विजयादशमी च्या हार्दिक शुभेच्छा..

सर्व मिपाकरांना विजयादशमी च्या हार्दिक शुभेच्छा..

कोलंबीची मॉली

Primary tabs

नूतन सावंत's picture
नूतन सावंत in पाककृती
27 Jun 2015 - 11:48 am

मला वेगळे प्रकार करायला न् खायला भयंकर आवडतं.पाचवीत असल्यापासून आईल २-३ दिवसांसाठी कामासाठी गावी गेली की स्वयंपाक करावा लागत असे.न आई करून जात असे पण तेव्हा फ्रीज नसल्याने कधी खराब झालं तर काही भाजी, आमटी करायची वेळ येत असे. आई स्वयंपाक करताना पहत असे. वाटून कातून द्यायला मदतही करत असे.मासे भाज्यांपेक्षा करायला सोपे वाटत.एक वाटण वाटले की काम झाले. माझ्या वडिलांचा न्यूज पेपरचा धंदा असल्याने साप्ताहिके,मासिकेही भरपूर असत. वेगवेगळ्या मासिकाकांचे,साप्ताहिकांचे अन्नपूर्णा,रुचकर,स्वादिष्ट असे विशेषांक येत असत.त्यात पाहून इतर पद्धतीचा स्वयंपाक करायला शिकले.पुढे वेगवेगळ्या प्रांतातल्या मैत्रिणी कॉलेज आणि नोकरी निमित्ताने भेटल्या. तेव्हा त्यांच्याकडून, त्यांच्या आईकडून ,सासूकडून शिकले.कोलंबी अतिशय आवडता मत्स्यप्रकार.त्याचे विविध प्रकार पाहून आश्चर्यच वाटते. कोणत्याही मसाल्यात करा,ती चवदार होणारच.ओलं खोबरं वापरा की सुकं खोबरं;लाल तिखट वापरा की गरम मसाला;कच्चा मसाला वापरा की भाजून वाटण करा;हिरवा मसाला वापरा की लाल मिरच्या वापरा;चिंच वापरा की कोकम वापरा की कैरी वापरा; खोबरं वाटून वापरा किंवा त्याचं दूध कडून वापरा किंवा खोबरं न वापरता करा. तिची चव प्रत्येकाशी जमवून घेत खुलते. असाच हा एक केरळी प्रकार. खोबरं न वापरता केलेला.मला अतिशय आवडतो.तुम्हाला आवडतो का ते पहा.पाकाकृतीवरचं पाहिलं पान गोड नाही,नाही, चमचमीत करून घ्या.
साहित्य:-
१. १२ ते १५ कोलंब्या
.

.
२. दोन कांदे मध्यम.

३. दोन टोमॅटो मध्यम.
.
४. वाटीभर कोथिंबीर
1
५. १ चहाचा चमचा मिरचीपूड..

६. १ चहाचा चमचा धणेपूड.

७. अर्धा चहाचा चमचा हळदपूड.

८. अर्धा चहाचा चमचा राई.

९. १ लवंग.

१०. १०काळेमिरी.

११. ६ लसूण पाकळ्या.

१२. २ हिरव्या मिरच्या,तुकडे करुन.

1

१३. तेल अर्धी वाटी.मी थोडे कमी वापरले आहे.

१४. चवीनुसार मीठ.

कृती :-
१. कोलंबी सोलून आतला काळा दोरा काढून साफ करावी.धुऊन घ्यावी.

.

२.. कांदे उभे पातळ चिरून घ्यावेत.
1
३. टोमॅटोला सुरीने + आकारात काप देऊन उकळत्या पाण्यात मिनिटभर सोडून गॅस बंद करावा.

४. टोमॅटो लगेच थंड पाण्यात टाकवेत.त्यामुळे त्याची साल लगेच सुटते.

५. टोमॅटो सोलून अनुक्रमांक ५ ते १२ मधले पदार्थ त्यासोबत बारीक वाटावेत.

1
६. कढई किंवा पातेल्यात तेल गरम करून त्यात कांदे परतावेत.

७. वाटलेला मसाला मिठासाहित त्यात घालावा
1
८. मसाल्याला तेल सुटेपर्यंत परतावे.

