तव्यावरचा शेंगदाणे-मिरचीचा झटपट ठेचा

मंजुषा१९८०'s picture
मंजुषा१९८० in पाककृती
27 Aug 2015 - 6:53 am

जिन्नस
सात-आठ मिरच्या
मूठभर शेंगदाणे
लसणाच्या चार-पाच पाकळ्या
जीरे
दोन चमचे तेल
कोथिंबीर, मीठ

मार्गदर्शन

  • प्रथम मिरच्या स्व्च्छ धुवून बारिक चिराव्यात.
  • लसूण पाकळ्या चिराव्यात.
  • तव्यावर तेल टाकून, प्रथम शेंगदाणे टाकावेत. नंतर, मिरच्या, लसूण टाकावेत.
  • ते भाजले गेल्यावर, ते मिश्रण बाजूला सारून, तव्याच्या मध्यभागी तेल टाकावे. त्यात जीरे व बारीक चिरलेली कोथिंबीर टाकावी.
  • मग ते सगळे मिश्रण एकत्र करावे. जीरे शेवटी टकल्याने ते जळत नाही.
  • मग मीठ टाकून त्याला जाडेभरडे ठेचावे.
  • हवं असल्यास त्यावर लिंबू पिळू शकतो.
  • तोंडी लावायला अगदी चवदार !!

टीपा
मिक्सर वापरू नये. ठेचलेलाच छान लागतो.

माहितीचा स्रोत
मी स्वत:

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

27 Aug 2015 - 7:29 am | यशोधरा

करुन पाहते, वाचूनच अहाहा वाटते आहे! :)

मम :) पण पुढच्या वेळी फोटो पण टाका. फोटो टाकण्यासाठी काही मदत हवी असेल तर कळवा.

मांत्रिक's picture

27 Aug 2015 - 9:57 am | मांत्रिक

ताई, माझ्या मते खडे मीठ टाकले तर फारच बरे! दुसरे अजून एक, साध्या पण चविष्ट तांदळाचा गरमागरम भात, खमंग लसणाच्या फोडणीचं पिठलं, लिंबाचं गोड लोणचं, आणि लोणकढं तूप याबरोबर हा ठेचा अप्रतिम अप्रतिम लागतो! पावसाळी दिवसात तर असा मेन्यू फारच सुंदर!

आठवण काढल्याबरोबर करणे आले!

नूतन सावंत's picture

27 Aug 2015 - 8:44 am | नूतन सावंत

मी आज करतेच.

मनिमौ's picture

27 Aug 2015 - 9:31 am | मनिमौ

यातच माझी आई हिरव्या कोवळ्या चिंचा पण घालते.

अाम्ही ठेचा असाच करतो अगदी पण बडगीमध्ये ठेचून

त्रिवेणी's picture

27 Aug 2015 - 1:47 pm | त्रिवेणी

बगड़ी। नेलीस। काय ग तू तिकडे.
मी पण करते baryacha। बडगीत. आज बगडित कुटलेले भरित खाणाऱ् आहे ग मी. उगाच तुला थोड़ी जलजल व्हावी म्हणून अवांतर लिहिले बाक़ी काय नैय.

मनुराणी's picture

27 Aug 2015 - 1:57 pm | मनुराणी

हो मी बडगी आणलीय इकडे. आणि भरताचं म्हणशील तर गेल्या भारतवारीत मनसोक्त खाल्लेय. आणि इकडे जांभळ्या वांग्यावर भागवते पण ती चव येत नाही.

सानिकास्वप्निल's picture

1 Sep 2015 - 10:45 pm | सानिकास्वप्निल

मस्तं पाकृ मंजुषा.
माझ्याकडे ही बडगी आहेच तर करतेच त्यात लवकरच.

इरसाल's picture

27 Aug 2015 - 11:13 am | इरसाल

मिरच्या बारीक नै काय चिरत, तशाच भाजतो तव्यावर, मग सगळं खलबत्त्यात कुटतो....भरडं, मग त्यावर शेंगदाण्याच तेल ओतुन (हो हो ओतुन) बाजरी, ज्वारी किंवा कळण्याची भाकर या बरोबर हादडतो.

बाबा योगिराज's picture

27 Aug 2015 - 12:37 pm | बाबा योगिराज

एकदम गावाची आठ्वन आली.......

