जाह्नवे! येशिल बाळंतून?

स्वामी संकेतानंद's picture
स्वामी संकेतानंद in दिवाळी अंक
26 Oct 2015 - 11:04 am

.
.
(प्रेरणा :- पाखरा! येशिल का परतून?)

जाह्नवे! येशिल बाळंतून?

महत्प्रयासाने, किती मास
झाले ते अठवून? जाह्नवे! ||१||

सेटवर मिसळलेल्या श्रीच्या
निःश्वासा वळखून? जाह्नवे! ||२||

टाळशील अजून किती दिवस
'काहीही हं' म्हणून? जाह्नवे! ||३||

थांब, मोजू दे एपिसोड हे
झाले किति पाहून! जाह्नवे! ||४||

टीव्ही उघडता मज दिसे ही
डोहाळ्याची खूण! जाह्नवे! ||५||

विसरशील तू, पण प्रेक्षकच
म्हणती तुला 'जपून!' जाह्नवे! ||६||

घे आताच कळा शेवटच्या
चार ज़रा सोसून! जाह्नवे! ||७||

-- स्वामी संकेतानंद --

('बाळंतून'सारखा मराठी शब्द नाही हे माहीत आहे, पण मालिकांमधला एकूणच कृत्रिमपणा अधोरेखित करायला हा शब्द निर्मिला आहे.)
.

प्रतिक्रिया

अत्रुप्त आत्मा's picture

10 Nov 2015 - 7:58 am | अत्रुप्त आत्मा

ह्हि ह्हि ह्हि! स्वामीज्जी झिंदाबाद... :D

बिपिन कार्यकर्ते's picture

10 Nov 2015 - 8:41 am | बिपिन कार्यकर्ते

जोरदार!

संदीप डांगे's picture

10 Nov 2015 - 9:09 am | संदीप डांगे

१ नंबर

प्रीत-मोहर's picture

10 Nov 2015 - 10:11 am | प्रीत-मोहर

Vah

टवाळ कार्टा's picture

10 Nov 2015 - 10:22 am | टवाळ कार्टा

खिक्क

विशाल कुलकर्णी's picture

10 Nov 2015 - 2:32 pm | विशाल कुलकर्णी

ख्याक....

आतिवास's picture

10 Nov 2015 - 2:53 pm | आतिवास

जमलीय
आता कदाचित एक एपिसोड या गाण्यात घालवतील.

सुहास झेले's picture

10 Nov 2015 - 3:03 pm | सुहास झेले

लैच डेली सोप बघायला लागलास स्वामी ... मस्तच :D ;)

सूड's picture

10 Nov 2015 - 3:41 pm | सूड

एक नंबर!!

हा हा हा! या कवितेचे शक्य तितक्या करूणार्त स्वरांत अभिगायन करून यूट्यूबवर टाका. भारीये! ;-)

बोका-ए-आझम's picture

10 Nov 2015 - 7:07 pm | बोका-ए-आझम

दिल्लीपर्यंत जान्हवीची खबर पोचली तर स्वामीजी!

मधुरा देशपांडे's picture

10 Nov 2015 - 9:07 pm | मधुरा देशपांडे

:)

मितान's picture

11 Nov 2015 - 7:20 am | मितान

:))

मित्रहो's picture

11 Nov 2015 - 10:10 am | मित्रहो

आतातरी जान्हवी बाळंतून येइल.

सतिश गावडे's picture

11 Nov 2015 - 10:43 am | सतिश गावडे

एक नंबर रे स्वाम्या.

तुमची कविता धाडली तर न जाणो तात्काळ बाळंतेल हो जान्हवी
म्हणजे तुमच्या कवितेच्या धक्क्याने
कधी कधी अस ऐकलय एक धक्काच पुरेसा असतो........
ते देण्याच काम तुमची कविता करेल
अन तमाम महाराष्ट्र तुम्हाला दुवा देइल.

