आई ग्ग!! लाथा मारतो की गम्मत करतो हा? फुटबॉल खेळणार नक्की कार्टा.." ती पोटाकडे पहात कौतुकाने म्हणाली.
तो मस्तपैकी हसला..
~
"बाई, तुमच्या मुलाची ओपन हार्ट सर्जरी करावी लागेल.."
"....."
"घाबरू नका. तो पुर्ण बरा होईल."
"फुटबॉल खेळेल?"
दाराआडुन त्याने चटकन डोळे पुसले..
~
डोळे उघडत नाही, दुध पित नाही, टिचकी मारली तरी रडत नाही.
ती तिचं पिल्लु कणाकणानी मरताना बघत होती..
तो... डॉक्टरांमागे पळत होता..
~
"ऑपरेशन तर झालं, पण धोका टळलेला नाही." डॉक्टर म्हणाले..
नळ्यांमध्ये वेढलेल्या व्हेंटीलेटरवरच्या जीवाला पाहुन तिने आवंढा गिळला.
तो गप्पच होता.. दोन दिवस..
~
"आई... डिझाईsssssन!!!!!"
छातीवरच्या टाक्यांच्या खुणाकंडे पहात पोरगं थुईथुई नाचत होतं.
तो पुन्हा एकदा मस्तपैकी हसला!
प्रतिक्रिया
10 Aug 2015 - 6:03 pm | जगप्रवासी
छान +१
10 Aug 2015 - 6:11 pm | रेवती
+१.
10 Aug 2015 - 6:26 pm | स्रुजा
+१ सही.. :)
10 Aug 2015 - 8:27 pm | चांदणे संदीप
प्रचंड आवडली!
+१
लहानपणी अशीच डिजाईन पहायची वेळ टाळलेला
Sandy
10 Aug 2015 - 11:58 pm | एक एकटा एकटाच
+१
11 Aug 2015 - 12:01 am | राघवेंद्र
+१
11 Aug 2015 - 2:07 am | इडली डोसा
+१
11 Aug 2015 - 2:24 am | हाहा
+१
11 Aug 2015 - 3:37 am | विशाखा राऊत
+१
11 Aug 2015 - 5:33 am | स्पंदना
सुबक!
आईसारखाच बाप पण उलगडतो येथे.
11 Aug 2015 - 2:45 pm | गिरकी
+१
11 Aug 2015 - 4:18 pm | भुमी
+१
12 Aug 2015 - 5:43 pm | अनन्न्या
आवडली कथा.
14 Aug 2015 - 1:06 pm | जिन्गल बेल
+१