एक कविता मनाची.......

मयुरMK's picture
मयुरMK in जे न देखे रवी...
22 Nov 2015 - 10:40 am

एक कविता मनाची
एक कविता जनाची
मना वाटते, राजा मी व्हावे
जन म्हणती, तू रंकचि रहावे-

एक कविता स्वप्नाची
एक कविता सत्याची
स्वप्न म्हणे, गगनात विहरावे
सत्य म्हणे, कदर्मी तू कुजावे -

एक कविता नात्याची
एक कविता जातीची
नाते म्हणे, आमचाच हां स्वकीय
जात म्हणे, कोण हां परकीय-

एक कविता प्रश्नाची
एक कविता क्षणाची
प्रश्न म्हणे,मी कधी संपणार नाही
क्षण म्हणे, मी कधी थांबणार नाही-

ही कविता जीवनाची
ही कविता मरणाची
जीवन म्हणे, ना मी कुणाची मालमत्ता
मरण म्हणे, इथे तर आहे माझीच सत्ता -

कविता माझीमुक्तक

प्रतिक्रिया

रातराणी's picture

22 Nov 2015 - 10:42 am | रातराणी

छान! आवडली!

मयुरMK's picture

22 Nov 2015 - 10:43 am | मयुरMK

याचा लेखक मी नसून माझे बाबा आहेत त्यांच्याकडून धन्यवाद आपल्याला.

चांदणे संदीप's picture

23 Nov 2015 - 3:45 pm | चांदणे संदीप

कविता आवडल्याची पोच द्या हो मयुरMK वडीलांना तुमच्या!

अवांतर: मयुरMK हे क्रीश्णनअय्यरMA याच्या अगदी जवळ जाणारे वाटते! ;-)

धन्यवाद!
Sandy

मयुरMK's picture

23 Nov 2015 - 5:01 pm | मयुरMK

हो नक्की सांगेन
सैंडी. तो माझ्या नावाचा शोर्ट फॉर्म आहे मयूर मोहन कदम

नीलमोहर's picture

23 Nov 2015 - 5:06 pm | नीलमोहर

छान लिहीली आहे कविता तुमच्या वडीलांनी.

मयुरMK's picture

23 Nov 2015 - 5:07 pm | मयुरMK

धन्यवाद नीलमोहर.

माहीराज's picture

24 Nov 2015 - 1:18 pm | माहीराज

छान कविता ...उत्तम मांडणी. ..पण आशय समजला नाही. .

पद्मावति's picture

24 Nov 2015 - 2:17 pm | पद्मावति

फारच सुरेख.
सहज सोपे शब्द आणि मनाला भिडणारा आशय. खरंच छान आहे.

मयुरMK's picture

24 Nov 2015 - 5:52 pm | मयुरMK

धन्यवाद

शिव कन्या's picture

24 Nov 2015 - 8:56 pm | शिव कन्या

आशय गर्भ. तीर्थरुपांना नमस्कार.
बाकी ही पितृसेवा दाद देण्याजोगी.