मत्सर ...

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in जे न देखे रवी...
13 Jun 2015 - 11:22 am

आधी पावसाची, पावसाळ्याची चाहूल लागायची ती वातावरणात होत जाणार्‍या बदलाने. झाडांवर फुलणार्‍या कोवळ्या पालवीने आणि वळिवाच्या साक्षीने मदहोश करणार्‍या मृदगंधाच्या मादक सुवासाने. आजकाल ती लागते सोशल नेटवर्क्सवर पडणार्‍या कुत्सित स्टेटस अपडेट्सने.. उदा. आता पावसाच्या कवितांचा पाऊस येणार वगैरे..वगैरे...

पण त्याला पर्याय नाही तसेच पावसाच्या कवितांनासुद्धा पर्याय नाही....

गंमतच आहे सगळी...
त्याला माझाही...
अगदी माझाही मत्सर वाटावा?
ओके, अ‍ॅग्रीड...! मी आलो की ती सुखावते..
मी पाहीलेत, माझ्या आगमनाने...
तिच्या अंगोपांगी फुललेले निशिगंध,
मी अनुभवली आहेत, माझ्या ....
ओझरत्या स्पर्शानेही शहारून आलेली तिची गात्रे!

कधी कधी नकळत तिच्या हनुवटीवर रेंगाळते माझी नजर...
आणि मग ती हरवते...
तो संतप्त होतो, रुसतो, चरफडतो...
तिला म्हणतो,
तू अशीच आहेस...
तो आला की मला विसरतेस...., मला पण?

तुला खरं सांगू...
ती तर मला आवडतेच रे...
पण तुझा तो रुसवा पण मोहवून टाकतो,
प्रेमाचं असंच असतं बघ...
त्याला कुणाशीच वाटणी मान्य नसते...
मग वाटणीदार माझ्यासारखा सखा का असेना !

अरे वेड्या, तुला कळत कसे नाही?
तिच्या हरवण्यात तर मज्जा आहे खरी,
त्यावेळी ती कसली गोड दिसते माहितीये?
तिला तशी मुग्ध बघीतली ना...
की मग मलादेखील उत्साह येतो...

आणि मग...
मी आनंदाने, भरभरून बरसायला लागतो...!!

विशाल...

कविता

प्रतिक्रिया

एक एकटा एकटाच's picture

13 Jun 2015 - 11:27 am | एक एकटा एकटाच

मस्त आणि मस्तच!!!!!!!

गुनि's picture

13 Jun 2015 - 12:03 pm | गुनि

चिम्ब झालो

पैसा's picture

13 Jun 2015 - 1:45 pm | पैसा

बाहेर संततधार पडणार्‍या पावसात ही कविता वाचते आहे!

अत्रुप्त आत्मा's picture

13 Jun 2015 - 8:28 pm | अत्रुप्त आत्मा

लै मस्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्त!

विशाल कुलकर्णी's picture

15 Jun 2015 - 8:49 am | विशाल कुलकर्णी

धन्यवाद मंडळी _/\_

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Jun 2015 - 7:24 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पाऊस म्हटलं की ती आलीच पाहिजे.
आणि ती म्हटली की पाऊस आलाच पाहिजे.
मला तिला आणि पावसाला कवितेत वाचायला आवडतं. :)

तेरे मशरुफ रहने का अंदाज तुझे तनहा न कर दे
रिश्ते फुरसत के नहीं तवज्जो के मोहताज होते है

-दिलीप बिरुटे

विशाल कुलकर्णी's picture

19 Jun 2015 - 9:40 am | विशाल कुलकर्णी

मनःपूर्वक आभार डॉक _/\_

महासंग्राम's picture

19 Jun 2015 - 9:54 am | महासंग्राम

खरय दिलीप सर पाऊस आणि सखीचे नाते जर वेगळेच आहे। पाऊस म्हटलं की ती आलीच पाहिजे.

रातराणी's picture

20 Jun 2015 - 2:38 am | रातराणी

अरेच्च्या ही कशी काय राहून गेली वाचायची? भन्नाट आहे!

रुपी's picture

20 Jun 2015 - 4:35 am | रुपी

फार आवडली..

विशाल कुलकर्णी's picture

20 Jun 2015 - 9:09 am | विशाल कुलकर्णी

मनःपूर्वक आभार मंडळी !

मुक्त विहारि's picture

20 Jun 2015 - 11:26 am | मुक्त विहारि

आवडली...

विवेकपटाईत's picture

20 Jun 2015 - 12:55 pm | विवेकपटाईत

मस्त आवडली