सुमारे दोन वर्षापूर्वी ख्रिस्तोफर नोलान कृत "Inception" पाहिला होता. पाहून झाल्यावर अनेक दिवस मनात घोळत राहिला . त्यातच पूर्वी भारतीय अध्यात्मावर काही पुस्तके वाचले होती . आणि अलीकडेच युट्यूब वर Spirit Science ची व्हिडिओ सिरीज पाहिली . आणि मग विचारमंथनातून काही ठोस मुद्दे हाती लागले ते असे -
१ . "परलोक" अथवा spirit world हे प्रत्यक्षात अस्तीत्वात असावे .
२. मनुष्याच्या सुप्त मन /अंतर्मना च्या सात पातळ्या असून त्यांनाच भारतीय अध्यात्मात सप्तलोक अथवा सप्तस्वर्ग म्हणत असावेत .
३. मनुष्याच्या सुप्त मन /अंतर्मना च्या पातळीवर ज्या घडामोडी होतात ,त्यावर प्रत्यक्षात भौतिक जगात मनुष्याचे जीवन प्रभावित होत असते.
४. सिनेमामध्ये ज्याप्रमाणे एकावर एक Dream-Levels दाखवल्या आहेत ,त्याचप्रमाणे या अंतर्मनाच्या / सप्तलोकांच्या जाणिवेच्या लेवल्स असाव्यात .
५. सिनेमात अनेक ठिकाणी मनुष्याच्या Self-Defense चा उल्लेख येतो. हा Psychic-Self -Defense मनुष्याची तीव्र इच्छाशक्ती व त्याने केलेली "पुण्य"कर्मे यावर आधारित /संबंधित असावा . म्हणजे असे की पुण्य/सत्कर्मांमुळे व्यक्तीची इच्छाशक्ती स्ट्रॉंग होते व अशा व्यक्ती भौतिक अथवा आध्यात्मिक दृष्ट्या सहजासहजी संकटांना बळी पडत नाहीत .
६. सिनेमात जरी अंतर्मनाच्या सुप्त पातळीपर्यन्त पोहोचण्यासाठी Drugs चा वापर केलेला असला तरी ध्यान /समाधी इत्यादी मार्गानी अंतर्मनाच्या सुप्त पातळीला पोहोचता येवू शकते व बिघडलेल्या गोष्टी ठीक करू शकतो . किंबहुना भौतिक जगातील अनेक समस्यांचे अथवा स्वभावदोषांचे मूळ अंतर्मनातच असल्याने त्यावर उपाय करणे शक्य होते .
७. In other words, We are co-creators of our Reality and Destiny. भारतीय अध्यात्म -तत्त्वज्ञानातील अनेक मूल्ये आणि कर्मसिद्धांत यांना सिद्ध करणारा हा चित्रपट आहे असे माझे मत बनले .
आपणास काय वाटते ?
प्रतिक्रिया
5 Nov 2015 - 10:52 am | एस
निरर्थक आणि हास्यास्पद वाटते.
5 Nov 2015 - 10:56 am | उडन खटोला
का बुवा?
तुम्ही "फे"क्युलर "फु"रोगामी तर नाही ना?
5 Nov 2015 - 2:23 pm | एस
आम्ही त्यांचेही बाप आहोत. असल्या खुळचट कल्पनांना 'भंड धूर्त निशाचरः' म्हणून निकालात काढणारे लोकायतिक चार्वाक. काय समजलेंत?
5 Nov 2015 - 3:30 pm | मोगा
त्रयो वेदस्य कर्तारो धूर्त भंड निशाचरः
5 Nov 2015 - 4:57 pm | आदूबाळ
धूर्त आणि भंड समजू शकतो, पण निशाचर असण्यात काय वाईट आहे?
6 Nov 2015 - 12:43 pm | काळा पहाड
म्हमद्या नव्हता ना निशाचर म्हणून मग यांना पण निशाचर वर्ज्य.
7 Nov 2015 - 1:05 am | एस
येथे निशाचर शब्दाचा अर्थ चोरलफंगे, दरवडेखोर, लुटारू इत्यादी प्रामुख्याने रात्रीच्या अंधारात आपला वाईट कार्यभाग उरकणारे, समाजाला फसवणारे, लुबाडणारे, अशा धिक्कार करण्याजोग्या प्रवृत्ती असा लाक्षणिक अर्थ चार्वाकांना अपेक्षित आहे. त्या काळात अशा समाजकंटकांचे एका शब्दात वर्णन निशाचर असे केले जात असावे.
