एल ई डी प्रकारातला टी व्ही

सुनिल साळी's picture
सुनिल साळी in तंत्रजगत
25 Jun 2015 - 3:31 pm

राम राम मंडळी,

गेली 12 वर्षे ते आतापर्यंत माझा एल जी कंपनीचा सी आर टी टेलीव्हिजन संच काहीही बिघाड न होता खूप चांगल्या प्रकारे चालत होता. पण सध्या सुरुवातीला दणका दिल्या शिवाय टेलीव्हिजन संच चालू होत नाही :-(

असो आम्ही ह्या नीर्णयाप्रत आलो आहोत की नवीन एल ई डी प्रकारातला टी व्ही विकत घ्यावा.

आपल्या मिपा सदस्यापैकी बहुतेक लोक वेग वेगळ्या कंपन्याची एल सी डि, एल ए डी वापरत असणारच.

आपला बहुमोल सल्ला द्यावा.

अटी:
> 32 इंच ते 40 इंच
> कींमत: रु. 18000 ते 25000
> स्पष्ट चित्र - कोणत्याही बाजूने बघीतल्यास

प्रतिक्रिया

एल जीचा ४२ इंची /एल ई डी - ३D रेडी/ हेच डी /इंग्लंड मध्ये घेऊन वापरला - पुढे कर भरून भारतात आणला . काही प्रोब्लेम नाही - इथल्या एल जीने मस्तपैकी बसवून दिला ! पण ड्युटी भरण्यामुळे किंमत मात्र रु. ७०,००० पडली .

भारतात आता हा ५५००० असेल असा अंदाज आहे. अर्थात कमीवाले पर्याय आहेतच!

एल सी डी चा विचारही आता करू नये. कारण - ''स्पष्ट चित्र - कोणत्याही बाजूने बघीतल्यास '' नाही मिळत

त्रिवेणी's picture

26 Jun 2015 - 11:43 am | त्रिवेणी

एल जी ४२ इंची ५६१०LED ५०के ला padvyala घेतला ५०के ला.
मस्त आहे.
फ़क्त क्रोमा मधून घेवू नका.बेक्कार सर्विस.
नवरा टाटा मोटर्स employee म्हणून चला आपल्याच लोकांकडून घेतला तर मनस्ताप सहन करावा लागला.

खेडुतजी आपल्या प्रतीसादाबद्दल धन्यवाद.

एल ई डीत स्पष्ट चित्र - कोणत्याही बाजूने बघीतल्यास दिसते का?

सदस्यनाम's picture

25 Jun 2015 - 4:39 pm | सदस्यनाम

बहुतेक कुठल्याच एलेडीत मागच्या बाजूने चित्र दिसत नाही. ;) ह. घ्या.
इतर अ‍ॅंगलने पाहण्यास आयपीएस स्क्रीन असते असे वाटते.

खेडूत's picture

25 Jun 2015 - 4:48 pm | खेडूत

:)
होय!
अत्यन्त क्लियर...

आता पाहिले : LG 42LA620V 42 Inch Smart 3D LED TV हा आहे.

नाव आडनाव's picture

25 Jun 2015 - 5:06 pm | नाव आडनाव

कमी किंमतीत ओनिडा एक चांगला ऑप्शन आहे. मी ३९ इंच स्क्रीन चा १.५ वर्षा आधी घेतला होता. तेंव्हा किंमत होती ४३००० रुपये आता अजून कमी झाली आहे. ३डी सपोर्ट आहे. पिक्चर क्वालिटी चांगली आहे.

नाव आडनाव's picture

25 Jun 2015 - 8:47 pm | नाव आडनाव

माझ्या टीवी चं मॉडेल आहे LEO40FC3DLED. कंपनी वॉरंटी १ वर्षाची होती + मी ई-झोन मधून टीवी विकत घेतला त्यांची १ वर्षाची वॉरंटी अशी २ वर्षांची वॉरंटी आहे.

