फणसाची गर्‍या गोट्याची भाजी

यशोधरा's picture
यशोधरा in पाककृती
28 Aug 2015 - 10:04 am

लागणारे जिन्नसः

कच्चा पण थोडासा जून असा कापा फणस,
२-३ ओल्या मिरच्या,
१ वाटी खोबरे,
१ लहान चमचा हळद,
७-८ काळी मिरी,
फोडणीसाठी हिंग, मोहरी,
चवीला साखर, मीठ

कृती:

फणस सोलून व आतील गरे साफ करुन घ्यावेत.
गर्‍यांमधील बिया (आठळ्या) काढून त्यांची वरची साले काढून त्यांचे लांबट तुकडे करावेत.
फणासाच्या बाहेरील सालीचा आतील भाग काढून त्याचेही लांबट तुकडे करावेत. जरासे चेचावे.
गरे लांबट चिरावेत.

तेलात हिंग मोहरीची फोडणी करुन त्यात आठळ्यांचे तुकडे व सालीच्या आतल्या भागांचे तुकडे शिजायला घालावे. सोबत थोडे पाणी व हळद घालावी.
हे शिजले की त्यात गर्‍यांचे तुकडेही घालावे.
चवीला मीठ व साखर घालावी.
मिरच्या व मिरी ठेचावी व खोबर्‍यासकट मिक्सरमधून एकदोनदा फिरवून घ्यावी.
वाटण फणसाच्या भाजीत घालून भाजी ढवळून घ्यावी व चांगली वाफ आणावी.
वरुन खोबरे - कोथिंबीर पेरावी.

कारवारी मसाला:

१ टेस्पू धणे, १ टीस्पू जिरे व हळद प्रत्येकी, ४-५ लाल सुक्या मिरच्या.
१ छोटा कांदा कापून, ६-७ लसूण पाकळ्या, किंचितसे आले, १ वाटी खोबरे
चिंचेचा कोळ.

मिरची सोडून सर्व मसाला कच्चा वाटायचा. मिरचीची फोडणी व बाकी वर दिल्याप्रमाणेच. हिरवी मिरची, मिरी ऐवजी हे वाटण वापरायचे.

phanasa bhajee_cleaned.jpg

टीपा:

गरे साफ करताना व फणस सोलताना हातांना व विळीला तेल लावून घ्यावे.
फोडणीसाठी हिरव्या मिरच्यांऐवजी लाल मिरच्या वापरता येतील. तेह्वा सोबत उडीद डाळही घालता येईल.
साखरेऐवजी गूळ घालता येईल.
ह्या भाजीत काही जण ओले शेंगदाणे / पावटे/ भिजवलेले हरभरे/ मटार वगैरेही टाकतात. आपापली आवड.

प्रतिक्रिया

पैसा's picture

28 Aug 2015 - 10:30 am | पैसा

मस्त पाकृ! आणि फटु तर अप्रतिम आहे!

चक्क यशोची पाकॄ वाचावयास मिळत आहे ! ;)
फणसाची भाजी मला आवडते, फोटो मस्त. :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Aashiqui Mein Teri... ;) :- 36 China Town

ए शहाण्या, मागे पण टाकल्यात मी पाककृत्या.:P

नूतन सावंत's picture

28 Aug 2015 - 11:16 am | नूतन सावंत

मस्त ग यशो,फणसाची भाजी जीव कि प्राण.मला अगदी कोवळ्या फणसाची भाजी आवडते.रामनवमीच्या उत्सवाला आजोळी कोणी गेलं की,त्याच्याबरोबर माझी मामी माझ्यासाठी कुवऱ्या पाठवते.थोडे कष्ट घ्यावे लागतात,पण भाजी अहाहा.....आता तुझ्यासारखीही करून पाहीन.

यशोधरा's picture

28 Aug 2015 - 11:32 am | यशोधरा

मलापण खूप आवडते ताई. :) ही भाजी, केळफुलाची भाजी काळे वाटाणे घालून, कच्च्या केळ्यांची भाजी...

