प्रसिध्द शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला अन लगेच वादाला तोंड फुटले. वृत्तवाहिन्या अन वृत्तपत्रांमधून बरीच मत मतांतरे बघावयास अन वाचावयास मिळत आहेत. बराच काळ वाट पाहून इथे शेवटी या विषयावर काथ्याकुट टाकतो आहे.
बाबासाहेबांनी त्यांचे अख्खे आयुष्य शिवरायांच्या जीवनपटावर लोकउद्बोधक कार्यक्रम व शाहिरी करण्यात व्यतीत केले. "जाणता राजा " या लोकप्रिय कार्यक्रमामुळे शिवराय लहान मोठ्यांना अधिक सुलभतेने समजण्यास मदत झाली. पण पुरस्कार विरोधकांचा मुख्य आक्षेप हा आहे कि बाबासाहेबांनी चुकीचा इतिहास कथन केला. शिवरायांच्या जन्म तिथिबद्दल वाद, त्यांच्या जीवनात रामदास स्वामी यांना गुरु म्हणून चिकटवण्याचा प्रमाद, जीजाउंच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्यात जेम्स लेनला केलेली कथित मदत व इतर अनेक आक्षेप त्यांच्यावर या अनुषंगाने आहेतच.
या आक्षेपांमुळे त्यांच्या आयुष्यभराच्या कार्याला बट्टा तर लागला नाही ना?
पुरस्कार ज्या कार्यासाठी मिळतोय ते कार्य वादविवादरहित असावे या मताचा मी असल्याने बाबासाहेबांनीच हा पुरस्कार नाकारावा असे मला वाटते.
मिपाकरांना याबद्दल काय वाटते, हे जाणण्यास उत्सुक.
महाराष्ट्र भूषण पुरस्कार वाद
गाभा:
प्रतिक्रिया
18 Aug 2015 - 5:38 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
पुरस्कार स्वीकारावा असे आमचे मत.दोन चार राष्ट्रवादीच्या टग्यांच्या धुडगुसाला जुमानता कामा नये. ह्यांचा हेतु प्रामाणिक असता तर त्यांनी बाबासाहेबांवर टिका करण्याऐवजी मूळ मुद्द्यांवर ईतिहास मंडळाबरोबर चर्चा केली असती.पण आडनाव पुरंदरे असल्याने व तो पुरस्कार फडणवीस देणार असल्याने जळजळ चालू आहे.
19 Aug 2015 - 12:57 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
आँ!!!!
अरे कोणीतरी कांदा आणा रे माझ्या नाकाला लावायला. =))
20 Aug 2015 - 11:34 pm | डॉ सुहास म्हात्रे
माईंना त्यांच्या 'ह्यां'नी त्यांचे मत सांगणे थाबविल्यापासून माई आमुलाग्र बदलल्यात !
विशेष सूचना : कांद्यांचे भाव लई वाढू र्हायलेत, वेळेत साठा करून ठेवा. नाय्तर मंग कठीण हाय =))
21 Aug 2015 - 12:42 am | विकास
ह्यांचा हेतु प्रामाणिक असता तर
ह्यातील "ह्यांचा" म्हणजे कोणाचा? ;)
18 Aug 2015 - 5:47 pm | दत्ता जोशी
आक्षेप एव्हढेच नाहीत . शिवाजीमहाराजांचे व्यक्तिमत्व मुस्लिम विरोधी रंगवले आहे ते खोटे असून शिवाजी महाराज हे सेक्युलर होते - असाही एक आक्षेप आहे. आजच अजून एक बातमी वाचली. पानिपतकार विश्वास पाटलांनी सर्व आक्षेप्कार्त्यांना चर्चेचे आवाहन दिले आहे. हे मला फार आवडलं. चर्चा होणे पुरावे देवाण घेवाण करून सत्य परिस्थिती समाजासमोर येणे गरजेचे आहे. तसे न होता लोकांच्या भावनांना आवाहन देवून बुद्धीभ्रम आणि तेढ निर्माण करण्याचे कार्य होत आहे असे मला वाटते.
18 Aug 2015 - 5:51 pm | कपिलमुनी
हाहा हा !
भलत्याच अपेक्षा बॉ तुमच्या
18 Aug 2015 - 5:51 pm | चलत मुसाफिर
बाबासाहेब पुरंदरे हे स्वतःला शिवरायांचे शाहीर असेच म्हणवून घेतात. इतिहासकार असल्याचा दावा त्यांनी कधीही केलेला नाही. परंतु अवघे आयुष्य शिवस्तुतीला वाहून दिलेल्या या ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्वाचा सन्मान हा व्हायलाच हवा. त्यांचे कार्य निर्विवादपणे थोर आहे. शिवरायांचा जीवनपट त्यांना मुखोद्गत आहे. राजांचे एकूणएक गडकिल्ले त्यांनी पालथे घातले आहेत. हजारो लोकांनी त्यांची पुस्तके, व्याख्याने आणि अर्थातच 'जाणता राजा' यांवर भरभरून प्रेम केले आहे. त्यांच्याशी वैचारिक मतभेद असू शकतात. नव्हे, असावेतच. कारण इतिहास हा विविधरूपी असतो. पण हा पुरस्कार योग्य व्यक्तीस मिळत आहे हे नक्की.
18 Aug 2015 - 5:51 pm | संदीप डांगे
बस... एवढंच?
18 Aug 2015 - 6:20 pm | पिलीयन रायडर
अश्स्शाच नावच एक धागा होता ना रे आधी??
असो.. पुरस्कार स्वीकारावा. ४ टग्यांनी धुडगुस घातला म्हणुन त्यांना जास्त महत्व देण्याचे कारण नाही.
18 Aug 2015 - 6:34 pm | खटपट्या
+१
18 Aug 2015 - 6:51 pm | फुलथ्रॉटल जिनियस
राष्ट्र्वादीचे आमदार मा.ना.जितेंद्रभाऊ आव्हाड यांनी उपस्थीत केलेले मुद्देही योग्य आहेत असे मला वाटते, या मुद्द्यांचे निराकरण करणे गरजेचे आहे.
18 Aug 2015 - 7:24 pm | आदिजोशी
लिस्ट आहे का?
18 Aug 2015 - 7:32 pm | श्रीगुरुजी
नानासाहेबने आधी माईसाहेबच्या नावाने पुरस्काराला पाठिंबा जाहीर केला आणि आता फुलबॉटलच्या नावाने पुरस्काराच्या विरोधकांचे समर्थन करतोय. हे अगदी पवारांसारखं झालं. म्हणजे आधी ३-४ वेळा पवारांनी स्वहस्ते बाबासाहेबांचा सत्कार केला, स्वहस्ते २०१३ मध्ये त्यांना डी.लिट. ही पदवीही दिली. तेव्हा त्यांना बाबासाहेबांबद्दल काहीही आक्षेप नव्हते. आणि आता त्यांना देण्यात येणार्या पुरस्काराला ते विरोध करीत आहेत.
19 Aug 2015 - 3:00 pm | चिनार
फुलथ्रॉटल जिनियस यांचं बरोबर आहे..जीन्तेंद्र आव्हाड हे मुख्यमंत्री पदासाठी पात्र असलेले एक ऋषीतुल्य, अभ्यासू, प्रामाणिक व्यक्तीमत्व आहे. त्यांना मुख्यमंत्री बनवा.
19 Aug 2015 - 8:21 pm | श्रीरंग
संपूर्ण विश्वाचे अधिपत्य करण्याची योग्यता असलेल्या या थोर विभूतीस एका यःकश्चित राज्याचे मुख्यमंत्री या रूपात पाहूच कसे शकता तुम्ही? "save gaza" असे लिहिलेल्या टी शर्टातील त्यांची छबी डोळ्यासमोर आली, की काटा येतो अंगावर. कोणत्याही क्षणी आपल्या पक्षातील ४ गावगुंड घेऊन आव्हाड महाराज गाझा पट्टीवर अवतीर्ण होऊन पापाचे निर्दालन करतील, असे तेव्हा वाटायचे.
18 Aug 2015 - 7:18 pm | विवेकपटाईत
सेकुलर इतिहासकारांच्या मते टिपू सुलतान हा सेकुलर होता. अधिक काही बोलणे योग्य नाही.
विरोध करणार्याने स्पष्ट बोलले पाहिचे 'ब्राह्मण' व्यक्तीला कुठलाही पुरस्कार देणे आम्हाला खपणार नाही. आमच्या राजनीतिक पोळी भाजण्याच्या दृष्टीने हे योग्य नाही.
18 Aug 2015 - 7:27 pm | अर्धवटराव
महाराष्ट्राला 'भूषण' ठरावीत अशी अनेक व्यक्तीमत्वे हयात असताना उगाच मातीगोट्याच्या किल्ल्यांवर वेळ दडवणार्या शाहीरांना का म्हणुन पुरस्कार द्यावा. लाखमोलाच्या ( आता तर अरबो मोलाच्या ) कामगीर्या करणारे राहिले बाजुला. आणि हे टिकोजीराव नागपूरच्या आदेशाने पुरस्कार लाटायला निघाले. काय तर म्हणे शिवशाहीर. त्यापेक्षा आधुनीक काळातल्या कर्तुत्ववान लोकांचे पोवाडे गाणारे शाहीर शासनाला दिसत नाहि काय...
18 Aug 2015 - 7:35 pm | जिन्क्स
महाराष्ट्राला 'भूषण' ठरावीत अशी अनेक व्यक्तीमत्वे हयात असताना
किमान ५ नावे सांगा. मग पुढे चर्चा करू.
18 Aug 2015 - 8:51 pm | अर्धवटराव
पण ति तुम्हाला पचणार नाहित.
19 Aug 2015 - 1:19 pm | मृत्युन्जय
किमान ५ नावे सांगा. मग पुढे चर्चा करू.
१. जितेंद्र आव्हाड
२. शरद पवार
३. अजित पवार
४. सुप्रियाताई सुळे
५. पुरुषोत्तम खेडेकर
अजुन पाहिजे असतील तर अजुन नावे देतो. इतकी महनीय व्यक्तिमत्वे भारतात असताना पुरंदरेंसारख्या माणसांना महाराष्ट्रभूषण मिळावा हा महाराष्ट्राचा अपमान आहे. महाराष्ट्राच्या जातीयवादी राजकारणाची आताशा किळस यायला लागली आहे,
19 Aug 2015 - 1:22 pm | प्यारे१
महाराष्ट्राच्या जातीयवादी राजकारणाची आताशा किळस यायला लागली आहे,
हे वाक्य वरील प्रतिसादात 'फाऊल' म्हणून गणल्या गेले आहे.
19 Aug 2015 - 1:24 pm | पैसा
नाना फडणवीस बाबासाहेब पुरंदर्यांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार देऊन जातीयवादी राजकारण करत आहेत असं वाचायचं अस्तं ते.
19 Aug 2015 - 1:27 pm | प्यारे१
आता बरोबर आहे.
किंवा जातीयवादी राजकारणाची किळस ऐवजी अभिमान अथवा कौतुक वाटलं योग्य ठरेल.
19 Aug 2015 - 1:30 pm | मृत्युन्जय
पैसातै बरोब्बर बोलत्यात. त्यो नाना मुख्यमंत्री झाल्यापासुन महाराष्ट्र जातीयवादी व्हायालाय परत
19 Aug 2015 - 8:30 pm | अनिरुद्ध.वैद्य
नाना हे नाव स्पॉटनानाच्या धर्तीवर अमित शहा ह्यांना द्यावे का?
