(एकदम बेसिक वर्हाड़ी चिकन रस्सा)
लागणारे साहित्य:
चिकन - अर्धा किलो,
तेल - पाऊण मोठी वाटी,
कांदा - १ मोठा चिरून (चमचाभर तेलावर भाजून बारीक पेस्ट केलेली),
लसूण - १ मध्यम आकाराचा गड्डा,
हिरव्या मिरच्या - २,
आलं - बोटाच्या १ पेराइतका तुकडा,
(आलं, लसूण आणि हिरव्या मिरच्यांची पेस्ट)
सुक्या खोबऱ्याचा तुकडा - अर्ध्यापेक्षा थोडा कमी छोटे तुकडे भाजून बारीक केलेले,
जिरे - १ चमचा,
दालचीनी- अर्ध्या बोटा एवढा १ तुकडा ,
मिरे - ७ ते ८,
लवंग - ४ ते ५,
मसाला वेल्दोड़े- २,
धने - एक चहाचा चमचा तेलात भाजून (+ मिरे + लवंग + विलायची + दालचीनी + जिरे) बारीक केलेले,
कोथिंबीर बारीक चिरून,
तिखट,
हळद,
मीठ.
क्रमवार पाककृती:
चिकन ३ वेळ पाण्यात धुवून घ्यावे. त्यातील पूर्ण पाणी काढून टाकावे. ३ चमचे तेलात १/२ छोटा चमचा हळद आणि दीड चमचा मीठ टाकून मध्यम आचेवर १० मिनिट झाकण ठेवून शिजवावे. (पाणी घाला अगदी थोड़े बुडाला लागु नये म्हणून. तसेही चिकन पाणी सोडत)
शिजल्यानंतर दुसऱ्या मोठ्या पातेल्यात तेल टाकावे (वैदर्भीय खासम ख़ास तेलाची तर्री हवी असल्यास तेल जास्त टाका, sincerely वर्हाड़ी रश्यात ती हवीच).
तेल गरम झाल्यावर त्यात तेलावर भाजलेल्या कांद्याची पेस्ट टाकावी , त्यानंतर आलं लसूण हिरव्या मिरच्यांची पेस्ट टाकावी, धने आणि इतर जिन्नस असलेली मसाला पूड घालून परतावे, त्यापाठोपाठ भाजलेल्या खोबऱ्याची पेस्ट टाकावी.
त्यात ५ चमचे तिखट, दीड मोठा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकावे (चिकन वाफवताना टाकलेल्या मिठाला विसरु नये).
आता त्या फोडणीत अर्धा ग्लास पाणी टाकून झाकण ठेवावे. दोन मिनिटात फोडणी आणि त्यातली तर्री वेगळी झालेली दिसेल. त्यात वाफवून शिजवलेले चिकन टाकून हलवून घ्यावे. दीड ते २ पेले पाणी टाकून त्यास १० ते १२ मिनिट मध्यम आचेवर उकळू द्यावे.
आच बंद करून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून ताबडतोब त्यावर झाकण ठेवावे. ५ मिनिटांनी असले फोटो काढता येतात मग.
*माझ्याकडे कोथिंबीर नव्हती
**********
("सदरहु पाककृती ही टीना ह्यांची असुन मी त्याच्यात बेयर मिनिमम सामान वापरून मी बनावली आहे तस्मात् ह्या पाककृती चे श्रेय टीना ह्यांचेच आहे")
प्रतिक्रिया
10 Sep 2015 - 10:14 pm | माम्लेदारचा पन्खा
अति श्रीमंत वर्गातले दिसताय....नका हो असे अत्याचार करू !
10 Sep 2015 - 10:23 pm | कैलासवासी सोन्याबापु
लोल!!! अहो ते कांदे खर्चिक नव्हते हो! डोकितला एक काढून चिरला (डोक्यात अजुन मणभर आहेत)
10 Sep 2015 - 10:19 pm | मांत्रिक
बाप्पू हो! काय हा छळ! भर श्रावणात इतकी जबरा रेशिपी?
काय हा त्रास!
10 Sep 2015 - 10:25 pm | मांत्रिक
आता पोटदुखीच्या गोळ्या घेऊन ठेवा!