पियुशा's picture

1 Sep 2015 - 1:04 pm | पियुशा

मस्त दिसतेय भाजी :)

प्रचेतस's picture

28 Aug 2015 - 11:43 am | प्रचेतस

ही फणसाची भाजी, ती काजूगरांची भाजी, ओल्या काजूंची उसळ असल्या खास कोकणी पाककृती आतापर्यंत कधीच खाल्लेल्या नाहीत.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

28 Aug 2015 - 7:25 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

तुम्ही वेळेवर चहा नं पाजल्यानं ह्या आनंदास मुकलेला हात. पुढच्या वेळी पेश्शल चहा पाजा बघा फणसाची भाजी, कजुगरांची भाजी, ओल्या काजुंची उसळ वगैरे पाकृ. खायला नाही तरी बघायला तरी मिळतील. हाकानाका.

हल्ला व्हायच्या आत पळतो ता.

-कॅप्टन रणछोडदास र"न"गाडे-

प्रचेतस's picture

28 Aug 2015 - 8:43 pm | प्रचेतस

खी खी खी
पण चहा पाजत नै हा आक्षेप पुणेकरांवर आहे हो. आपण तर डायहार्ड चिंचवडकर.

मला चहा नाही पाजलात तरी खाऊ घालेन हो तुम्हांला भाजी प्रचेतस सर :P

प्रचेतस's picture

28 Aug 2015 - 8:49 pm | प्रचेतस

अता वाट बघणे आले.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

28 Aug 2015 - 9:17 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

बघा वाटचं बघा प्रचेतस सर (लुऊलुलुलुलुलुलुलुलुलुलुलुलुलुलुलुल)

एस's picture

28 Aug 2015 - 10:39 pm | एस

फणसाची भाजी, ती काजूगरांची भाजी, ओल्या काजूंची उसळ अशा क्षुल्लक गोष्टींसाठी कुणाला चहा पाजायचा म्हणजे अतिच आहे. चला, बरी आठवण झाली. आलोच जरा चहा घेऊन!

अत्रुप्त आत्मा's picture

30 Aug 2015 - 9:49 pm | अत्रुप्त आत्मा

@मुकलेला हात >> http://www.freesmileys.org/smileys/smiley-devil25.gif
@हल्ला व्हायच्या आत पळतो ता. >> http://www.freesmileys.org/smileys/smiley-sw022.gif

अजया's picture

28 Aug 2015 - 12:25 pm | अजया

मी पण:(
तुमच्या पाकृ बघून तुमच्याकडेच येऊन ट्रायल घेतली पाहिजे असे वाटतंय!

पद्मावति's picture

28 Aug 2015 - 12:44 pm | पद्मावति

रेसिपी आणि फोटो दोन्हीही आवडले. नक्कि करून बघते.

सई कोडोलीकर's picture

28 Aug 2015 - 12:50 pm | सई कोडोलीकर

कृतीही सोपी आहे. मी ओले शेंगदाणे घालते.
माझ्या आवडत्या भाज्यांमधे पहिल्या पाचात आहे फणसाची भाजी. नुसतीही बोलमधे घेऊन खाते.
शिल्लक आहे का? येऊ का? :-)

यशोधरा's picture

28 Aug 2015 - 12:53 pm | यशोधरा

ये की. कधी येतेस? ;)

विशाखा राऊत's picture

28 Aug 2015 - 1:40 pm | विशाखा राऊत

काय एकसे एक रेसेपी देताय.... दिल मेरा जल रहा है... मेरेकु घरकु जाना है

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Aug 2015 - 1:50 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्त भाजी !

अवांतर : तयार फणसाच्या भाजलेल्या आठळ्या एक नंबर लागतात :)

चैतन्यमय's picture

28 Aug 2015 - 2:10 pm | चैतन्यमय

भाजी चवीला कशीही असली तरी फोटोत मात्र चांगलीच दिसायला हवी, नै का यशोधराताई? ;)

आमच्यात भाजी चवीलाही चांगली असते आणि दिसायलाही छानच दिसते चैभाऊ.

आवडती भाजी!! यावर्षी फणस एकदोनदा पाह्यला, नंतर करु म्हणून चालढकल केली. आता इनो घेऊन येतो.

