काँबीनात्सिऑन (प्रकार २)

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in पाककृती
8 Jul 2015 - 9:22 pm

.

बाहेर मस्त पाऊस पडत असताना भजी, वडे सगळेच खातात. हा पास्ता काँबीनात्सॉन ट्राय करून पहा.
वेगवेगळ्या प्रकारच्या पास्त्यांचे इटालियन काँबीनात्सिऑन तुमच्यासाठी-
काँबीनात्सिऑन (प्रकार १) तुम्हाला माहित आहेच. नवीन मंडळींसाठी त्याची लिंक देते आहे.

साहित्य-
फुसिली, पेन्नं, फार्फल अशा वेगवेगळ्या प्रकारचा पास्ता प्रत्येकी १ बाऊल
३ टोमॅटो किवा टोमॅटो प्युरी १ मोठा बाऊल भरून
१ कांदा
बारीक चिरलेला लसूण २ चमचे
१ चमचा बासिलिकुम ( ड्राय बेसल पावडर)
१ चमचा रोझमारिन (ड्राय रोझ मेरी पावडर)
१ चमचा पिरपूड
मीठ चवीनुसार
१ टेबलस्पून ऑलिव्ह ऑइल
१ बाऊल भरून किसलेले चीज
२०० मिली फ्रेश क्रिम
१ कप दूध+ १ टेबलस्पून मैदा

कृती-
टोमॅटो पाण्यात घालून शिजवा, निथळू द्या, नंतर साले काढून गर मिक्सरला फिरवा अथवा तयार प्युरी घ्या.
दुधात मैदा विरघळून घ्या.
वेगवेगळे पास्ता शिजायला वेगवेगळा वेळ लागतो म्हणून प्रत्येक प्रकारचा पास्ता वेगळा शिजवून घ्या. एका पातेल्यात पाणी उकळत ठेवा त्यात एक प्रकारचा पास्ता घाला आणि शिजवा. शिजल्यावर चाळणीवर घालून पाणी पूर्ण निथळू द्या. दुसरा पास्ता शिजला की पहिला प्रकार चाळणीतून ताटलीत काढा म्हणजे तेवढ्या वेळात पाणी पूर्णपणे निथळेल.
..
कांदा उभा चिरा, मग त्याचे पेराएवढे तुकडे करा.
ऑलिव्ह ऑइल गरम करा, त्यात लसणीची पेस्ट घाला, परता, कांदा घालून परता व शिजू द्या. कांदा ट्रान्सपरंट होईल
टोमॅटो प्युरी घालून शिजवा.
बेसल पावडर, रोझमारीन, मिरपूड घाला व एक दोन उकळ्या येऊ द्या.
मैदा मिसळलेले दूध घाला, उकळू द्या.
फ्रेश क्रिम घाला. मीठ घाला. एक उकळी आल्यावर आच बंद करा.
आता सॉस तयार झाले. त्यातील निम्मे सॉस बाजूला काढून ठेवा.
एका बेकिंग मोल्ड मध्ये शिजवलेला पास्ता घाला. त्यावर निम्मे सॉस ओता व ६-७ तास मुरवत ठेवा.
संध्याकाळी पास्ता खायचा असेल तर सकाळी मुरवत ठेवा व दुपारी खायचे असेल तर रात्रीच मुरवत ठेवा.
.
जेव्हा पास्ता काँबीनात्सॉन करायचे आहे तेव्हा आधी पास्ता व सॉसचे मिश्रण सारखे करून घ्या. त्यात थोडे चीज घालून एकसारखे करा. उरलेले निम्मे सॉस त्यावर घाला व हलके ढवळून सारखे करा.
सर्व पास्ता चीजने झाका.
.
२०० अंश से वर २५-३० मिनिटे बेक करा.
गरम गरम खा.
.

प्रतिक्रिया

त्रिवेणी's picture

8 Jul 2015 - 9:39 pm | त्रिवेणी

पास्ता माझ्या आवडीचा.पण white सॉस मधला आवडतो जास्त.
विमान नगर च्या शिवसागर चा पास्ता मस्त असतो.
आणि मी पहिली.

