मोबाईल मोबाईल......

बाबा योगिराज's picture
बाबा योगिराज in तंत्रजगत
28 Jul 2015 - 5:45 pm

मित्रान्नो,
मोबाईल घ्यायचा ठरवतोय,
बजेट २० ते २५ हजार.
दोन फोन आवड्ले होते.
१) असुस झेनफोन २
(सम्पुर्न महिती इथे मिळेल
http://www.gsmarena.com/asus_zenfone_2_ze551ml-6917.php )
किमत :- २३ हजार.

परन्तु क्यामेरा व्यवस्थित काम करत नसल्याने बाद केला.

२) वन प्लस टू
(सम्पुर्न महिती इथे मिळेल
http://www.gsmarena.com/oneplus_2-6902.php )
किमत :- २५ हजार (अंदाजे)

परन्तु कंजुस भौ नि सायनोजेन ऑपरेटिंग तितकीशी उपयोगी नाही सांगितल्याने बाद केला.

दोन्ही फोन किमतीमुळे नव्हे तर त्यांच्या हार्डवेयर (तांत्रिक वैशिष्ठ्या????) मुळे आवडले होते.
आता प्रश्न असा पडलाय की काय करू? कुठ्ला मोबाईल घेउ? मोबाईल जरा उच्च हार्डवेयरवाला (तांत्रिक वैशिष्ठ्या) असेल तर अधिक चांगला.

(व्याकारण, आणि शुध्लेखन खुप प्रयत्न केलेत तरी तेव्हड़ सुधारलेल नाही. पहिलाच प्रयत्न असल्याने कमी(?) मार पडेल अशी आशा करतो.)

सांगा काय करू ते.......

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

28 Jul 2015 - 5:50 pm | श्रीरंग_जोशी

BlackBerry Z30 (Black)

मी स्वतः अडीच वर्षांपासून ब्लॅकबेरी झेड १० फोन वापरत आहे.

सतिश गावडे's picture

15 Apr 2017 - 10:09 am | सतिश गावडे

तुझं ब्लॅकबेरी प्रेम पाहीलं की मला एक शेर आठवतो,

गुल गया, गुलशन गया, गयी होठोकी की लाली
अब तो पिछा छोड दे उसका, वो हो गयी दिवाळखोरवाली :p

बाबा योगिराज's picture

28 Jul 2015 - 6:20 pm | बाबा योगिराज

बघितला,
चांगला आहे. परन्तु तांत्रिक वैशिष्ठ्यात (हार्डवेयर) कमी वाटला...

अजुन काही....

श्रीरंग_जोशी's picture

28 Jul 2015 - 6:38 pm | श्रीरंग_जोशी

माझ्या मते हार्डवेअरचा ऑप्टिमाइझ्ड उपयोग करणारी ऑपरेटिंग सिस्टिम असेल तर उच्च क्षमतेचं हार्डवेअर नसलं तरी चालतं. अन ओ एस तशी नसली तर कितीही उच्च क्षमतेचं हार्डवेअर असो उपकरण परफॉर्मन्स देऊ शकत नाही.

बादवे यापेक्षा अधिक क्षमतेचं हार्डवेअर ब्लॅकबेरी पासपोर्टमध्ये मिळेल.

बाबा योगिराज's picture

28 Jul 2015 - 6:53 pm | बाबा योगिराज

आहे खास..... त्याला की-पैड पण आहे का? दिसायला थोडा अवजड प्रकार आहे.

एकदा वस्तु घेतल्यावर ती २-३ वर्ष मी बदलत नाही. परन्तु प्रत्येक वेळी आलेले अप-डेट्स(काही प्रति-शब्द आहे का?) करत राहिल की २ वर्षानी हार्डवेयर कमी पडायला लागत. म्हणून घेतानाच मोबाईल जरा तगड़ा घेऊ की.
म्हणून हा सारा खटाटोप.

आणि हो आम्हाला मोबाईल वर खेळ (गेम्स) खेळायला फार आवडत.... क्लैश ऑफ़ क्लान्स मध्ये टाउन हॉल ८ व्या लेवल वर जाईलच.

श्रीरंग_जोशी's picture

28 Jul 2015 - 6:59 pm | श्रीरंग_जोशी

मी ब्लॅकबेरी झेड १० मार्च २०१३ पासून वापरत आहे. ओएस तीनदा अपडेट झाली आहे.