सरल मान's picture

25 Jun 2015 - 6:01 pm | सरल मान

Sharp LC-32LE156M ,तुमच्या बजेट मध्ये येइल. Digi १ आउटलेट मध्ये डिस्काउन्ट चालु होता, पाहवे लागेल.
मी ३ महिन्यापुर्वी घेतला आहे, छान चालतो. LED घेताना दुकानदारास मी २०००० ते २५००० मधील LG, VideoCon, Panasonic, MEPL (Local Brand) आणि Sharp जवळ जवळ मान्डून चालु करायला सान्गितले. Samsung आणि Sony या बजेट मध्ये नव्हते. मला Sharp जास्त स्पष्ट वाटला आणि warrenty पण 3 years आहे.

सुनिल साळी's picture

25 Jun 2015 - 7:10 pm | सुनिल साळी

प्रतीसादाबद्दल धन्यवाद

मायक्रोम्याक्स बद्द्ल आपले काय मत आहे. फ्लिपकार्ट वर ऑफर चालू आहे. रु. २३०००+.

४० इन्च, फुल्ल एच डि.

स्थानिक दुकानदार मात्र मायक्रोम्याक्स घेऊ नका असे म्हणतात.

सुबोध खरे's picture

25 Jun 2015 - 9:02 pm | सुबोध खरे

जरा सावकाशीने प्रतिसाद देतो. मायक्रो माक्स टाळता आला तर पहा.

चिनार's picture

26 Jun 2015 - 12:52 pm | चिनार

मायक्रोम्याक्स !
चांगले आहेत हे टीव्ही ..

मोहनराव's picture

25 Jun 2015 - 7:45 pm | मोहनराव

मला जरा यातील फरक सांगाल का?
HD-Ready
Full HD
4K
Ultra HD

आनंदी गोपाळ's picture

25 Jun 2015 - 9:02 pm | आनंदी गोपाळ

एच डी = हाय डेफिनिशन.

जितके जास्त हाय तितकी पिक्सेल डेन्सिटी वाढत जाते व चित्र अधिक चांगले, गुळगुळीत कागदावर छापलेल्या मासिकाच्या चित्रांसारखे दिसते. तुलनेने साध्या टीव्हीवर चित्र पेपरमधल्या फोटो सारखे ;)

पण ते तसे दिसण्यासाठी मूळ टीव्ही/केबलचा सिग्नल तसा हवा. एचडी सिग्नलवाले चॅनल्स डिशवर आजकाल मिळतात, पण त्या च्यानेलसाठी जास्त पैसेही भरावे लागतात. तेव्हा सध्याच्या उपलब्धतेनुसार नुस्ता एचडी टीव्ही पुरे.
*
मायक्रोमॅक्स चांगला टीव्ही आहे. बेन्क्यू नामक कंपनीचा ५२" टीव्ही खूपच स्वस्तात कोरियातून आणला होता. तो छाण सुरू आहे. भारतात मिळतो की नाही ठाऊक नाही.
*
माझ्या मते,

टीव्ही घेताना त्याच्या पाठीमागील बाजूस कोणती व किती छिद्रे आहेत, ते पाहून घेणे. उदा. यूएस्बी, एचडीएमआय, व्हीजीए, इ. इनपुट, डीव्हिडीआर व सेटटॉप बॉक्स इनपुटसाठी एकाच वेळी वापरता येतील अशी इनपुट्स, होम थिएटरसाठी आऊटपुट वगैरे.

टीव्हीला यूएसबी-स्टिक उर्फ पेन ड्राईव्ह, किंवा मोबाईल, किंवा पोर्टेबल हार्ड डिस्क किंवा आपल्याकडचा डिजिटल कॅमेरा जोडल्यास त्यातून सरळ टेक्स्ट/गाणी/चित्रे/सिनेमा इ. पाहता येतो काय? आल्यास कोण-कोणत्या फॉर्म्याट्स सपोर्ट होतात, .mkv इ. नव्या फॉर्मॅट्स हा टीव्ही ओळखतो काय? हेदेखिल पाहून घ्यावे.

