माझी जिज्ञासा :
१) थिऑसॉफी म्हणजे काय ?
२) थिऑसॉफिकल सोसायटीचे उद्दीष्ट कार्य योगदान काय ? थिऑसॉफी आणि थिऑसॉफिकल सोसायटीची बलस्थाने कोणती ?
३) थिऑसॉफिकल सोसायटीची कोणकोणती विभाजने आणि का झाली ?
४) थिऑसॉफीवरील आक्षेप आणि थिऑसॉफीच्या मर्यादा कोणकोणत्या ?
५) थिऑसॉफी, थिऑसॉफिकल सोसायटी कडे बघण्याचा तत्कालीन हिंदू तत्त्ववेत्त्यांचा दृष्टीकोण कसा होता ? आणि आजच्या हिंदू तत्त्ववेत्यांचा दृष्टीकोण कसा आहे ?
६) थिऑसॉफी, थिऑसॉफिकल सोसायटीचे तत्त्वज्ञान इतर देशात असो अथवा भारतात विशीष्ट तत्त्वज्ञानाच्या अभ्यासकांपलिकडे सर्वसामान्य जनतेत कितपत पोहोचले सर्वसामान्य जनतेमध्ये ते कितपत फॉलोअरशीप (अनुयायीत्व) निर्माण करू शकले ? अपेक्षीत फॉलोअरशीप निर्माण करू शकले नसेल तर का ?
७)
भ्रामक श्रद्धांवर उभारलेल्या छुप्या साम्राज्यवादी ‘थिऑसॉफिकल सोसायटी’चा खरपूस समाचार मॅककॅबे यांच्याकडून अपेक्षित होता, त्याला वाचक मुकले. ~ डॉ. यशवंत रायकर (आध्यात्मिकतेचा घोटाळा-दैनिक प्रहार May 12, 2013 06:35:37 AM मध्ये म्हणतात)
डॉ. यशवंत रायकर त्यांच्या दैनिक प्रहार मधील लेखातून थिऑसॉफिकल सोसायटीवर भ्रामक श्रद्धांवर उभारलेले आणि छुपे साम्राज्यवादी अशी थिऑसॉफिकल सोसायटीवर टिका का करतात ? संदर्भ
८) निओ-थिऑसॉफी म्हणजे काय ?
८) महाराष्ट्रातील थिऑसॉफी, थिऑसॉफिकल सोसायटीचे स्थान
९) मराठी आणि इतर भाषातून थिऑसॉफी बद्दलचे उल्लेखनीय संदर्भ ग्रंथ
१०) थिऑसॉफी, थिऑसॉफिकल सोसायटीच्या पाठीराख्या अथवा अनुयायीयी उल्लेखनीय मराठी/ भारतीय / अथवा जागतीक व्यक्ती
उपोद्घात
अॅनी बेझंट एक भारतीय स्वातंत्र्य सैनिक होत्या ज्या काँग्रेसच्या अध्यक्षा झाल्या त्या थिऑसॉफिकल सोसायटीच्या सदस्या होत्या एवढेच काय ते थिऑसॉफी आणि थिऑसॉफिकल सोसायटी हे दोन शब्द शालेय शिक्षणात आले त्या नंतर जेव्हा जेव्हा अॅनी बेझंटांचे नाव आठवले शालेय जिवनातील पाठांतरामुळे थिऑसॉफी आणि थिऑसॉफिकल सोसायटी हे शब्द आठवले एवढेच. काही वर्षांपुर्वी समजण्यास सुलभ असे कुणा कृष्णमुर्तींचे तत्त्वज्ञानावरचे इंग्रजीभाषेतील पुस्तक दोन एकतासांसाठी हातात आले होते ते जिद्दू कृष्णमुर्तींचेच होते का नाही माहित नाही. त्यानंतर मराठी विकिपीडियावर जिद्दू कृष्णमुर्तींवर कुणीतरी लेख लिहितेय पाहीले होते तो लेख, हा लेख लिहिण्यापुर्वी जरासा चाळला, गेल्या ऑगस्टाच्या सुरवातीस तुकाराम तात्या पडवळ यांच्या बद्दल संदर्भ शोधताना काही संदर्भ थिऑसॉफीकल सोसायटीच्या कुणा जुन्या सदस्याच्या लेखनातून आढळले तेव्हा एकदा थिऑसॉफी शब्द वाचला, थिऑसॉफी बद्दल माझे ज्ञान एवढे अगाध आहे :) पण एखादा शब्द पुन्हा पुन्हा कानावर पडला आणि स्मरणात असला तर तो विषय आपल्याला माहित असल्यासारखे वाटते तसेच काहीसे माझे थिऑसॉफी शब्दा बद्दल होते.