19 Aug 2015 - 1:31 pm | अनिरुद्ध.वैद्य
आमच्या नारायणरावांना वगळल्याबद्दल निषेध
19 Aug 2015 - 1:37 pm | खेडूत
तुमचे म्हणजे कुठल्ले ?
पेशवाईतले की शिंदूदुर्गातले?
19 Aug 2015 - 5:50 pm | अनिरुद्ध.वैद्य
शिंदुदुर्गातले हो महाराजा. पेशवाईतले नक्को ...
19 Aug 2015 - 3:10 pm | चिनार
रामदास आठवले यांचे नाव वगळून जातीय राजकारणाचा नीच स्तर गाठल्याबद्दल मृत्युंजय यांचा जाहीर निषेध.
कुठे फेडाल ही पापं?
अजूनही कितीतरी नाव देत येतील. पण फक्त पाचच नाव देण्याचे परस्पर ठरवून कितीतरी जातींवर अन्याय केल्याबद्दल "किमान ५ नावे सांगा. मग पुढे चर्चा करू" या प्रतिसादाचाच जाहीर निषेध..!
महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रभूषण हा पुरस्कार बंद करून सगळ्या जाती, उपजातीन्साठी "जाती भूषण ' हा पुरस्कार सुरु करावा ही नम्र विनंन्ती
18 Aug 2015 - 7:42 pm | श्रीगुरुजी
>>> महाराष्ट्राला 'भूषण' ठरावीत अशी अनेक व्यक्तीमत्वे हयात असताना
बाबासाहेब सुद्धा हयात आहेत आणि ते महाराष्ट्राचे भूषणही आहेत.
18 Aug 2015 - 7:47 pm | प्रचेतस
उपरोधात्मक प्रतिसाद आहे हो तो. :)
18 Aug 2015 - 7:56 pm | प्रसाद गोडबोले
कशावरुन ?
18 Aug 2015 - 8:01 pm | प्रचेतस
दिसतंय की सरळ. नायतर अर्धवटरावांनाच विचारा की हाकानाका.
18 Aug 2015 - 8:40 pm | प्रसाद गोडबोले
चला अर्धवटरावांनाच विचारु ...
अर्धवटराव तुमचे आडनाव काय आहे हो ?
18 Aug 2015 - 8:53 pm | अर्धवटराव
अगोदरच इतका वाद झाला आहे. त्यात आमचं नाव देऊन आणखी गदारोळ कशाला करावा.
19 Aug 2015 - 12:10 pm | प्रसाद गोडबोले
तसं नाही हो ... आजकाल आडनावावरुन ठरते की वाद निर्माण करायचा की नाही ते !
=))
20 Aug 2015 - 5:00 pm | प्रमोद देर्देकर
अर्धवटराव तुमचे आडनाव काय आहे हो ?>>> प्रगो नुसत्या आडणावाने काय हो होणार उदा. जोशी म्हंटले तर आग्री लोक ही जोशी आहेत. मी म्हणतो इथुन पुढे अशा प्रकारच्या धाग्यावर प्रतिक्रिया देताना सर्वांनी आपापली जातच द्यावी ना.
म्हणजे मग प्रतिक्रियेचे स्वरुप जास्त सस्पष्ट होईल हाकानाका.
वरिल माझा प्रतिसाद जर गैर वाटत असेल तर संपा ने तो उडवुन लावावा.
20 Aug 2015 - 10:02 pm | रमेश आठवले
देर्देकर साहेब ! आपल्या धाग्याच्या किंवा प्रतिसादाच्या सुरवातीला आपणच आपली जात ,पोटजात , कुल, गोत्र वगैरे माहिती टाकून या प्रथेची सुरुवात करा.खरे नाव लिहा. मिपा वर टोपण नाव असेल तर ते नको .
18 Aug 2015 - 7:30 pm | बबन ताम्बे
शिवरायांचे किल्ले मातीगोटयांचे ?
18 Aug 2015 - 7:41 pm | श्रीगुरुजी
पवारांनी आणि राष्ट्रवादीने हा वाद मुद्दाम उठविला आहे. त्यामागे सबळ कारणे आहेत.
१९९९ साली राष्ट्रवादीचा इतिहास पाहिला तर प्रचंड भ्रष्टाचार आणि जातीयवाद या दोनच क्षेत्रात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अफाट कर्तृत्व गाजविल्याचे लक्षात येईल. अजित पवार, तटकरे, भुजबळ, पद्मसिंह पाटिल, कोल्हापूरच्या महापौर माळवे, पुण्याच्या शिक्षण मंडळातले चौधरी आणि धुमाळ, गेला महिनाभर फरारी असलेले रमेश कदम इ. भ्रष्टाचाराची आघाडी सांभाळली तर आव्हाड, नबाब मलिक, संभाजी ब्रिगेड इ. नी सतत प्रक्षोभक विधाने करून जातीयवाद वाढविला.
जूनमध्ये भुजबळांच्या मालमत्तेवर धाड घालून २५६० कोटी रू. ची मालमत्ता सापडल्यावर दुसर्या दिवशी तावडे, पंकजा भुजबळ इ. ची नसलेली प्रकरणे बाहेर येणे हा योगायोग नव्हता. तावडे, मुंडे इ. मुळे माध्यमातून भुजबळांचे नाव आपोआप अदृश्य झाले.
कालच १ महिनाभर फरारी असलेला आमदार रमेश कदम सापडणे आणि कालपासूनच पुरंदर्यांविरूद्ध अचानक उग्र वक्तव्ये सुरू होणे हा देखील योगायोग नाही. किंबहुना काल साहेबांनी स्वत:हूनच कदमला पोलिसांच्या स्वाधीन होण्यास सांगितले असावे. त्याच्या अटकेची चर्चा पुरंदर्यांच्या पुरस्कारामुळे माध्यमात फारशी होणार नाही हा त्यांचा अंदाज अचूक ठरला.
भविष्यात तटकरे किंवा अजित पवारांविरूद्ध कारवाई सुरू झाली की लगेच दुसर्या दिवशी भाजप नेत्यांची नसलेली प्रकरणे जाहीर करून आपल्या नेत्यांबद्दल माध्यमात चर्चा होणार नाही अशी व्यवस्था साहेब नक्कीच करू शकतील.
19 Aug 2015 - 9:44 am | अमित मुंबईचा
अगदी बरोबर, हे वाचून यशवंत दत्त यांच्या सरकारनामा चित्रपटाची आठवण झाली. असेच काहीसे राजकीय डावपेच होते त्यात.
18 Aug 2015 - 7:55 pm | प्रसाद गोडबोले
हे सर्व प्रकरण ब्राह्मण समाजासाठी अत्यंत उपयुक्त असा अभ्यास आहे !
मी अन्यत्र केलेल्या विधान ह्या निमित्ताने परत क्वोट करत आहे !
बाबासाहेब ब्राह्मण आहेत हेच एक स्पष्ट कारण आहे ह्या संपुर्ण वादाचे ! ९० वर्षांचे संपुर्ण योगदान आज नुसतेच मातीमोल नव्हे तर वादग्रस्त झालेले दिसत आहे !
समस्त ब्राह्मण समाजाने ह्या निमित्ताने पुनरेकवार , सर्व समाज ,आपले सामाजिक योगदान आणि समाजाची त्यावरील प्रतिक्रिया इत्यादी विषयांवर आत्मचिंतन करावे !
-
सन्यस्तखड्ग प्रगो
ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊ
18 Aug 2015 - 8:37 pm | जेपी
काही का असेना यामुळे बर्याच आयचणीत पडलेल्यांना चमकोगिरी करायची संधी मिळाली.
18 Aug 2015 - 8:52 pm | आनन्दा
वरील प्रतिसाद योग्यच आहेत. पण या निमित्ताने अजून एक गोष्ट ध्यानात घेणे आवश्यक आहे. सारे डावे/ निधर्मी विचारवंत एक होऊन या पुरस्काराचा निषेध करत असताना बाबासाहेबांच्या बाजूने एकही प्रथितयश व्यक्ती उभी राहू नये याचे सखेद आश्चर्य वाटते. प्रसारमाध्यमे देखील या विषयाला नेगेटिव्ह प्रसिद्धी देत आहेत अशी माझी समजूत होऊ लागली आहे. तो देखील निधर्मी अजेंडा असावा. नाही म्हणायला लोकसत्ताने आज अग्रलेख लिहून या विषयाला थोडे फूटेज दिले. पण एकंदरीत प्रसारमाध्यमांची या विषयातील भूमिका संशयातीत नाही असे म्हणावयास शंका नसावी.
दुसरा विषय असा की आता या विषयात सर्वसामान्य नागरिकांनीच पुढाकार घेऊन बाबासाहेबांच्या पुरस्काराचे समर्थन करावे का असा विचार सध्या करत आहे.. त्यानिमित्ताने काही ब्लॉग पोस्ट, निवेदने, सभा वगैरे घेऊन आपण बाबासाहेबांच्या सोबत आहोत असे सरकारला दाखवून द्यावे का असा विचार करू लागलो आहे.
18 Aug 2015 - 9:50 pm | तीरूपुत्र
टीका ह्या होत राहतील पण शिवशाहिरांनी पुरस्कार स्विकारावा.काहीतरी कारण काढून त्यांना पुरस्कार मिळायला नको म्हणून त्यांच्या वर टीका होत आहे.कारण काय ते त्यांनाच माहित .जे टीका करत आहेत त्यांनी शिवाजी महाराज बद्दल किती वाचन आणि लेखन केलं????
18 Aug 2015 - 10:52 pm | प्रदीप साळुंखे
संभाजी ब्रिगडने या कारणावरून जो उच्छाद मांडला आहे तो निंदनीय आहे. जातीद्वेष उराशी बाळगून काही साध्य होत नाही. सर्वच ब्राह्मण समाजाला 'त्या' नजरेतून बघून चालणार नाही.ब्राह्मण समाजाचे राष्ट्रासाठीचे योगदान उल्लेखणीय आहे अर्थात इतरांचे नाही असे मी म्हणत नाही.पण आपण हिंदूच जर असे एकमेकांविषयी तिरस्काराची भावना बाळगणार असू तर मग भविष्य कठीण आहे, अर्थात काळाच्या ओघात आणि ग्लोबलायझेशनमुळे सर्व जातीपातींचं आवरण संपून जावं हीच अपेक्षा.
18 Aug 2015 - 11:33 pm | रमेश आठवले
शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला त्रिपाठी आडनाव असलेला एक ब्राह्मण कवि हजर होता. हा मुळचा कानपूर जवळच्या गावाचा होता. त्याला भूषण हा किताब चित्रकुट च्या राजाने दिला होता. कविराज भूषण याने शिवाजी राजांची स्तुति करणारी बरीच कवने ब्रज भाषेत लिहिली आहेत. ही कवने महाराष्ट्रात ही लोकप्रिय आहेत
ही पूर्वपीठीका असताना दुसऱ्या एका ब्राह्मणाने मराठी मध्ये महाराजांची स्तुति केल्याबद्दल त्याला भूषण असा किताब मिळत असेल तर ह्या दुसऱ्या भूषण पुरस्कारा विरुद्ध एवढा गदारोळ का ?
18 Aug 2015 - 11:44 pm | raudransh_27
बार्हमण म्हणुन विरोध करतात’’
जातीची पोपटपंची करत आहेत.
त्यांनी आधी खालील महाराष्ट्रभुषण प्राप्त व्यक्तींची यादी वाचावी.
