TIFRAC भारताचा पहिला संगणक

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in तंत्रजगत
25 Aug 2015 - 11:35 am

TIFRAC च्या विकासाच्या टीममधे, फिजीक्समधे पोस्टग्रॅज्यूट झालेले, आणि ज्यांचं इलेक्ट्रोनीक्समधे स्पेशलायझेशन झालेले असे काही लोक, तसेच रेडीयो इन्जीनियरींग मधले डिप्लोमा घेतलेले असे लोक होते. शिवाय त्यांना अमेरिकन युनिव्हर्सीटीमधे संगणाच्या दृष्टीने झालेल्या विकासाची पुरी माहिती घ्यायला मुभा होती. TIFR च्या लायब्ररीमधे वाचण्यासाठी त्या विषयावर भरपूर ग्रंथ होते. ह्या प्रोजेक्टसाठी त्यवेळचे १६ लाख रुपये बजेटमधे मंजूर झाले होते. हजारो वॉल्व्हस, डायोड्स आणि रेझीस्टर्स वापरून बनविला गेलेला हा संगणक १९६० मधे वापरात आणला होता. मद्रास युनिव्हर्सीटीचे आणि TIFRचे कॉस्मिक रे रिसर्च करणारे शास्रज्ञ हा संगणक वापरायला लागले होते. शिवाय सेंट्रल वॉटर आणि पॉवर रिसर्चचे शास्त्रज्ञसुद्धा तत्परतेने हा संगणक वापरायला पुढे आले होते.

आमच्या ह्या टीमने स्वतःची मेमरी सिस्टीम तयार केली होती. त्यासाठी लागणारी मॅग्नेटिक कोअर्स परदेशातून आणली गेली होती. शिवाय फास्ट ऍडर बनविण्यात ती कोअर्स उपयोगात आणली होती. ग्राफिकल डिसप्ले विकसीत करून एकंदर संगणाच्या विकासासाठी एक पाऊल पुढे टाकलं होतं. इतकं करूनही संगणाच्या शाखेत पश्चिमी देशात एवढा जोराने विकास होत होता की, १९६२ पर्यंत ही टेक्नॉलॉजी मागे पडायला लागली होती. ह्या संगणाचा वापर कमी कमी होत गेला. कारण ट्रान्झीसटर्स वापरून जास्त भरवशाचे संगणक प्रचलित होत होते.

के एस काणे उर्फ कमलाकर काणे ह्यांना आम्ही बापुसाहेब काणे असंही म्हणायचो. ते ह्या संगणकावर मुख्य प्रोग्रामर होते. फोर्ट्रान लॅन्ग्वेजमधे ते पारंगत होते. युरोपमधे निरनीराळ्या संगणकाच्या सॉफ्टवेअरवर त्यांचं शिक्षण झालं होतं. दिवसभर TIFR मधे संगणकाच्या सॉफ्टवेअरवर ते डेव्हलपमेंट करायचे. दादर पश्चिम रेल्वेच्या समोर "मामा काणे यांचं स्वच्छ उपहारगृह" आहे त्याचे ते मालक होते.

संध्याकाळी TIFR मधून निघाल्यावर घरी न जाता ते आपल्या उपहारगृहात देखरेख करायला जायचे. बापुसाहेबांची ह्या उपहारगृहात काम करणारी तिसरी पिढी. गल्ल्यावर बसण्यापासून ते भटारखान्यात जाऊन देखरेख करण्यापर्यंत स्वतः कामं करायचे. वेळ पडल्यास स्वयंपाक्याना मदत करायचे. मोठ्या टोपातल्या डाळीच्या आमटीत झारा टाकून ती ढवळण्यापर्यंत काम करत असताना त्याना कुणी पाहिल्यास हेच ते TIFRAC वर काम करणारे प्रोग्रामर का असा संभ्रम होणं कठीण नव्हतं. नंतर ते रात्री १० वाजता उपहारगृह बंद करून घरी जायचे.पुन्हा सकाळी सर्वांच्या अगोदर TIFR मधे येऊन आपल्या कामात मग्न असायचे. सांगण्य़ाचा मतितार्थ एव्हडाच की, पडलेल्या जबाबदारीची जाणीव ठेऊन अतिशय तत्परतेने काम करण्याच्या सवयीमुळे इकडे संगण्काची डेव्हलपमेंट आणि तिकडे उपाहारगृहाची मॅनेजमेंट ह्या दोन टोकाच्या व्यवसायात बापुसाहेब तितकेच व्यस्त असायचे. तसेच इतरही टीम मधले लोक असायचे. TIFR मधून निवृत्त झाल्यावर आता ते उपहारगृहाच्या व्यवसायात व्यस्त असतात.माझा त्यांच्याशी अजूनही संपर्क आहे.