या टीव्हीचा वापर, लॅपटॉपचा एक्स्टेन्शन स्क्रीन प्रेझेंटेशन्स, सर्फिंग इ. साठी, मोबाईलवरून/कॅमेर्‍यावरून काढलेल्या फोटोजचा फॅमिली शो, यूएसबीवरून सिनेमे पाहणे, गाणी ऐकणे इ. अनेक प्रकारांनी करता येतो.

सुबोध खरे's picture

25 Jun 2015 - 9:00 pm | सुबोध खरे

एच डी रेडी म्हणजे ७२० P( PROGRESSIVE) 1,280×720 किंवा १ मेगा पिक्सेल
फुल एच डी म्हणजे १०८० P 1,920×1,080 किंवा २ मेगा पिक्सेल
Ultra HD म्हणजे २००० P (आणी जास्त) 2,048×1,536 किंवा ३ मेगा पिक्सेल (आणी जास्त)
४ K म्हणजे २१६० p 3,840×2,160 किंवा ८ मेगा पिक्सेल
पहा https://en.wikipedia.org/wiki/High-definition_video

मदनबाण's picture

25 Jun 2015 - 9:54 pm | मदनबाण

मी हल्लीच एलजी चा {LG 42LB5820} स्मार्ट एलइडी टिव्ही घेतला...
हा टिव्ही घेताना खालील गोष्टी यात आहेत का ते पाहिल्या...
१}फुल एचडी + आयपीएस डिस्प्ले
२}नेट कनेक्टिव्हीटी { वायफाय कनेक्टिव्हीटी }
३}युएसबी आणि एचडीएमआय पोर्टची संख्या
४}फाईल फॉरमॅट प्ले सपोर्ट :- { हा जवळपास अगदी सगळे फाईल फॉरमॅट प्ले करतो अगदी .MKV सुद्धा.}
५}वॉल माउंट स्टँड :- { हा जवळपास सगळ्याच टिव्हींना हल्ली पुरवला जातो, } हव्या त्या अ‍ॅगलला टिव्ही वळवायचा झाल्यास उपयोगी.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Amazing Girl Drummer Does BIGBANG ;)

द-बाहुबली's picture

27 Jun 2015 - 11:18 am | द-बाहुबली

वायफाय कनेक्टीवीटी हवीच हेच सांगायला आलो होतो. माझ्या मित्राकडे हा प्रकार नुकताच बघीतला. मोबाइलवरुन डायरेक्ट टीवी कनेक्ट केला आहे. ३G स्पीडमधे अप्रतीम HD वीडीओ व चित्रपट बघता येतात. तसेच शक्य झाल्यास ३D सोय असलेला घ्य जरा महाग आहे पण तेच भविष्य आहे.

सुबोध खरे's picture

27 Jun 2015 - 12:20 pm | सुबोध खरे

तीन हजार रुपयात हे सर्व सहज उपलब्ध होते गुगल क्रोम कास्ट लावून तूमचा टीव्ही स्मार्ट होऊ शकतो त्यासाठी ६-८ हजार रुपये जास्त देण्याची गरज नाही
https://en.wikipedia.org/wiki/Chromecast
http://www.google.com/chrome/devices/chromecast/
३ D च्या भविष्याबद्दल जर शंकाच आहेत. एकतर त्याचे किती कार्यक्रम आत्ता उपलब्ध आहेत आणि नजीकच्या भविष्यात किती उपलब्ध होतील हे माहित नाही. शिवाय जवळ जवळ ३० % लोकांना ३ D कार्यक्रम डोळ्याच्या अशक्तपणामुळे किंवा त्रिमितीत प्रतिमा तयार न करता आल्याने फायदा होत नाही किंवा थोड्या वेळाने त्रास होऊ शकतो. http://www.eyecaretrust.org.uk/view.php?item_id=566
http://3droundabout.com/2011/12/5788/understanding-requirements-for-high....
तेंव्हा आपल्या घरातील लोकांचे डोळे तपासून घ्या आणि मगच ३D टीव्ही विकत घ्या असे सुचवावेसे वाटते.