● १९९६ - पु.ल.देशपांडे (साहित्य)
● १९९७ - लता मंगेशकर (कला,संगीत)
● १९९९ - विजय भटकर (विज्ञान)
● २००१ - सचिन तेंडुलकर (क्रीडा)
● २००२ - भीमसेन जोशी (कला,संगीत)
● २००३ - अभय व राणी बंग (आरोग्यसेवा)
● २००४ - बाबा आमटे (समाज सेवा)
● २००५ - रघुनाथ अनंत माशेलकर (विज्ञान)
● २००६ - रतन टाटा (उद्योग)
● २००७ - रा.कृ.पाटील (समाज सेवा)
● २००८ - नाना धर्माधिकारी (समाजसेवा)
● २००८ - मंगेश पाडगावकर (साहित्य)
● २००९ - सुलोचना लाटकर (कला,सिनेमा)
● २०१० - जयंत नारळीकर (विज्ञान)
● २०११ - अनिल काकोडकर (विज्ञान)
वरील यादीमध्ये बहुतांश व्यक्ती ब्राह्मण असल्याचे दिसते.
जर आमचा विरोध ब्राह्मणांना असता तर वरील लोकांच्या पुरस्कारालाही
आम्ही विरोध केला नसता का ? मग पुरंदरेंनाच आमचा विरोध का ?
★ पुरंदरेंना विरोध असण्याची कारणे –
● पुरंदरेंनी ‛‛राजा शिवछत्रपती’’ आणि ‛‛लालमहाल’’
या कादंबरीतुन राष्ट्रमाता जिजाऊ व छत्रपती शिवरायांबद्दल
अत्यंत अवमानकारक व संतापजनक लिखाण केले.
● ‛‛राजा शिवछत्रपती’’ कादंबरीतुन स्वराज्य निर्मीतीच्या कार्यात
स्वतःचे रक्त सांडणाऱ्या बारा मावळ आणि महाराष्ट्रातील सरदारांच्या
आईबद्दल खुप भयानक व विकृत लिखाण केले.
● ‛‛राजा शिवछत्रपती’’ कादंबरीत कुणबीणी म्हणजे कुणब्याची
(शेतकऱ्याची) पत्नींविषयी खुप किळसवाणे व बदनामीजनक लिखाण केले.
● पुरंदरेंनी महाराष्ट्रात शिवजयंती तारीख-तिथी वाद सुरु करुन
शिवप्रेमींमध्ये फुट पाडली.
● पुरंदरेंनी स्वतःच्या लिखाणातुन मानवतावादी, धर्मसहिष्णु
छत्रपती शिवरायांची प्रतिमा गोब्राह्मणप्रतिपालक व मुस्लिमविरोधी
एवढी संकुचित करुन छत्रपती शिवराय हे दंगलीचे प्रतिक म्हणुन उभे केले.
हा शिवरायांच्या व्यक्तिमत्वाचा अवमान आहे.
● पुरंदरेंनी खोटा इतिहास लिहला. शहाजीराजे गैरहजर दाखविले.
तुकोबांना अनुल्लेखाने दुर्लक्षित ठेवले.
तसेच दादु कोंडदेव आणि रामदास स्वामी हे
काल्पनिक गुरु शिवरायांच्या डोक्यावर बसवले.
● २००३ मधे आलेल्या जेम्स लेन लिखीत पुस्तकाची पार्श्वभुमी तयार करण्याचे, त्या पुस्तकाचे महाराष्ट्रात वितरण करण्याचे आणि त्या पुस्तकाचा प्रचार करण्याचे काम पुरंदरे आणि त्यांच्या पुरंदरे प्रकाशनने केले.
● राजघराण्यांतील व सरदारघराण्यांती
ल अनेक ऐतिहासिक कागद,दस्तावेज, रुमाल,पत्रे,ताम्रपत्रे,शस्त्रे संशोधनाच्या नावाखाली नेऊन नष्ट करण्याचे काम पुरंदरेंनी केले.
● पुरंदरेंच्या पुस्तकावर,लिखाणावर १ कोटीचा दावा,खटला आणि ४-५ ठिकाणी फौजदारी गुन्हा व तक्रारी दाखल आहेत.
● पुरंदरे इतिहाससंशोधक नाहीत.त्यांचे लिखाण कुठेच संदर्भासाठी वापरले जात नाही.ते शाहीर नाहीत.त्यांनी एकही पोवाडा लिहलेला नाही.हे सगळे त्यांनी स्वतः कबुल केले आहे. यापुर्वी २००४ मध्ये पण त्यांना पुरस्काराची घोषणा झाली होती.परंतु त्यांच्या वादग्रस्त लिखाण व वागण्यामुळे त्यावेळी हा पुरस्कार रद्द झाला होता.मग आता हा पुरस्कार देण्यासाठी फडणवीस एवढी खटाटोप का करत आहेत ?
हे व असेच अनेक आक्षेप पुरंदरेंवर आहेत.त्यामुळे पुरंदरे ब्राह्मण असल्यामुळे त्यांना विरोध होतोय असले फुटकळ व बालीश अफवा पसरवणाऱ्या बाजारबुणग्यांनी पुरंदरेंवरील आरोप खोडुन दाखवावेत.ब.मो.पुरंदरे ही विकृती आहे आणि अशा विकृतीचा सन्मान करुन संस्कृतीचा अवमान करण्याला आमचा विरोध आहे.
जय शिवराय.
19 Aug 2015 - 1:42 am | अर्धवटराव
मराठा जहागीरदारांचा कावेबाजपणा पुर्वी होता तसाच आजही आहे. बहुजन समाजाच्या भरोशावर स्वराज्य निर्माण झालं. पण मराठे सरदार, मनसबदार झाले. भटांना दक्षीणा मिळाली. पण बहुजन समाज कायमच दुर्लक्षीत राहिला. जरा स्वातंत्र्य मिळाल्यावर बहुजनांनी काहि भलं करावं म्हटलं तर हे ब्रीगेडी आले बोकांडी बसुन राजकारणाची मलाई ओरपायला. त्यांना वाटते कि भटांना शिव्या दिल्या कि आपण झालोच बहुजनांचे तारणहार. त्याकाळी त्यांनी शिवाजीला मारायचा प्रयत्न केला ( विषाळगडाच्या पायथ्याशी कोण वेढा घालुन बसले होते आठवतय का? ) आज हे बहुजनांचं अस्तित्व मारायला निघाले आहेत ( सामान्य शेतकर्यांची पिळवणुक कोण करतय दिसतय का? ) पण आता त्यांचं पितळ उघडं पडलं आहे.
जय बहुजन.
19 Aug 2015 - 2:44 am | पिलीयन रायडर
तुम्ही उत्तर देणार नाही (हे जे वर लिहीलय ते ही कॉपी पेस्टेड असल्याचाच भास होतोय कार्ण सगळं एकदा आधी चेपुवर वाचलय..) तरीही...
पुस्तकातले उतारे दाखवा. फोटो काढुन इथे डकवा. नुसतेच भडकाऊ शब्द वापरु नका.
पुरावा द्या.
पुन्हा एकदा, कोणत्या वाक्यांमधुन जे ज्ञान मिळाले?? सिद्ध करा.
तुम्हाला पटत नाही म्हणुन खोटं आणि पटलं तरच खरं असं नसतं.
● २००३ मधे आलेल्या जेम्स लेन लिखीत पुस्तकाची पार्श्वभुमी तयार करण्याचे, त्या पुस्तकाचे महाराष्ट्रात वितरण करण्याचे आणि त्या पुस्तकाचा प्रचार करण्याचे काम पुरंदरे आणि त्यांच्या पुरंदरे प्रकाशनने केले.
नष्ट केले???? पुरावे द्या.
तुम्हीच केले असणार अजुन काय... कमालच झाली बिनडोकपणाची..
लक्षात घ्या तुम्ही फार गंभीर आरोप केले आहेत. माझ्यामते तुमच्यावर नक्कीच अब्रुनुकसानीचा दावा पुरंदरे करु शकतात. विकृत काय.. किळसवाणे काय? समजतं का तुम्हाला की कुणाविषयी लिहीता आहात???
नाही आता तुम्ही मला पुरावे दाखवाच. मला बघायचंच आहे की आम्हाला का नाही कधी असली विकृत वर्णनं दिसली.
19 Aug 2015 - 7:37 am | अजया
पिराच्या संपूर्ण प्रतिसादाला +१०००
19 Aug 2015 - 9:19 am | आनन्दा
+१०००
चला चला. उत्तर आणि पुरावे द्या. नुसती पिंक टाकून पळून जाऊ नका. कोणत्याही जाणत्या शिवप्रेमीसाठी बाबासाहेबांचा अपमान म्हणजे शिवरायांचाच अपमान आहे. तेव्हा परत या.
19 Aug 2015 - 10:03 am | किसन शिंदे
पिलियन रायडरच्या संपूर्ण प्रतिसादाशी सहमत! कोणत्याही गोष्टीबद्दल हातात योग्य आणि संपूर्ण माहीती असेल तरच ती लोकांना दाखवावी. मिळालेल्या साधनांचा गैरवापर करून तुमचेच विखारी आणि विकृत विचार प्रसवणे बंद करा.
(मायला! महाराजांनाही नाही सोडलं या नालायक लोकांनी राजकारण करण्यासाठी)
22 Aug 2015 - 11:47 pm | हेमंत लाटकर
तुमच्याशी सहमत
19 Aug 2015 - 7:45 am | अजया
व्हाॅट्स अॅपवरचं ज्ञान फाॅरवर्ड करायला डोकं लागत नाही.निदान कोणाबद्दल काय फाॅरवर्ड करतोय हे कळले तरी खूप.हे फाॅरवर्ड करणार्यानी किती साहित्य वाचलंय पुरंदर्यांचं?
आपली लायकी आहे का अशा प्रकारची भाषा वापरून एखाद्या व्यक्तीचं चारित्र्यहनन करण्याची? असे प्रश्न पडत नाहीत का?
पु.ल.देशपांड्यांनी पुरंदर्यांबद्दल गणगोत या पुस्तकात लिहिलेला हा लेख जरूर वाचा!
"मी त्या वेळी दिल्लीला सरकारी चाकरीत होतो. सुटीत मुंबईला आलो होतो. उत्तरेस कूच करण्यापूर्वी सोबतीला चार मराठी पुस्तके घ्यावीत म्हणून एका पुस्तकाच्या दुकानात शिरलो. केवळ योगायोगाने काउंटरवर पडलेल्या शिवचरित्राचा पहिला खंड हाती पडला. साऱ्या महाराष्ट्रातल्या शुभदेवतांना केलेल्या सुरुवातीच्या आवाहनानेच मनावरची धूळ झटकली. “सुदिन सुवेळ मी शिवराजाच्या जन्माचं व्याख्यान मांडलंय-आई, तू ऐकायला ये” ही तुळजाईला घातलेली हाक जिवाला चेतवून गेली. त्या शिवचरित्रातला ‘उदो उदो अंबे’चा जागर म्हणजे महाराष्ट्राचा पाना- दोन पानांत उभारलेला सांस्कृतिक इतिहास आहे. बळवंत मोरेश्वर पुरंदरे नामक कोण्या इतिहासकाराने लिहिलेल्या शिवचरित्राचा पहिला खंड वाचत मी काउंटरपाशीच खिळून राहिलो. ते दहाखंडी चरित्र विकत घेऊन मी निघालो. दिल्लीला पोचेपर्यंत अखंड चोवीस तासांच्या सफरीत ते दहाही खंड संपवले. आपण काही तरी अद््भुत अनुभवातून न्हाऊन बाहेर पडल्यासारखे वाटले. महाराष्ट्रात जन्माला आल्याच्या धन्यतेने मी फुलून निघालो होतो.