प्रो.नरसिंव्ह हे आमचे बॉस होते.ते भारतातल्या संगणक शास्त्रात विकास करणारे भिष्म म्हणून ओळेखले जायचे. मद्रास युनीव्हरसीटीमधून कम्युनिकेशन इंजीनियरींगची डिग्री घेऊन, युएसमधे कॅलिफोरनीया इंन्स्टीट्युट ऑफ टेकनॉलॉजीमधून इलेक्ट्रीकल इनंजिनीयरींगची डिग्री घेऊन एम.एस झाले. नंतर इंडीयाना युनिव्हरसीटीमधून त्यांनी गणितात पिएचडी केलं होतं.

Fortran (FORmula TRANslation) ही लॅन्गवेज IBM ने डेव्हलप केली होती. गणितातल्या फॉर्म्युल्याचं कोडमधे रुपांतर करण्यात ही लॅन्गवेज फार उपयोगी पडायची. तिला सायंटीफीक लॅन्गवेज म्हणूनही ओळखलं जायचं. प्रोग्रामर्सना कोडमधे लिहून हिचा वापर करायला फारच सोपं जायचं. ह्या लॅन्गवेजबद्दल खूप काही लिहिता येईल. पण तूर्तास एवढं ठिक आहे.

त्यावेळी हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर ह्या निरनीराळ्या शाखा म्हणून समजल्या जायच्या. एकाला दुसर्‍या शाखेबद्दल माहिती नसायची आणि त्याची आवशक्यताही नसायची. परंतु संगणाचा हळुहळू विकास होत गेला तसं हार्डवेअरच्या लोकांना सॉफ्टवेअरची माहिती करून घेण्याची आवशक्यता वाटायला लागली.

व्हॅक्युम ट्युब वापरून TIFRAC संगणक चालत असल्याने तपमानाचा मोठा प्रश्न उभा ठाकायचा. त्यासाठी थंडगार हवेचा प्रचंड वारा आणून त्याची झोत सर्व सर्कीटसवर टाकण्याची जरूरी असायची. हे काम मोठ्या ब्लोअर मधून व्हायचं. तरीसुद्धा दिवसातून दोन पाच ट्युब्स, पाच पंचवीस रेझीस्टर्स निकामी व्हायचे. रोज तास दोन तास मशिन देखभालीसाठी घेऊन पुढे होणारा फॉल्ट चुकवण्यासाठी धडपड करावी लागायची. प्लगइन टाईप युनिट्स असल्याने हे काम सोपं जायचं.

हळुहळू पश्चिमी देशात ट्रान्झीस्टर वापरून संगणक प्रचलित व्हायला लागले होते. CDC, IBM, DEC संगणकाच्या कंपन्यानी मेनफ्रेम सुपर संगणक वापरात आणले होते. १९६१, ६२, ६३चा हा काळ होता.