फणसाच्या भाजीची चव एकदोन वेळाच घेतली आहे . त्या वेळी आवडली होती असे आठवते.
आता करून बघेन.
पा. कृ. साठी धन्यवाद !

मृत्युन्जय's picture

28 Aug 2015 - 5:46 pm | मृत्युन्जय

कधी येउ खायला?

यशोधरा's picture

28 Aug 2015 - 6:39 pm | यशोधरा

फणसाच्या मोसमात :)

वाह! मस्त फोटू व सोपी कृती.
तू काळे वाटाणे घातलेस ना ? पण ते वाफेवर सहज शिजत नाहीत ना? मग काय करायचे?

आदल्या रात्री वाटाणे भिजत घालून दुसर्‍या दिवशी कूकरला लाव.

रेवती's picture

28 Aug 2015 - 9:45 pm | रेवती

बरं.

क्या बात यशो. मी हौसेने कॅन्ड कच्चा फणस घेऊन आले आणि त्याचं काय करावं न कळल्याने बिचारा तो डबा वाट बघत कपाटात शांत बसुन आहे. आता वीकांताला करते तुझ्या रेसिपीने.

आमच्या कडे, उन्हाळ्याच्या दिवसात, आठवड्या-पंधरवड्यातून, ही भाजी, एकदा तरी होतेच होते.

सुबोध खरे's picture

28 Aug 2015 - 8:19 pm | सुबोध खरे

फणसाची भाजी माझी फार आवडती आहे. सुदैवाने लष्करातून निवृत्त झाल्यावर मुंबईत परत आल्याने गावचा फणस आला कि भाजीचा आनंद लुटता येतो. बायको देशावरची असली तरी आई वरच्या मजल्यावरच राहत असल्याने हमखास गरम गरम भाजी खायला मिळतेच.
पण यशोधरा ताई भाजीची पाककृती आणी फोटो( अतिशय सुंदर आहेत च) पण टाकण्याची अत्यंत चुकीची वेळ गाठ्लीत. पुढचे सात महिने तरी फणस मिळण्याची शक्यता नाही तेंव्हा तोंडचे पाणी पुसून टाकावे लागत आहे या बद्दल आपला निषेध

सस्नेह's picture

28 Aug 2015 - 9:04 pm | सस्नेह

एकदम हटके पाकृ ! माझ्या दारातले कच्चे फणस वार्याने पडलेले मला, भाजी करता येत नाही म्हणून देऊन टाकले गेल्या वर्षी !
बाकी कच्चा फणस म्हणजे श्रावणातलं मटण अं ?

फणसाला मटण म्हणणे हा फणसाचा आणि मटणाचाही अपमान आहे!! निषेध!

आम्ही म्हणतो बाॅ ! करा आमचा णिशेध !!

यशोधरा's picture

28 Aug 2015 - 9:36 pm | यशोधरा

आमाला फणस दिलात तरच निषेध मागे घेऊ! अन्यथा आमचा जाज्वल्य निषेध सुरुच राहील.

नाखु's picture

12 Sep 2015 - 2:21 pm | नाखु

माझ्याकडे हा फणस दिला असता तर बरे झाले असते.

फणस पोहोच्वल्याबद्दल फणसाची भाजी मिळाली असती. मी फणसभाजी अमरावतीला कंपनीच्या विभागीय प्रबंधकाचे कृपेने (२०-२२) वर्षांपूर्वी खाल्ली आहे. त्यानंतर काही योग आला नाही खरं!

अभामिपा पुणे महानगर कट्टा मित्रमंडळ
परस्पर भागवत समीती सभासद.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

12 Sep 2015 - 6:42 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

घरी केली की भेटुन देइन तुम्हाला.

यशोधरा's picture

12 Sep 2015 - 10:10 pm | यशोधरा

घ्या क्यापटनकडून :D

नाखु's picture

17 Sep 2015 - 2:23 pm | नाखु

आपलेकडीलही भाजी स्वीकारली जाईल.

दोन्हीघरचा पाहुणा उपाशी राहीलका या विवंचनेतला नाखु.