जगण्यासाठी महत्त्वाची गोष्ट मिळवावी लागते; ती म्हणजे जगण्याचे प्रयोजन. पुरंदऱ्यांना हे प्रयोजन वयाच्या सोळाव्या-सतराव्या वर्षीच गवसले. एका ड्रॉइंग मास्तराच्या बळवंत नावाच्या मुलाला शिवनेरीच्या शिवरायाने झपाटले. त्या झपाटल्या अवस्थेतच त्यांच्या जीवनाचा प्रवास चालू आहे, यापुढेही चालणार आहे. इतिहासाचा हा मोठा डोळस उपासक आहे, भक्त आहे; पण त्या भक्तिमार्गावर ज्ञानदीपाचा प्रकाश आहे. निराधार विधान करायचे नाहीत, अशी प्रतिज्ञा आहे. लिहिताना अखंड सावधपण आहे. उगीचच ‘शिवाजी’ म्हटल्यावर हाताचे आणि जिभेचे पट्टे फिरवणे नाही. त्यांच्या अंतःकरणातला कवी मोहोरबंद, गोंडेदार भाषा लिहितो; पण हातातला इतिहासाचा लगाम सुटत नाही, वर्तमानाच्या रिकिबीतून पाय निसटत नाही की नजर डळमळत नाही.
पुरंदरे इतिहासात सहजतेने डुबकी घेतात. माशाला पोहायची ऐट मिरवावी लागत नाही, तशी पुरंदऱ्यांना शिवभक्तीचा दर्शनी टिळा लावण्याची आवश्यकता भासत नाही. आणि म्हणून जाणत्या इतिहासकारांनी घालून दिलेले दंडक सांभाळून शिवचरित्र आणि त्या अनुषंगाने इतर इतिहासविषयक लिखाण सामान्यांपर्यंत अत्यंत सचित्र भाषेत पोहोचवण्याचे कार्य त्यांनी केले आहे. इतिहास संशोधन हे शास्त्र आहे याची त्यांना पक्की जाणीव आहे आणि म्हणूनच हा तरुण मोकळ्या मनाने सांगतो, की “माझ्या रचनेतल्या चुका दाखवा. पुढल्या आवृत्तीत दुरुस्त करीन. इतिहास ही माझी एकट्याची मिरास नाही. ते साऱ्यांचं धन आहे. त्यात कुठं हीण आलं असेल तर ते पाखडून फेकून द्यायला हवं! इथं वैयक्तिक अहंकार गुंतवण्याचं कारण नाही.” त्यांच्या शिवचरित्राच्या खास आवृत्तीच्या प्रकाशनाच्या दिवशी ते म्हणाले होते, “शिवाजीला मी माणूस मानतो, अवतार नव्हे. आजवर ठपका द्यावा, असा ह्या माणसाविरुद्ध सबळ पुरावा आढळला नाही. आढळला तर न लपवता तो शिवचरित्रात घालीन.” आणि म्हणूनच पुरंदरे ऐतिहासिक घटनांविषयी बोलताना कोणत्याही नाटकी अभिनिवेशाने बोलत नाहीत.
पुरंदऱ्यांची तपशिलांवरची पकड भलतीच कडक आहे. स्मरणशक्ती विलक्षण. त्यांच्याशी बोलताना-म्हणजे ते बोलत असून आपण ऐकत असताना-इतिहास हा वर्तमानापासून तुटला आहे असे वाटतच नाही. अतिशय रंगतदार भाषेत बोलतानादेखील इतिहासकार म्हणून ते एक प्रसन्न अलिप्तपणा सांभाळू सकतात. आज इतकी वर्षे मी त्यांच्या तोंडून शिवचरित्रातले प्रसंग ऐकतो, पण कधी मुसलमान व्यक्तीचा मुसलमान म्हणून त्यांनी तुच्छतापूर्वक उल्लेख केलेला मला स्मरत नाही. परधर्मीयांची कुचेष्टा नाही. अवहेलना नाही. इतिहास ही वस्तू अनेक जण अनेक कारणांनी राबवतात. खुद्द शिवाजी महाराजांचे चित्र दुसऱ्या महायुद्धात रिक्रूटभरतीसाठी राबवले होते. “सोळा रुपये पगार, कपडालत्ता फुकट...शिवाजी न्यायासाठी लढला” हे पोस्टर अजून आठवते. काहींना इतिहासातले नाट्य रुचते. काहींचा रोख आजवर झालेले इतिहास संशोधन चुकीचे होते आणि आपलेच कसे खरे हे अट्टहासाने दाखवण्यावर असतो. इतिहासाचे काही भक्त तर सदा उन्मनी अवस्थेतच असल्यासारखे वागतात. उगीचच ‘रायगड रायगड’ करीत उड्या मारण्याने शिवरायांवरची आपली निष्ठा जाज्वल्य असल्याची लोकांची कल्पना होते, अशी यांची समजूत असावी; पण शिवाजी महाराजांच्यावर प्रेम असायला प्रत्येक किल्ल्याचा चढउतार केलाच पाहिजे, असे मानायचे कारण नाही.
दरवर्षी रायगडावर जाऊन डोळे गाळायचे ही शिवभक्ती नसून शिवभक्तीची जाहिरात आहे. आणि म्हणूनच गड-कोटांविषयी पुरंदरे बोलायला लागले की शिवाजी महाराजांच्या जीवनाचे मूळ सूत्र जो विवेक न गमावता ते रंगून बोलतात, म्हणून मला त्यांचे कौतुक अधिक वाटते. स्वतःच्या डोळ्यात आधीच लोटीभर पाणी आणून ऐतिहासिक कथा सांगण्याचा देखावा त्यांनी कधी केला नाही-ते करणारही नाहीत. कारण त्यांनी इतिहासाकडे “हरहर ! गेले ते दिवस!’’ असले उसासे टाकीत पाहिले नाही.
पुष्कळदा वाटते की, त्यांनी शिवचरित्र कसे लिहिले याचा इतिहास एकदा लिहावा. किती निराशा, कसले कसले अपमान, केवढी ओढग्रस्त! त्यातून पुरंदऱ्यांचे खानदान मोठे! वडील भावे स्कुलात ड्राॅइंग मास्तर. पर्वतीच्या पायथ्याशी पुरंदऱ्यांचा वाडाही आहे. भिक्षुकी, मास्तरकी हे व्यवसाय अफाट दैवी संपत्तीचे धनी करणारे. त्या धनातून मंडईतली मेथीची जुडीदेखील येत नसते. महागाईच्या खाईत भारत इतिहास संशोधक मंडळाकडून मिळणारे माहे पाऊणशे रुपये घेऊन पुरंदऱ्यांनी संसार सजवला. रुपयांचा अखंड शेकडा एकजिनसी न पाहिलेले ग. ह. खरे हे पुरंदऱ्यांचे गुरू. ऋषी हा शब्द फारच ढिलेपणाने वापरला जातो; पण ऋषी म्हणावे अशी खऱ्यांसारखी माणसे क्वचित आढळतात. खऱ्यांचे सहायक म्हणून पुरंदऱ्यांनी खूप वर्षे भारत इतिहास संशोधक मंडळात काम केले.
वर्तमानातून इतिहासात पुरंदरे अगदी सहजतेने डुबकी घेतात. हा माणूस किती शांतपणे माणसांच्या अंगावर रोमांच उभे करतो. कुठेही राणा भीमदेवी थाट नाही, अश्रुपात नाही, मुठी आवळणे नाही. त्या पूर्वदिव्यावर पडलेल्या कालवस्त्राला अलगद दूर करून पुरंदरे इतिहासाचे दर्शन घडवतात. त्यांना वक्तृत्वाची देणगी आहे. शब्दकळा तर अतिशय साजरी आहे. सूक्ष्म विनोदबुद्धी आहे. पण ही सारी लक्षणे मिरवीत येत नाहीत. भाषेच्या अंगातून अलगद ओसंडत असतात. कुठलीही ऐतिहासिक घटना पचवून ते लिहितात किंवा बोलतात. “मला अमुक एक ऐतिहासिक कथा ठाऊक नाही, किंवा निश्चित पुरावा नाही म्हणून मी मत देत नाही” हे सांगायची त्यांनी भीती वाटत नाही.
इतिहास हा आम्ही हातच्या कागदपत्रांइक्याच वयाने आणि त्याहूनही मनाने जीर्ण लोकांच्यावर सोपवलेला विषय समजतो. अशा वेळी शिवचरित्राच्या रूपाने त्या इतिहासाचे पाठ लोकमानसात नेऊन सोडणाऱ्या पुरंदऱ्यांचे खूप कौतुक व्हायला हवे होते. त्यांनी इतिहासकाराची पंडिती पगडी चढवली नाही. कुणाही पंडिताने धन्योद््गार काढावेत इतका अभ्यास केला आणि मांडला मात्र गद्यशाहिरासारखा. त्या चरित्राला ते आधारपूर्वक लिहिलेली बखर म्हणतात. इतिहास हा “माजघरापर्यंत गेला पाहिजे, पाळण्यापर्यंत गेला पाहिजे. इतकंच नव्हे, तर आमच्या बहिणी, भावजया आणि लेकी-सुना गरोदर असतील त्यांच्या गर्भापर्यंत गेला पाहिजे,” असे म्हणणारा हा इतिहासकार मला तरी आमच्या आजवरच्या भारतीय इतिहासकारांपेक्षा एक निराळी – लोकशाहीला अत्यंत पोषक भूमिका घेऊन उभा राहिलेला दिसतो.
वयाच्या सोळाव्या-सतराव्या वर्षापासून आजतागायत आपल्या सुखाचे, स्वास्थ्याचे नव्हे, तर आयुष्याचे दान देऊन गोळा केलेले हे शिवचरित्राचे हे धन. एका मास्तरचा हा मुलगा शिवरायाचे चरित्र आठवीत आडरानातल्या वडपिंपळाखाली पालापाचोळ्याचे अंथरूण आणि दगडाची उशी करून झोपला. हल्ली रस्त्यारस्त्यातून जिल्हा परिषदेच्या जीपगाड्या धावताना आढळतात.
शिवाजी महाराजांच्या पावलांच्या खुणा शोधत जाणाऱ्या पुरंदऱ्यांना कोण जीपगाडी देणार! पार्लमेंटात हात वर करण्यापुरते जागे असणाऱ्या सभासदांना आसेतुहिमाचल आगगाडीच्या पहिल्या वर्गाचा फुकट पास असतो. पुरंदरे कुठल्याशी गावी कागदपत्रं मिळायची शक्यता आहे, हे कळल्यावर थर्ड क्लासच्या खिडकीपाशी तिकिटासाठी रांग धरून उभे असतात! निरनिराळ्या जागा धरून किंवा अडवून ठेवण्याच्या ह्या युगात उदात्त वेडाने झपाटलेली माणसे एकूणच कमी. बाराशे मावळे दीड लाख मोगली फौजेचा धुव्वा उडवीत होते. कारण ते बाराशे मावळे “हे हिंदवी स्वराज्य व्हावे, हे तो श्रींची इच्छा!” ह्या शिवाजीराजाने त्यांच्या कानी फुंकलेल्या मंत्राने झपाटलेले होते. कोणत्याही कार्याच्या सिद्धीला असा एखादा मंत्र लागतो; पण सिद्धीपेक्षा प्रसिद्धी मोठी, अशी भावना रुजायला लागते तेव्हा माणसांची बाहुली होतात. पुरंदरे शिवाजीचे चरित्र गाईन हा संकल्प सोडून जगताहेत. इतिहासाच्या त्या धुंदीत वावरणाऱ्या पुरंदऱ्यांना वर्तमान आणि भुताची चित्रे एकदम दिसतात. हे दिसणे भाग्याचे! ही भाग्याची वेडे !