ह्याबद्दल आणि पुढील संगणाकाच्या विकासाबद्दल पुढे पाहूया. एवढंच म्हणता येईल की TIFRAC चा वापर कमी कमी होत गेला आणि TIFRने CDC 3600 हा संपूर्ण ट्रान्झीस्टरचा सुपर संगणक वापरात आणला आणि त्यानंतर DEC 20 आणि त्यानंतर CYBER 175 सुपर संगणक आणला. ह्या तिन्ही संगणकात माझा सहभाग होता एवढंच तूर्तास सांगतो.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

TIFRACचं उद्गघाटन १९६०साली पं.जवाहरलाल नेहरूंच्या हस्ते झालं.

.

प्रतिक्रिया

उगा काहितरीच's picture

25 Aug 2015 - 11:53 am | उगा काहितरीच

___/\___

खेडूत's picture

25 Aug 2015 - 12:00 pm | खेडूत

क्या बात है !

मस्त माहिती आणि आठवणी .

क्रमश: विसरलेत का काय?

१९६२! त्यानंतर ३० वर्षांनी आम्हीही फोर्ट्रान आणि पास्कलच शिकलो ते आठवले.

३६० केबी च्या फ्लॉप्या आणि बूटेबल आठवल्या.

(प्रगतीचा खरा वेग १९९३ नंतर आणि मग विंडोज ९५ नंतर आला असे वाटते. )

द-बाहुबली's picture

25 Aug 2015 - 12:16 pm | द-बाहुबली

हा हा हा.. काय त्या आठवणी एक दोन बुटमधेच ही फ्लॉपी कामातुन जायची. अन ती हार्डीस्क तर बुट होताना अख्खा टेबल हादरायचा. बहुतेक १२८ एम.बी ची हार्डीस्क होती. दगडच जणू. विंडो ९५ आले अन... जगच बदलुन गेले. पुन्हा मागे वळुन बघायला संधीच मिळाली नाही. मी सर्वप्रथम त्या डॉस बेस्ड कॉमवर डिबेस शिकत होतो. जाम कंटाळलो. काय मजा येइना म्हणून मधेच कोर्स थांबवला. फक्त डेव्ह, पॅकमॅन अन प्रिन्स खेळत बसायचो. :)

मांत्रिक's picture

25 Aug 2015 - 12:07 pm | मांत्रिक

उत्तम माहितीने परिपूर्ण लेख! तांत्रिक विषय असून देखील समजायला अवघड नाही गेला. कृपया लेखमाला लिहा या विषयावर अशी विनंती.

ऋतुराज चित्रे's picture

25 Aug 2015 - 12:09 pm | ऋतुराज चित्रे

छान माहीती'

वीस एक वर्षापूर्वी 'मामा काणे' यांच्या स्वच्छ उपहारगृहात गेलो होतो, तेथे चालु स्थितीत असलेला वॉल्व्हचा रेडिओ होता.

'नवशक्ती' ह्या मराठी दैनिकाच्या पहिल्या पानावर वरील उजव्या कोपर्‍यात 'मामा काणें'च्या स्वच्छ उपहारगृहाची जाहीरात असायची.

एस's picture

25 Aug 2015 - 12:19 pm | एस

तूर्तास तुमच्यासारख्या संशोधकांचा वावर मिपावर आहे ह्याचा अभिमान आहे एव्हढंच सांगतो.

तसेच तूर्तास हा भाग एव्हढाच लिहिला असला तरी या विषयावर अजून सविस्तर लिहावे ही विनंती करतो :-)

असंका's picture

25 Aug 2015 - 2:25 pm | असंका

अगदी हेच..!

संदीप डांगे's picture

25 Aug 2015 - 12:22 pm | संदीप डांगे

_/\_
खूप छान लेख. अजून याबाबतीत विस्तृत लिहता येत असेल तर लिहा. माननीय संपादकांची मदत घेऊन व्याकरण, शुद्धलेखनाच्या बाबतीत अचूक करून घ्यावा. एखादी छोटी लेखमालाच लिहिली तर उत्तम होइल व मिपावर रेकॉर्डस्वरूपात राहू शकेल एक अनमोल खजिना म्हणून.