नूतन सावंत's picture

28 Aug 2015 - 10:07 pm | नूतन सावंत

स्नेहा.मी यशोला पाठिंबा देत आहे

श्रीकृष्ण सामंत's picture

29 Aug 2015 - 1:49 am | श्रीकृष्ण सामंत

यशोधरा,
डिश मधली फणसाची भाजी पाहून माझ्या आजोळची आठवण आली.

पिवळा डांबिस's picture

29 Aug 2015 - 3:39 am | पिवळा डांबिस

तुकां काय कामधंदो नाय गो?
कसले-कसले भाजये टाकतंय!
आमच्याकडे एकतर कुयरीचो फणस गांवतां नाय तर एकदम पिको.
हो गर्‍या-गोट्याच्या किंवा आनसा-फणसाच्या स्टेजचो गांवणां नाय....
पार्सल कर थोडी भाजी (श्रावणाकारणान तुझ्याकडे सुके बांगडे मागणंय नाय, ते आम्ही आमचें वापरूं!!)
:)

जुइ's picture

29 Aug 2015 - 10:48 pm | जुइ

पाकृ आवडली.

आता नोव्हेंबरात फणसाला फळेधरू लागतील.
यशो आणि सुरंगीतैंचा नंबर लावण्यात आला आहे.

छान दिसतेय ग भाजी.कधी खाल्ली नाहिये.

अत्रुप्त आत्मा's picture

30 Aug 2015 - 9:51 pm | अत्रुप्त आत्मा

आठवणीतली आवडती भाजी

स्पंदना's picture

31 Aug 2015 - 5:20 am | स्पंदना

कालच पाहिला बाजारात.
आम्ही काळे वाटाणे घालून करतो ही भाजी. काय चव आली तोडात.
उठा! चला बाजारात!!

प्यारे१'s picture

31 Aug 2015 - 3:18 pm | प्यारे१

इतके दिवस लोक फणस घेऊन जाता येताना दिसले की वाटायचं एवढी चिवचिव का करतात लोक?
गरे काढा आणि बाकी फणस फेका.
कोकणी लोक पूर्ण फणसाचा वापर कर्तात हे माहिती नव्हतं.

पाकृ खाऊन बघण्यात येईल.

पिकलेला फणस चालत नाही. त्याची नाही होत भाजी. गरे खायचे फक्त.

विशाखा राऊत's picture

1 Sep 2015 - 8:28 pm | विशाखा राऊत

फणसाची मस्त भाजी.. ह्यात कोलीम घालुन कोणी करते का?

यशोधरा's picture

1 Sep 2015 - 8:35 pm | यशोधरा

कोलीम म्हणजे? करंदी का?

विशाखा राऊत's picture

1 Sep 2015 - 8:44 pm | विशाखा राऊत

करंदी बहुदा एकदम बारीक पांढरी, कोलीम लालसर बहुदा जवळा बोलतात काही जण.. त्यानंतर काड जरा मोठी

अच्छा! जवळा. ओके. काड म्हणजे सोडे का?

विशाखा राऊत's picture

1 Sep 2015 - 9:19 pm | विशाखा राऊत

नाही थोडेसे मोठे असतात पण सोड्याइतके नाही... काड पण लालसर असते. काड नुसती धुवुन कांदा टोमॅटोवर परतवायची. तिखट मीठ कोकम घालुन मस्त लागते. खरतर हे सगळे लहानपणापसुन एकलेले शब्द आहेत तर तेच आठवतात. सोडे वगैरे कधी खावे लागले नाहीत.. बाकी सगळे ऑप्शनस असताना :) बारा महिने काही ना काही मासे मिळायचेच

सोडे आणि कार्ल्याची भाजी मस्त लागते :)

अदि's picture

2 Sep 2015 - 2:55 pm | अदि

सर्वत बारीक कोलीम. दुरुन पाहीला तर मातीचा गोळाच वाटतो. अतिशय निगुतीने चहाच्या गाळणीतून साफ करावा लागतो. कोलमाची पेंड चुलीवर भाजून अप्रतिम लागते. मग जवळा, मग करन्दी, मग कोलंबी. हे सगळे वेगवेगळे प्रकार आहेत.