10 Sep 2015 - 10:26 pm | कैलासवासी सोन्याबापु
आमचं बेटर हाफ (पक्षी ध्यान) गेले आहे घरी मंगळागौर पुजायला!! तिच्यासोबत विनातिकीट श्रावण सुद्धा दिला धाडून! ऑर्डर्ली काढला किचन बाहेर अन अमृत बनवले :प
10 Sep 2015 - 10:29 pm | माम्लेदारचा पन्खा
ही तर आमची घरातली पदवी......
10 Sep 2015 - 10:31 pm | कैलासवासी सोन्याबापु
:D
12 Sep 2015 - 4:52 pm | अत्रुप्त आत्मा
सदर वाक्य प्रचंड लाइकण्यात आलेलं आहे!
10 Sep 2015 - 10:24 pm | कविता१९७८
वाह मस्तच
10 Sep 2015 - 10:27 pm | नूतन सावंत
Zakkas
10 Sep 2015 - 10:29 pm | कैलासवासी सोन्याबापु
विशेष आभार पैसा ताई जिच्या मेहनतीमुळे धागा सजला
10 Sep 2015 - 10:30 pm | पैसा
त्यात काय विशेष! फोटो अपलोड करायला आता फ्लिकर सगळ्यात चांगलं हा शोध लागला त्यामुळे!
10 Sep 2015 - 10:45 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
व्वा वा बापुसाहेब दिसायलाच एवढं झक्कास असेल तर चवीला काय अप्रतिम लागत असेल. कधी बोलवताय खादाडीला? सगळा कंपु घेउन येतो =))
10 Sep 2015 - 10:46 pm | कैलासवासी सोन्याबापु
येवा की कधी बी!!
-जय इच्छा मटन
10 Sep 2015 - 10:56 pm | प्यारे१
हे लोक आमाला पुना कोम्बडी खायला लावणार.....
10 Sep 2015 - 10:57 pm | कैलासवासी सोन्याबापु
आभार! :D
10 Sep 2015 - 11:01 pm | प्यारे१
ई देखो ससुरा हम अगर खाना चालू कर दिए तो सब पाप तोहरा सर पर आ जाएगा पहले ही बता दे रहे है हम
11 Sep 2015 - 6:51 am | कैलासवासी सोन्याबापु
ई देखो पाप पुण्यका ऑडिट! अरे आवा ता! आई के पहले खाई लो! तबहु देखेंगे!
11 Sep 2015 - 9:50 am | माम्लेदारचा पन्खा
उ एक्कई है जो तोहरी लुगाईके सबहू नखरे जानत रही....
10 Sep 2015 - 11:25 pm | उगा काहितरीच
कब खतम होगा श्रावण ? :'(
10 Sep 2015 - 11:36 pm | बोका-ए-आझम
आता मिळेल त्या गाडीने निघतो आणि येतो हा रस्सा हादडायला!
10 Sep 2015 - 11:50 pm | एस
तो रंग बघूनच तोंड पोळलं. वर्हाडात अजिबात येणार नाही. आमचं एका आठवड्याचं तेल-तिखट एकाच भाजीत घातलंन् तुम्ही तर!!!
तिखट-तेल नच्छवाला
- स्वॅप्स..!
11 Sep 2015 - 6:53 am | कैलासवासी सोन्याबापु
तिखट भयानक खातात खरे आमच्याकडे. पण हे रंगच होता नुसता तिखट इतके नव्हते
11 Sep 2015 - 7:03 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
आपल्याला तिखट चालेल ओ!! तेलकट नको =))
11 Sep 2015 - 7:44 am | कैलासवासी सोन्याबापु
असं नसतंय कप्तान साब! दोन्ही असतेच् असते! पण मसाले कॉम्बो काय असते माहिती नहीं बेटे कधीच बाधत नाही.
(कोल्हापुरी मित्रमंडळीस हा रंग अन चव जास्त अपील होईल हे मात्र खरे)
11 Sep 2015 - 11:02 am | सस्नेह
येऊन जावा एकडाव कोल्लापूरला !
बाकी पाकृ एकदम झकास !
11 Sep 2015 - 12:02 am | स्रुजा
एवढ्या चांगल्या फोटुवाल्या पाकॄ चिकन च्या का असतात ? :( आमचा सदाचाच श्रावण असतो बर्याचदा. पण हा रस्सा वापरुन काय करता येईल यासाठी डोकं लढवते आता.