माझा वापर बघाल तर तुम्ही मला माणसात धरणार नाही ;-) , इतका राक्षसी वापर करतो मी फोनचा. काही महिन्यांपूवी बॅटरी बदलली (किंमत $६).

आजही परफॉर्मंस पहिल्या दिवसासारखाच वाटतो. अजुन किमान एक दीड वर्ष हा फोन बदलेन असं वाटत नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Jul 2015 - 7:05 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>> माझा वापर बघाल तर तुम्ही मला माणसात धरणार नाही ;-) , इतका राक्षसी वापर करतो मी फोनचा.

हाहाहा हे आवडलं. आपलंही काम तसेच आहे, पुरे पैसे वसुल केल्याशिवाय फोन टाकायचा नाही. कंटाळा आला पाहिजे.

-दिलीप बिरुटे

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Jul 2015 - 8:25 pm | डॉ सुहास म्हात्रे

माझा वापर बघाल तर तुम्ही मला माणसात धरणार नाही ;-)

हा... हा... हा...

आपला वजनदार फोन दुसर्‍याच्या डोक्यात घालणारा माणुस डोळ्यासमोर आला ;)

(ह घ्या किंवा गेला बाजार हहाहाहा घ्या ;) )

श्रीरंग_जोशी's picture

28 Jul 2015 - 8:29 pm | श्रीरंग_जोशी

यावरंच व्यंगचित्र शोधायचा प्रयत्न केला. पटकन मिळालं नाही... :-(

उगा काहितरीच's picture

28 Jul 2015 - 9:43 pm | उगा काहितरीच

क्लैश ऑफ़ क्लान्स मध्ये टाउन हॉल ८ व्या लेवल वर जाईलच.

माझा टाउन हॉल ९ लेवल चा आहे , लेवल ९९+, वॉर स्टार ५९४ !

वाचन प्रेमी's picture

29 Jul 2015 - 9:55 am | वाचन प्रेमी

मी टाऊन हॉल ९ लेवल चा आहे,लेवल १०८ +

उगा काहितरीच's picture

29 Jul 2015 - 6:43 pm | उगा काहितरीच

# टॅग सांगा क्लॅनचा . रच्याकने सध्या कमी खेळतोय मी , बिल्डर झोपा काढत असतात !

माझा आवडता खेळ. लेवेल १२५ आहे मी ,:-)

बाबा योगिराज's picture

28 Jul 2015 - 7:14 pm | बाबा योगिराज

मग खरच विचार करावा लागेल....
रात्री सवडीने रिव्यु बघेन...

वा धागा काढलात आता मिपाकर चांगली मॅाडेल्स सुचवतील.एक श्रीरंग यांनी दिलेच आहे.बजेट दिल्याने काम सोपे झाले आहे.
ज्या फोन्सच्या मागे ( हार्डवेर ,सॅाफ्टवेर ) कंपनी खंबीरपणे उभी आहे असे निवडायचे तर १)ब्लॅकबेरी ,२)माइक्रोसॅाफ्ट ,३)आइफोन होय.

सॅमसंग एलजी आणि सोनी या कंपन्या हँडसेट आणण्याच्या बाबतीत सध्या तरी द्विधा मनस्थितीत आहेत असे दिसत आहे. दुसय्रा कोणत्यातरी कंपनीचा अमुक प्रकारचा फोन चालतो आहे हे पाहून त्याला टक्कर म्हणून काहीतरी अचाट गोष्टी टाकून ( परंतू काटछाट करून )मार्केट पकडायच्या मागे आहेत.

चालू कंपन्यांच्या विषयी काय बोलणार? आठ हजाराच्या आतले घेण्यापर्यंत ठीक आहे.

योगी९००'s picture

28 Jul 2015 - 8:16 pm | योगी९००

LG G4 stylus घ्या. LG सारखे फोन कोणीच नाही बनवतं....!!!

शब्दबम्बाळ's picture

29 Jul 2015 - 10:32 am | शब्दबम्बाळ

HTC Desire 826 बघा. हार्ड्वेअर तसे चांगले आहे, 1080p 5.5-इंच Display खूप मस्त आहे. डुअल सीम आहे.
OTG सपोर्ट आहे. मी सध्या वापरतोय!

जर online काही कुपन्स किंवा सवलतींमध्ये २०-२१ हजारापर्यंत मिळत असेल तर उत्तम!
तुम्ही जर हार्डकोर गेमर नसाल तर चांगला आहे तुमच्यासाठी असे वाटतंय.
त्याशिवाय HTC Desire 820 आणि HTC Desire 820S आहेतच.