मी जेव्हा पासून मेघश्याम पुंडलिक रेगे यांचे वाक्या जे पुस्तक आपण वाचलेले नसेल तरी आपण ते वाचलेले असणार अशी ज्याच्याविषयी आपली समजूत असते त्या पुस्तकाला अभिजात पुस्तकाचा (classic) दर्जा प्राप्त झालेला असतो असे म्हटले गेले आहे. वाचले तेव्हा पासून या वाक्यावर अपरंपार फिदा झालो आहे तेव्हा थिऑसॉफी हा काहीतरी अभिजात विषय असणार तर अस्मादीकांना या थिऑसॉफी विषयावर अधिक माहिती (वर विचारल्या प्रमाणे) हवी आहे.
*काही माहितीपूर्ण प्रतिसाद मराठी विकिप्रकल्पात लेखासाठी वापरले जाऊ शकती म्हणून आपले प्रतिसाद प्रताधिकारमुक्त गृहीत धरले जातील
* अनुषंगिका व्यतरीक्त अवांतर टाळण्यासाठी आणि चर्चा सहभागासाठी आभार
प्रतिक्रिया
7 Oct 2015 - 5:19 pm | एस
इंटरेस्टिंग. पण खरोखरंच जास्त माहिती नाही. शक्य झाल्यास शोधाशोध करून टाकतो. पुण्यात डेक्कनला मराठवाडा मित्रमंडळ महाविद्यालयाजवळ 'थिऑसॉफिकल सोसायटी' चे कार्यालय आहे.
7 Oct 2015 - 5:44 pm | आदूबाळ
मलाही तेच आठवलं. मस्त टुमदार इमारत आहे.
7 Oct 2015 - 5:38 pm | तुडतुडी
सनातन झाली .आता थिऑसॉफिकल सोसायटी. हिंदू विरोधी शक्तींनी नवीन टार्गेट शोधलं का ? चालू द्या
7 Oct 2015 - 5:58 pm | प्रसाद गोडबोले
मलाही प्रचंड उत्सुकता आहे ह्या थिओसॉफीकल सोसायटी बद्दल .
विवेकानंदांच्या अमेरिकावारी नंतर ह्यां लोकांनी म्हणे "विवेकानंद सांगतात तो खरा हिंदु धर्म नाहीच" असा तळतळाट केला होता म्हणे ... जाणकारांनी ह्या विषयावर प्रकाश टाकावा :)
8 Oct 2015 - 11:54 am | शरद
भारतीय संस्कृतिकोश खंड ४ मध्ये पृ. २४९ ते २५३ वर माहिती दिली आहे.
शरद
17 Oct 2015 - 3:13 pm | मनिम्याऊ
माझे वडील मराठी थिऑसॉफिकल फ़ेडेरेशनचे अध्यक्ष आहेत. आपल्याला थिऑसॉफिकल सोसायटी बद्दल खरच काही जाणून घ्यायचे असल्यास माला व्य नी करावा. वडिलान्चा नंबर देईन. तसेच आपण कोणत्या गावाचे (महाराष्ट्रातील) ते कळव्लास संबंधित / जवळील गावातील सोसायटीचा पत्ता/ व्यक्तीचे डीटेल्स देता येतील.