यसवायजी's picture

27 Jun 2015 - 4:20 pm | यसवायजी

बरोबर. मला सिनेमा हॉलमधेसुद्धात २-३ तास ३D पाहताना वैताग येतो. कधीतरी ठीक आहे, पण तेवढ्यासाठी जास्त पैसे देऊन घरी टिव्ही घेताना आपण वापर किती करू याचा विचार करावा. माझ्या माहितीतल्या दोघांनी घेतलाय ३डी टिव्ही, पण गेले वर्षभर जेवढ्या फ्री मिळालेल्या ४-५ क्लिप आहेत त्याच दाखवतात आल्या-गेलेल्यांना. काय उपेग? ;)

तेंव्हा आपल्या घरातील लोकांचे डोळे तपासून घ्या आणि मगच ३D टीव्ही विकत घ्या
हायला, म्हणजे माझ्या डोळ्यातच प्रॉब्लेम असू शकतो काय? मला वाटायचं की अजून टेक्नॉलॉजीच डेव्हलप नाही झाली व्यवस्थीत, काही वर्षांनी असा त्रास न देणारे टिव्ही येतील.

तीन हजार रुपयात हे सर्व सहज उपलब्ध होते गुगल क्रोम कास्ट लावून तूमचा टीव्ही स्मार्ट होऊ शकतो त्यासाठी ६-८ हजार रुपये जास्त देण्याची गरज नाही.
ह्म्म... लिनोव्हो तर याही पुढे गेला आहे... कसं ?

तसेच :- Lenovo Launches $49 Google Chromecast Competitor
कास्ट अ‍ॅप्स आणि डिव्हाइस यात कोण जिंकणार ?

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- दारु Peeke डांस... ;) :- Kuch Kuch Locha Hai

तीन हजार रुपयात हे सर्व सहज उपलब्ध होते गुगल क्रोम कास्ट लावून तूमचा टीव्ही स्मार्ट होऊ शकतो त्यासाठी ६-८ हजार रुपये जास्त देण्याची गरज नाही
टिव्हीला स्वतःची वायफाय कनेक्टीव्हीटी असल्यास ओएस ओव्हर द एअर अपडेट करता येते.वायफाय कनेक्टिव्हीटी नसलेल्या टिव्हीस ओएस अपडेट करण्याचा पर्याय आहे का ? ते ठावूक नाही. मी आत्ता पर्यंत एकदा अपडेट केला आहे.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Infosys, Wipro & TCS lose over 1,00,000 people in last four quarters as automation kicks in

मी माझा सोनी ब्राव्हिया एल.सी.डी. अपडेट केला आहे. पेन ड्राईव्ह मधुन ओ.एस. अपडेट करता येते.

राजो's picture

29 Jul 2015 - 2:06 pm | राजो

.

भुमन्यु's picture

29 Jul 2015 - 3:33 pm | भुमन्यु

बहुतेक तरि EX300 आहे... आज घरी गेलो की बघुन सांगतो.

भुमन्यु's picture

30 Jul 2015 - 4:19 pm | भुमन्यु

EX300च आहे

आजच ऑर्डर केले आहे. वापरुन अनुभव टाकेन

मोबाइलवरुन डायरेक्ट टीवी कनेक्ट केला आहे.
मोबाइलनेच टिव्हीचा रिमोट ऑपरेट करता येतो. विंडोज फोनसाठी आणि अ‍ॅन्ड्रॉइड फोनची त्या त्या टिव्ही मॉडेलसाठी अ‍ॅप्स अ‍ॅव्हेलेबल आहे, तसेच मोबाइलवर युट्यूब प्ले करुन ते टिव्हीवर स्ट्रीम करता येते. टिव्हीची सुद्धा अ‍ॅप्स आहेत पण अजुन त्यात जास्त डोक घातल नाही,एकंदर पाहता अजुन टिव्ही अ‍ॅप्सला ग्रोथ हजुन व्हायचा आहे असे वाटते.
{इथे एलजीवाले बरेच दिसत आहेत त्यामुळे लुमियासाठीचे एलजी अ‍ॅप इथे देउन ठेवत आहे.
जाता जाता :- .MKV ची व्हिडीयो सॉंंग्स प्ले करुन पहावयास लय भारी वाटतं... :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- दारु Peeke डांन्स... ;) :- Kuch Kuch Locha Hai

उगा काहितरीच's picture

25 Jun 2015 - 10:55 pm | उगा काहितरीच

कुठला घेतला ते सांगावे .

