मालवणी समुपदेश आणि शेजारचा बायो [मनमोहन रोगे]

दिवाळी अंक's picture
दिवाळी अंक in दिवाळी अंक
21 Oct 2015 - 1:15 pm

.
.

जवळची होकाल कुरडी भासता, कारण
तेच्या डोळ्यातला कुसाळ दिसता
लांबची होकाल चोकट गमता, कारण
तेनी सोसलेला मुसळ म्हायत नसता

लांब आसतत तेव्हा सगळेच सगे-सोयरे
मदत करूची येळ इल्यार कुणी कुणाचे नायरे
म्हणूनच म्हणतात दुरून डोंगर साजरे
पण डोंगरात घुसल्यार दिसतत सगळे काजरे

हातातल्या काकणाक कित्या होयो आरसो?
म्हागडो गॉगल लावल्यान तरी डोळ्यान तिरसो
टिचभर तवशात हातभर बीया
तुझी फकांडा ऐकाक मोकळो नाय मीया

असतील शीता तर जमतील भुता
पण माणूस होया देता-घेता
देव तारी तेका कोण मारी
येळ इल्यार कोण नाय सावरी

आसात हरी तर देयत खाटल्यावरी
तरास नको कसलो म्हणून तब्येत नाय बरी
दुनियेत बळी तोच कान पिळी
जेचा खावचा तेची वाजवची टाळी

आडातच नाय तर पोयरात खयसून येता?
नशीबातच नाय तर लॉटरी कसली लागता?
आपलोच कार्टो तर शेजारचो कसलो फळता?
धरलो तर धावता आणि सोडलो तर पळता

दिसता तसा नसता म्हणून जग फसता
खोटा बोलणारो शेवटी तोंडार आपाटता
अडाण्याक चपलाचो तर शहाण्याक शब्दाचो मार
बुडणार्‍याक पाठ आणि उगवत्याक नमस्कार

करूचा तसा भरूचा ह्यो निसर्गाचो न्याय
स्वतःपुरतो जगणार्‍याक उद्या कोण नाय
जमली तेव्हा मजा केल्यान पुढचो नाय इचार
म्हातारपणी कोन नाय, तेव्हा माणूस होता लाचार

------- मनमोहन रो. रोगे, ठाणे.

भाषाटः ९८६९१८०९५८

.

शेजारचा बायो कॉलेजात जाता

शेजारचा बायो कॉलेजात जाता
तोंडाक मेकअप लिप्स्टिक लावता
चलताना हडे – थडे बघित चलता
रस्त्यान जाताना नुसता मिरावता
मिरावता तर मिरवाने, तुझा काय जळता?
शेजारचा बायो कॉलेजात जाता||१||

केसांची बट डोळ्यार उडवता
जीन्सवर तोकडा टी-शर्ट घालता
बघताना डोळ्यांच्या कोपर्‍यातून बघता
शेजारच्या माणसांका अनोळखी भासवता
भासवल्यान तर भासवने, तुझा काय अडता?
शेजारचा बायो कॉलेजात जाता||२||

पायात बूट तर कधी सॅण्डल घालता
खांद्यात मॅचिंग पर्स अडकवता
डोळ्यांका आयलायनर लावता
बघणार्‍यांचा काळीज हलवता
हलवता तर हलवने, तुझा कित्या हलता?
शेजारचा बायो कॉलेजात जाता||३||

बघुचा तेव्हा कानाक हेडफोन लावता
आपल्याच धुंदीत, जगाक इसारता
घरातली झोपल्यार चॅटिंग करता
२४ तास हातात मोबाईल धरता
धरता तर धरू दे, तुझा काय झरता?
शेजारचा बायो कॉलेजात जाता||४||

हल्ली घरातल्या कामात लक्षच नसता
मित्र-मैत्रिणींबरोबर फिरफिर फिरता
दर वर्षी नेमान पास मातर होता
माका कळना नाय, अभ्यास कधी करता?
करूचो तेवा करता, तुझा काय सरता?
शेजारचा बायो कॉलेजात जाता||४||

- श्री. मनमोहन रोगे, ठाणे.
डिसेंबर २०१४
.

दिवाळी अंक २०१५

प्रतिक्रिया

खटपट्या's picture

10 Nov 2015 - 11:07 am | खटपट्या

जबरदस्त रोगे साहेब.
होतात कुठे एवढे दीवस..
मस्त अजुन येवुदे

मितान's picture

11 Nov 2015 - 7:44 am | मितान

मस्त !!!