Sony Xperia C4 डुअल हा सुद्धा चांगला वाटला! चिपसेट Mediatek आहे.

वेल्लाभट's picture

29 Jul 2015 - 10:40 am | वेल्लाभट

मायक्रोसोफ्ट चा घ्या. विंडोज वाला.

सतिश पाटील's picture

29 Jul 2015 - 11:16 am | सतिश पाटील

बाबा योगीराज..तुमच्या आधीच्या फोन चं काय झालं ज्यामुळे तुम्हाला पुण्याला पोहचायला ८ तास उशीर झाला ...हे रहस्य तुम्ही अजून उलगडलेले नाही...

सुबोध खरे's picture

29 Jul 2015 - 11:23 am | सुबोध खरे

हुअवेई होनर(HUAWEI HONOR) ६ हा पण एक चांगला फोन आहे ३ GB RAM आणी ४G असलेले फार कमी फोन आहेत. त्यातील एक आहे. ब्याटरी ३१०० mAH दोन दिवस चालते. माझी मुलगी गेले एक वर्ष वापरत आहे. स्वस्त आणी मस्त.
http://www.91mobiles.com/compare/Huawei/Honor+6/vs/HTC+Mobiles/Desire+82...

बाबा योगिराज's picture

29 Jul 2015 - 11:55 am | बाबा योगिराज

चांगले विकल्प आहेत. विचार करायला हरकत नाही...

ईथेही भरपुर लोक्स गेम्स खेळतात. क्या बात, क्या बात, क्या बात.

बाबा योगिराज's picture

29 Jul 2015 - 11:58 am | बाबा योगिराज

काहीही हा सतिश,
८ कुठे चांगले १८ तास उशिरा आलो होतो.....

सुबोध खरे's picture

29 Jul 2015 - 12:07 pm | सुबोध खरे
मना सज्जना's picture

30 Jul 2015 - 7:26 pm | मना सज्जना

आसुस चा फोने वापरात आहे चांगला आहे.

नन्दादीप's picture

13 Aug 2015 - 3:07 pm | नन्दादीप

सद्ध्या हाच फोन वापरतोय... अफलातून user interface....
Camera quality म्हणाल तर बर्‍यापैकी..... selfi खासच येतात....

बाबा योगिराज's picture

29 Jul 2015 - 12:30 pm | बाबा योगिराज

पहिली पसन्ति असुसलाच होती, पन क्यामेरा १३ मेगा पिक्सेल च्या तुलनेत तेव्हडा खास नाही. नाही तर ४ गिगा बाईट रॅम, आणि ६४ गिगा बाईट मेमरी बघितली आणि डोळेच फिरलेना आपले........

अगदी अमुकच एक मॅाडेल सुचवणे बरोबर नाही परंतू तुमचे प्राधान्य कशाला आहे ते ठरवा
१)कॅम्रा २)गेमिंगसाठी तगडा प्रसेसर अधिक RAM ३)बिझनेस अर्थात सिक्युअरटी ४)व्हिडिओ बघणे अर्थात 4G
आणखी थोड्या सुचना देऊ का?

बाबा योगिराज's picture

30 Jul 2015 - 11:53 am | बाबा योगिराज

१)कॅम्रा २)गेमिंगसाठी तगडा प्रसेसर अधिक RAM

कंजूस's picture

30 Jul 2015 - 12:41 pm | कंजूस

१)साठी lumia 640 xl ----१४ /१५हजारात अथवा कमी रुत (1GB RAM) अपग्रेड करणार आहेत.
karl zeiss camera 13mp and front 5 mp selphi
२)साठीही हाचालेल परंतू कालच विंडोज १० रिलिज झाली आहे आणि हेच मॅाडेल आणखी मोठ्या RAM सह आणि थेट विंडोज १० टाकून दिवाळीपर्यंत येण्याची दाट शक्यता आहे.

बाबा योगिराज's picture

30 Jul 2015 - 12:59 pm | बाबा योगिराज

क्या बात चांगली बातमी आहे....

फोनमध्ये बदलता येणारी/काढता येणारी बॅटरी असणे,सिम कार्ड फोन बंद न करताही बदलता येणे ,मेमरी कार्डची मेमरी अधिक फोन मेमरी हीच फोनची मेमरीप्रमाणे काम करते त्यामुळे मेमरी फुल झाली वगैरे प्रश्न पडत नाही.या चांगल्या गोष्टी आहेत.

