मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कोलंबीची मॉली

नूतन सावंत · · पाककृती
मला वेगळे प्रकार करायला न् खायला भयंकर आवडतं.पाचवीत असल्यापासून आईल २-३ दिवसांसाठी कामासाठी गावी गेली की स्वयंपाक करावा लागत असे.न आई करून जात असे पण तेव्हा फ्रीज नसल्याने कधी खराब झालं तर काही भाजी, आमटी करायची वेळ येत असे. आई स्वयंपाक करताना पहत असे. वाटून कातून द्यायला मदतही करत असे.मासे भाज्यांपेक्षा करायला सोपे वाटत.एक वाटण वाटले की काम झाले. माझ्या वडिलांचा न्यूज पेपरचा धंदा असल्याने साप्ताहिके,मासिकेही भरपूर असत. वेगवेगळ्या मासिकाकांचे,साप्ताहिकांचे अन्नपूर्णा,रुचकर,स्वादिष्ट असे विशेषांक येत असत.त्यात पाहून इतर पद्धतीचा स्वयंपाक करायला शिकले.पुढे वेगवेगळ्या प्रांतातल्या मैत्रिणी कॉलेज आणि नोकरी निमित्ताने भेटल्या. तेव्हा त्यांच्याकडून, त्यांच्या आईकडून ,सासूकडून शिकले.कोलंबी अतिशय आवडता मत्स्यप्रकार.त्याचे विविध प्रकार पाहून आश्चर्यच वाटते. कोणत्याही मसाल्यात करा,ती चवदार होणारच.ओलं खोबरं वापरा की सुकं खोबरं;लाल तिखट वापरा की गरम मसाला;कच्चा मसाला वापरा की भाजून वाटण करा;हिरवा मसाला वापरा की लाल मिरच्या वापरा;चिंच वापरा की कोकम वापरा की कैरी वापरा; खोबरं वाटून वापरा किंवा त्याचं दूध कडून वापरा किंवा खोबरं न वापरता करा. तिची चव प्रत्येकाशी जमवून घेत खुलते. असाच हा एक केरळी प्रकार. खोबरं न वापरता केलेला.मला अतिशय आवडतो.तुम्हाला आवडतो का ते पहा.पाकाकृतीवरचं पाहिलं पान गोड नाही,नाही, चमचमीत करून घ्या. साहित्य:- १. १२ ते १५ कोलंब्या . . २. दोन कांदे मध्यम. ३. दोन टोमॅटो मध्यम. . ४. वाटीभर कोथिंबीर 1 ५. १ चहाचा चमचा मिरचीपूड.. ६. १ चहाचा चमचा धणेपूड. ७. अर्धा चहाचा चमचा हळदपूड. ८. अर्धा चहाचा चमचा राई. ९. १ लवंग. १०. १०काळेमिरी. ११. ६ लसूण पाकळ्या. १२. २ हिरव्या मिरच्या,तुकडे करुन. 1 १३. तेल अर्धी वाटी.मी थोडे कमी वापरले आहे. १४. चवीनुसार मीठ. कृती :- १. कोलंबी सोलून आतला काळा दोरा काढून साफ करावी.धुऊन घ्यावी. . २.. कांदे उभे पातळ चिरून घ्यावेत. 1 ३. टोमॅटोला सुरीने + आकारात काप देऊन उकळत्या पाण्यात मिनिटभर सोडून गॅस बंद करावा. ४. टोमॅटो लगेच थंड पाण्यात टाकवेत.त्यामुळे त्याची साल लगेच सुटते. ५. टोमॅटो सोलून अनुक्रमांक ५ ते १२ मधले पदार्थ त्यासोबत बारीक वाटावेत. 1 ६. कढई किंवा पातेल्यात तेल गरम करून त्यात कांदे परतावेत. ७. वाटलेला मसाला मिठासाहित त्यात घालावा 1 ८. मसाल्याला तेल सुटेपर्यंत परतावे. ९. कोलंबी घालून परतावे आणि चार वाट्या गरम पाणी घालावे.यात टोमॅटोचे पाणी आधी मोजून घ्यावे. 1 १०. उकळून उतरावे.रस अंगासरसा ठेवावा.कोथिंबीर घालून सादर करावे. 1 आता काय वाचताय? भात ,चपाती ब्रेड,पुरी,पानपोळे,अंबोळ्या कशाहीबरोबर हाणावेत.

वाचन 19359 प्रतिक्रिया 30