भरली भेंडी –प्रकार पहिला.

नूतन सावंत's picture
नूतन सावंत in पाककृती
26 Aug 2015 - 8:00 pm

श्रावण विशेषात मोडणारी आणि श्रावणातच मिळणारी एक चविष्ट भाजी.अतिशय कमी साहित्य हा हिचा गुणविशेष.पांढरी भेंडी म्हणायला पण पिस्ता कलरची असणारी ही भेंडी.

यात अजून प्रकार असतात ते म्हणजे नऊधारी किंवा सातधारी भेंडी.एरवी पंचकोनी असलेली भेंडी चक्क सप्तकोनी,नवकोनी असतात.या भाजी साठी नेहमीची हिरवीगार भेंडीपण वापरता येतात.पण खरी चव खुलते ती श्रावणातल्या भेंडीसोबत.ही ती भेंडी.

माझ्या आईची मैत्रीण श्रीमती भानुमती पाटकर हिच्या सी.के.पी. घरात होणारी ही भाजी. भानूमावशीकडे शिकलेली भाजी करण्याआधीच तिची आठवण ही भेंडी दिसली येतेच. आता माझ्याही स्वयंपाकघरातली कमी वेळात न कमी साहित्यात होणारी ही भाजी आहे,त्यामुळेही आवडती भाजी आहे.

खास करून कांदा,लसूणन वापरायच्या दिवशी ही भाजी म्हणजे मेजवानीच.तुम्हालाही आवडेलच याची खात्री आहेच.बघाच करून.

भाजीसाठी लागणारे साहित्य पाहू.

साहित्य:-

१. १० पांढरी किंवा सातधारी भेंडी.(मी पांढरी वापरली आहेत.)

.

२. १ वाटी ओले खोबरे.(शक्यतो ताजे खवलेले).

.

३. सहा ते सात हिरव्या मिरच्या.(आवडीनुसार जास्त घ्यायला हरकत नाही.)

.

४. अर्धी वाटी कोथिंबीर

५. १ वाटी ताजे सायीचे घट्ट दही.

६. १ चहाचा चमचा साजूक तूप.

७. अर्धा चहाचा चमचा जिरे.


८. मीठ चवीनुसार.

९. १ चहाचा चमचा साखर.

कृती:-

१. भेंडी धुऊन पुसून दोन तुकडे करून,प्रत्येक तुकड्याला एका बाजूने चीर द्यावी.

२. खोबरे, मिरच्या, कोथिंम्बीर, मीठ, साखर याचे वाटण अर्धे दही घालून पाणी न घालता करावे.
थोडे पातळच होते.

३. भेंड्यात वाटण भरून घ्यावे.

४. नॉनस्टिक पसरट पॅनमध्ये तूप घालून जिऱ्याची फोडणी करावी.

५. भेंडे पसरून लावावे,शक्यतो एकच थर लावावा.

६. उरलेल्या वाटणात उरलेले दही मिसळून भेंड्यांवर पसरावे.

७. वर झाकण ठेऊन ५/७ मिनिटे शिजवावे.

८. झाकण काढून भेंडी उलटावीत.

९. आता झाकण न ठेवता भाजीला सुटलेले पाणी आटेपर्यंत शिजवावे.मस्त खरपूस होतात.

आता पुढे काय ते सांगायची गरज आहे का?वरण भातासोबत फन्ना उडवावा.

प्रतिक्रिया

वाह! भेंडी कोणत्याही प्रकारात आवडतेच! त्यातही भरली भेंडी म्हणजे काय बोलायला नको. या भाजीप्रकारात दही घातलेले नव्यानेच पाहिले. दहीभेंडी ही साधारण घट्ट कढीतील असावी अशी एक रेशिपी पूर्वी पाहिली होती. पण वरील कृती छान दिसतिये.

इशा१२३'s picture

26 Aug 2015 - 8:57 pm | इशा१२३

वा वा!मस्तच!
मझ्यासारख्या शाकाहारी लोकांसाठी पाककृती दिल्याबद्दल धन्यवाद!

अजया's picture

26 Aug 2015 - 9:24 pm | अजया

या भेंड्या तर माझ्या क्लीनिकच्या दारातच एक बाई घेऊन बसते.नक्की करुन पाहीन.

मुक्त विहारि's picture

26 Aug 2015 - 10:15 pm | मुक्त विहारि

एक चिंच-गुळाची सोबत सोडली तर मस्त खुलणारी भाजी.....