मधुरा देशपांडे's picture

8 Jul 2015 - 11:15 pm | मधुरा देशपांडे

यावेळी पहिल्यांदाच एवढे सुंदर फोटो बघुनही अज्जिबात जळजळ झाली नाही. तुझ्याच घरी हे परवा खाल्ल्यामुळे. :) अफलातुन झाला होता हा प्रकार. पाकृ आल्याने आता कधीतरी करुन पाहीन.

रेवती's picture

9 Jul 2015 - 12:23 am | रेवती

भारी हां! अगदीच भारी!
स्वातीताई, मी तुझ्याकडे आल्यावर तू फक्त पास्ताच कर.
असा सॉस करून पण एकाच प्रकारचा पास्ता वापरून मी करते, आता दोन तीन प्रकार मिसळून करून बघते. यम् यम्.........

उमा @ मिपा's picture

9 Jul 2015 - 11:31 am | उमा @ मिपा

मस्तच गं!
चीज कोणतं वापरलंय?

स्वाती दिनेश's picture

9 Jul 2015 - 3:12 pm | स्वाती दिनेश

मी गौडा चीज वापरले आहे, पण गौडा, एमेंटालर ,चेडर कोणतेही चीज वापरू शकतो.
स्वाती

मस्तच गं ताई... छान दिसतोय पास्ता.
पास्ता एवढा आवडत नाही पण नवर्‍याला खुप आवडतो. सो त्याला करुन देता येईल.

सानिकास्वप्निल's picture

9 Jul 2015 - 3:35 pm | सानिकास्वप्निल

तोंपासू!!

मी हा पदार्थ बनवणार म्हणजे बनवणारचं :)
पास्ता भंयकर आवडतो, पण व्हाईट सॉसमधला पास्ता विषेश आवडत नाही. ह्या पाककृतीमध्ये टोमॅटो सॉस व व्हाईट सॉस असे दोन्ही असल्यामुळे मी नक्की बनवणार.

जाता-जाता जेव्हा-केव्हा आपला युरोप कट्टा होईल तेव्हा तूला हेच सांगणार आम्हाला खाऊ घालायला ;)

स्वाती दिनेश's picture

9 Jul 2015 - 5:22 pm | स्वाती दिनेश

जरूर! करायलाच हवा आहे आपला युरोप कट्टा आता!
स्वाती

कपिलमुनी's picture

9 Jul 2015 - 4:09 pm | कपिलमुनी

पावसाळी थंड हवेत गरम चिझी पास्ता खायला मजा येइल

पद्मावति's picture

9 Jul 2015 - 5:42 pm | पद्मावति

स्वाती, आजपासून इथे मुलांना शाळेला सुट्टी. रोज वेगळ्या वेगळ्या फरमाइशी सुरू होतिल. या रेसेपिं ने माझा आज चा मेनू ठरला. धन्यवाद. मस्तं प्रकार.

रेसिपी चांगली आहेच, पण एवढं चीज?

स्वाती दिनेश's picture

9 Jul 2015 - 8:30 pm | स्वाती दिनेश

किमान एवढं तरी चीज हवंच रे , जास्तही चालेल.. :)
स्वाती

दिपक.कुवेत's picture

14 Jul 2015 - 4:30 pm | दिपक.कुवेत

पास्ता + चीज हे कॉम्बो खुपच आवडतं पण थंडित बनवीन. आधीच उन्हाने ईथे जीव हैराण झालाय त्यात हे गरमागरम काय जाणार???

एस's picture

14 Jul 2015 - 7:00 pm | एस

स्वादिष्ट असणार यात शंका नाही. यातील जे इटालिअन पदार्थ आहेत, उदा. रोजमेरी पावडर, बेसिल पावडर इत्यादी ह्यांना भारतीय पर्याय सांगता येतील का?

स्वाती दिनेश's picture

15 Jul 2015 - 1:11 pm | स्वाती दिनेश

कोरम ,विवियाना,बिग बझार सारख्या मॉल मध्ये हे इतालियन मसाले मिळतात अगदी सहज.
बेसलची पाने म्हणजे सब्जाची पाने.. ती तर सहज मिळतील.
स्वाती