सुनिल साळी's picture

26 Jun 2015 - 10:52 am | सुनिल साळी

सॅमसंग मॉडेल - 40 एच 5100

- शॉपक्लूस ऑफर
- 40 इंच
- फुल्ल एच डी
- रेज़ल्यूशन - 1920 x 1080
- एच डी एम आय पोर्ट x 2
- यू एस बी x पोर्ट 2
- ध्वनी - डी टी एस 2
- किमत - रु. 23990
- इम्पोर्टेड टी व्ही

इंडिया सॅमसंग वारण्टी नाही. सेलर वारण्टी आहे.

नाव आडनाव's picture

26 Jun 2015 - 11:30 am | नाव आडनाव

सेलर वॉरंटी - ऑनलाईन विकणारं पब्लिक चेन्नई, दिल्ली असं दुसर्‍या राज्यातलं असलं तर काही बिघाडासाठी त्याच्याकडे टीवी पाठवणार कसा किंवा तो तुमच्याकडे येणार कसा? मोठी झंझट आहे, त्यापेक्षा जवळच्या दुकानातून आणी कंपनी वॉरंटी असलेला टीवी बघा. किंमत जास्त पडते पण या झंझटीपेक्षा ते बरं.

भुमन्यु's picture

29 Jul 2015 - 1:41 pm | भुमन्यु

हा टी. व्ही. सिरीज ५ मधला आहे. आणि आत सिरीज ६ उपलब्ध आहे.

ह्रिशिक्केश's picture

26 Jun 2015 - 12:17 pm | ह्रिशिक्केश

Vu 42" 4K UHD SMART LED TV

LED 42D6455 UHD
Vu HI-FI 4K UHD TVs

Four times high definition with intelligent features make your visual experience truly future ready.

You're looking at the latest in LED technology.
This 42" 4K UHD TV from Vu is intelligent luxury. All the features you want in a sleek TV, at a price that can't be matched! Be the envy of your city with this classy television from Vu.

Overview

Four times high definition, more inputs than you'll ever need, and intelligent features that make this TV an obvious choice.

MRP : 42000/-

- See more at: http://vutvs.com/index.php?id_product=56&controller=product#sthash.xLDu6...

राजेंद्र मेहेंदळे's picture

26 Jun 2015 - 2:25 pm | राजेंद्र मेहेंदळे

मी पण विचार करतोय 4K वाला LED घ्यायचा दिवाळीत. बजेट साधारण ५० हजार किंवा कमी.

चौकटराजा's picture

27 Jun 2015 - 10:40 am | चौकटराजा

नुसत्या टी व्ही चे रेझोल्यूशन महत्वाचे नाही तर ट्रान्समिशन क्वालिटी ती हवी. आपल्याकडे दिसणारे बरेचसे चानेल ती देत नाहीत. आपली आवड एच डी चानल असलेल्याशी निगडित असेल तर एच डी अल्ट्रा एच डी घेण्यात हशील आहे.

आपण लॅपटॉप वापरत असल्यास अँगल ऑफ व्यू जास्तीत जास्त असावा याचे महत्व अधोरेखित करण्याची गरज नाही.
सोनी वाले चुकूनही आपले ट्रान्समिशन चे डेमो दाखवीत नाहीत. त्यामुळे शोरूम मधील पॅरिस व स्वीस चे व्हिडिओ ( हाय ल्वालिटी) पाहून सोनी टी व्ही घेउ नये. त्यातील बराचसे श्रेय ते वापरीत असलेल्या चित्रीकरणाचे असू शकते.

चौकटराजा's picture

27 Jun 2015 - 10:40 am | चौकटराजा

नुसत्या टी व्ही चे रेझोल्यूशन महत्वाचे नाही तर ट्रान्समिशन क्वालिटी ती हवी. आपल्याकडे दिसणारे बरेचसे चानेल ती देत नाहीत. आपली आवड एच डी चानल असलेल्याशी निगडित असेल तर एच डी अल्ट्रा एच डी घेण्यात हशील आहे.