पैसा's picture

11 Nov 2015 - 12:49 pm | पैसा

=)) तुला ही सीरियल बघायची वेळ का बरे आली?

नूतन सावंत's picture

12 Nov 2015 - 5:41 pm | नूतन सावंत

अरे बापरे,तुम्ही अशा मालिका पहाता? बाकी बाळंतून या शब्दाची भर मराठी भाषेत पडली हे छान झालं.

मुक्त विहारि's picture

12 Nov 2015 - 6:33 pm | मुक्त विहारि

(अज्ञानी बालक) मुवि

जव्हेरगंज's picture

12 Nov 2015 - 10:05 pm | जव्हेरगंज

भारी!!

श्रीरंग_जोशी's picture

13 Nov 2015 - 10:34 am | श्रीरंग_जोशी

लैच खतरा भाष्य केले आहे रे स्वाम्या. कुणीतरी या कवितेचा दुवा या मालिकेच्या निर्माता दिग्दर्शकांपर्यंत पोचवण्याची कृपा करावी.

मालिका तर कधी पाहिली नाही. पण सतत फिरत राहणार्‍या विनोदांमुळे ती काय पोचलेली मालिका असेल याचा अंदाज येतो.

श्री मी नव्हेच फेम - रंगा.

बॅटमॅन's picture

13 Nov 2015 - 5:27 pm | बॅटमॅन

ठ्ठो =))

शब्दबम्बाळ's picture

13 Nov 2015 - 5:59 pm | शब्दबम्बाळ

डिरेक्ट प्रसंगच उभा राहिला ना डोळ्यांसमोर भाऊ!
महाएपिसोड मध्ये गायक मांडी घालून, एक हात कानावर ठेऊन दुसरा हात शक्य तितका हवेत हलवून, एक डोळा बंद करून, दुसर्या डोळ्यावरची भुवई किंचित तिरपी करून, चेहऱ्यावर अत्यंत आर्त भाव आणून शेवटच्या कडव्यात जान्हवीला आवाहन करतोय आणि दुसरीकडे कित्येक भाग इस्पितळात कळा सोसत असलेली जान्हवी त्याच्या आर्जवाना प्रतिसाद देऊन अखेर बाळन्तिण होतेय आणि त्रिभुवनात पुष्प वृष्टी होतेय...

देवांच्यात उगीच कुजबुज: लास्ट टाइम १०० कौरव याच्यापेक्षा लवकर जन्मले होते नै!

राही's picture

13 Nov 2015 - 6:28 pm | राही

१०० कौरव याच्यापेक्षा लवकर जन्मले होते नै!>

P1
{चित्र जालावरुन घेतले आहे.}

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आ के तेरी बाहों में, हर शाम लगे सिंदूरी... :- Vansh

हर शाम लगे सिंदुरी
खुबसुरत
ब्युटीफुल बियॉन्ड लिमीट्स
धन्यवाद

नाखु's picture

14 Nov 2015 - 9:49 am | नाखु

स्वामी कुर्नीसात

बाकी बाण राव काकांनी (स्वतःच्या) गालावर का म्हणून हात ठेवला आहे??

उगा आपली (बारीक) शंका.

मदनबाण's picture

17 Nov 2015 - 4:43 pm | मदनबाण

@ मारवा
थांकु... :)

@ नाखुराव
काकांनी (स्वतःच्या) गालावर का म्हणून हात ठेवला आहे??
माहित नाय बाँ... पुतण्याच्या चिंतेची पोझ असावी का ? ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- हाय रे हाय तेरा घुंगटा... :- ढोंगी

चौकटराजा's picture

13 Nov 2015 - 8:53 pm | चौकटराजा

जेंव्हा टी आर पी कोसळेल सपाटून
तेंव्हा येईन मी बाळ्न्तून
आपली जानू

प्रभाकर पेठकर's picture

17 Nov 2015 - 12:41 pm | प्रभाकर पेठकर

'आपली' नाही हो, श्रीची.