नीलमोहर's picture

27 Aug 2015 - 12:07 pm | नीलमोहर

वाचता वाचताच तोंडाला पाणी सुटलं.

बाबा योगिराज's picture

27 Aug 2015 - 12:35 pm | बाबा योगिराज

आमच्या येथे थोडा वेगळा प्रकार होतो.
पहिले मिरच्या भाजुन ठेचा केला जातो. ज्या मध्ये लसन ठेचतानाच घातला जातो.
अता तव्यावर थोडे तेल घालुन त्यात ठेचा, शेंगदाण्याचा (जाडसर) कुट, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकुन परतवून घेतला जातो.
यात मिरचिचा तिखट पना थोडा कमी होतो. आणि खायला हि चविष्ट.

बाबा योगिराज's picture

27 Aug 2015 - 12:42 pm | बाबा योगिराज

हा थोडा वेळ खाऊ प्रकार आहे....

नुसतं मिरच्या तव्यावर तेलावर परतून मिठात खरडल्या की शिळी भाकरवर चौदार लागतो.मग वढ्यावर जाऊन पाणी। प्यायचे.आणि झाडाखाली सावलीत थोडं आडवं व्हायचं.

प्यारे१'s picture

27 Aug 2015 - 2:03 pm | प्यारे१

दणका आणि झणका पाकृ.

अवांतर- बडगी म्हणजे काय?

इरसाल's picture

27 Aug 2015 - 2:09 pm | इरसाल

बडगी म्हणजे वर दिलेला सगळं एकत्र ठेचण्यासाठी वापरले जाणारे एक लाकडी खलब्त्त्या सदृश्य औजार.

प्यारे१'s picture

27 Aug 2015 - 2:24 pm | प्यारे१

ओह्ह्ह. मी लाकडी खलबत्ता च म्हणतो. बा द वे वरवंट्यानं वाटण्यात आणि बत्त्यानं ठेचण्यामुळे पदार्थाच्या चवीत बदल होतो बहुतेक. वरचा प्रकार भरड वाटल्यानंतर अधिक चविष्ट लागतो.
अवांतर- खोबरं किंवा शेंगदाने वेगवेगळ्या प्रकारे बारीक केल्यावर चवीला वेगळे लागतात. खवणलेलं खोबरं नी मिक्सरमध्ये बारीक केलेलं खोबरं टोटल वेगळे लागतात.

इरसाल's picture

28 Aug 2015 - 1:39 pm | इरसाल

लाकडी चव मिसळुन मस्त चव येते, जशी मदिरा ओकच्या लाकडापासुन बनवलेल्या पिंपात ठेवली असता ;)

प्यारे१'s picture

28 Aug 2015 - 1:46 pm | प्यारे१

>>>मदिरा ओकच्या

ही पु ना ओकांची कोणी नातलग की काय असा प्रश्न पडला. मदिरा ऐवजी मंदिरा वाचलं होतं. ;)

उगा काहितरीच's picture

27 Aug 2015 - 3:02 pm | उगा काहितरीच

ठेचा...! क्या कहने !

जुइ's picture

28 Aug 2015 - 6:19 am | जुइ

फोटो टाका एखादा.

मदनबाण's picture

28 Aug 2015 - 10:59 am | मदनबाण

मला वेळ मिळाला की ठेचा बनवण्याचे काम मी आवडीने करतो...
५-६ मिरच्या + थोडासा आल्याचा तुकडा + लसणीच्या ३-४ कळ्या +काळ मीठ + लिंबु + { इच्छा असल्यास भाजलेले दाणे}
मिरच्या भा़जुन मग वरचे पदार्थ मस्त मिक्सर मधे काढुन घेतो. :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Aashiqui Mein Teri... ;) :- 36 China Town

जागु's picture

28 Aug 2015 - 11:23 am | जागु

माझा आवडता पदार्थ.

भाकरी केली की हा करतेच.

अत्रुप्त आत्मा's picture

1 Sep 2015 - 11:13 pm | अत्रुप्त आत्मा

फोटू................................................................................... :-/

सुचिकांत's picture

2 Sep 2015 - 10:51 am | सुचिकांत

तुम्ही फोटो का नाही टाकत?
माझी आई देखील अशा प्रकारे तव्यावर मिरची आणि शेंगदाण्याची एकत्र चटणी करते.

प्रभाकर पेठकर's picture

2 Sep 2015 - 11:28 am | प्रभाकर पेठकर

थांब आता करतोच.