11 Sep 2015 - 6:59 am | कैलासवासी सोन्याबापु
रश्यात चिकन चा अर्क उतरतो तेव्हाच स्पेशल टेस्ट येते. तरीही अंडी चालत असता अंडा करी करुन पहा उत्तम होईल. शिवाय बटाटा किंवा पनीर चे फ्राइड टुकड़े घालुन "पनीर वर्हाड़ी" करता येईल (अर्थात त्या केस मधे रस्सा थोडा आटवुन मग लालसर तळलेले पनीर तुकडे घालावेत
11 Sep 2015 - 9:06 am | त्रिवेणी
वांग घाल सृजा त्या रस्या rasyat अधिक च्या आकारांत चिरलेले.
बाकी अश्या चम्चमित पाकृ आपल्या विषेश आवडीच्या.
लवकरच श्रावण संपेल आता मग आहेच kombdi आणि मी.
12 Sep 2015 - 2:20 pm | प्रभाकर पेठकर
>>>>>सदाचाच श्रावण असतो बर्याचदा.
सदाचाच आणि बर्याचदा??
13 Sep 2015 - 8:14 am | स्रुजा
हेहे, पॅराडॉक्स झाला खरा. मी तशी शाकाहारीच आहे, थोडं थोडं चिकन वगैरे खाते अधुन मधुन अगदीच नुसतंच सॅलड किंवा सोया खायची वेळ येऊ नये म्हणुन. त्यामुळे तसा आमचा श्रावण नेहमीच चालु असतो , ऑल्मोस्ट नेहमी :)
सोन्याबापु आणि त्रि, धन्यवाद. अंडं चालतं , वांगं पळतं. दोन्ही करुन बघेन.
13 Sep 2015 - 8:23 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
पॅराडॉक्सवरुन लै भारी आयड्या आलेली आहे. लेख येणार एक-दोन दिवसात. धन्स :)!!
14 Sep 2015 - 7:43 am | स्रुजा
प्रतिक्षेत :)
11 Sep 2015 - 12:36 am | कपिलमुनी
खायला कधी घालताय ??
बाकी चिकन अर्धा किलो म्हणजे एका माणसापुरतेच प्रमाण !
11 Sep 2015 - 6:59 am | कैलासवासी सोन्याबापु
तुम्ही बोला!
11 Sep 2015 - 7:31 am | हेमंत लाटकर
सोन्याबापू, श्रावणात नाॅनव्हेज रेसिपीज टाकून सगळ्यांच्या तोंडाला पाणी अाणताय.
11 Sep 2015 - 7:46 am | कैलासवासी सोन्याबापु
अहो मी सद्धया उत्तर भारतात राहतो अन इकडे श्रावण १५ दिवस अगोदर संपतो! तस्मात् टेक्निकल फायदा घेता येतो
(तसे पाहता मी श्रावण पाळत नाही)
11 Sep 2015 - 8:26 am | मुक्त विहारि
अरे व्वा!!!!
मस्तच.
तुम्ही पण आमच्या सारखेच दिसताय.
आमचा नियम : आम्ही वेळ प्रसंगी हत्ती-घोडे-डायनॉसॉर पाळू.....पण.... श्रावण अजिबात पाळणार नाही.
11 Sep 2015 - 8:31 am | मुक्त विहारि
खंग्री दिसत आहे.
जमल्यास "सावजी" मसाल्याची पाकृ टाकाल का?
11 Sep 2015 - 8:53 am | कैलासवासी सोन्याबापु
मुवि काका,
सावजी ही नागपुरी खासियत आहे , विशेषतः कोष्टी समाज ह्यात अतिशय पारंगत आमच्या एका मित्राची मदर खुप भारी बनवते सावजी, आता त्यांना विचारेन सुट्टी ला घरी गेलो की रेसिपी.
11 Sep 2015 - 9:05 am | मुक्त विहारि
इथे पोट्टे तर लई खूष होतील बघा.
बादवे,
तुम्ही विदर्भात नक्की कुठे राहता?
11 Sep 2015 - 10:05 am | कैलासवासी सोन्याबापु
प्रॉपर गाव अकोला बॉर्न एंड एडुकेटेड इन अमरावती आता दोन्ही गावात एक एक घर आहे तस्मात् आई वडील आलटून पालटून असतात अकोला अमरावती ला
11 Sep 2015 - 11:00 am | मुक्त विहारि
ह्या शहराबाबत आमच्या फार रम्य आठवणी आहेत.