19 Aug 2015 - 1:41 pm | उगा काहितरीच
अजयाताई, प्रतिसाद अत्यंत आवडला. बाबासाहेब पुरंदरे यांच्याबद्दल आदर होताच, तो द्विगुणीत झाला. आत्तापर्यंत त्यांचे साहित्य वाचण्यात आले नाही हे माझे दुर्दैव ! चला अशा धाग्यामुळे इतकी चांगली माहिती आमच्यापर्यंत पोचली हेही नसे थोडके.
23 Aug 2015 - 3:24 pm | हेमंत लाटकर
अजयाताई, छान माहिती टाकली. वाचून छान वाटले.
19 Aug 2015 - 2:16 pm | श्रीगुरुजी
>>> पुरंदरेंनी ‛‛राजा शिवछत्रपती’’ आणि ‛‛लालमहाल’’ या कादंबरीतुन राष्ट्रमाता जिजाऊ व छत्रपती शिवरायांबद्दल
अत्यंत अवमानकारक व संतापजनक लिखाण केले.
मी बाबासाहेब पुरंदर्यांचे "राजा शिवछत्रपती" हे पुस्तक अनेकवेळा वाचलेले आहे. त्या पुस्तकाची प्रत माझ्या संग्रही आहे. त्या पुस्तकात राष्ट्रमाता जिजाऊ व छत्रपती शिवरायांबद्दल अत्यंत अवमानकारक व संतापजनक लिखाण नक्की कोणत्या पानावर व कोणत्या परिच्छेदात केले आहे ते सांगा.
>>> ● ‛‛राजा शिवछत्रपती’’ कादंबरीतुन स्वराज्य निर्मीतीच्या कार्यात स्वतःचे रक्त सांडणाऱ्या बारा मावळ आणि महाराष्ट्रातील सरदारांच्या आईबद्दल खुप भयानक व विकृत लिखाण केले.
हे विकृत लिखाण या पुस्तकाच्या नक्की कोणत्या पानावर व कोणत्या परिच्छेदात केले आहे ते सांगा.
>>> ● ‛‛राजा शिवछत्रपती’’ कादंबरीत कुणबीणी म्हणजे कुणब्याची (शेतकऱ्याची) पत्नींविषयी खुप किळसवाणे व बदनामीजनक लिखाण केले.
हे विकृत लिखाण या पुस्तकाच्या नक्की कोणत्या पानावर व कोणत्या परिच्छेदात केले आहे ते सांगा.
_______________________________________________________________________________
तुम्ही हे सांगू शकणार नाही व वरील प्रतिसादाला उत्तर देणार नाही हे उघडच आहे. कारण हे पुस्तक तुम्ही स्वतः वाचलेलेच नाही आणि वरील पुस्तकात असे कोणतेही लिखाण नाही. संभाजी ब्रिगेड नावाच्या एका अत्यंत उन्मत्त व फॅसिस्ट संघटनेने ब्राह्मणांविरुद्धच्या जळफळाटातून हे धडधडीत खोटे आरोप केले आहेत व त्या आरोपांवर तुमच्यासारख्या व्यक्ती स्वतः पुस्तक न वाचता डोळे झाकून विश्वास ठेवून विष पसरवित राहता.
पुन्हा एकदा विचारतो. "राजा शिवछत्रपती" या पुस्तकात तुम्ही वर्णन केलेले लिखाण नक्की कोणकोणत्या पानांवर आहे ते सांगा. ते शक्य नसेल तर आपण केलेले विषारी आणि खोटे आरोप मागे घ्या.
19 Aug 2015 - 11:12 pm | श्रीगुरुजी
वरील लोकांच्या पुरस्काराला तुम्ही विरोध केला नाही आणि फक्त बाबासाहेबांच्याच पुरस्काराला विरोध केला याचे एकमेव आणि फक्त एकच कारण म्हणजे वरील कोणाच्याही पुरस्काराला विरोध करून तुम्हाला ब्राह्मण वि. मराठा हा वाद निर्माण करता आला नसता व त्याद्वारे आपल्यासाठी मतांची बेगमी करता आली नसती. परंतु बाबासाहेबांच्या पुरस्काराला विरोध केल्याने ब्राह्मण वि. मराठा अशी फूट पाडून आपल्यासाठी मतांची बेगमी करता येते. म्हणूनच वरील लोकांच्या पुरस्काराला तुम्ही विरोध केला नाही आणि फक्त बाबासाहेबांच्याच पुरस्काराला विरोध केला.
19 Aug 2015 - 12:13 am | श्रीरंग_जोशी
संजय सोनवणी यांची या विषयाशी संबंधीत लेख (प्रकाशन तारीख ६ मे २०१५)
राजा शिवछत्रपती आणि आक्षेप!
तसेच काही तासांपूर्वी प्रकाशित केलेला आणखी एक लेख
माझ्या दृष्टीने तरी बाद!
तसेच ऑक्सफर्ड युनिवर्सिटी प्रेसला पाठवलेले १० नोव्हेंबर २००३ चे हे पत्र (जालावरून साभार). भांडारकर संस्थेवरचा हल्ला ५ जानेवारी २००४ रोजी झाला होता.
19 Aug 2015 - 8:09 pm | शब्दबम्बाळ
चांगली माहिती दिल्याबद्दल आभार!!
19 Aug 2015 - 3:36 am | रमेश आठवले
खूप समर्पक माहिती पुरवल्या बद्दल.
19 Aug 2015 - 9:52 am | विशाखा पाटील
अजया आणि श्रीरंग जोशी, माहितीसाठी धन्यवाद!
कालच्या ABP माझा वरच्या चर्चेतले प्रा. हरी नरके यांचे विचारही विरोध करणाऱ्यांनी जरूर ऐकावे.
पुराव्याशिवाय रेटून बोलणे, मागच्या-पुढच्या वाक्यांचा संदर्भ न लावता अर्थ काढणे, जेम्स लेनच्या पुस्तकावरून विनाकारण राळ उठवणे ही विरोधकांची साधने. समाजात दरी उभी करणारे, त्याचा राजकीय फायदा करून घेणारे कसले देशभक्त! एवढीच शक्ती स्थानिक समस्या सोडवण्यासाठी, विकासासाठी घालवली तर खरी देशभक्ती...
19 Aug 2015 - 10:17 am | चौकटराजा
खरे तर आज जे आपण जगतो त्या जगण्याची सुरूवात १८५७ पासून होते कारण आपल्या स्वार्थापोटी का होईना त्यावेळी भारतातील राजे रजवाडे ब्रिटीशांविरूद्ध एकत्र येउ पहात होते. ( ते त्याना जमले नाही हा भाग वेगळा ! ) . त्यापूर्वीच्या इतिहासात मला अजिबात रस नाही याचे कारण आपले वर्तमानाचा संबंध हा राजे, संस्थानिक , वतनदार , जहागिरदार, सरंजाम शहा , सरदार अशांबरोबर नसून तो राष्ट्र, प्रधानमंत्री ,संसद, विधीमंडळे, कामगार, उधोगपति, व्यावसायिक, कामगार ,शेतकरी, नोकरशहा, ऐअर मार्शल जनरल ई ई सारख्या संस्थांशी आहे. यातील किती मूलतत्वे १८५७ च्या अगोदरच्या काळापासूनच्या वास्तवाकडून घेतली आहेत ? त्यातली किती परकीय आहेत? किती स्वकीय याचा चिकित्सक अभ्यास झाला
पाहिजे. तो सोडून महाराष्ट्रातील अतिरेकी इतिहास प्रेमी पुन्हा सोळाव्या शतकातील व्यवस्था जणू आजच्या काळात कशी चपखल लागू आहे याची चर्चा करीत असतात. अर्थात इतिहासाचा अभ्यास हा मनुष्य जीवनाचा एक पैलू आहे पण तो इतक्या महत्वाचा नाही ही त्याच्या एका अभ्यासकास राज्य भूषण पुरस्कार द्यावा. पण सर्वसमावेशक कार्य हा निकष न ठेवता तो विशिष्ट कार्य असा निकष असेल ( तसाच तो आहे हे यादीवरून कळून येते ) तर पुरंदरेना तो मिळण्यास काहीच
हरकत नाही. त्यांच्या विरोधकानी पद्धतशीर अभ्यास करून पुरावे आणून त्यांचे लेखन चुकीचे ठरवले तर तो पुरस्कार स्वता: च पुरंदरे तो परत करतील. पण विरोधकांचाही अभ्यास ऐकीव असेल तर सरकारने त्याची काय म्हणून परवा करायची ?
19 Aug 2015 - 10:19 am | नूतन सावंत
पिरा, अजयाशी +१००० वेळा सहमत.हेच लिहायला आले होते.
आणि रंगाभाऊ, तुमच्या अज्ञानी लोकांचे अज्ञान दूर करणाऱ्या माहितीबद्दलआभार.
हल्ली मिपावर स्वतंत्र विचार करणारे, मुळातून काही वाचन करून त्यावर लिहिणारे लेखक कमी झालेत असे वाटू लागले आहे.(विवेकानंद धागा)हे सगळे महाराष्ट्राच्या राजकारणातल्या, महाराष्ट्राला “गाडता राजा” चे प्रताप आहेत हे उघड दिसून येत आहे.कुणीही उठावे कोणाबद्दलही बोलावे असे झाले आहे.जितेंद्र आव्हाड याचे इतिहासातील योगदान काय? तर शून्य. जर काही शंका असतील तर त्याचे निराकरण योग्य व्यक्तीकडून करून घेणे हे ह्या माणसाला समाजात नाही,ज्यांना पदव्या विकत घ्यावा लागतात अशांच्या भुन्कण्याकडे लक्ष न देता बाबासाहेबांनी हा पुरस्कार आमच्यासारख्या सामान्य माणसांसाठी स्वीकारला पाहिजे.ज्यांना त्यांनी आमचा राजा कसा होता आम्हाला हे रक्ताचे पाणी करून शिकवलेय.
19 Aug 2015 - 10:21 am | संदीप डांगे
आज फेफ्रातल्या बातम्या वाचून परत एकदा सिद्ध झालंय....
"साहेबांचा आदेश आहे. जाळपोळ करा, चक्काजाम करा, काहीही करा. कोणी विचारलं तर सांगा पुरस्कार देऊ नये म्हणून करतोय."
का? कशासाठी? काय उपयोग? हे प्रश्न कार्यकर्ते विचारत नसतात. ते फक्त आदेशाचे मानकरी. त्यातल्या त्यात थोडे इंटरनेटवर पडीक असले फॉरवर्ड पिंकत बसतात. अशा लोकांना ना शिवाजी माहित ना पुरंदरे. महाराजांच्या आयुष्यातला एकही प्रसंग तपशीलात सांगता येणार नाही. एकही किल्ला आयुष्यात चढून बघितलेला नसतो. गेले असतील तर फक्त दारूच्या बाटल्या फोडायला आणि दिलात बाण खुप्सून नावं लिहायला. परत यांना फक्त पुरंदरेंनी लिहिलेल्या इतिहासातून शिवाजी समजून घेतलेला आणि आज तेवढाच शिवाजी हायजॅक करतायत. त्याच पुरंदरेंवर उलट चिखलफेकीचे आरोप करतायत. स्वतःचे काही कर्तॄत्व नाही पण साहेबांचा आदेश आला की स्वतःच्या आईलाही विकायला कमी करणार नाहीत. कुणाला तसं लिहायची तरी काय गरज आहे. यांच्या वागणुकीतूनच हे सिद्ध केले आहे आज. यांचे इतिहासावर आणि महाराष्ट्रावर किती प्रेम आहे हे दाखवून दिलेच आहे सरकारी संपत्तीची जाळपोळ करून.