भेंडीचे विविध प्रकार म्हणजे....

१. तळलेली

२. सुकी (कांदा लसूण मारके)

३. भरीत

४. सुकी (बटाट्याचे काप + कांदा + लसूण)

५. तवा फ्राय

जावू दे.....

आजच भेंडी आणली आहेत.... आता उद्या मस्त तळलेली भेंडी (आम्ही जरी गुरुवार पाळत नसलो तरी आजकाल मासेवाली गुरुवारी येत नाही, त्यामुळे तळलेल्या कोलंबीच्या जागी) आणि एल.पी. (माइल्ड).......

गुरुवार सार्थकी लावायलाच पाहिजे.

तळलेली भेंडी ची रेसिपी द्या ना.

पियुशा's picture

27 Aug 2015 - 11:03 am | पियुशा

नविन मस्त प्रकार तै :) भेंडीच्या भरिताची रेसेपी द्या ना मुवि काका :)

काही काही फोटो ब्लर झालेत.

मुक्त विहारि's picture

26 Aug 2015 - 10:23 pm | मुक्त विहारि

आम्ही तरी फोटोच्या क्वालीटीबाबत खूष आहोत.

फोटो तो दिखाने के लिये हय...रेशीपी महत्वाची....

(स्वगत: हा मेला सूड, आसूड ओढण्याचे काही थांबवत नाही.आमचे ठीक आहे.सूडचे आसूड पचवायची ताकद आमच्यात आहे.इतरांचे काय?)

ओ ताई,

तुम्ही ह्या सूड रावांचे बोलणे जास्त मनावर घेवू नका. हे काय, अमृतात पण अमृत कमी आहे, म्हणून सांगतील.

ता.क. =====> वरील प्रतिसाद हा श्री.सूड ह्यांनाच असून इतरांनी जास्त दखल देवू नये. आम्ही आणि सूड, बदलापूरला जावून, मिसळपाव खाता-खाता, हा प्रश्र्न सोडवू.

स्नेहानिकेत's picture

26 Aug 2015 - 10:27 pm | स्नेहानिकेत

आता उद्या भेंडी आणणे आलेच.

मुक्त विहारि's picture

26 Aug 2015 - 10:35 pm | मुक्त विहारि

त्यांचे नक्की काय करायचे? हे पण महत्वाचे.

तवा फ्राय की, तळलेली?

नितिन५८८'s picture

26 Aug 2015 - 11:40 pm | नितिन५८८

उद्या सगळ्या वर्तमानपत्रात बातमी असेल मि. पा. वर भेंडीच्या भाजीची पाककृती आल्यामुळे भेंडीचे भाव वाढले.

आज तक पण दाखवेल "ये देखिये सफेद भिंडी, हरी भिंडी. . . . क्या जाने फिर कभी ना दिखाई दे. " और इसके लिये सिर्फ सिर्फ मि. पा. जिम्मेदार है ।

जुइ's picture

27 Aug 2015 - 2:50 am | जुइ

नवीन प्रकार कळाला.

स्रुजा's picture

27 Aug 2015 - 4:44 am | स्रुजा

सुरंगी ताई, आता काय भारी वाटतंय, तू शाकाहारी पदार्थांचा धडाका लावलायेस. मस्त वाटते आहे ही रेसिपी, मी नक्की करणार. भेंडी कशी ही आवडतेच :)

प्रीत-मोहर's picture

27 Aug 2015 - 8:39 am | प्रीत-मोहर

भेंडीची रेशिपी उद्याच करते!!! बाकी शाकाहारी पाकृसाठी धन्यु ग सुरंगी ताई

भिंगरी's picture

27 Aug 2015 - 11:14 am | भिंगरी

मी पण करते अशीच पण दही नाही वापरले कधी.आता नक्की करून पा।हीन.
तोंपासु भेंडी

पगला गजोधर's picture

27 Aug 2015 - 11:58 am | पगला गजोधर

दही आंबट असेल तर अजून जमून जाईल ही भाजी नैका ? दही आंबट नसेल तर लिंबू पिळून त्याला आंबट करून भाजी करता येईल का हो ताई ???

मांत्रिक's picture

27 Aug 2015 - 10:17 pm | मांत्रिक

आंबट दह्यातच रेसिपी जास्त खुलतात. अर्थातच तिखट रेसीपी.

भुमी's picture

27 Aug 2015 - 2:40 pm | भुमी

प्रथमच पाहिली, सोप्पी रेसेपी ,कमीत कमी साहित्यात, मस्तच.