मुलगा "बॅडमिंटन" शिकायला हनुमान व्यायामशाळेतच जात होता.
आता धाग्याचे "वेगळ्या विदर्भात" रुपांतर करण्यापेक्षा, व्यनि करतो.
12 Sep 2015 - 2:33 pm | अभ्या..
बापूसाहेब गुस्ताखी माफ पण सावजी म्हण्जे आमच्याकडचे सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रिय लोक्स. ते विणकरांच्या धंद्यात असतातच पण त्यांच्या भाषेत (मराठी, अहिराणि अन गुजराती मिक्स थोडी वर्हाडी अशी वाटते ती भाषा) भावजीला सावजी म्हणतात. नावात पण विठठलसा, गोविंदसा अशी असतात. अभ्यासात नाही पण व्यवसायात परफेक्ट अन कष्टाळू देखणे लोक्स. चिकाटीने बिझनेस करतात. एकत्र कुटूंबे असतात. त्यांचे भुश्श्याचा शेगडीवर मंद आचेवर शिजवलेले मटन त्यांचीच खासियत. असा ओला मसाला वापरुन केलेले मटन सावजी मटन म्हणतात. हे येवला, नाशिक, सोलापूर, बिदर, हुमनाबाद भागात जास्त आहेत.
12 Sep 2015 - 6:12 pm | कैलासवासी सोन्याबापु
अहो आमच्याकडे कोष्टी समाजातले लोकं सावजी म्हणुन ओळखले जातात (कधी पासुन ते मला ही नाही माहिती) म्हणुन तसे सांगितले, अपन को जो मालुम उतना बोले!
नवीन माहितीसाठी धन्यवाद देवा! :)
14 Sep 2015 - 1:07 pm | प्रभाकर पेठकर
मुक्त विहारी,
सावजी मटण केल्यावर कळवा. येतोच मध्यवर्ती ठिकाणी.
11 Sep 2015 - 8:34 am | कोमल
सकाळ सकाळ आत्या४..
झालं, ओन्ली ३ दिवस मोअर मग ढिंकचिक्या ढिंकचिक्या ढिंकचिक्या ढिंकचिक्या
11 Sep 2015 - 8:53 am | कैलासवासी सोन्याबापु
म्हणुन पूर्वतयारी म्हणुन दिला हा धागा!
11 Sep 2015 - 9:26 am | अजया
दर्शन घेऊनच गार पाकृचे!!
11 Sep 2015 - 10:54 am | पियुशा
स्ल्र्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प !!!!!
काय कातील फोतु वाह !
11 Sep 2015 - 10:57 am | तुषार काळभोर
दंडवत..!
गणपाभौंची आठवण करून दिलीत..
(ड्रंकन बम चिकन, पेरी-पेरी..... स्लर्प्प, स्लर्रर्रर्र्प)
11 Sep 2015 - 11:03 am | कैलासवासी सोन्याबापु
अर्र!! गणपा भाऊ ह्यांचा फोटो आमच्या देव्हार्यात आहे व आम्ही सोवळ्यातली बॉक्सर घालुन त्यांस नमन करूनच किचन मधे शड्डू ठोकुन शिरतो!!
गणपा भाऊ इज गणपा भाऊ
11 Sep 2015 - 11:07 am | संजय पाटिल
मस्त पा. क्रु. फोटो पण जबर्याच. श्रावण संपल्या बरोबर करुन बघणार.
11 Sep 2015 - 11:11 am | नाव आडनाव
बाप्पूसाहेब, एव्हढ्या चांगल्या चिकना बरोबर चपाती? भाकर नाही? चपाती म्हणजे त्या चिकनाचा अपमान :) चुरून हाणायला भाकरंच पाह्यजे.
आयला, इथं लोक काय फोटू टाकतात चिकनाचा / मटणाचा / माश्याचा. आठ वर्षा आधी नॉनवेज खाणं बंद करून चूक केली का काय असा प्रश्न लई वेळा पडाया लागलाय :(
(मी एगिटेरियन आहे पण बाकिचं बंद केलंय)
11 Sep 2015 - 11:14 am | कैलासवासी सोन्याबापु
अंडयाला अधिक च्या आकारांत चीरा देऊन सोडा ह्या रश्यात कातिल आइटम बनतो वर्हाड़ी अंडा करी वाला
11 Sep 2015 - 11:14 am | कैलासवासी सोन्याबापु
इकडे ज्वारी काय असते तेच माहिती नाही लोकांना!!