ब़जरबट्टू's picture

3 Aug 2015 - 5:13 pm | ब़जरबट्टू

मला सुद्धा घ्यायचा आहे फ़ोन.. गेमिंगसाठी तगडा प्रसेसर अधिक राम, कमीत कमी ५" डिस्प्ले, हवेत.
सध्या तरी सोनी एक्सपेरीया Sony Z1 सोडून दुसरा मनात भरत नाहीये, अजून काही ऑप्शन सांगा राव.. Mi4 वापरताहेत का कुणी ?

कंजूस's picture

3 Aug 2015 - 6:05 pm | कंजूस

mi4
review इथे.

स्वप्क००७'s picture

10 Aug 2015 - 9:27 pm | स्वप्क००७

xiaomi phones changale aahet..
mi4 18000 rs 64 gb milat aahe

एस's picture

11 Aug 2015 - 8:19 pm | एस

नवीन स्मार्टफोन घ्यायचा आहे. बजेट रु. ७००० ते ८०००/-. झाओमी रेडमी २ प्राइम आवडलाय. अजून काही पर्याय असले तर सुचवा. फोन सतत हँग होणार नाही आणि कॅमेरा चांगला असावा अशी अपेक्षा आहे. ८०००/- च्या वर एक पै नाही बजेट अलोकेशन! :-)

श्रीरंग_जोशी's picture

11 Aug 2015 - 8:56 pm | श्रीरंग_जोशी

हा फोन भारतात विकत घेतला तर तुमच्या बजेटमध्ये बसणार नाही. पण अमेरिकेतून कुणी आणणार असेल तर बजेटमध्ये अंदाजे १०% वाढ करावी लागेल.

तुम्ही खाजगीपणा जपण्यासाठी ब्राउझरच्या बाबतीतही चोखंदळ आहात हे वाचले होते. त्यामुळे तुमच्यासाठी या प्रणालीवर चालणारे फोन्स योग्य पर्याय ठरतील. हा फोन मी अडीच वर्षांपासून वापरत आहे.

धन्यवाद! जरा बाहेर आहे बजेटच्या. विचार करतो.

बादवे, ब्लॅकबेरीच्या फोनमध्ये खासगीपणा जपण्याची जास्त वैशिष्ट्ये असतात का? उदा. अ‍ॅन्ड्रॉइड वि. ब्लॅकबेरी अशी तुलना प्रायव्हसीच्या मुद्द्यावर उपलब्ध आहे काय?

श्रीरंग_जोशी's picture

13 Aug 2015 - 5:43 pm | श्रीरंग_जोशी

आजवर हा प्रश्न न पडल्याने शोध घेण्याची वेळ आली नाही. आता शोधून बघतो.

काल वाचलेली माहिती: सर्व जी-७ देशांचे राष्ट्रप्रमुख व जी-२० मधल्या १६ देशांचे राष्ट्रप्रमुख ब्लॅकबेरी फोन्स वापरतात.

हो, ही बातमी माहिती होतीच. ब्लॅकबेरी मॅसेजिंग सर्व्हिसपुरती ब्लॅकबेरीची प्रायव्हसी मर्यादित आहे. पण ब्राउजरमधून प्रायव्हसी कशी जपली जाईल हा कळीचा मुद्दा आहे.

श्रीरंग_जोशी's picture

13 Aug 2015 - 11:31 pm | श्रीरंग_जोशी

ब्लॅकबेरी ब्राउझर दर्जाने बरेच उजवे असल्याने ब्लॅकबेरी १० चे वापरकर्ते इतर कुठले ब्राउझर वापरण्याची शक्यता फारच कमी आहे.

ब्लॅकबेरी वापरकर्त्यांच्या ब्राउझिंगबाबतच्या माहितीचा वापर इतर कंपन्यांप्रमाणे दुसर्‍या उद्देशाने करते असे आजवर एकदाही वाचले नाही.

मित्रहो's picture

12 Aug 2015 - 8:14 pm | मित्रहो

माझी बायको रेडमी 1 वापरते आणि मी एम आय 4 काही समस्या नाही.
चीन मधे शाओमी ब्रँड फार मोठा आहे भारतात पण त्यांचा तोच प्रयत्न चालू आहे. चीन मधे असे म्ह्णतात सेकंड टू अॅपल. आता तर रतन टाटाने पण त्यात पैसे गुंतवलेत.

