सोशल मिडीया आणि नोकरी

नितीनचंद्र's picture
नितीनचंद्र in तंत्रजगत
4 Nov 2015 - 3:05 pm

जानेवारी २०१५ मध्ये जेव्हा I-HRD या संस्थेने एक दिवसाचा रिक्रुटमेंट युजींग सोशल मिडीया असा एक दिवसाचा वर्कशॉप घेशील का म्हणुन मला विचारले तेव्हा या विषयाची खोली इतकी आहे मला ही माहित नव्हते. जस जसा वर्कशॉप चा दिवस जवळ येतोय तस तसे माहितीच्या जंजाळातुन काय घेऊ आणि काय नको घेऊ असे झाले आहे.

२००८ मध्ये मी जेव्हा एका कंपनीमध्ये एच आर मॅनेजर म्हणुन काम पाहु लागलो तेव्हा नुकतीच मंदीची लाट सुरु झाली. या लाटेत तोटा होऊ नये म्हणुन कंपन्यांनी रिक्रुटमेंट कन्सलटंट नकोत म्हणुन सांगीतले. यावर भर की काय म्हणुन नोकरी डॉट कॉम व मोनस्टर ह्या जॉब पोर्टलचे वार्षीक सबस्क्रिपशन सुध्दा गोठवले.

जरी भरती १/४ झाली तरी नोकरीची जाहिरात कुठे द्यायची ? योग्य उमेदवार कुठे आणि कसे शोधायचे हा प्रश्न माझ्या पुढे उभा राहिला. यातुनच सुरवातीला शोध लागला तो पैसे न घेता इंटरनेटवर जाहिराती देता येणार्‍या वेब साईटस चा. याच्या पुढे जाऊन कोणाशीही चर्चा/ सल्ला न घेता मी फेसबुक, लिक्डईन आणि ट्वीटर या सोशलमिडीयाचा रिक्रुटमेंट साठी वापर सुरु केला आणि मर्यादीत यश ही मिळवले.

हे सगळे करताना सोशल मिडीयाचा रिक्रुटमेंट साठी वापर ही नोकर्‍यांच्या जगात मोठी क्रांती घडत आहे या बाबत २०१४ साला पर्यंत मी अनभिज्ञ होतो. माझा स्वतःचा सोधल प्रोफाईल मी लिंकडीनवर अपडेत करत राहिलो. नविन सोशल कॉन्टक्ट जोडत राहिलो आणि त्याचा विवीध गोष्टींसाठी वापर करत राहिलो. पण सोशल मिडीया रिक्रुटमेंट साठी कसा वापरतात यावर कोणी वर्कशॉप घ्यायला बोलावेल असा विचार सुध्दा आला नव्हता.

मायबोलीचा शोधही मला याच मुळे लागला. करायला गेलो एक आणि कथा, लेख तसेच कविता करायला लागलो हे फळ अजिबात अपेक्षीत नव्हते. नविन मित्र जोडले गेले हा भाग आणखी महत्वाचा.

आज भारत सोडला तर विकसीत देशात रिक्रुटमेंट आणि सोशल मिडीया म्हणजे लिक्डीन, फेसबुक, ट्वीटर , ब्लॉग्ज आणि युट्युबवरचा व्हिडीओ- सी व्ही शिवाय याच एक अतुट नात तयार झाल आहे. आय टी कंपन्यात तर सोशल मिडीया आणि रिक्रुटमेंट हा अविभाज्य घटक झाला आहे.

आनंदाची बाब या विषयात शोध घेताना सापडली ती म्हणजे सारंग ब्रह्मे हा मराठी युवक आपल्या प्रयत्नातुन कॅपजेमिनी या कंपनीत आपल स्थान निर्माण करण्यात यशस्वी झालेला आहे.

सारंग ब्रह्मे सध्या कॅपजेमिनी या आय टी कंपनीत ग्लोबल हेड सोशल रिक्रुटींग या पदावर काम करतोय. सोशल रिक्रुटींग हेड - इंडिया या पदावरुन ही बढती त्याने त्याच्या असामान्य कामाने मिळवली आहे.

यातला आश्चर्यकारक भाग असा की भारतात सोशल मिडीयाचा प्रभाव अजुन वाढतोय. विकसीत देशात मात्र लिकडीन वर प्रोफाईल नाही अस घडत नाही. अश्या वेळेला याचे महत्व समजुन सोशल रिक्रुटमेंट या क्षेत्रात आघाडी मिळवायची आणि सर्वात उच्च पदावर ताबा मिळवायचा तो ही एका मराठी युवकाने ?