11 Sep 2015 - 11:24 am | मित्रहो
आमाले जमत नाही न भाउ
य़ा डाक्टराच्या..........
तेल कमी, तिखट कमी, नॉन व्हेज, काय मजा नाही
11 Sep 2015 - 11:42 am | मीता
रस्सा कातील दिसतोय . वांग घालून करून बघतेच ..
11 Sep 2015 - 11:54 am | स्वाती दिनेश
मस्त दिसतोय रस्सा.. तोंपासु.
स्वाती
11 Sep 2015 - 2:43 pm | पद्मावति
वॉव, फारच टेंप्टिंग दिसतोय रस्सा.
तुम्ही सांगितल्याप्रमाणे अंडं किंवा पनीर, बटाटा टाकून रस्सा बनवीन माझ्यापूरता. बाकी घरातले तर हा चिकन
रस्सा जिभल्या चाटत खातील.
12 Sep 2015 - 2:24 pm | प्रभाकर पेठकर
सुरण (आवडत असेल तर) घातल्यास मटणाचा फिल सुद्धा येईल.
12 Sep 2015 - 9:25 pm | पद्मावति
सुरणाची सुद्धा आयडिया मस्तं वाटतेय. थॅंक्स. सुरण टाकून करुन बघीन.
12 Sep 2015 - 3:17 pm | मधुरा देशपांडे
आहाहा. अस्सल वर्हाडी रस्सा. काय ती तर्री. पण मी चिकन करत नसल्याने आणि खाण्यातही अगदीच कच्चा लिंबु असल्याने पास. वाटल्यास वांगी किंवा अंडे घालुन करुन बघेन.
कालच आमचे शेजारचे मामा येऊन ओरडून गेले मला, की तु भारतात श्रावणातच का येतेस? त्यांच्या घरी डिट्टो असे दिसते चिकन. पुढ्च्या वेळी भारतात आणि घरी वर्हाडातल्या पाहुणचारासाठी म्हणुन श्रावणात येऊ नकोस अशी धमकीच मिळाली आहे. ;)
12 Sep 2015 - 4:58 pm | सत्य धर्म
तोंडाला पाणी सुटला न भाऊ
12 Sep 2015 - 5:05 pm | याॅर्कर
नाॅनव्हेज चा विषय आणि माझी प्रतिकिया नाही असे व्हायला नको म्हणून ही एक.
बाकी छान रेसिपी हाय
12 Sep 2015 - 7:50 pm | मनीषा
अरे वा ! मस्त
13 Sep 2015 - 2:05 am | टिना
अच्छा..इथं दिली का ही पाकृ..
चांगलय..
मी दिलय ना सोन्याबापु, दगडफुलाशिवाय मुळ पा़कृ ला चव नै येत आणि मेथी सुद्धा हवीच हवी..
तुम्ही त्या दोन वस्तु काढून टाकलेल्या दिसतात लागणार्या जिन्नसांमधुन..
आणि चिकन वाफवताना काहिही झाले तरी पाणी टाकणे मना आहे बापु.. त्यामुळे चिकन निब्बर होतं..चुकिचा सल्ला..
करुन पाहिल्याबद्दल अभिनंदन..
तिकड प्रचि का नै दिला ?
13 Sep 2015 - 4:44 am | कैलासवासी सोन्याबापु
टीना,
माझ्याकडे काहीच सामान नव्हते हो! म्हणुन बोललो न एकदम बेसिक रस्सा झाला तो (महा मतलब फ़क्त तर्रीशी होता!!) बाकी तिकडे फोटो चिपकवणे काही येत नाही बा आपल्याला! इकडे सुद्धा संपादक मंडळ (पैसा ताई) ने चिपकवुन दिले फोटो.
13 Sep 2015 - 3:28 am | यशोधरा
सोन्याबापू, टीनातैला क्रेडिट द्यायला हवे होते रेसिपीचे, नाही का? :)
13 Sep 2015 - 4:41 am | कैलासवासी सोन्याबापु
ताई, टीना ह्यांना मी मिपा वर कधीच पाहिले नव्हते जिथे त्यांना रेगुलर पाहात असे (माबो) तिथे त्यांस श्रेय दिले आहे. आपण त्यांना समक्ष विचारुन खातरजमा करून घेऊ शकता. :)
13 Sep 2015 - 4:43 am | यशोधरा
ते दिलेच आहे की हो बाप्पा, पण हिथे बी द्यायला हवे होते, इतकेच सुचवत आहे :)
13 Sep 2015 - 4:44 am | यशोधरा
म्हंजे हिथे त्या नसल्या तरी श्रेय द्यायला हरकत नव्हती असे म्हणायचे आहे, बाकी काय बी न्हाई.
