॥ जय जय्य एंड्रॉइड समर्थ ॥

Anonymous's picture
Anonymous in तंत्रजगत
3 Nov 2015 - 5:17 pm

॥ जय जय्य एंड्रॉइड समर्थ ॥

पहिला मोबाइल!
तो दिवस आठवाला की वाइट वाटतं,
खरं तर मला मुळीच घ्यायचा नव्हता...
आधीच नवीन जॉब त्यात मोबाइल मग परत महिन्याचा खर्च वेगळा,
पण अमृता म्हणाली, तू घेच मोबाइल!
मला हवा तेव्हा तुला कॉंटॅक्ट करता येईल.
तेव्हा तिच्या कड़े बीएसएनएल चा 'तरंग' नामक सेलफोन होता,
सेलफोन कसला...
काळी वीट होती ती! सिम नसलेला CDMA फोन!

असो... तशी तेव्हा फोनची दुकानं कमीच, त्यातल्यात्यात डेक्कनला होती ४-५.. सागर आर्केड मधे गेलो, संध्याकाळची वेळ, गर्दी अपेक्षेप्रमाणे, नोकियाचे फोन तर भाजी विकल्यासारखे खपायचे तेव्हा, माझं लक्ष्य गेलं मोटोरोलाच्या रंगीत स्क्रीन असलेल्या मोबाइलवर... मोबाइल जगातला (तेव्हाचा) पहिला वहिला रंगीत फोन, छान लहान क्रोम बटन्स आणि सिल्वर बॉडी, दिसता क्षणीच आवडला, किम्मत जास्त होतीच... ४-५हजार! २००३-४चा काळ असेल... सकाळ पेपर्स मध्ये होतो तेव्हा... माझा पहिला फूल टाइम जॉब! जेमतेम ९हजार पगार होता, काढलं पाकिट अन घेतला फोन, घाम फुटलेला... पण हातात घेतल्यावर मजाच वाटली! काय मस्त होता फोन... रिंगटोन सेट करा...नवीन बनवा. इनबिल्ट गेम्स खेळा...सेटिंग्स चेंज करा... ह्यातच मस्त वेळ जायचा! पण वर्षभरात कंटाळलो,

त्यानंतर मग नोकियाचा रेडियो वाला फोन, पहिल्या वहिल्या कलर स्क्रीन वरुन आता पहिला रेडियो वाला फोन, ग्रे शेड्स असलेला फोन होता... मॉडल नंबर नाही आठवत, किम्मत असेल ६हजार... तो वापरला वापरला... रेडियोचं कौतुक काय, मग पहिला एमपी3 प्लेयर असलेला फोन ३३००... आडवा फोन, किम्मत ऐकून मी ही आडवा झलेलोच! पण हौसेला मोल नसते हे लक्षात ठेऊन घेतला...त्यात गाणी ऐकण्याचे प्रचंड वेड.. दिसायला जरा विचित्र होता... आडवा म्हणजे ज़रा नवीनच, डाव्या बाजूला अर्धा कीपैड आणि उजव्या बाजूला उरलेला.. त्याच मॉडल वरून मग Nगेज नावाचा कम्पास बॉक्स काढलेला नोकियानी... वीडियो गेम्स दिवाण्यांसाठी!

असो...ह्या फोन नी खुप साथ दिली, आधी 128mb मग 256mb मग 512mb कार्ड पर्यन्त मजल मारली, आणि त्यात एक विशेष योजना अशी दिलेली की तुम्ही तुमच्या कैस्सेट प्लेयर वरून आउटपुट केबलने मोबाइल वर रेकॉर्ड करू शकता!!! एका स्पेशल वायर नी... हे कळाल्यावर तर मी उडालोच! तेव्हा एमपी3 डौनलोडिंग आणि नेट यांचा भोज्ज़ा होताच, बाबांना आवडणारी जगजीत-चित्राच्या ग़ज़ल्स... आणि मी विकत घेतलेल्या काही लौंज-वर्ल्ड जॉनर कैसेट्स... सगळ्या डिजिटल्ली रिकॉर्ड केल्या ह्या मोबाइल वरुन... चायला दमड़ी न दमड़ी वसूल केली!!! मग त्याचं कव्हर बदललं... कीपैड बोम्बलला.. ते बदलून झालं, बैटरी बदलली, पण फोन चालू होता, अजुन ही आहे, हो हो... हा फोन अजुनही आहे... एंटीक पीस! मारला की मरणार क्याटेगिरी... टिपिकल नोकिया!