चिरोटा's picture

25 Aug 2015 - 12:40 pm | चिरोटा

उत्तम माहिती.कोलकात्याच्या आय.एस.आय.मध्येही ह्यावेळेस संगणकावर काम चालू होते असे वाचले होते.

बाबा योगिराज's picture

25 Aug 2015 - 1:15 pm | बाबा योगिराज

अभ्यास पुर्ण लेख आहे. तरी पण विनंती की अजुन ही लेख येऊ दया.................
और दिखावो, और दिखावो......

कैलासवासी सोन्याबापु's picture

25 Aug 2015 - 1:29 pm | कैलासवासी सोन्याबापु

वाह !!! क्या बात है!!

समीरसूर's picture

25 Aug 2015 - 1:58 pm | समीरसूर

फारच छान! अजून येऊ द्या. एक मस्त लेखमालिका होणार हे नक्की!

बॅटमॅन's picture

25 Aug 2015 - 2:04 pm | बॅटमॅन

क्या बात है. _/\_

अनुप ढेरे's picture

25 Aug 2015 - 2:05 pm | अनुप ढेरे

मस्तं! पुढले भागही येउद्या!

सौंदाळा's picture

25 Aug 2015 - 2:07 pm | सौंदाळा

सामंतकाका, मस्त लिहिलय
वाचतोय.

मस्त माहीती. मेनफ्रेमची जुनी कपाटं/पेट्या अजुनही आमच्या कंपनीच्या एका शाखेत चालू अवस्थेत आहेत.

मजेदार माहिती. असेच कधीतरी सुचलं की लिहित जा.इकडे जिवाचे कान करून ऐकायला बसलो आहोत.
आमच्यावेळी खालसा कॅालेजला प्रिन्सिपल म्हणून डॅाक्टर चि वि कर्वे होते.ते बिएआरसी वगैरे संस्थात व्हिजिटिंग प्रोफेसर होते.हौस म्हणून आठवड्याला एक तास ते शिकवायला येत.त्यांचे शिकवणे म्हणजे काही गमतिदार किस्से सांगत.त्या तासाला सर्व विद्यार्थी उपस्थित असायचे.
संगणक मोठी गणिते करतो आणि थकतोही हे आपण ओळखायचे कसे तर एक साधी युक्ती वापरली जायची.ज्या गणिताचे उत्तर आपल्याला माहित असते परंतू ते उत्तर काढायला संगणकाला बराच वेळ लागतो असे गणित करायला सुरुवातीला देतात.आता याची उत्सुकता लागली.सोपे आहे-मोठ्या संख्येचे गुणक काढायला सांगणे.ती एक मूळ संख्याच असली तर उत्तर दोनच गुणक येतात =१ , आणि नंतर तीच संख्या आणि शेरा prime number! अर्थात हे उत्तर काढायला संगणकास रोज वेगवेगळा वेळ लागायचा आणि कळायचे आज थकला आहे!
हाच गुणक काढायचा प्रोग्राम कोड ( वीस बावीस ओळींचा) तुमच्या संगणकात चालवून बघा किती वेळ लागतो.

तसे वाटत आहे आपल्या IT क्षेत्राची मूळ कहाणी वाचताना. अजून लेख येण्याची प्रतिक्षा.

मामा काणे उपहारगृहाचे मालक भारतातले आद्य प्रोग्रॅमर! ऐकावं ते नवलच!

आणखी लिहा. पुभाप्र!

पैसा's picture

25 Aug 2015 - 3:57 pm | पैसा

अजून येऊ द्या!

बॅटमॅन's picture

25 Aug 2015 - 3:58 pm | बॅटमॅन

इंडियन स्टॅटिटिकल इन्स्टिट्यूट कोलकाता इथे १९५३ साली भारतात प्रथम संगणक बनवला गेला, मात्र ते पुढे सस्टेन करणे झाले नाही. यासंबंधी पुरावा म्हणजे तेथील म्युझियममध्ये फोटो व माहिती पाहिलेली आहे. अधिक काही कळाले तर टाकतो.