आपल्याच लोकांना वेठीस धरून दहशत माजवणे हा कुण्या एका धर्माचा मक्ता नाही, ही प्रवृत्ती सार्वत्रिक आहे असे खेदाने नमूद करावे लागते.
असल्या लोकांमधे राहावं लागतं याचं खरंच वैषम्य आहे.
19 Aug 2015 - 10:22 am | नूतन सावंत
“गाडता राजा”असे वाचावे.
19 Aug 2015 - 10:27 am | नूतन सावंत
जो माणूस महाराष्ट्राचा माजी मु.मं.आहे त्याचे उद्गार आहेत की,”मी महाराष्ट्रभूषण पुरस्काराला किंमतदेत नाही”.कारण हे महाराष्ट्रदूषण आहेत हे त्यांना स्वता:ला माहीत आहे.
19 Aug 2015 - 12:21 pm | सस्नेह
एक जाणता होता आणि एक त्याला जाणून त्याच्या ठायी लीन झालेला होता.
..दोघांचीही महानता कणभरही जाणण्याची जाण नसणारे निष्कारण भांडत आहेत...अरेरे..!!!
19 Aug 2015 - 12:22 pm | प्यारे१
'महाराजांचे लग्न ठरल्यावर आऊसाहेब आणि दादोजींची लगीनघाई सुरु झाली' अशा अर्थाची जिजाऊंची बदनामी करणारी वाकयं बाबासाहेबांनी लिहिली आहेत असं ब्रिगेडी लोक म्हणतात. (जितुभाऊंनी (मुंब्रावाले डॉक्टर) आपल्या भूमिकेचं स्पष्टीकरण देताना हे लिहिलंय)
यात बदनामी दिसणारा माणूस सडक्या डोक्याचा असून त्याला चपलेनंच हाणला पाहिजे.
बऱ्याच जणांना नेमकं काय चुकीचं लिहिलंय तेही समजणार नाही.
काही ठराविक आयडी ना समजण्याची शक्यता आहे. कारण ते/त्या अशाच सडक्या पद्धतीनं विचार करतात.
19 Aug 2015 - 12:56 pm | खटपट्या
दणकून अनुमोदन
19 Aug 2015 - 1:31 pm | प्रसाद गोडबोले
खरंच अजुनही कळत नाहीये की ह्यात काय चुकीचे लिहिले आहे ते ? जितेंद्रजी आव्हाड ह्यांन्ना ह्या विधानात काय अर्थ लागला कोणी समजावुन सांगेल का इथे ?
19 Aug 2015 - 1:33 pm | प्यारे१
असा प्रतिसाद कुणीतरी टाकणार हे अपेक्षित होतं.
व्यनि करतो.
19 Aug 2015 - 12:30 pm | फुलथ्रॉटल जिनियस
फेसबुक फॉरवर्ड,हे खरे आहे काय,? मिपाकरांना काय वाटते??
पुरंदरे आणी ब्राह्मणांना विरोध कशासाठी ,माझे विश्लेषण
१९९१ साली मंडल आयोग लागू झाल्यानंतर, ओबिसिंना सत्तेत मोठा वाटा मिळाला
ओबिसिंना मोठा वाटा मिळाल्याने शिक्षण,रोजगार,राजकारण यातला मराठ्यांचा दबदबा खूप कमी झाला
अमर्याद सत्ता उपभोगायची सवय लागलेल्या मराठा समाजाला ओबिसिंची प्रगती आणि घौडदौड बघून पोटात दुखायला लागले
ओबिसि आरक्षण काढणे बाप जन्मात शक्य नसल्याने थेट आरक्षणात घुसण्याची तयारी मराठा समाजाने सुरु केली
यासाठी मराठा हा मागासवर्गिय दाखवला पाहीजे,दलित, ओबिसिंनी भूतकाळात मराठ्यांनवर अत्याचार केले असा प्रचार केला तर् तो शतकातला मोठा विनोद ठरला असता
मग मराठ्यांपेक्षा उच्चवर्णीय ब्राह्मण समाजाला यात ओढले गेले ,व ब्राह्मणांनी भूतकाळात मराठ्यांवर अत्याचार केल्याच्या खोट्या बाता मारणे सुरु झाले,यासाठी पगारी इतिहासतज्ञ नेमले गेले,ब्रिगेड सारख्या संघटना स्थापण केल्या गेल्या.
मराठा हा दलित ओबिसिंप्रमाणेच मागासवर्गीय आहे हा खोटा दावा वारंवार लोकांच्या माथि मारुन पार्श्वभुमी तयार केलि गेली,यासाठी ब्राह्मणांना बदनाम केले गेले,प्रसंगी स्त्रीयांची बदनामी केली गेली
२००५ पर्यंत पार्श्वभुमी निर्माण केल्यानंतर मराठा आरक्शनाची मागणी हळुच पुढे करण्यात आली
मराठा हे मागासवर्गीय आहेत या खोट्या प्रचाराला दलित,ओबिसींच्या संघटना भुलल्यामुळे मराठा आरक्षणाला त्यांचा विरोध कमी झाला
राष्ट्रवादी हा मराठ्यांचा पक्ष असल्याने २०१४ साली मराठा आरक्षण जाहीर झाले
आरक्षणाची लबाडी हायकोर्टाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर हायकोर्टाने यावर बंदी घातली
त्यामुळे पुन्हा ब्राह्मणविरोध सुरु झाला आहे,पण या संघटनांचं अंतीम लक्ष हे ओबिसी आरक्षणात घुसघोरी करुन त्यांच्या ताटातला चतकोर तुकडा हिसकावून घेणे हे आहे.
परंतू या सर्वांमध्ये ब्राह्मण समाजाचा नाहक बळी जात आहे हे खेदजनक आहे.
19 Aug 2015 - 12:39 pm | संदीप डांगे
उत्तम प्रतिसाद! याची सुरुवात केतकरांच्या घरावर हल्ला करण्यापासून झाली होती बहुतेक. तेव्हापासूनच मराठ्यांनी शिवाजी महाराजांना आपल्यात ओढायला सुरुवात केली.
19 Aug 2015 - 8:36 pm | अर्धवटराव
ज्याला आपण ओबीसी समाज म्हणतो तो ना कधि राजकारणात बळकट होता ना अर्थकारणात. आपली बलुतेदारी सांभाळावी, सगळी कष्टाची कामे करावी, राजसत्तेला कर द्यावा, व जे पानात पडेल त्यात सुख मानुन नशीबाच्या हावाल्याने जगावं असं त्यांचं आयुष्य होतं. स्वातंत्र्यानंतर त्यांचं थोडंफार राजकीय भान जागृत झालं आणि लगेच पारंपारीक सत्ताधीशांना मिर्च्या झोंबल्या. त्याचाच परिणाम आहे हा सगळा.
23 Aug 2015 - 9:50 pm | होबासराव
प्रतिसाद वाचल्यानंतर पुन्हा पुन्हा आयडी चेक केला, स्वतःला एक चीमटा सुद्धा घेतला.
19 Aug 2015 - 12:42 pm | मालोजीराव
फेसबुक वरची पोस्ट कॉपी-पेस्टवतोय, माझेहि मत हेच आहे...
19 Aug 2015 - 12:54 pm | खटपट्या
जबरी मालोजीराव.
19 Aug 2015 - 1:12 pm | किसन शिंदे
तुमच्याच प्रतिक्रियेची वाट पाहत होतो मालोजीराव!
19 Aug 2015 - 1:18 pm | प्यारे१
बाकी प्रतिसादाशी १००% सहमत.
फक्त ...
नाना फडणविसांना चिक्कीत अडकलेल्या पंकजाला वाचवायचं आहे
याबाबत दुमत आहे किंबहुना हे प्रकरण जाणीवपूर्वक उकरलं गेलंय असं वाटतं.
कोणी उकरलं म्हणून विचारताय???? ह्या ह्या ह्या!
19 Aug 2015 - 1:29 pm | अनिरुद्ध.वैद्य
आमी तर पंकजाताईंना नाना फडणविसांनी अडकवल आस ऐकलं होत!
19 Aug 2015 - 1:31 pm | प्यारे१
असं अजिबात नस्तं बोलायचं.
विरोधकांचा डाव असतो हा सगळा.
20 Aug 2015 - 3:00 pm | अनिरुद्ध.वैद्य
.
19 Aug 2015 - 1:22 pm | बॅटमॅन
वयाच्या ९४ व्या वर्षी पुरंदर्यांना असले काही बघायला मिळावे याचा फार फार खेद वाटतो. राजकारण करायचे ते करतातच पण नाहक अशा लोकांना वेठीला धरले गेलेले पाहिले की त्यासारखे वाईट दुसरे काही नाही. आता या लोकांनी बाबासाहेबांच्या पाठोपाठ मेहेंदळे सरांच्या मागे लागू नये म्हणजे झाले. :(
19 Aug 2015 - 1:27 pm | पैसा
पुढचा नंबर त्यांचा. श्रीशिवजयंती उत्सव लोकमान्य टिळकांनी सुरू केला याला राजवाड्यांच्या लेखात पुरावे असताना ते नाकारणारे आणि स्त्रीशिक्षणात आगरकरांचं कार्य काही नाही म्हणणार्यांना काय अशक्य आहे?
19 Aug 2015 - 1:37 pm | बॅटमॅन
तेही खरेच म्हणा, पण मेहेंदळे सर खमके आहेत. ब्रिगेडी पस्तावतील जास्ती काही केलं तर.
19 Aug 2015 - 2:12 pm | मालोजीराव
मेहेंदळे सर ऋषीतुल्य आहेत,सरांचं साहित्य वाचलेलं आहे आणि त्याचं काम इतकी वर्ष पाहिलेलं सुद्धा आहे, सरांवर अशी वेळ आली तर सरांसाठी आम्ही पुन्हा तलवार उचलू …
19 Aug 2015 - 3:20 pm | जयंत कुलकर्णी
मालोजीराव,
ब. मो. पुरंदर्यांसाठी आपली तलवार म्यानातून बाहेर का पडत नाही याचे कारण वाचण्यास आवडेल. मी दोघांचीही सर्व पुस्तके अभ्यासली आहेत म्हणून उत्सुकता...
19 Aug 2015 - 3:32 pm | मालोजीराव
दुर्दैवाने जाणता राजा नाटक पाहता आले नाही अजून, बाबासाहेबांची पुस्तके अजून वाचली नाहीत आणि अभ्यासलीहि नाहीत , थेट भेट कधीच झाली नाही, आम्ही म्हणजे ट्रस्ट ने त्यांचा 'शिवकल्याण राजा' हा कार्यक्रम गणेश कला क्रीडा ला ठेवला होता तेव्हा हि पुण्यात नव्हतो…पुरेसा अभ्यास आणि माहिती नसल्याने या वादात पडलो नाही.
बाबासाहेबांच्या अचाट आणि अफाट निष्ठेबद्दल आणि कार्याबद्दल त्यांना पुरस्कार नक्कीच देण्यात यावा, असे वैयक्तिक मत आहे
19 Aug 2015 - 3:21 pm | बॅटमॅन
सरांना जर कुणी त्रास दिला तर यथाशक्ती नक्की प्रतिकार करूच.
