कडकणी

दिवाकर कुलकर्णी's picture
दिवाकर कुलकर्णी in जनातलं, मनातलं
30 Oct 2015 - 7:52 pm

(कडकणी -मैद्याची एकदम पातळ थोडीशी गोडसर पुरी,कोल्हापूर साइडला
नवरात्रात करतात)
----------कडकणी----------
लहाणपणी दसर्‍याला सोनं द्यायला आमची मित्रांची टोळी एकमेकांच्या घरी जायचो, तेव्हां हमखास कडकणी जिकडं तिकडं मिळायची. लहाणपण सरलं ,कोल्हापूरहि सुटलं आणि कडकणी आयुष्यातून पसार झाली.
किती वर्षानि ,पुन्हा कोल्हापूरात दसर्‍याला येणं झालंय ,वडलार्जित प्रॉपर्टी संबधी कांही काम निघाल्यामुळं, थोरल्या बंधुनी बोलावून घेतल्यामुळं यावलं लागलं होतं. एक मावशी आमच्या कडं अनेक वर्ष ,मी कोल्हापूरात ,आम्ही एकत्रात राहात असू तेव्हां पासून काम करताहेत.कांहीं पडेल ते काम.
दसर्‍या दिवशी नेहमी प्रमाणं,त्या कामावर आल्या,इकडंच तिकडचं बोलणं झाल्या वर मी त्याना गंमतीनं म्हणालो , मावशी या वर्षी कडाकण्या नाहीत काय.
या वर्षी घरातली तीन माणसं गेली साहेब त्यामुळं नाही केल्या त्या म्हणाल्या . वाईट झालं मी म्हणालो,आणि नाही हो कडाकण्याचं सहज बोललो ,मी म्हणालो.
मावशींचे एक दीर , जाऊ आणि नणंद तिघं जण दोन महिन्याच्या अंतरात गेले , बंधू मला रात्री जेवताना म्हणाले. आणि तो विषय तिथंच संपला.
रात्रीच आवरा आवरी करुन झोपायला हवं होतं ,सकाळी लवकर निघायचं होतं. सकाळी इकडं तिकडं चहापाणी आवरुन निघण्याचीवेळ झाली ,तेव्हाड्यात मावशी आलेल्या दिसल्या .आज एव्हड्या लवकर कसंकाय हो,वैनी त्याना विचारात होत्या,.
"नाही धाकटे साहेब आज जायचे आहेत नं,आणि त्यानी काल कडाकण्याचं बोलले नं, रात्री १२,नंतर केल्या तर शामा भटजी चाललं म्हणाले मग तश्या केल्या .किती वर्ष झाली ,कडाकण्या बघून म्हणाले,मला पण जीवाला लागलं कडाकण्याची काय बाब ती ,खांवून देत सारी पोरं सोरं, मोठ्या शहरात याची काय आप्रुबाइ.पण साहेबानी कडाकण्याची आठवण ठेवली हाय का नाही,?
म्होरच्या सालाचं कुणी बघितल्यं, आणि साहेबांना सांगा चांगल्या तेलातल्या आहेत,म्हणून"
एव्हडं बोलल्या आणि पदर डोळ्याला लावला .
मी बाहेरून सगळं ऐकत होतो ,मला त्याना सामोरं जाणंहि जीवावर आलं होतं ,माझा कंठ भरून आला होता,कोणत्यहि क्षणी मला रडू कोसळू शकलं असतं.
दादानी बाहेर आणलेली ती पिशवी मी छातीला घट्ट कवटाळून धरली ,एक हजाराची नोट त्याला दिली ,मावशींच्या नातवंडासाठी त्याना दे म्हणालो.आणि मागं न वळून बघताहि,गाडीत बसलो.,
सुदाम्याचे पोहे , शबरीचि बोरं या पेक्षा वेगळी असू शकतात काय?

कथा

प्रतिक्रिया

रेवती's picture

30 Oct 2015 - 8:02 pm | रेवती

हम्म............

कंजूस's picture

31 Oct 2015 - 6:32 am | कंजूस

खरंय.

अजया's picture

31 Oct 2015 - 8:52 am | अजया

अगदी खरं..

चतुरंग's picture

31 Oct 2015 - 9:12 am | चतुरंग

तुम्ही फक्त विषय काढताच त्यांनी एवढ्या आपुलकीनं केल्या. पैशापेक्षा आपलेपणाची जास्त गरज असते, तुम्ही त्यांना भेटून निघायला हवं होतंत असं मात्र वाटून गेलं....:(

शिव कन्या's picture

31 Oct 2015 - 9:46 am | शिव कन्या

हेच मला पण वाटले.
हरकत नाही. पुढच्या वेळी.
बाकी मनाला भिडली गोष्ट.

प्रभाकर पेठकर's picture

31 Oct 2015 - 10:58 am | प्रभाकर पेठकर

नुसतं वाचूनही डोळ्यात पाणी आलं. तुम्ही त्यांना भेटू शकला नाहीत ते मी समजू शकतो. अशा वेळी दोन व्यक्ती समोरासमोर आल्या की दोघांनाही भावनांना आवर घालणं अशक्य होतं. तो प्रसंग टाळण्यासाठी न भेटणंच योग्य होतं आणि तशाही त्या न थांबता निघून गेल्या होत्या. असो.

सर्वसाक्षी's picture

31 Oct 2015 - 11:19 am | सर्वसाक्षी

खरं आहे

प्यारे१'s picture

31 Oct 2015 - 3:45 pm | प्यारे१

+११११

असेच वाटले. पैसेही त्या बाईंनी घेतले नसते बहुतेक.
(सांगली, कोल्हापुरकडची माणसं वेगळीच स्वाभिमानी वगैरे असतात. खिशाला तोशिस लावतील स्वतःच्या पण जिद्दीनं एखादी गोष्ट पूर्ण करतील)

पद्मावति's picture

31 Oct 2015 - 2:37 pm | पद्मावति

नुसतं वाचूनही डोळ्यात पाणी आलं.

..सहमत. सुन्दर लेख.

एक भावस्पर्शी सुंदर कथा.

असंका's picture

31 Oct 2015 - 5:42 pm | असंका

अप्रतिम... !!!

धन्यवाद!!

जव्हेरगंज's picture

31 Oct 2015 - 6:01 pm | जव्हेरगंज

मस्त!

हरीहर's picture

1 Nov 2015 - 12:04 am | हरीहर

मनाला भिडनारी कथा आवडली.