नूतन सावंत's picture

27 Aug 2015 - 10:27 pm | नूतन सावंत

पगला गाजोधरजी,जास्त आंबट दही वापले तर मिरच्याही जास्त वापरावे लागेल असे वाटते.रात्री लावलेलं दही वापरायला हरकत नाही.मी सकाळी लावलेलं वापरते,कारण मला ही पद्धत शिकताना तसेच सांगितले गेले होते.

श्रीरंग_जोशी's picture

28 Aug 2015 - 9:27 am | श्रीरंग_जोशी

भेंडी माझी आवडती भाजी आहे. ही पद्धत एकदम खास वाटत आहे.
संधी मिळताच या प्रकारे भेंडीची भाजी बनवून पाहीन.

पैसा's picture

28 Aug 2015 - 10:34 am | पैसा

एकदम मस्त पाकृ!

मदनबाण's picture

28 Aug 2015 - 10:37 am | मदनबाण

वाह्ह... :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Aashiqui Mein Teri... ;) :- 36 China Town

जागु's picture

28 Aug 2015 - 11:02 am | जागु

वा मस्त.
आमच्या घरात पण आठवड्यातून एकदा तरी भेंडी असतातच.
मी करत असलेले भेंड्याचे प्रकार.
१)दही भेंडी,
२)भेंड्याच्या चकत्या करून भाजी
३)उभे भेंडे चिरुन कांदा न घालता परतून भाजी
४)भरली भेंडी ओल्या खोबर्‍याचे वाटण घालून
५)भरली भेंडी चिंच-गुळ, सुके खोबरे कांदा वगैरे घालू
६)भेंडी फ्राय मसाला लावून
७) भेंड्याची आमटी
८) ताकातली भेंडी
९) भेंड्याची मिक्स ओलसर भाजी (बटाटा, टोमॅटो घालून)
१०) भेंड्याचा भगरा
११) भेंड्याची भजी

विशाखा राऊत's picture

28 Aug 2015 - 1:42 pm | विशाखा राऊत

जागुताई दे ग रेसेपी.. बरेच दिवस तु काही रेसेपी दिली नाही आहेस

चालेल देते हळू हळू. एकदम द्यायचे झाले तर भेंडी पंधरवडा करावा लागेल मला घरी.

पगला गजोधर's picture

28 Aug 2015 - 1:58 pm | पगला गजोधर

भेंड्या उभ्या चिरून, चायनीज चिकन लॉलीपॉपचं आवरण असतं ना, तश्या ब्याटरमधे बुचकळून, डीपफ्राय केली, तरी मस्त लागते.

आमच्या मेसमध्ये होणारा आवडता भेंडीचा प्रकार म्हणजे, भेंडीच्या चकत्या चिरायच्या अंदाजे मीठ घालायचं. नंतर डाळीचं पीठ, हळद, लाल तिखट, गरम मसाला असं मिश्रण कोरडंच त्या भेंडीला लावायचं. भेंडीच्या चिकटपणामुळे ते मिश्रण भेंडीवर नीट बसलं की डीप फ्राय करुन घायचं.

विशाखा राऊत's picture

28 Aug 2015 - 1:41 pm | विशाखा राऊत

एकदा करुन बघावे लागेल आता... ताई पोतडी खोल आणि मस्त रेसेपी अजुन येवु देत

विवेकपटाईत's picture

28 Aug 2015 - 7:36 pm | विवेकपटाईत

पाणी आल तोंडाला. आज सकाळीच डब्यात भिंडीची भाजी नेली होती.

सानिकास्वप्निल's picture

1 Sep 2015 - 10:48 pm | सानिकास्वप्निल

दही भेंडी / रायता पाककृती माहित आहे, अनेकदा केली ही जाते पण दही घातलेली भरली भेंडी प्रथमचं पाहिली. छान आहे पाकृ करुन बघेन.
एक चिंच-गुळाची सोडली तर भेंडी अतिशय आवडता प्रकार आहे :)

आदूबाळ's picture

1 Sep 2015 - 11:03 pm | आदूबाळ

ते "प्रकार दुसरा" चं बघा कैतरी.

पदम's picture

2 Sep 2015 - 11:41 am | पदम

खुप छान

लीना घोसाळ्कर's picture

2 Sep 2015 - 12:19 pm | लीना घोसाळ्कर

मस्त् च

वाखु साठवतो.

(भेंडी)-जेपी