निनावं

पद्मश्री चित्रे's picture
पद्मश्री चित्रे in पाककृती
31 Aug 2008 - 4:14 pm

साहित्य-
तीन वाट्या बेसन पीठ, १ वाटी गव्हाचे पीठ, १/२ वाटी तांदूळ पीठ, ३ वाट्या किसलेला गुळ्,दोन मोठे चमचे साजुक तूप, एका नारळाचे दुध, वेलची-जायफळ पूड, मीठ ,काजू.
कृती-
प्रथम सर्व पीठे एकत्र करुन तूपात मंद आचेवर खमंग भाजून घ्यावीत्.गुठ्ळ्या होवु न देता. गूळ नारळाच्या दुधात विरघळवुन त्याचे सरसरीत मिश्रण करुन घ्यावे. पीठ गार झाले कि या मिश्रणात टाकुन वरुन वेलची-जायफळ पूड, मीठ ,काजु टाकावे.
मंद आचेवर हे मिश्रण सतत ढवळत घाटावे. मिश्रण घट्ट झाले की प्री-हीटेड ओव्हन मधे १५० डिग्री वर १२/१५ मिनिटे बेक करावे.
बाहेर काढल्यावर १५ मिनिटानी त्याच्या चौकोनी वड्या पाडाव्या.
इतर-
हा एक पारंपारीक सी के पी पदार्थ आहे. हरतालिकेच्या आदल्या दिवशी हा आवर्जुन केला जातो. याचं नाव निनावं असण्याच मजेशीर कारण संगितलं जातं की- सी के पी लोक खवय्ये समजले जातात. खास सामिष्-निरामिष पदार्थ करण्यात पुढे असतात्.या खाद्यसंस्कृती त इतके पदार्थ आहेत, की या पदार्थाला नावच उरल नसावं -म्हणुन हे निनावं.

प्रतिक्रिया

प्राजु's picture

31 Aug 2008 - 11:45 pm | प्राजु

हे काहीतरी वेगळंच आहे.
नावाचं गुपितही छान आहे. एकदा नक्की करून बघेन ही पाकृ. सांदणासारखाच वाटतो हा प्रकार.
धन्यवाद फुलवा ताई.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

स्वाती दिनेश's picture

31 Aug 2008 - 11:52 pm | स्वाती दिनेश

वावा.. लय खास लागतं हे निनावं आणि ते करावं तर कुण्या सिकेपींनीच.. आवरणाच्या दिवशी निनावं खायची मजा वेगळीच..
फुलवा, ही रेसिपी इथे दिल्याबद्दल धन्यु.
स्वाती

यशोधरा's picture

1 Sep 2008 - 12:01 am | यशोधरा

फुलवा, हे निनावं मस्तच लागत गं :) आमच्या शेजारी एक सीकेपी कुटुंब राहतं, त्या कुटुंबातल्या काकू करतात हे अन् खाणे खिलवणे याचीही त्यांना खूप आवड आहे, त्यांच्याकडे पहिल्यांदा खाल्लय हे.

विसोबा खेचर's picture

1 Sep 2008 - 11:27 am | विसोबा खेचर

वा वा! निनावं ह आमचादेखील अत्यंत आवडता पदार्थ. आमचं शेजारचंच घर कायस्थाचं असल्यामुळे आम्हाला हा पदार्थ नेहमीच खायला भेटतो! :)

फुलवा, पाकृबद्दल धन्यवाद...

आपला,
तात्या गुप्ते.