:16 pm | शान्तिप्रिय

परत डकवितो

चौकटराजा's picture

28 Dec 2015 - 8:48 pm | चौकटराजा

मला देखील या जागेला भेट द्यायची फार दिवसापासून इच्छा आहे कारण जगप्रसिद्ध जायंट्स कॉजवे नशीबात नसेल तर किमान गिल्बर्ट टेकडी तरी पहावयास हवी.येथे षट कोनी चितीचे आकाराचे खडक पहावयास मिळतात.

शान्तिप्रिय's picture

28 Dec 2015 - 9:18 pm | शान्तिप्रिय

चौकट राजा
तुम्ही दिलेली माहिती छान आहे. नाही.... मी खडक जवळून पाहिले नाहित.
फोटो परत डकवतोय.

G

G

G

G

G

G

G

G

G

G

G

G

G

G

शान्तिप्रिय's picture

29 Dec 2015 - 12:21 pm | शान्तिप्रिय

फोटो दिसतात काय?
जाणून घेण्यास उत्सुक आहे.

धोणी's picture

29 Dec 2015 - 12:25 pm | धोणी

मजा नाय

तुषार काळभोर's picture

29 Dec 2015 - 12:36 pm | तुषार काळभोर

लेखातले नाय

शान्तिप्रिय's picture

29 Dec 2015 - 12:41 pm | शान्तिप्रिय

धन्यवाद . प्रतिसादात लेखातीलच फोटो योग्य रितीने पिकासावरुन डकवले आहेत.

राही's picture

29 Dec 2015 - 5:00 pm | राही

गिल्बर्ट टेकडीतला कॉलम्नर बसॉल्ट हा पाषाण आताशी नीटसा पाहायला मिळत नाही. ते उभे कॉलम पाहाण्यासाठी एका विवक्षित बाजूने पाहावे लागते. तिथे आता टेकडीला खेटून इमारती झाल्या आहेत. वरती गावदेवीचे देऊळ असल्यामुळे टेकडीचा इवलासा भाग तरी सुरक्षित राहिला. नाही तर भूशास्त्राचे कुणाला काही पडले नव्हते. आता मात्र उरलेला भाग संरक्षित आहे. स्तम्भीय बसॉल्ट सह्याद्रीमध्ये काही ठिकाणी पाहायला मिळतो. बसॉल्ट्चे सहज दिसणारे सुंदर चौरस कॉलम मराठवाड्यातल्या नळदुर्ग किल्ल्याबाहेर (मागल्या तटाबाहेर) पाहायला मिळतात. खरे तर हा पूर्ण किल्ला जवळच मुबलक असलेला बसॉल्ट खणून त्याच्या वापरातून बांधलेला आहे. नुसता किल्लासुद्धा अत्यंत भव्य आणि प्रेक्षणीय आहे.

पैसा's picture

29 Dec 2015 - 5:43 pm | पैसा

राही म्हणतात तसे स्तंभांचे आणि किल्ल्याचे फोटो बघायला आवडले असते.

शान्तिप्रिय's picture

29 Dec 2015 - 8:21 pm | शान्तिप्रिय

धन्यवाद राही. सुन्दर माहिती
मुंबई आपलीच आहे.
परत गेल्यावर जवळुन टेकडी पाहिन व फोटो घेइन.
नळदुर्ग मी पाहिला आहे. सुन्दर आणि भव्य किल्ला आहे.

शान्तिप्रिय's picture

29 Dec 2015 - 8:33 pm | शान्तिप्रिय

हा टेकडीचा फोटो

gilb

शान्तिप्रिय's picture

29 Dec 2015 - 8:37 pm | शान्तिप्रिय

आणि हा सुध्धा.

GIlb

बोका-ए-आझम's picture

30 Dec 2015 - 10:09 am | बोका-ए-आझम

धन्यवाद शांतिप्रिय!

शान्तिप्रिय's picture

30 Dec 2015 - 12:09 pm | शान्तिप्रिय

धन्यवाद पैसा.
सर्वांच्या प्रतिसादबद्दल धन्यवाद.
आता मी नीट फोटो डकवायला शिकलोय.

यापुढील लेखनात व्यवस्थित डकवेन.

मुक्त विहारि's picture

31 Dec 2015 - 12:14 pm | मुक्त विहारि

तसा २५४चा आणि आमचा संबंध फारच जुना.

पण अद्याप तरी ह्या बसचा असा उपयोग करून घेतला न्हवता.

आता वेळ काढून एकदा जायलाच हवे.