मग सोनी-एरिक्सन! वाकमन W530I विथ 1.5mp कैमरा... मस्त मैट फिनिश ऑरेन्ज! ट्वीस्ट मारून ओपन होणारा! काय जब्राट! फूल हवा!!! त्यात इन-ईयर बड्स असलेला पहिला फोन... असे सगळे 'पहिले' असलेले मोबाइल अगदी पहिल्या मोबाइल पासून! ह्या मोबाइल मुळे माझ्या दर दिवस/दर आठवडाची फ़ोटो फ़ोल्डर्सना सुरुवात झाली, अजुन ही आहेत ती फ़ोल्डर्स... ह्या मोबाइल नंतर सर्व मोबाइल्स मध्ये कैमरे आहेत... त्यामुळे सर्वांची त्यांच्या त्यांच्या नावाची फ़ोल्डर्स.

दुबइत आलो आणि ह्या फोनला प्रॉब्लम आला... स्क्रीनच खल्लास झाला! मग तातडीने दुबैतला पहिल्याच पगारात सोनी इरीक्सनचाच W850I घेतला... हां स्लाइड वाला होता... सेम फीचर्स पण विथ एक्सटर्नल मीडिया कार्ड! त्याचाही नंतर स्क्रीनचा प्रोब्लेम, मग मात्र मी सोनी-एरिक्सनला राम राम ठोकला!

आय-फोन 2 होता तेव्हा बाजारात, सगळे आय-फोन 3 ची वाट पहात होते! काउंटडाउन काय चालू एप्पल च्या साइट वर, भलतीच उत्सुकता, त्यात ओफ्फिस मधल्या बड्या लोकांनी बुक काय केलेले.. हे सगळ मला नवीनच! मग मी ही घेतला! काय सुंदर मॉडल हो, टच स्क्रीन आणि एकच बटण वगैरे, पण महाग तर इतका होता विचारुच् नाका... त्यात तो अनलॉक करा... मग नवीन अपडेट आलं की न विचार करता परत लॉक होइ, की परत अनलॉक साठी पैसे घालवा,मग पैसे जाउ नयेत म्हणून स्वतः शीकलो.. मग परत स्क्रीन प्रॉब्लम, काही पीक्सेल्सच गायब! नवीन स्क्रीन टाकला, त्यात पैसे घलावले, अजुन एक महा चीड़चीड़ म्हणजे ब्लूटूथ हे फ़क्त मीडिया कनेक्ट करीता.. गाणी आणि इतर काही ट्रान्सफर व्हायचे नाही! ड्रैग एंड ड्रॉप हा साधा प्रकारही नाही! जाम वैताग्लो, आणि आलो सैमसंगवर! माझा पहीला वहीला एंड्राइड फ़ोन!

खरं सांगायचं तर मला एंड्राइड वगैरे हां प्रकार काही माहीत नव्हता... केवळ आय-फोन नको या भवनेनी मी सैमसंग गैलेक्सी S उचलला, अप्रतिम कैमेरा! सुन्दर कलर्स, त्यात फ्रंट कैमेरा पण! मग तो स्लो झाला, सैमसंगनी चांगली छाप सोडलेली म्हणून S2 घेतला! आजही नव्या स्मार्टफ़ोन्स ना लाजवेल इतका छान सदपातळ आणि मस्त मॉडेल... झगमग असं काही नाही! पडला हेयर क्रैक गेली तरी वापरला..., अजुनही आहे, पण बैट्री नखरे दाखवायला लागली मग मी नवीन मोबाइलच्या शोधात रामलो.