प्रिंड मिडीया म्हणजे वर्तमानपत्रातल्या नोकरीच्या जाहिराती किंवा नोकरी डॉट कॉम सारखे जॉब पोर्टल्स उमेदवारांना कंपन्या विषयक फारशी माहिती पुरवत नाहीत. उमेदवारांना अगदी नोकरीचा अर्ज पाठविण्यापुर्वी कंपनी विषयक, कंपनीच्या कर्मचारी विषयक धोरणांबाबत, फॅसीलीटी बाबत, व्यवसायातल्या प्रगती बाबत सातत्याने महिती हवी असते. ही पुरविण्यासाठी जुन्या पध्दतीत खर्च जास्त असतो आणि पुन्हा त्याचे एक आयुष्य असते. सोशल मिडीयाचा वापर करुन संभाव्य उमेदवारांपर्यंत ही ताजी माहिती बिनखर्चात, तात्काळ पोचवण्याचा मार्ग म्हणजे सोशल मिडीया.

जसा ग्राहक एखादी वस्तु पडताळुन खरेदी करतो तसा संभाव्य उमेदवार सुध्दा कंपनीची माहिती घेतल्याशिवाय जॉब ऑफरच काय पण नोकरीसाठी आपली माहिती पुरवायला फारसा राजी नसतो. हे सत्य फक्त आय टी कंपनीच्या बाबतीत आहे असे नाही. तीन वर्षांपुर्वी एका आय टी आय मधे शिकाऊ उमेदावार भरती करायला गेलो असताना आय टी आय चे प्राचार्य मला म्हणाले की पुर्वी कंपन्या उमेदवारांच्या मुलाखती घ्यायच्या. आज फक्त आय टी आय शिक्षण झालेले संभाव्य उमेदवार कंपनीत काय स्टायपेंड आहे ? कॅन्टीन आणि बस फॅसीलीटी आहे का ? यासारखे प्रश्न विचारुन मगच निर्णय घेतात.

काळ बदलतो आहे तश्या पध्दती ही बदलत आहेत याचा अनुभव सर्वच क्षेत्रात येतो आहे. मग नोकरी शोधायला निघाल्यावर आपला प्रोफाईल सोशल मिडीयावर आहे का ? आपला व्हिडीओ सी वी यु ट्युब वर आहे का ? आपली सोशल माहिती फेस बुक वर आहे का? ह्या प्रश्नांना उत्तरे मिळाल्याशिवाय आपल्याला नोकरीच्या संधी हव्या तितक्या येणे अशक्य आहे. यातुन परदेशात नोकरी करायला निघाला असाल तर मग हे हवेच.

मायबोलीवर अनेकांनी जॉब पोर्टल्स च महत्व ( नोकरी डॉट कॉम किंवा टाईम्स जॉब इ त्यादी ) कमी झालेल नाही अश्या प्रतिक्रिया दिल्या. हे अगदी खर आहे. विकसीत देशात सुध्दा जॉब पोर्ट्ल्स अद्याप आपले महत्व टिकवुन आहेत.

सध्या अ‍ॅट्रीशन म्हणजे नोकरी बदलणार्‍यांची संख्या हा एच आर मॅनेजमेंट मध्ये कळीचा मुद्दा आहे. ज्या उमेदवारांना सारखे जॉब बदलावेसे वाटत नाही. जे आहे त्या नोकरीत स्थिर रहाण्याचा प्रयत्न करतात असे उमेदवार आपला सी व्ही जॉब पोर्टलवर अपडेट करत नाहीत. परीणामी त्याचे सी व्ही सापडतच नाहीत. यासाठी सोशल मिडीयावरचा त्याचा प्रोफाईल कामी येतो. म्ह्णुन अश्या ( पॅसीव्ह ) दिर्घ काळ टिकु पहाणार्‍या उमेदवारांची गरज एच आर मॅनेजर्स ना असते. ही गरज पुर्ण करण्यात सोशाल मिडीया साथ देतो. परिणामी अ‍ॅट्रीशन आटोक्यात रहाते असे रिसर्च सांगते.

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

4 Nov 2015 - 3:19 pm | मुक्त विहारि

एक शंका....

"आपला व्हिडीओ सी वी यु ट्युब वर आहे का?"

====>व्हिडीओ सी.वी. यु ट्युब वर कसा टाकायचा?

आणि एक उपशंका ====> काही लिंक असतील तर त्या देवू शकाल का?

वेल्लाभट's picture

4 Nov 2015 - 3:26 pm | वेल्लाभट

छान माहिती.
व्हिडियो सीव्ही प्रकार नव्याने ऐकला. रोचक संकल्पना!
सोशल मिडिया हे फ्यूचर आहे म्हणायचं तर...

प्रोफाइली अपडेट ठेवणे गरजेचें... कसें!?!

नोकरी डॉट कॉम किंवा अन्य जॉब पोर्टलवर अपडेटेड सी.व्ही. पटकन नजरेस पडतो. जर रिक्रुटमेंट डिपार्टमेंटने ठरावीक शिक्षण आणि अनुभव टाकुन संभाव्य उमेदवार शोधले की अपडेटेड सि.व्ही सर्वात वरती येतात. ज्यांनी १॑२ महिन्यांपेक्शा जास्त काळ सी. व्ही अपडेट केला नाही असे सी. व्ही पटकन दिसत नाहीत.