बाबा योगिराज's picture

12 Aug 2015 - 9:13 pm | बाबा योगिराज

चीन मधे असे म्ह्णतात सेकंड टू अॅपल.
बरोब्बर.

परन्तु शाओमीचे विक्रि-पश्चात सेवा पुरवनार्‍या कार्यालयांचे जाळे उभे रहायला थोडा वेळ लागेल.

बाबा योगिराज's picture

12 Aug 2015 - 2:32 pm | बाबा योगिराज

मी मागच्या महिन्यात आई साठी लेनोवोचा Lenovo A6000 Plus हा मोबाईल घेउन दिला आहे. ७५००/- किम्मत आहे. एक-दिड महिन्याच्या वापरात काहिही त्रुटी आढळली नाही.
The 64-bit Qualcomm Snapdragon 410 SoC आहे. २ गिगा बाईट चा रॅम आहे. आमच्या चिरंजिवाला यु टयुब वर गाणे बघायची हौस आहे. थोड फार गेम खेळुन बघितलेत. व्यवस्थित चालतोय. स्क्रिन साडे पाच इंची आहे. उर्जा दिवसभर पुरते. क्यामेरा ८ मेगा पिक्सेल आहे. साठ्वन्या साठी १६ गीगा बाईट जागा उपलब्ध आहे, आणि ३२ गिगा बाईट पर्यन्त वाढवता येते. चवथ्या युगा साठी तय्यार आहे.
माझ्या मित्र आणि परिवारात आधीच लेनोवो चे ३-४ मोबाइल आहेत, त्यामुळेच मी पण तोच घेतला. काहिच त्रास होत नाही. दुरुस्तिची ठिकाने सुद्धा उपलब्ध आहेत. काळजी नसावी.
विचार करुन बघायला हरकत नसावी.

आधिक माहिती साठी खलील लिंक वर जा....
http://gadgets.ndtv.com/mobiles/reviews/lenovo-a6000-plus-review-a-welco...

ह्याचा कॅमेरा परफॉर्मन्स कसा आहे?

बाबा योगिराज's picture

12 Aug 2015 - 3:09 pm | बाबा योगिराज

वरती दिलेल्या लिन्क वर या मोबाईलच्या कॅमेर्‍यातुन काढ्लेले फोटो आहेत. लगेच लक्षात येयील.

धन्यवाद! मला एकच शंका आहे. बाकीचे स्पेसिफिकेशन्स सर्व रेडमी २ प्राईम सारखेच असताना रेडमी ची किंमत ७००० आणि ह्याची ७५०० आहे. पण लेनोवो हा प्रस्थापित ब्रँड आहे त्यामुळे जास्त विश्वसनीय वाटतोय.

बाबा योगिराज's picture

12 Aug 2015 - 4:22 pm | बाबा योगिराज

रेड मी तर मला ही आवडला होता, परन्तु साधारणत: दिडेक वर्षापासून समोरच्याला लेनोवो वापरताना बघितलय शिवाय काही वेळेस वापरुन सुद्धा बघितला होता म्हनुन मला तरी लेनोवोवरच विश्वास आहे.
मी मोबाईल घ्यायचा ठरवला तेव्हा लेनोवोचा lenovo vibe z2 pro घ्यायचा ठरवला होता. पन तोपर्यन्त तो उपलब्ध नव्हता, म्ह्नुन सुचत नव्हत कि काय घ्याव, आणि या सठिच हा धागा सुरु केला होता. लेनोवो सुद्धा चांगले पर्याय उपलब्ध करुण देत आहे.
अजुन ही शंका असेल तर यु ट्यूब वर सुधा या फोन ची माहिती मिळु शकेल.
https://www.youtube.com/results?search_query=lenovo+a6000+plus+review

रेड मी ही अजुनही नविन कंपनी आहे. फोन घेतल्यावर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे विक्री-पश्चात सेवा, आणि रेड मी साठी विक्री-पश्चात सेवांची अजुन तरी कुणी खात्री केल्याच मी बघितलेल नाही.

एस's picture

12 Aug 2015 - 4:42 pm | एस

सहमत आहे.

संजय पाटिल's picture

12 Aug 2015 - 5:41 pm | संजय पाटिल

माय्क्रोमॅक्स मध्ये काहि मॉडेल अस्तील तर सुचवा.