९. कोलंबी घालून परतावे आणि चार वाट्या गरम पाणी घालावे.यात टोमॅटोचे पाणी आधी मोजून घ्यावे.
1
१०. उकळून उतरावे.रस अंगासरसा ठेवावा.कोथिंबीर घालून सादर करावे.
1

आता काय वाचताय? भात ,चपाती ब्रेड,पुरी,पानपोळे,अंबोळ्या कशाहीबरोबर हाणावेत.

प्रतिक्रिया

नूतन सावंत's picture

27 Jun 2015 - 11:49 am | नूतन सावंत

बाकीचे फोटो का दिसत नाहीत.स.मं. कृपया मदत करा.

नूतन सावंत's picture

27 Jun 2015 - 11:49 am | नूतन सावंत

बाकीचे फोटो का दिसत नाहीत.स.मं. कृपया मदत करा.

मुक्त विहारि's picture

27 Jun 2015 - 11:53 am | मुक्त विहारि

(कोलंबी आणि पापलेट प्रेमी) मुवि

उगा काहितरीच's picture

27 Jun 2015 - 12:09 pm | उगा काहितरीच

१. कोलंबी सोलून आतला काळा दोरा काढून साफ करावी

हा दोरा म्हणजे नक्की कुठला अवयव ?

इंटेस्टाइन
किंवा पचन संस्था।

उमा @ मिपा's picture

27 Jun 2015 - 1:49 pm | उमा @ मिपा

अतिशय टेम्प्टिंग पाकृ, नक्की करणार!

पद्मावति's picture

27 Jun 2015 - 1:58 pm | पद्मावति

छानच आहे रेसीपी. फार कॉंप्लिकेटेडही वाटत नहिये.
नक्की करुन बघिन.

त्रिवेणी's picture

27 Jun 2015 - 4:06 pm | त्रिवेणी

कोलंबी कधी घरी नाही केलि पण अलीबाग च्या saman मधे खलेला प्रॉन्स मसाला खुप भारी होता.

न खाणार्यांनी काय लिहावं बरं!
सादरीकरण मस्तच!

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Jun 2015 - 4:50 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्तं ! फटू जीवघेणे आहेत !

कोलंबी जीव की प्राण आहे ! हर एक प्रकार आवडतो !

स्नेहानिकेत's picture

27 Jun 2015 - 10:53 pm | स्नेहानिकेत

छान आणि सोपी रेसिपी.नक्की करणार.

सानिकास्वप्निल's picture

27 Jun 2015 - 11:35 pm | सानिकास्वप्निल

मस्तं पाककृती, करुन बघेन :)

अत्रन्गि पाउस's picture

28 Jun 2015 - 12:30 am | अत्रन्गि पाउस

रात्री १२३० ला हे वाचून भूक खवळलीये ...कोण देणार हे ???

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

28 Jun 2015 - 12:52 am | निनाद मुक्काम प...

प्रथम तुमच्या लेखन कौशल्याला व सादरीकरणाला सलाम
कोळंबी माझा आवडता प्रकार पण तो काळा धागा सोडवणे प्रकार कठीण वाटल्याने सोललेला वाटा कोळीणीकडे मागायचो. तेव्हा आला रविवारचा बामन गिर्हाईक असे भाव कालांतराने तिच्या चेहऱ्यावर दिसायला लागले.
मी भाव सुद्धा करत नसे.
म्हणूनहि असेन कदाचित
तुमची पाककृती करून पाहीन
येथे फ्रोझन कोळंबी मिळते त्यामुळे धागा प्रकरण निकालात निघते.

नूतन सावंत's picture

28 Jun 2015 - 9:48 am | नूतन सावंत

मुवि,तुमही तिखटाचे आणि लवंगांचे प्रमाण वाढवा.मूळ पाककृतीत ४ लवंगा वापतात.

@ उगा काहितारीच,हा कला धागा म्हणजे कोलंबीचे आतडे असते.त्यात रेती असू शकते. त्यामुळे तो काढणे अपरिहार्य आहे.