आता वेळ होती प्यूअर एंड्रॉइडची! मित्राकड्च्या सैमसंग गूगल नेक्सस3 ची किर्ती ऐकलेली! प्यूअर गूगल स्टॉक एंड्रॉइड हा प्रकार भयंकर स्मूद असतो, ह्याची चव चाखायची ठरवलं! त्यात व्हर्जन्सची नावंही चवदार! होनीकोम्ब काय आइसक्रीम सैंडविच काय जिंजर काय किटकैट काय! गम्मतच...शेवटी एलजी चा गूगल नेक्सस4 घेतला... तेही डबल किम्मत मोजून! मस्त फ्रंट बैक गोरिला ग्लास... चकाचक ब्लैक, अर्थातच ५-६मगिन्यानी त्याची किम्मत नॉर्मलला आली पण मी कसला थांबतोय!
असो... नो रिग्रेट्स... पहा ना... आत्ताही ह्याच फोन वरना ही अक्षरं टाईपतोय. पैसा वसूल हो!

मग त्यात नवीन अपडेट्स, किटकैट झालं...
आता लोलीपॉप! काय काय नावं...बेस्ट प्रकार आहे हा एंड्रॉइड. त्यातच मध्ये ज़रा खाज म्हणून एक्सट्रा फोन घेतला हुवावीचा 6इंची मेट1... मस्त 2gb रैम... 8gb इनबिल्ट आणि 64gb एक्सटर्नल... कचकचीत स्क्रीन दणदणीत 4050mah बैटरी जी अरामात २दिवस चालते आणि महत्वाचं घ्यायचं कारण म्हणजे डॉल्बी इनबिल्ट... पहिला फोन ज्याला डॉल्बी आउटपुट! आणि मग काय .flac आणि .wav सारख्या लॉसलेस म्युझिक फाइल्सना एकणं म्हणजे परमानंदच!

सध्या हा गूगल नेक्सस4 आणि हुवावी मेट1 अपुनपे राज कर्रेले है! बघू किती दीवस/महीने हे टिकतील!

बाकी एलजी जी4 झालच तर वन+2 सारख्या दर्जेदार स्मार्टफोन्सचा मोह होतोय रोज पण,

मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक असं कुज्बुजत दीवस काढतोय!

फोन वरूनी स्मार्ट फोन आता,
सहज मारूनी बटणी बाता,
वायफाय प्रिय असे लांब ठेऊन डाटा,
लिहोतो रोज नवीन अक्षरवाटा,
छायाचित्र असो की चलचित्र अदा,
साथ असते आठवणींची सदा,
चुकून आयफोन वर घसलरो अलाहदा,
आता मात्र ह्या एंड्रॉइड वर फीदा!!
साथ देओ हा सदा.. सर्वदा!!!

॥ जय जय्य एंड्रॉइड समर्थ ॥

#सशुश्रीके

प्रतिक्रिया

काकासाहेब केंजळे's picture

3 Nov 2015 - 5:51 pm | काकासाहेब केंजळे

माझा सध्या लेनोवो a6000 चालू आहे,याला लॉलीपॉप अपडेत आले आहे, पण आमच्या गावात अजुनही कुठेच वायफाय नसल्याने अपडेट करत नाहीए,मला एक प्रश्न विचारायचा होता.
थ्रीजी नेटवर्कवरुन लॉलिपॉप अपडेट होइल काय ,मध्येच नेटवर्क गेले तत? 1089 mb चं अपडेट आहे. १.५ जीबीचा थ्रीजी पॅकमध्ये हूईल का अपडेट?

उगा काहितरीच's picture

3 Nov 2015 - 6:15 pm | उगा काहितरीच

मस्त ! माझा मोबाईल प्रवास चालू झाला नोकिया ११०८ पासून ... सध्या मोटो ई, सॅमसंग गॅलॅक्सी जे पर्यंत आला आहे. ११०८ नंतर नोकिया ६०३० नंतर नोकिया ५२००, ५२२० नंतर स्थिरावलो ते नोकिया ई ५ वर . माझा अतिशय आवडता मोबाईल ! ज्याने ई ५ वापरला तोच त्याची महती जाणु शकतो.

टवाळ कार्टा's picture

3 Nov 2015 - 6:26 pm | टवाळ कार्टा

3310

७० ते ८० मध्ये जलमलेल्याची अन् नेटाने नेट वापरणार्यांची जवळपास कॉमन स्टोरी.

नोकिआ 2700 क्लासिकवर अजूनही लेख टंकतो ( टंकू शकतो )X2-00 ही पूर्ण चालू.सॅमसंगवर विश्वास नाही म्हणून नाही घेतला.E 5 घेताघेता थांबलो कारण नोकिआ विकणार ही बातमी आली.