आजकाल कृष्णकृत्ये दिवसाढवळ्या राजरोसपणे करण्याइतपत अशा लोकांची मजल जाते ही बाब अलाहिदा! :-)
5 Nov 2015 - 10:56 am | टवाळ कार्टा
=))
5 Nov 2015 - 12:35 pm | संजय पाटिल
" आणि मग विचारमंथनातून काही ठोस मुद्दे हाती लागले ते असे- "
:):)
5 Nov 2015 - 1:42 pm | रिम झिम
भारतीय अध्यात्म -तत्त्वज्ञानातील अनेक मूल्ये आणि कर्मसिद्धांत यांना सिद्ध करणारा हा चित्रपट आहे असे माझे मत बनले
आपल्या ईथे चित्रपटांवरुन भारतीय अध्यात्म कसे सिद्ध होईल? चित्रपट म्हणजे सत्य नव्हे!
5 Nov 2015 - 1:52 pm | याॅर्कर
.
.
सहमत.
याबाबत माहिती मिळवत आहे.
.
.
.
.
.
.
.
(समाधी घेण्यास उत्सुक असणारा-याॅर्कर)
5 Nov 2015 - 2:21 pm | भाऊंचे भाऊ
इट्स जस अ मेटाफोर. टेक्नीकली अ ड्रीम विदीन ड्रीम ड्स नॉट गारंटी गोइंग डीप इन्साइड माइंड... इट मे हॅपन ऑर मे नॉट.
5 Nov 2015 - 5:21 pm | चित्रगुप्त
म्हणजे मराठीत काय ? उलगडा करावा.
5 Nov 2015 - 5:48 pm | भाऊंचे भाऊ
स्वप्नामधे (मधील) स्वप्न आपल्याला मनाच्या गाभार्यात खोलवर पोचवते ही चित्रपटामधे वापरलेली संकल्पना अंतर्मनाच्या सुप्त पातळीपर्यन्त पोचायचा निश्चीत मार्ग अजिबात नाही.
म्हणून चित्रपटात दाखवलेल्या अंतर्मनात जायच्या (जी काही असेल त्या )प्रक्रीयेचे प्रतिकात्मक उदाहरण इतकेच महत्व द्यावे. कारण स्वप्नात स्वप्न पाहणे ही क्रीया मनाला अपेक्षीत सुक्ष्म पातळीवर न्हेत नाही.
5 Nov 2015 - 2:48 pm | संदीप डांगे
चित्रपट फारच मनाला लावून घेतलाय भाउंनी... :-)
5 Nov 2015 - 4:38 pm | म्हसोबा
खुप छान संगती लावली आहे.
मात्र आजच्या काळात आपल्या स्वतःच्याच संस्कृतीला हिनवण्याला महत्व आले आहे. त्यामुळे तुमच्या लेखाची टींगळ-टवाळी होईल यात शंकाच नाही.
6 Nov 2015 - 11:28 am | परिकथेतील राजकुमार
आपल्याकडे जुन्याकाळापासून ऋषी मुनी भांग, गांजा, मदिरा ह्यांचा वापर करतातच.
6 Nov 2015 - 12:19 pm | भाऊंचे भाऊ
काहीही हं उ...! सिनेमात फक्त पुरेसे झोपी जायला ड्रगचा वापर केलेला दाखवला आहे. अंतर्मनात शिरायला मशीनच्या सहाय्याने हवेते स्वप्न झोपी जाणार्या व्यक्तीत प्रक्षेपीत केल्या जात असे.
6 Nov 2015 - 1:44 pm | नितीनचंद्र
स्वप्नामधे (मधील) स्वप्न आपल्याला मनाच्या गाभार्यात खोलवर पोचवते ही चित्रपटामधे वापरलेली संकल्पना अंतर्मनाच्या सुप्त पातळीपर्यन्त पोचायचा निश्चीत मार्ग अजिबात नाही.
मनाच्या सुप्त पातळी पर्यंत जाण्याचा अजुन एक मार्ग ध्यान आहे. स्वप्नात काय किंवा ध्यानात काय आपले शरीर रिलॅक्स असते. रक्तदाब न्युनतम पातळीत ( असु शकतो ) असतो. आपला मेंदु येणारे आवाज किंवा विचार स्विकारत असतो परंतु त्याच फारस विश्लेषण करत नाही.
मनालाही अश्यावेळी सुप्त पातळीत जाता येते. योगसुत्र ग्रंथात याचा उल्लेख आहे की अश्या अवस्थेत ( प्रखर अभ्यासाने लाभलेल्या ) मागील जन्माचे ज्ञान होते.