आपण लॅपटॉप वापरत असल्यास अँगल ऑफ व्यू जास्तीत जास्त असावा याचे महत्व अधोरेखित करण्याची गरज नाही.
सोनी वाले चुकूनही आपले ट्रान्समिशन चे डेमो दाखवीत नाहीत. त्यामुळे शोरूम मधील पॅरिस व स्वीस चे व्हिडिओ ( हाय ल्वालिटी) पाहून सोनी टी व्ही घेउ नये. त्यातील बराचसे श्रेय ते वापरीत असलेल्या चित्रीकरणाचे असू शकते.

सुबोध खरे's picture

27 Jun 2015 - 11:12 am | सुबोध खरे

चौरा साहेब
सहमत. आपल्याकडे ७२० p नेच केबल मधून रिसेप्शन येते तेंव्हा त्यासाठी ४ K चा ती व्ही घेऊन आत्ता तरी फारसा फायदा होत नाही. एच डी चे आता मला वाटते कि २०-२५ चान्नेल्स उपलब्ध आहेत. त्यामुळे फुल एच डी टीव्ही घेतला तर ते पाहता येतील.
माझी सूचना अशी आहे कि फुल एच डी चा IPS प्यानेलचा टीव्ही घ्या आकार आपल्या खिशाला आणी खोलीला शोभेल असा. VA किंवा TN प्यानेल स्वस्त आहेत पण दोन तीन वर्षांनी जसे तंत्रज्ञान सुधारेल तसा तुमचा टीव्ही तुम्हाला फारच जुनाट वाटू लागेल.
http://www.pchardwarehelp.com/guides/lcd-panel-types.php
मायक्रो माक्स चे फोन स्वस्त आणी मस्त आहेत हि वस्तुस्थिती असली तर त्यांनी वापरलेले तंत्रज्ञान स्वतःचे नाही. त्यामुळे त्यात येणाऱ्या त्रूटी त्यांना सहज सुधारता येत नाहीत. फोनची गोष्ट वेगळी आहे कारण साधारण माणसे फोन एक ते दोन वर्षात बदलतात, हरवतात किंवा खराब होतात. पण साधारन माणूस आपला टी व्ही पाच वर्षे तरी बदलत नाही म्हणून मायक्रो माक्स नको असे मला वाटते आत्ता तरी त्याचे रिपोर्ट फार खराब आहेत.
पहा http://gizmoreport.com/micromax-uhd-4k-tv-review/#.VY4yKhsXnx0

तिमा's picture

27 Jun 2015 - 12:51 pm | तिमा

एलिडी किंवा एलसीडी टी.व्ही. वापरणार्‍यांनी त्याचे सरासरी आयुष्य सांगावे. ३ वर्षांच्यावर ते टिकत नाहीत आणि सी.आर.टी. सारखे १५ वर्षे तर नाहीच, असे ऐकून आहे.
अजूनही सॅमसंगचा सी.आर्,टी. वापरणारा (१५ वर्षे होऊन गेलीत)

संदीप डांगे's picture

27 Jun 2015 - 2:55 pm | संदीप डांगे

माझ्याकडे सोनी ब्रावीया एलईडी ४० इंची (फेब २०११) - किंमत ६५ हजार - होता. एवढी उत्तम क्वालिटी, सुविधा तेव्हा उपलब्ध बजेटमधे कुणाकडेच नव्हत्या. दोन वर्षांनी स्क्रीनच्या वरच्या भागात एक ४ इंची काळसर पट्टा दिसू लागला. आणखी दीड वर्षांनी दोन-तीन पट्टे अजून वाढले. जालावर तपासणी-चौकशी केली तेव्हा कळले मी फारच भाग्यवान निघालो. इतर अनेकांचे वर्षाच्या आत स्क्रीन बोंबलले. काहिंचे तर वारंटी संपल्यावर लगेच. नवीन रीप्लेसमेंट स्क्रीन २२ हजार ला मिळतो. अनेकांना हा भुर्दंड बसलेला आहे. ६५ हजाराचा टीवीची ओनरशिप कॉस्ट तीन वर्षांसाठी काय्च्या काय होऊन जाते.