अदि's picture

2 Sep 2015 - 2:57 pm | अदि

माझ्या माहितीनुसार, साल काढलेली कोलंबी म्हण्जे सोडे. मग ते ओले असुदे नाहीतर सुके.

यशोधरा's picture

2 Sep 2015 - 3:14 pm | यशोधरा

ओल्या कोलंबीला सोडे नाही म्हणत, मला वाटते. ती सुकवून वगैरे मग सोडे.

पैसा's picture

2 Sep 2015 - 11:45 pm | पैसा

साफ करून सुकवलेली कोलंबी म्हणजे सोडे. ते घालून सीकेपी लोक पोहे, आळूभाजी वगैरे सुद्धा करतात.

प्रभाकर पेठकर's picture

14 Sep 2015 - 3:43 pm | प्रभाकर पेठकर

सिकेपी पाककृतीत सोडे घालून उपमाही करतात.

कविता१९७८'s picture

14 Sep 2015 - 1:42 pm | कविता१९७८

हे सर्व प्रकार नेहमी खाते

सानिकास्वप्निल's picture

1 Sep 2015 - 10:39 pm | सानिकास्वप्निल

वाह!!

मस्तचं पाककृती आहे फणसाच्या भाजीची आणि फोटो पण सुरेख!!
आम्ही केळफुलात काळे वाटाणे घालतो :)

नूतन सावंत's picture

2 Sep 2015 - 8:07 pm | नूतन सावंत

यशो,सोडे-कार्ल्यची क्रुति दे ना

यशोधरा's picture

2 Sep 2015 - 11:00 pm | यशोधरा

देते.

सौंदाळा's picture

3 Sep 2015 - 1:52 pm | सौंदाळा

मस्तच
यात आम्ही लसुण आणि काळे वाटाणे घालतो.
इतकी आवडते की उप्पीट, पोह्यासारखी नुसतीसुद्धा खातो.
बाकी जाणकारांनी असा फणस निवडायच्या काही टीप्स दिल्या तर बरं होईल. सध्या पिंपरी मंडईतुन भाजीवाल्याला विचारुनच फणस घेतो. बर्‍याचदा चांगला असतो पण कधी कधी फणस मोठा असुन खुप पाव असते मग भाजी २ जणांपुरतीच होते बाकिच्यांना आयत्या वेळी दुसरी भाजी करावी लागते.

याशिवाय गर्‍याचे फणस असतात ते पुर्ण पिकायच्या आधी उतरवुन त्यातल्या फक्त गर्‍या - गोट्याची भाजी फोडणी, हळद आणि ओलं खोबरं घालुन जबरदस्त लागते.

मग ही गर्‍या गोट्याचीच आहे की :) हो, नुसती खायला पण मस्त! तशीच केळफुलाचीही.

स्वाती दिनेश's picture

3 Sep 2015 - 7:47 pm | स्वाती दिनेश

आवडती भाजी.. आमच्याकडे बिरड्या घालून करतात..
ह्म्म..आता फणसाच्या सिझनला भारत वारी करणे आले..
स्वाती

सविता००१'s picture

14 Sep 2015 - 1:33 pm | सविता००१

मस्त मस्त.
पण कच्च्या आठळ्या चिरल्या जातात? (जामच अडाणी प्रश्न आहे. पण सांग ना). मी उकडून घेते आधी.

हो.उकडूनही घेतल्यास तरी चालेल.

प्रभाकर पेठकर's picture

14 Sep 2015 - 3:46 pm | प्रभाकर पेठकर

कच्चा फणस म्हणजे इथे 'भाजीचा फणस' म्हणून साधारणपणे, सोललेल्या नारळाच्या आकाराचा मिळतो. तोच वापरायचा का?

नाही तो बहुधा नीरफणस असणार. बाहेरुन हिरवा असतो का?

अन्यथा हि भाजी मला अजीबात आवडत नाहि.

यशोधरा's picture

16 Sep 2015 - 10:52 pm | यशोधरा

अरेरे, काय हे! :D