@ सानिका,तुला आवडली म्हणजे मास्टरशेफचे प्रमाणपत्र मिळाल्यासारखे आहे.पण _/\_तुला. प्रत्येक पायरीचे फोटो पाहायला छान वाटतात,पण काढायला किती कठीण असतात रे बाबा.

@अत्रंन्गी पाऊस,मुंबईत असाल तर पाहुणचाराची संधी द्या.

उमा,पद्मावती,स्नेहानिकेत,सानिका,निनाद मुक्काम प... एकदा करा.परत परत करावीशी वाटेल.

त्रि,करून पहा घरी.

डॉ.साहेब,धन्यवाद.

सुरन्गी ताय अप्पुन जन्दगी मे ये प्रकार खायेला नै आउर खानेकी ग्यारन्टी भी नै फिर बी अप्पुनको
ये प्र्कार भारी लग रैला हे :)

मसाला तोच ठेऊन बटाटे, पनीर वैगरे वापरुन करुन बघावंसं वाटतंय.

gogglya's picture

1 Jul 2015 - 3:33 pm | gogglya

पाकृ अन्डे घालुन करता येइल का?
कृ. ह. घ्या.

पाकृ अन्डे घालुन करता येइल का?

एकदा करुन बघा. पण अंडी घालण्याच्या त्रासदायक प्रक्रियेनंतर परत पाकृ करण्याचं अवसान उरेल का?

किल्लेदार's picture

14 Jul 2015 - 4:11 am | किल्लेदार

हा हा हा..........हा विनोद कुणाला कळालेला दिसत नाही.

नूतन सावंत's picture

1 Jul 2015 - 7:11 pm | नूतन सावंत

@ पियुशा,मसाले तेच ठेऊन आवडती भाजी घालून करून पहा.

@ सूड,प्रयोग करून बघायला हरकत नाही.

@goggly,अंडे घालून करता येईल की,फक्त अंडी घालताना उकललेली अंडी घाला म्हणजे झालं

कविता१९७८'s picture

3 Jul 2015 - 2:26 pm | कविता१९७८

वाह , मस्त पाक कृती, मी राहते हा समुद्रीभाग असल्याने जवळ जवळ रोजच मासळीबाजारात कोलंबी पाहायला मि ळते आणि मुंबईच्या मानाने भरपुर स्वस्त असते, यावेळेस अशा प्रकारे करुन पाहीन

छान आहे पाककृती. वाखू साठवली आहे.

रच्याकने, याला मॉली असे का म्हणतात? मॉली म्हणजे काय?

पैसा's picture

3 Jul 2015 - 4:08 pm | पैसा

डिट्टेल पाकृ. फोटो पण झकास!

स्पंदना's picture

3 Jul 2015 - 8:08 pm | स्पंदना

सोप्पे आणि मस्त!

स्वाती२'s picture

4 Jul 2015 - 1:44 am | स्वाती२

छान पाकृ! नक्की करणार.

दिपक.कुवेत's picture

14 Jul 2015 - 4:15 pm | दिपक.कुवेत

कुठल्याहि प्रकारात जाम आवडते सो हे करुन पाहिनच. एक शंका आहे - टोमॅटो सोबत बाकि पदार्थ वाटुन वाटण एवढं घट्ट कसं? थोडं ओलं खोबरं घातलय का?

नूतन सावंत's picture

20 Jul 2015 - 12:13 pm | नूतन सावंत

दिपक.कुवेत
ते वाटण करताना एकच टोमॅटो वापरला आहे,दुसरा वेगळा वाटला आहे.या पाककृतीत खोबरे अजिबात नाही.
प्रत्येक पायरीचे फोटो काढणे अजून लक्षात रहात नाही.

नूतन सावंत's picture

20 Jul 2015 - 12:13 pm | नूतन सावंत

दिपक.कुवेत
ते वाटण करताना एकच टोमॅटो वापरला आहे,दुसरा वेगळा वाटला आहे.या पाककृतीत खोबरे अजिबात नाही.
प्रत्येक पायरीचे फोटो काढणे अजून लक्षात रहात नाही.

पदम's picture

2 Sep 2015 - 12:13 pm | पदम

Chhan paakkruti