नूतन सावंत's picture

11 Nov 2015 - 9:37 am | नूतन सावंत

छानच कविता .पहिलीतर उत्तमच.एक म्हण चार पानांच्या मज्रकूइतके ज्ञान देते.इथे तर म्हणीचा मेळावाच आहे.छान,लिहित राहा.

मालवणी मसाला आवडला! मस्त आहेत दोन्ही कविता!

पैसा's picture

11 Nov 2015 - 12:33 pm | पैसा

:)

प्रदीप's picture

11 Nov 2015 - 7:48 pm | प्रदीप

.

मित्रहो's picture

11 Nov 2015 - 9:33 pm | मित्रहो

मस्त. आवडल्या

विशाल कुलकर्णी's picture

12 Nov 2015 - 9:07 am | विशाल कुलकर्णी

जबरी राव , लै भारी

सोनू's picture

12 Nov 2015 - 11:19 am | सोनू

आडंस... !!!

यशोधरा's picture

12 Nov 2015 - 11:23 am | यशोधरा

भारी लिहिल्यात हो अगदी!!

प्रभाकर पेठकर's picture

17 Nov 2015 - 10:23 am | प्रभाकर पेठकर

अस्सल मालवणी तडका. दोन्ही कविता आवडल्या.

नाखु's picture

17 Nov 2015 - 10:35 am | नाखु

खमंग फराळी कवीता

सूड's picture

17 Nov 2015 - 3:18 pm | सूड

मस्त!!

मदनबाण's picture

17 Nov 2015 - 4:55 pm | मदनबाण

सुरेख ! :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- हाय रे हाय तेरा घुंगटा... :- ढोंगी

स्वाती दिनेश's picture

18 Nov 2015 - 7:19 pm | स्वाती दिनेश

मालवणी मसाला मस्त!
स्वाती

दमामि's picture

24 Nov 2015 - 7:55 am | दमामि

आवडला.

नीलमोहर's picture

24 Nov 2015 - 10:28 am | नीलमोहर

भारीच !!

कविता आवडल्या. पण एक शंका आहे. कोंकणीत आणि दक्षिण कोंकणात अनुस्वारांची रेलचेल असते असे वाचले आहे आणि जुन्या मालवणी लेखनात (उदा. जयवंत दळवी किंवा मधु मं कर्णिकांच्या साहित्यातले मालवणी) पुष्कळ अनुस्वार, नपुंसकलिंग स्पष्ट करणारे तर सर्वच, वाचले आहेत. अलीकडे जे मालवणी लिखाण प्रसिद्ध होते, त्यावर उघड उघड मराठीची छाप दिसते. मराठीप्रमाणेच मालवणीने (तिची खासियत असलेले) अनुस्वार लेखनातून आणि उच्चारांतून काढून टाकले का?
मराठीतले अनुस्वार काढून टाकण्यात कोंकणी उच्चार विरुद्ध उर्वरित महाराष्ट्रातले उच्चार असा छुपा वाद होता. मालवणी भाषकांमध्ये असे काही असण्याचा संभव नाही. हा फक्त मराठीकरणाचा रेटा दिसतोय. बोली भाषा अशक्त होत चालल्याचे हे आणखी एक उदाहरण वाटले. हल्ली, भासवता ह्या शब्दांचे मराठीकरण होत चालले असावे. नाही तर ते हालीं, भासयतां असे लिहिले गेले असते.
"श्यजारचां बायो कालिजांत जाता, मिरावतां तर मिरवांने/दे, तुजां काय जळतां?' यात लहान मुलींसाठी नपुंसकलिंग वापरण्याची एक खास बोलीभाषिक लकब आहे. 'तें पोरगं' अशा अर्थाने हे वापरतात. या खास लकबी नष्ट होऊ नयेत असे वाटते.

चांदणे संदीप's picture

26 Nov 2015 - 1:18 pm | चांदणे संदीप

धरलो तर धावता आणि सोडलो तर पळता

हे
"धरलो तर चावता आणि सोडलो तर पळता" असे पाहिजे का?
म्हणजे "धरल तर चावतंय आणि सोडल तर पळतय"च्या धर्तीवर.

बाकी कविता दोन्ही आवडल्या. फराळात येगळा परकार खायाला मिळावा तसा वाटला मना येकदम!

धन्यवाद,
Sandy