माझा टीवी अजून खराब व्हायच्या आत २० हजाराला ओएलएक्स (फेब २०१५) वर विकून टाकला. घेणार्‍याला स्पष्ट कल्पना दिली की इथून घेऊन गेल्यावर काहीही झाले तर माझी जबाबदारी नाही. त्याच्याकडे अजून चालतोय. मला सर्व व्यवहारांती ओनरशीप कॉस्ट एक हजार रुपये महिना पडली. चार वर्ष सर्व फिचर्सचा भरपूर आनंद घेतला. नॅटजिओ सारखे एचडी चॅनल्स पाहतांना अगदी घटना समोर घडतायत असं वाटायचं, पाण्यातले दृश्य, निसर्गसौंदर्य अगदी जिवंत वाटायचे. त्या अनुभूतीस तोड नाही.

सोनीचा दर्जा अतिउत्तम आहे. पण हार्डवेअरचा भरवसा नाही. माझा असा संशय आहे की हार्डवेअरमधे (वारंटीकाळापुरता) टायमर लावत असावेत. अशी शंका यावी असे बरेच अनुभव आले आहेत वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे.

यसवायजी's picture

27 Jun 2015 - 4:24 pm | यसवायजी

माझ्या बहिणीच्या घरी श्यामसिंगच्या ४० इंची एलईडी टिव्हीला ९-१० महिन्यातच प्रॉब्लेम आला. स्क्रीनवर पट्टे दिसू लागले. वॉरंटी संपत आली होती. सॅमसंगने सांगितले की याचे रिपेअर शक्य नाही. त्यांनी नवीन टिव्ही रिप्लेसमेंट म्हणून दिला. आता त्यानंतर ३ वर्ष काही इश्यू नाही.

संदीप डांगे's picture

27 Jun 2015 - 5:23 pm | संदीप डांगे

अगदी असंच होतं.

(स्क्रीनची वारंटी ही एकूण किती तास वापर केला आहे त्यावर असायची. हा काळ १४०० ते १८०० व्युविंग अवर्स असतो. वारंटीकार्डवर असं नमूद केलेलं असायचं पुर्वी, १ लाख किमी किंवा ५ वर्ष अशा टैप.)

माझा ३२" एलजी फुल एचडी एलचीडी टीवी ५ वर्षांपूर्वी घेतला होता. कुठलाही प्रॉब्लम न येता टकाटक चालतोय अजूनही. वापर भरपूर.

संदीप डांगे's picture

27 Jun 2015 - 5:57 pm | संदीप डांगे

सरजी, एलसीडीला प्रॉब्लेम नाही. एलसीडीचे स्क्रीन्स १०-१२-१५ वर्ष दण्कट चालतात. समस्या एलइडीला आहे.

प्रचेतस's picture

27 Jun 2015 - 6:09 pm | प्रचेतस

ते आहेच.
बाकी तांत्रिक दृष्टया एलइडी टीवी हा एलसीडीच असतो. दोघांचेही फ्रंट प्यानेल एलसीडी फिल्मचेच असते. मात्र ब्याकलिट डिस्प्ले एलसीडीमधे सीसीएफएल तर एलेडी मधे एलेडीचा असतो.

संदीप डांगे's picture

28 Jun 2015 - 1:47 pm | संदीप डांगे

अगदी बरोबर.

एलईडी बॅकलिट डिस्प्ले (महाग) व एज एलईडी (स्वस्त) हे दोन वेगळे प्रकार आहेत.
led

समस्या एज एलईडी प्रकारात जास्त असावी. काही काळाने एज एलईडी स्क्रीनवर पट्टे दिसू लागतात. काही टीवींमधे हे अगदी सौम्य न जाणवण्या इतके असतात तर काहींमधे भयंकर असतात. माझा अनुभव आणि अभ्यास 'एज एलईडी' प्रकारात आहे. एलईडी बॅकलिटबद्दल सांगू शकणार नाही.