19 Aug 2015 - 1:33 pm | प्रसाद गोडबोले
ख्यॅ ख्यॅ ख्यॅ ...
लिस्ट्वर तुमचे आणि वल्ली सरांचे ही नाव असु शकते बरं का !!
19 Aug 2015 - 1:37 pm | बॅटमॅन
खी खी खी, वल्ली सरांना काय टेन्शन नाय. अजून सातवाहन राजांच्या अत्याचारांपर्यंत हे लोक पोचलेले नसल्याने वल्ली सर सेफ आहेत एकदम. जोपर्यंत ब्रिगेडवाले देऊळ पाडापाडीचा कार्यक्रम आरंभत नाहीत तोपर्यंत तरी वल्ली सरांना काही टेन्शनच नाय.
19 Aug 2015 - 1:41 pm | प्यारे१
सातवाहन.>>>
हे नाव कानावर पडू देऊ नका. नाहीतर....
अमुक तमुक ... 'आठवाहन' (फॉरचुनर) वाले असं नाव लावतील.
नाद करायचा नाय !
४१४१
19 Aug 2015 - 2:39 pm | प्रचेतस
कोण हो हे वल्ली सर?
19 Aug 2015 - 3:02 pm | कपिलमुनी
तुमास्नी माहिईत न्हाई ?
लै झेंगाट माणूस !
सुंदर्यांवर डोळा ठिवून आसतोय :)
19 Aug 2015 - 3:22 pm | बॅटमॅन
दर्पणसुंदर्या काय ओ? कुठलीही दर्पणसुंदरी दिसली रे दिसली की, "सुंद्राबाई, फटूत या" (वाड्यावर या च्या चालीत वाचावे =)) ) म्हणताना ऐकलेय तोच झेंगाट माणूस काय हो हा?
19 Aug 2015 - 3:24 pm | प्रचेतस
खी खी खी. :)
19 Aug 2015 - 8:47 pm | अर्धवटराव
ते ही आता लवकरच करणार ब्रीगेडवाले. भटांनी मिर्झाराजे जयसींगला देवीच्या अनुष्ठानात मदत केली. त्याचा परिणाम म्हणुन शिवाजीराजे जयसींगापुढे पराजीत झाले. भटांची मानगुट तर पकडलीच आहे ब्रीगेडींनी. पण आता मिर्झाराजांच्या देवीचं काहि खरं नाहि. तिने का म्हणुन ऐकावं भटांचं ? त्या देवीचा शोध सुरु आहे. तिच्या मंदीराची खैर नाहि.
पण तो ही मुद्दा नंतर येईल. सर्वप्रथम नंबर लागणार तुळजाभवानीचा. तिथे तर भट नसतात पूजेला. तरिही तिने शिवाजीला मिर्झाराजेंविरुद्ध यश देऊ नये?? जयसींगाची देवी जर पॉवरफुल्ल होती तर तुळजेने आपला मराठी.. नाइ नाइ.. मराठा बाणा दाखवायला नको होता तिला?? तुळजेची खैर नाहि आता. मराठा छावा घाव घालायला सज्ज होतोय.
जय ब्रीगेड.
22 Aug 2015 - 9:50 pm | काळा पहाड
राज ठाकरे आणि बाबासाहेबांचा स्नेह फार जुना आहे. ही पूर्वी राज ठाकरेंनी बाबासाहेबांची रायगडावर घेतलेली मुलाखतः https://www.youtube.com/watch?v=UX6PqD1AdBk
19 Aug 2015 - 12:43 pm | ज्योत्स्ना
ह्यांनी काहिही म्हंटले किंवा काहिही अपप्रचार केला तरीही छ्त्रपती आणि शिवशाहीर दोघांबद्दल महाराष्ट्रातील जनतेला असलेला आदर जराही कमी होणार नाही.शिवराय हे सर्व मराठी जनतेचे आदरणीय आहेत. ह्या लबाड कोल्ह्यांना सर्वजण ओळखून आहेत.
19 Aug 2015 - 12:57 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
असल्या आक्षेपांमुळे आयुष्याच्या कार्याला बट्टा लागत नसतो. कावळ्याच्या शापानं गाय मरत नाही.
त्यापेक्षा जे लोक वाद घालतायत त्यांना नाकारा की. कित्ती कित्ती तो सहिष्णुतेचा आव आणायचा तो.
19 Aug 2015 - 1:52 pm | सुबोध खरे
मा उच्च न्यायालयाने श्री ब मो पुरन्दरे यान्च्या विरोधातील याचिका फेटाळली आणि याचीका कर्त्यांवर दहा हजार रुपये दंड हि लावला.
19 Aug 2015 - 2:38 pm | प्रसाद गोडबोले
http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=4824324917673676974&Se...
आणि
ब्राह्मण समाजाच्या सुदैवाने न्यायाधीशांची आडनावे पाटील आणि शुक्रे अशी आहेत ... हेच जर कुळकर्णी किंव्वा देशपांडे असते तर महाराष्ट्रात १९४८ ची पुनरावृत्ती झाली असती ह्यात शंका नाही !
आता "न्यायालय सरकारच्या द्बावाखाली काम करते" असा युक्तीवाद कधी येतोय ह्याची वाट पहात आहे :)
19 Aug 2015 - 1:56 pm | सामान्यनागरिक
आज कोर्टाने याचिकेत काही अर्थ नाही हे स्पष्ट केलेच आहे.
सरकारने कोर्टाला विनंती करावी,
१. याचिका करणाऱ्यांनी कोर्टाचा वेळ वाया घालवला.
२.यानिमीत्ताने समाजात तेढ निर्माणं करायचा प्रयत्नं केला.
३. एका ऋषीतूल्य माणसाचा अपमान केला
म्हणून त्यांच्याकडुन प्रत्येकी ११लाख तसेच त्यांच्या पक्षा कडुन ११कोटी दंड
वसूल करण्यात यावा. कोर्टाने तसा आदेश द्यावा अशी विनंती सरकारने करावी.
शिवाय पक्षाची मान्यता रद्द करण्याची सिफारस निवडणूक आसिगाला करावी.
19 Aug 2015 - 2:29 pm | सुबोध खरे
प्रश्न पैश्याचा नसून याचिकाकर्त्यांना न्यायालयाने मारलेल्या चपराकेचा आहे. असे असूनही हे निर्लज्ज लोक हा प्रश्न भावनेचा असून न्यायालयाच्या अखत्यारीत येत नाही असेही म्हणतील. ( हेच जर न्यायालयाने स्थगिती दिली असती तर मात्र तोंड वर करून नाचले असते)
19 Aug 2015 - 4:17 pm | शिलेदार
श्री मोरोपंत पिंगळे हे जातींनी ब्राम्हण आहेत. आणि सरनौबत श्री हंबीरराव मोहिते किंवा सरनौबत श्री प्रतापराव गुजर हे जातींनी मराठा आहेत असा भेदभाव मुळातच महाराजांच्या स्वराज्याला माहित नाही . त्या स्वराज्याला माहित होत माणसाची गुणवत्ता त्याचं कौशल्य, धाडस ,निष्ठा.
आपण जर त्याच स्वराज्याचं आधुनिक रूप आहोत तर आपल्याला याचा विसर पडावा हेच दुर्दैव आहे.
थोड्या वेळासाठी जर आपण देशपातळीवर आपला विचार केला की आपली काय ओळख आहे आपल्या देशात, तर उत्तर आपल्याला सगळी कडे मिळेल (जे बाहेर राज्यात राहतात किंवा जाऊन आलेत ते) ते उत्तर आपल्या राष्ट्रगीतामध्ये ही आहे.
II पंजाब सिंध गुजरात मराठा II
याचा अर्थ सगळ्या देशाच्या दृष्टीनी आपण मराठा आहोत आणि महाराष्ट्र राहणारे सगळे मराठा
थोडा पुढा जावून म्हणावसं वाटत कि छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा पाईक तो मराठा.
मला वाटत की हाच अर्थ श्री महाराजांना ही अभिप्रेत असावा.
आता राहिला प्रश्न श्री बाबासाहेबांना पुरस्कार देण्याचा तर मला असे वाटते की भावनेचा किंवा ते कोणाचे आहेत हा भाग बाजूला ठेवून विचार केला तर असे समजेल की आपल्यामधल्या बहुतांशी लोकांचं जेवढा वय आहे तेवढा श्री बाबासाहेबांचा अभ्यास आहे. निदान त्याच तरी आदर करून त्यांच्यावर चाललेली चिखल फेक थांबवावी.
उगीच धुडगूस घालाण्यांनी काहीच सिद्ध होत नाही. ज्यांना काहीच माहित नाही आणि ज्यांना एखाद्या गोष्टीचा अर्थ सुद्धा निट लावता येत नाही त्यांनी काहीच बोलू नये.
19 Aug 2015 - 8:59 pm | सुबोध खरे
मराठा तितुका मेळवावा
महाराष्ट्र धर्म वाढवावा
हे लिहिणारे समर्थ रामदास स्वामी तर ब्राम्हण होते.( इतक्या वर्षात रामदास स्वामींची जात विचारात घ्यायचे "पुण्य" लाभलेले नव्हते ते आता या लोकांमुळे लाभले आता डोळे मिटले तरी चालतील.)
मग त्यांनी "मराठा" मेळवावा कसे लिहिले?
साधे उत्तर आहे
मराठा म्हणजे महाराष्ट्रात राहणारा मराठी बोलणारा माणूस. हे जातीवाचक विशेषण नाही. पण पिवळ चष्मा लावला कि सगळे जग कावीळ झाल्यासारखे भासते. त्याला कोण काय करणार?
19 Aug 2015 - 5:52 pm | नीलकांत
चवथीच्या पुस्तकात पहिल्यांदा शिवाजीमहाराज भेटले. ते इतिहासाचे पुस्तक आजही मनात कोरलेलं आहेच. दलालांची चित्रे असावीत ती. ते अश्वारूढ शिवाजी दैवत म्हणजे नेमकं काय ते समजायच्या आधी त्या पदावर आरूढ झाले त्यात चवथीच्या त्या पुस्तकाचा वाटा होताच मात्र पुढे जाऊन राजाशिवछत्रपती चे त्याकाळी असणारे छोटे छोटे पुस्तकामुळे सुध्दा झाले.
शाळेत असताना शाळेच्या वाचनालयातून पुढे परत एकदा मोठ्या ठोकळावजा पुस्तकातून आणि आता अगदी मागच्याच वर्षी दोन मोठ्या ठळक फॉन्तमधून दोन खंडात हे राजाशिवछत्रपती हे पुस्तक वारंवार भेटतंय. माझा मराठी पींड पोसण्यात ह्या पुस्तकाचा मोठा वाटा. बाबासाहेब पुरंदर्यांनी लिहीलेल्या आणि मी वाचलेल्या प्रत्येक पानापानाने माझ्या मनात शिवाजी महाराजांबाबतचा आदर वाढतच गेलाय. त्यांनी लिहीलेल्या राजाशिवछत्रपती नंतर मी अनेक वेगवेगळ्या मांडणीतील शिवाजी वाचलेत. सेतु माधव पगडी पासून ते नरहर कुरूंदकर आणि पानसरेंपर्यंत वाचलेत. जाणीवेच्या प्रत्येक पातळीवर आपल्याला नवनवीन काहीतरी मिळत जातं. शिवाजी अधीक खोलात समजतात. मात्र तरी सुध्दा माझ्या दैवताचे जे चरीत्र बाबासाहेबांनी मांडलंय त्याला तोड नाही. ते अधीक भावतं. ते अधीक पोहोचतं. कारण ते मनापासून निघालं आहे असं वाटतं. इतिहास आणि संशोधन हे करण्यासाठी त्याच्या शास्त्र शाखा आहेत त्यांना काय करायचे ते त्यांनी करावे. मला माझ्या राज्याचं कौतूक शिवशाहीर बाबासाहेबांच्या तोंडून ऐकायला किंवा वाचायला आवडतं. त्यांनी लिहीलेली पुस्तके आमच्यासाठी राजांची पोवाडेच आहेत. त्यामुळे ते महाराष्ट्र भूषण आहेतच. आमचे सरकार आज त्याला अधिकृत मान्यता देतेय एवढंच. त्याचेही स्वागत आहेच.