बॅटमॅन's picture

25 Aug 2015 - 4:00 pm | बॅटमॅन

In India, the first analog computer was designed by Samarendra Kumar Mitra and built by Ashish Kumar Maity at ISI in 1953, for use in computation of numerical solutions of simultaneous linear equations using a modified version of Gauss-Siedel iteration.[39] In 1955, the first digital computer of India was procured by ISI.[39] This machine was of a model named HEC-2M, manufactured by British Tabulating Machine Company (BTM).[39] As per the agreement with BTM, ISI had to take care of the installation work and maintenance of it,[39] before it became operational in 1956.[40] Though this HEC-2M machine and the URAL-1 machine, which was bought in 1959 from Russia,[39] were operational till 1963,[39] ISI began development of the first second-generation digital computer of India in collaboration with Jadavpur University (JU).[39] This joint collaboration led by the head of the Computing Machines and Electronics Laboratory at ISI, Samarendra Kumar Mitra, produced the transistor-driven machine ISIJU-1, which became operational in 1964.[40] The first annual convention of the Computer Society of India (CSI) was hosted by ISI in 1965.[39][40] The Computer and Communication Sciences division of ISI produced many eminent scientists such as Samarendra Kumar Mitra (who was its original founder), Dwijesh Dutta Muzumder, Sankar Kumar Pal, Bidyut B. Chaudhuri, Nikhil R. Pal, Bhabani P. Sinha, Bhargab B. Bhattacharya, Malay K. Kundu, Sushmita Mitra, Bhabatosh Chanda, C. A. Murthy, Sanghamitra Bandyopadhyay and many. ISI is regarded as one of the top most centres for research in Computer Science in India and attracts some of the best students in the country.[41]

संदर्भ

https://en.wikipedia.org/wiki/Indian_Statistical_Institute#Computer_science

राजेंद्र मेहेंदळे's picture

25 Aug 2015 - 4:24 pm | राजेंद्र मेहेंदळे

मस्तच माहीती...आणि ती पण अशा माणसाकडुन जो या सगळ्यात सहभागी होता.

धन्य त्या मामा काणेंची... त्यान्चा हा पैलू माहीतच नव्हता.

अवांतर-- व्हॉल्व्ह चे तंत्र मागे पडुन , ट्रान्झिस्तर चे तंत्र मागे पडुन इलेक्ट्रॉनि़क चिप आल्या आणि असा लेख वाचला की आता या चिपवर किती ट्रान्झिस्तर मावतील याची परिसीमा गाठली गेल्याने पुढचा विचार चालु आहे.

हा लेख

http://www.geek.com/chips/silicon-shrinking-will-end-about-2020-what-wil...

यशोधरा's picture

25 Aug 2015 - 8:11 pm | यशोधरा

काका,मस्तच लिहिल्यात! :)

आवडला लेख.माहितीपुर्ण

मुक्त विहारि's picture

25 Aug 2015 - 9:00 pm | मुक्त विहारि

अजून असेच लेख येवू द्या....

ही विनंती...

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Aug 2015 - 12:57 am | डॉ सुहास म्हात्रे

रोचक इतिहास !

जरा सविस्तर जरूर लिहा.

गामा पैलवान's picture

26 Aug 2015 - 12:02 pm | गामा पैलवान

श्रीकृष्ण सामंत,

बसल्या जागी ज्युरासिक पार्काची सफर घडवून आणविल्याबद्दल आभार! :-) उपाहारगृहाचे मालक कोडिंग करायचे हे पाहून अंमळ मौज वाटली. डायनर म्हणू की डायनोसॉर, दोन्ही चालवणे कौशल्याचे काम आहे.

आ.न.,
-गा.पै.

अंतरा आनंद's picture

26 Aug 2015 - 12:04 pm | अंतरा आनंद

माहिती आवडली. अजून लिखाणाची प्रतिक्षा.