मूळ धागाकर्त्याच्या विषयासंबंधी:
माझ्या मते तरी टीवी घेतांना जास्तीत जास्त वारंटी पीरीयडवाला आणि त्या कालावधीपुरती ओनरशीप कॉस्ट धरून परवडण्यासारखी किंमत काढून त्या परवडणार्‍या बजेटचा टीवी घ्यावा. टीवी पुर्वीसारखे कंझुमर डुरेबल्स आहेत हा विचार चुकूनही मनात ठेवू नका.

उदा. एक लाखाचा टीवी एक वर्षाच्या वारंटीसोबत येत असेल तर आपण टीवी वापरण्याचे दिवसाला २७५ रुपये देतोय असा हिशोब लावावा. एका वर्षाने टीवीला काहीही झाले तर कंपनी हात वर करते, दुरूस्ती योग्य होईलच याची काहीही खात्री नसते, तसेच नवीन मॉडेल्स लॉन्च झाल्याने जुन्या मॉडेल्सच्या पार्टसच्या किंमती जाणून बुजून महाग केलेल्या असतात अथवा कृत्रिम तुटवडा निर्माण केला जातो.

'युज अँड थ्रो' हे आपल्याला (१५-२० वर्षे सीआरटी टीवी वापरलेल्या पीढीला) टीवीच्या बाबतीत पचवणे जड जाते. माझ्या घरी '१९९९ साली तेरा हजारात घेतलेला सीआरटी अजून दणक्यात चालू आहे. आणि २०११ मधे पासष्ट हजाराचा अ‍ॅडवांस्ड टीवी खराब होतोय' हे सत्य पचवणे कमालीचे जड गेले.

बाकी, उत्तम दर्जा हवा असेल तर 'हौसेला मोल नसतं' ही म्हण लक्षात ठेवावी.

नन्दादीप's picture

27 Jun 2015 - 2:28 pm | नन्दादीप

Micromax 40 ईंची घ्या...
फुल एच.डी....आवज बर्‍यापैकी, ६० चा रीफ्रेश रेट... किम्मत २३-२५ पर्यंत...रोज बदलते..
ऑनलाईन बघा...

मी गेले ७-८ महीने तोच वापरतोय...अजून तरी काही प्रोब्लेम नाही....

मिनेश's picture

27 Jul 2015 - 8:05 pm | मिनेश

प्लास्मा व एल इ डी मध्ये काय फरक आहे कोणी सान्गु शकेल का?

ब़जरबट्टू's picture

29 Jul 2015 - 2:31 pm | ब़जरबट्टू

ही लिंक बघा..

TV Buying TIPS

ब़जरबट्टू's picture

29 Jul 2015 - 2:28 pm | ब़जरबट्टू

माझामते "लग(LG ) " च्या वस्तू भारतात मस्त चालतात. असा स्वानूभव पण आहे. माझा LCD TV मागील ५ वर्ष व्यवस्थित सुरु आहे. कदाचीत त्यांची Voltage रेंज भारतासाठी उपयुक्त आहे. याउलट साम्सुंग, सोनी यांचे डिस्प्ले खुपदा जातात. Invortor वर पण हा त्रास आहेच. माझा आवडता आहे, कारण किंमतीच्या मानाने लगच्या वस्तू बेष्टच ..

नाव आडनाव's picture

30 Jul 2015 - 5:16 pm | नाव आडनाव

साळी सरकार, टी.व्ही. कंचा घेतला शेवट?

स्वप्क००७'s picture

13 Aug 2015 - 6:39 pm | स्वप्क००७

मयक्रोमाक्स चे तीवी चान्गाले आहेत, जर थाम्ब्न्याचि तयरी असेल तर शिओमि तीवी लोन्च होनार आहेत ह्या वर्शाअखेर पर्यन्त,

व्हीडीओकॉन ३२ इं. चांगला वाटतोय...१९५०० किं मत आहे,आवाज दणदणीत आहे म्हणे..घ्यावा का?