बाबासाहेबांनी काय लिहीलंय आणि त्यातून कार्य अर्थ निघतो याचा अन्वय लावताना किंवा त्याच्या आधीच बाबासाहेबांच्या आयुष्याचा पट उलगडून बघावा. शिवाजीमहाराजांशिवाय त्यांच्या आयुष्यात उरतं तरी काय याचा शोध घ्यावा. उठता बसता... जळी काष्ठी पाषाणी फक्त आणि फक्त शिवाजी महाराज हेच त्यांचं दैवत आहे.
माझे मत असे आहे की माझ्यासारख्या सामान्य मराठी मानसासाठी बाबासाहेब महाराष्ट्र भूषण आहेतच.
- नीलकांत
19 Aug 2015 - 8:25 pm | विकास
हा लेख आणि प्रतिसाद आत्ता वाचला!
पूर्ण सहमत!
19 Aug 2015 - 11:55 pm | अभ्या..
अगदी मनातले बोललात मालक.
थोड्या वर्षापूर्वीची गोष्ट आहे. बाबासाहेब महाराष्ट्रभर शिवव्याख्यानासाठी दौरे करायचे. बार्शीसारख्या लहान गावात एका बॅंकेने त्यांचे तीन दिवसांचे व्या़ख्यान आयोजित केले होते. पहिल्यादिवशी 'पन्हाळगडावरुन सुटका' हा विषय होता. त्यावेळी बाबासाहेबांनी असे आवाहन केले होते की शिवचरित्रातला प्रत्येक प्रसंग शाहिरांना, चित्रकारांना आव्हान आहे. एकेका प्रसंगावर चित्र काढले तरी आयुष्य पणाला लागेल. एवढा संपन्न वारसा आपल्याला लाभलाय तर का कुणी चित्रकार त्यासाठी आयुष्य वेचत नाही. त्यासाठी त्यांनी स्व. दिनानाथ दलालांचेच उदाहरण दिले होते. व्याख्यानाला आलेल्या एका शाळकरी मुलाने त्या दिवशीच्या व्याख्यानावर एक चित्र काढले. मुलाच्या वडिलानी ते चित्र बाबासाहेबांना दिले. बाबासाहेबांनी दुसर्या दिवशी त्या मुलाला बोलावून स्वहस्ते त्याचा सत्कार केला. स्वतःची शाल त्याला देऊन वार्ताहरांना व्याख्यानाच्या फोटोएवजी त्या चित्राचे फोटो पेपरमध्ये टाकायला सांगितले. त्यांच्या बार्शीतल्या तात्पुरत्या निवासस्थानी बोलावून दलालांचा वारसा चालवायचा आशिर्वाद दिला.
.
आजही अभिमानाने सांगतो, ती शाल अन वर्तमानपत्र माझ्याकडे आहे. त्यांच्या आशिर्वादावरच माझी लहानशी का असेना पण चित्रकारकिर्द उभी आहे.
म्हणूनच
19 Aug 2015 - 11:59 pm | प्यारे१
जियो अभ्या. लै भारी!
नशीबवान हैस.
20 Aug 2015 - 12:02 am | पैसा
कसला नशीबवान आहेस तू!
20 Aug 2015 - 10:08 pm | यशोधरा
क्या बात है अभ्या! भारी!
20 Aug 2015 - 11:30 pm | स्रुजा
क्या बात ! काय नशीबवान आहात.
20 Aug 2015 - 11:37 pm | श्रीरंग_जोशी
मनःपूर्वक अभिनंदन, अभ्या.
त्या चित्राचा फोटो पाहण्यास उत्सुक आहे.
21 Aug 2015 - 4:29 pm | प्रमोद देर्देकर
+१ तो फोटो इकडे टाकावा.
आणि तुमचे अभिनंदन अभ्यासाहेब.
21 Aug 2015 - 12:13 am | बॅटमॅन
अरे क्या बात है अभ्या, लेका भाग्यवान हायेस लैच. प्रत्यक्ष शिवशाहीरांनी गौरवलेले टॅलेंट खासमखास असणार हे तर नक्कीच!!!! निव्वळ थोर _/\_
21 Aug 2015 - 12:19 am | डॉ सुहास म्हात्रे
भाग्यवंत आहेस अभ्या.. !!!
अशी प्रेरणा मिळणे विरळा असते !
23 Aug 2015 - 12:17 am | अभ्या..
पशा, पैकाताय, सृजा, ब्याटया, श्रीरंगा, श्री. एक्काकाका, पम्या आणि कोमल याना धन्यवाद.
मिपामुळे अशा क्षणाना उजाळा मिळाला. जिन्दगीत काहीतरी केल्यासारखे वाटते. धन्यवाद
23 Aug 2015 - 2:29 pm | बॅटमॅन
अभ्या, या निमित्ताने त्या चित्राचा व शालीचा फटू टाक की मर्दा. पायजे तर येक छोटासा लेखच टाक त्यावर. तेवढेच बघून बरे वाटेल.
23 Aug 2015 - 2:57 pm | अभ्या..
होय ब्याट्या.
ते आपल्या बार्शीच्या घरी अल्बम मध्ये हाय. नेक्स्ट ट्रिपला फोटो घेऊनच येतो. डीट्टेल स्टोरीसहीत टाकतो. :)
23 Aug 2015 - 4:36 pm | बॅटमॅन
येस्सार!!!!
23 Aug 2015 - 10:06 pm | होबासराव
आजही अभिमानाने सांगतो, ती शाल अन वर्तमानपत्र माझ्याकडे आहे. त्यांच्या आशिर्वादावरच माझी लहानशी का असेना पण चित्रकारकिर्द उभी आहे.
हया वाक्याने मात्र अंगावर सरसरीत काटा आला.
वरती जस मालकांनी म्हंटलय "माझ्यासारख्या सामान्य मराठी मानसासाठी बाबासाहेब महाराष्ट्र भूषण आहेतच"
हे एकदम खर आहे, आमच्या सारख्या वाचकांसाठी बाबासाहेब आम्हि जेव्हा पासुन इतिहास वाचायला शिकलो तेव्हापासुनच महाराष्ट्र भुषण आहेत.
19 Aug 2015 - 6:10 pm | _मनश्री_
आज बाबासाहेबांचा ९४ वा वाढदिवस आहे , त्यांना दीर्घायुष्य लाभावे ही सदिच्छा
19 Aug 2015 - 6:12 pm | जयंत कुलकर्णी
नीलकांत,
महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील बोललात. त्यासाठी तुम्हाला मिपाभुषण द्यावे काय असा प्रस्ताव समितीकडे पाठवत आहे....
:-)
19 Aug 2015 - 8:44 pm | विकास
19 Aug 2015 - 9:16 pm | तिमा
जातीच्या आणि पैशाच्या भ्रष्टाचारात रुतलेल्या किड्यांनो, बाबासाहेबांनी त्यांना पुरस्कार मिळालेली रक्कम, त्यांत स्वतःची भर घालून कर्कग्रस्त लोकांसाठी देणगी दिली आहे. यावरुन तरी तुम्हाला खरे सुसंस्कृत म्हणजे काय, ते कळावे.
19 Aug 2015 - 11:50 pm | सुबोध खरे
"पुरस्काराच्या स्वरुपात आपण मला १० लक्ष रुपये दिले. हे पैसे महाराष्ट्राचे आहेत, शाहीरांचे आहेत, कवींचे आहेत, लेखकांचे आहेत, इतिहासकारांचे आहेत, कलाकारांचे आहेत! ह्या पैश्यांवर माझा जरादेखील अधिकार नाही. मा. मुख्यमंत्री, मा. राज्यपाल यांचा आणि समस्त महाराष्ट्राचा मान राखायचा म्हणून, मी यांतले १० पैसे तेवढे घेतो. आणि त्या १० लक्ष रुपयांत माझ्याकडचे १५ लक्ष रुपये घालून, पैश्यांअभावी कॅन्सरवर उपचार करवू न शकणाऱ्या गरीब रुग्णांसाठी एकूण २५ लक्ष रुपये देऊन टाकतो!"
— 'महाराष्ट्रभूषण' शिवशाहीर श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे.
20 Aug 2015 - 3:04 pm | कहर
मी आता बिग्रेड आणि मंडळींच्या खालील वक्तव्याची वाट पहातोय
" आरक्षणामुळे काही जातींच्या लोकांची प्रगती झाली. परंतु ब्राम्हणांना आरक्षण नाही म्हणून ते हल्ली गरीब होत आहेत. आणि याच गरिबांना मदत म्हणून बाबासाहेबांनी २५ लक्ष दान केले. १५ लक्ष सोडा पण नऊ लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव रुपये आणि नव्वद पैसे या पुरस्कारातून मिळालेले होते. शिवाय वरचे १० पैसे स्वतःसाठी ठेऊन घेतले म्हणजे पुरस्काराची १००% रक्कम स्वजातीच्या कल्याणासाठी वापरायचा कुटील डाव बाबासाहेब आणि फडणविसांनी खेळला आहे"
(बोलायला काय जाते म्हणून बिन्डोकांकडून अशी अनेक विधाने आलेली आहेत येत रहातील)
बिग्रेडी अकलेचे तारे तोडणारा
कहर
20 Aug 2015 - 3:34 pm | प्यारे१
मंगेशकरांच्या हॉस्पिटललाच दिले ना पैसे???? असं म्हणून झालंय ऑलरेडी.
(मेसेज फिरतोय)
बाकी फर्स्ट हॅण्ड अनुभव म्हणून सांगतो, मंगेशकर हॉस्पिटलला 'शून्य रुपये खर्चात सुद्धा' उपचार होतात हे पाहिलं आहे.
20 Aug 2015 - 4:07 pm | प्रसाद गोडबोले
अवघड आहे !
20 Aug 2015 - 3:23 pm | वेल्लाभट
मोठ्या माणसाने मोठेपणा दाखवला...
23 Aug 2015 - 3:37 pm | सस्नेह
काही गोष्टी अशा आहेत की जिथे साक्षात शब्द आणि भाव नतमस्तक होतात.
..शिवछत्रपती आणि बाबासाहेब ही अशीच कवतिके आहेत महाराष्ट्राची !!
..अन मिपाकरांची !!!
23 Aug 2015 - 4:30 pm | हेमंत लाटकर
तुम्हा सर्वांचे प्रतिसाद वाचून मी थोडा वेळ स्वस्थ बसलो व एक दीर्घ श्वास घेतला. श्री. बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्रभुषण हा पुरस्कार म्हणजे त्यांनी शिवाजी महाराजांविषयी केलेल्या कार्याची पोहचपावती, ती त्यांना मिळालीच पाहिजे. ती मिळाली त्याबद्दल फडणवीसांचे अभिनंदन. राष्ट्रवादीवाले दिल्लीच्या सरदाराची थप्पड लवकर विसरले.