जे पुस्तक आपण वाचलेले नसेल तरी आपण ते वाचलेले असणार अशी ज्याच्याविषयी आपली समजूत असते त्या पुस्तकाला अभिजात पुस्तकाचा (classic) दर्जा प्राप्त झालेला असतो असे म्हटले गेले आहे. ~ मेघश्याम पुंडलिक रेगे
मराठी विकिप्रकल्पांसाठी महाराष्ट्री प्राकृतातील जैन, महानुभावपंथीय आणि यादवकालीन साहित्य / दस्तएवज विषयी खालील माहिती हवी आहे.
१) ग्रंथ / दस्तएवजाचे नाव
२) लेखकाचे नाव (असल्यास)
३) ग्रंथ / दस्तएवजाचे केवळ नाव आहे का ग्रंथ / दस्तएवज (कुठे ना कुठे) उपलब्ध आहे
४) मूळ ग्रंथ / दस्तएवजाचा ऑनलाईन दुवा उपलब्ध असल्यास
* महानुभव पंथींयाचे खास करून पुर्वाश्रमीचे (तथाकथित) गोपनीय लिपीतील साहित्य सुद्धा
* यादवकालीन नित्याच्या चर्चेत नमुद करण्यात न येणारे इतर साहित्य सुद्धा.
* आपणास १९५४ पूर्वी मृत्यू झाला असलेल्या कोणत्याही लेखकाचे मूळ दस्तएवज / ग्रंथ विकिमिडीया कॉमन्स प्रकल्पातून चढवता येतील.
* कॉपीराइट फ्री झालेल्या (६१ वर्षांपुर्वी मृत्यू झालेल्या) साहित्यिकांची यादी मराठी विकिस्रोत प्रकल्पात विकिस्रोत:समस्त लेखक (कॉपीराईट फ्री) पानावर अद्ययावत केली जाते.
* विकिमिडीया कॉमन्सवर चढवलेल्या मूळ दस्तएवज ग्रंथांचे युनिकोड टंकन मराठी विकिस्रोत प्रकल्पातून केले जाते.
या धाग्यावरील प्रतिसाद विकिप्रकल्पातून वापरले जाण्याची शक्यता असल्यामुळे प्रताधिकार मुक्त समजले जातील.
प्रतिक्रिया
21 Sep 2015 - 5:45 pm | प्रचेतस
वि. ल. भावे कृत 'महाराष्ट्र सारस्वत' ह्या पुस्तकात ह्याविषयी बरीच माहिती मिळेल.
22 Sep 2015 - 3:33 pm | माहितगार
प्रचेतस खूप खूप धन्यवाद. ग्रंथ माहितीपूर्ण आणि रोचक आहे. विनायक लक्ष्मण भावे यांचे महाराष्ट्र सारस्वत या अर्काईव्ह दुव्यावर वाचनास मिळाले आणि वाचतच बसलो.
मारवांच्या शंकेस अधिक माहिती प्रचेतसच अधिक चांगली देऊ शकतील पण तो पर्यंत विनायक लक्ष्मण भावे यांचा महाराष्ट्र सारस्वत सुद्धा वाचण्यास हरकत नसावी.
22 Sep 2015 - 5:58 pm | मारवा
महाराष्ट्र सारस्वत या पुस्तकाच्या दुव्यासाठी धन्यवाद.
22 Sep 2015 - 7:39 pm | माहितगार
प्रचेतस 'शके' वर्षांचे इसवि सनात रुपांतरण (कनव्हर्शन) करण्याची काही पद्धती असल्यास ती सांगावी आणि यासाठी काही ऑनलाईन फ्री सॉफ्टवेअर आहे का ?
23 Sep 2015 - 4:08 pm | प्रचेतस
शक वर्षात ७८ मिळवा म्हणजे इसवी सनाचे वर्ष येईल.
म्हणजे इसवी सन ७८ ला पहिला 'शक' (टू बी स्पेसिफिक 'शालिवाहन शक') चालू झाला.
हे वर्ष २०१५ म्हणजे सध्या शालिवाहन शक १९३७ चालू आहे.
21 Sep 2015 - 9:50 pm | मारवा
एक माहीती हवी होती.
यादवकालीन म्हणजे राजे रामदेवराव यादव कालीन शके १२१२ च्या पुढे मागे १०० वर्षे साधारण महाराष्ट्राचा राजकीय इतिहास समाज जीवन आदिं संदर्भात अधिक माहीती नेट वर कुठे मिळेल.
कृपया सांगितले तर आनंद वाटेल.
3 Oct 2015 - 11:01 am | परश्या
“महाराष्ट्र राज्य गॅझेटिअर, इतिहास : प्राचीन काळ (खंड १) “ वाचावयास हरकत नाही. यादवांच्या पूर्वीचे शिलाहार , चालुक्य, राष्ट्रकुट, वाकाटक, क्षत्रप व सातवाहन यांच्या राजकिय व सांस्कृतिक इतिहासाची चांगली माहिती मिळेल. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्या संकेतस्थळावर हा ग्रंथ एचटीएमएल स्वरूपात या दुव्यावर उपलब्ध आहे.
2 Oct 2015 - 7:52 pm | पैसा
डी एल आय (डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया) वरून मी महानुभावीय मराठी वाङ्मय हे पी डी एफ पुस्तक (लेखकः यशवंत देशपांडे, १९२५) डाऊनलोड केले होते. ते वन ड्राईव्ह वर ठेवले आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर लिंक देते. व्यनि करून ईमेल अॅड्रेस कळवा.
2 Oct 2015 - 8:53 pm | बिपिन कार्यकर्ते
दे. :)
3 Oct 2015 - 3:33 am | आदूबाळ
अहो हे डीएलआय कसं वापरायचं? मला काहीही डाउनलोड करता येत नाही त्यावरून :(
3 Oct 2015 - 11:21 am | पैसा
http://sanskritdocuments.org/scannedbooks/dlidownloader/ इथून डी एल आय डाऊनलोडर हे लहानसे सॉफ्टवेअर पीसीवर इन्स्टॉल करावे लागते.
http://www.dli.ernet.in/ साईटवर गेले की आपल्याला हवे ते पुस्तक सर्च करायचे. त्याचा बारकोड कॉपी करायचा. तो डी एल आय डाऊनलोडच्या विंडोमधे दिला की पुस्तक/हवी ती पाने डाऊनलोड होतात.
3 Oct 2015 - 7:32 am | chetanlakhs
जैन साहित्याबद्दल पुण्यात डॉ. हुकुमचंद संगवे चांगले मार्गदर्शन करू शकतील