13 Sep 2015 - 4:48 am | कैलासवासी सोन्याबापु
हो, थोड़े से चुकलेच माझे! हरकत नाही आता सुधारतो ती चुक ,
:)
(धांदरट) बाप्या
13 Sep 2015 - 4:57 am | यशोधरा
जे ब्बात! थ्यांक्यूच बघा.
13 Sep 2015 - 4:59 am | कैलासवासी सोन्याबापु
तुम्ही कश्याला थैंक्स म्हणताय ताई! मलाच सॉरी म्हणायचे आहे! :)
13 Sep 2015 - 5:02 am | यशोधरा
मुद्दा समजून घेऊन श्रेयनामावली छापल्याबद्दल =))
सॉरी न् फिरी काय करायचे आहे. सोल्जरकडून सॉरी म्हणून घेतल्याचे/ऐकल्याचे पाप लागेल ना बाप्पा, तर ते नकोच.
13 Sep 2015 - 5:18 am | कैलासवासी सोन्याबापु
वाद घालणे मुळातच आवडत नाही,
शिवाय झाली चुक तर झाली त्यात किंतुपरंतु नाही अन कारणे देणे ही, चुक मानायलासुद्धा हिंमत लागते ती सुदैवाने शाबूत आहे अन ती सुधारायची इच्छा पण! बाकी कसले सोल्जर अन कसले काय सगळी इथून तिथून माणसेच!
13 Sep 2015 - 5:13 am | अनन्त अवधुत
वांगे भारी लागते या रस्श्यात. एकदा पेठकर काका म्हणतात तसे सुरण घालून करून पहावी म्हणतो.
(स्वगत: चल बाप्पा आता सुरण शोधायला)
13 Sep 2015 - 10:20 am | प्यारे१
मिपावर पाकृ टाकली ती मायबोली वर आलेल्या पाकृ चा उपयोग करून टाकली काय? तसं असेल तर सांगायला हरकत नाही.
काही जणांसाठी - एखादा लेख एखाद्या साईट च्या रेफेरेंस ने आला तर त्यालाही हरकत असू नये ना? भले तो ती ते त्या संस्थळाची जाहिरात करत असले तरी? मागे झालेले काही वाद आठवले ब्वा!
13 Sep 2015 - 3:53 pm | पप्पुपेजर
रेसिपी तर खतरनाक आहे !!!! रानमाड च्या काळ्या रस्सा ची आठवण आली
13 Sep 2015 - 5:37 pm | कैलासवासी सोन्याबापु
रानमाळ! अंजानगाव (बारी) रोड??
13 Sep 2015 - 6:34 pm | पप्पुपेजर
बडनेरा कॉलेज जवळ होते आधी आता तिकडे शिफ्ट झाले असेल । आणी चाणक्य
13 Sep 2015 - 7:10 pm | त्रिवेणी
अंजनगांव सुर्जी जवळ का?
13 Sep 2015 - 8:10 pm | कैलासवासी सोन्याबापु
नाही नाही अंजनगाव सुर्जी अन अंजनगाव बारी दोन विरुद्ध टोके आहेत!
13 Sep 2015 - 7:13 pm | टिना
का इथे डयरेक्ट पिकासा ची लिंक दिली तरी प्रचि दिसत नै का ?
14 Sep 2015 - 8:56 am | पैसा
बघणारा pc वरुन गूगल वर logged in असेल तरच चित्र दिसतात. मी flikr account activate केला वैतागून.
14 Sep 2015 - 12:31 am | टिना
छे दिसतच नै आहे फोटो.. जाउदे तिकड..
14 Sep 2015 - 12:37 am | टिना
14 Sep 2015 - 5:56 am | कैलासवासी सोन्याबापु
माय दिसू राहला ना फोटो! झन्न दिसू राहिला रस्सा
14 Sep 2015 - 6:45 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
अगगगगगगगग!!!
=))
भुक लागली पहाटे पहाटे.