ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, ३४२ वा " श्रीशिवराज्याभिषेक सोहळा " श्री शिवक्षेत्र, दुर्गदुर्गेश्वर रायगड"

ganeshpavale's picture
ganeshpavale in भटकंती
1 Jun 2015 - 11:32 am

ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, ३४२ वा " श्रीशिवराज्याभिषेक सोहळा " श्री शिवक्षेत्र, दुर्गदुर्गेश्वर रायगड" (३१/०५/२०१५)

कशासाठी आणि जगावे कसे मी
विचारा स्वताला असा प्रश्न नेहमी
जगू पांग फेडावया माय भू चे
जगू पांग फेडावया धर्म भू चे
आम्ही मार्ग चालू जिजाऊ सुताचे…

राजांची पालखी
ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, ३४२ वा " श्रीशिवराज्याभिषेक सोहळा " श्री शिवक्षेत्र, दुर्गदुर्गेश्वर रायगड"
मी संपूर्ण परिवारासोबत "ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, ३४२ वा " श्रीशिवराज्याभिषेक सोहळा "( रविवार ३१/०५/२०१५) श्री शिवक्षेत्र, दुर्गदुर्गेश्वर रायगड" वर जाण्याचे ठरवले,
सकाळी ४ वाजता गडाच्या पायथ्याशी पोहचलो आणि ध्येय्यमंत्र, प्रेरणामंत्र खड्या आवाजात म्हणून, पहिल्या पायरीच दर्शन घेतलं, अंगात वेगळाच आवेश आला आणि आम्ही गड चढायला सुरवात केली, रात्रीच्या अंधारात उजेडासाठी टॉर्च होता त्याच्या प्रकाशात आम्ही गड चढायला सुरवात केली. आश्चर्य म्हणजे वाटेत कुठेही न थांबता, थोडासाही विसावा न घेता आम्ही महादरवाजा गाठला, माझा २ वर्षाचा चिमुकला त्याला खांद्यावर घेवून रायगड चढलो, वरती जात पर्यंत १ ते १/५ तास लागला होता आता सुर्यनारायण आपली सोनेरी किरणे या सोहळ्यासाठी रायगडावर पाडण्यास उत्सुक होता. आम्ही राजदरबारात पोहचे पर्यंत पालखी निघाली होती.
सुर्यनारायण आपली सोनेरी किरणे या सोहळ्यासाठी रायगडावर पाडण्यास  उत्सुक होता.
पालखी
पालखी
सोहळ्यासाठी रायगडावर
हिंदवी स्वराज्य संस्थापक, राजाधिराजा, माहाराजा, अखंड हिंदुस्थानाचा अधिपती, पहिला छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा ३४२ वा राज्यभिषेक सोहळा काल (रविवारी) मोठ्या थाटात रायगडावर पार पडला. ढोल-ताशांचा गजर आणि हर-हर महादेवच्या घोषणांनी रायगड दणाणून निघाला होता.
" श्रीशिवराज्याभिषेक सोहळा "
" श्रीशिवराज्याभिषेक सोहळा "
" श्रीशिवराज्याभिषेक सोहळा "
'मराठी राजा छत्रपती जहाला, गोष्ट सामान्य न जहाली’ दिवसभर हाच आवेश हाच जोश प्रत्येक शिवभक्तांच्या मनावर अधिराज्य गाजवत होता. प्रचंड आनंद कल्लोळ आज रायगड वर दिसत होता, भगव्या पताका झळकत होत्या, शांत आणि थंड हवेत मन मोहरून निघत होत.
" श्रीशिवराज्याभिषेक सोहळा "

" श्रीशिवराज्याभिषेक सोहळा "

" श्रीशिवराज्याभिषेक सोहळा "

राजांची पालखी ढोल ताशांच्या गजरात सदरेतून जगदीश्वराच्या मंदिराकडे निघाली तेंव्हाचा जल्लोष याच जन्मी याची डोळा आनुभवन्याचा योग मला आणि माझ्या चिमुरड्याला मिळाला. तो हि या सोहळ्याचा आनंद घेत होता.
" श्रीशिवराज्याभिषेक सोहळा "
" श्रीशिवराज्याभिषेक सोहळा "
" श्रीशिवराज्याभिषेक सोहळा "
होळीच्या माळावर ढोलताशांच्या गजरात, हर हर महादेव गर्जनेचा संगम झाला, तलवारी उंचावल्या भगव्या पताका झळकल्या. आणि रायगड पुन्हा एकदा धन्य झाला.

" श्रीशिवराज्याभिषेक सोहळा "

" श्रीशिवराज्याभिषेक सोहळा "

हा सारा आवेश पाहून अजून २ वर्षे ही पूर्ण न झालेला माझा चिमुरडा रुद्र हातात भगवा घेवून सामील झाला होता.
" श्रीशिवराज्याभिषेक सोहळा "
भगवा करात धरिला कधीही ना सोडू।
हिंदुत्व शञु सगळे हुडकुनी गाडू।।
शिवसुर्य ध्येय आमुच्या नित काळजात।
रणकंदनी फडकवू भगवा जगात।।

काही क्षण या देदिप्यमान सोहळ्याचे-

" श्रीशिवराज्याभिषेक सोहळा "

" श्रीशिवराज्याभिषेक सोहळा "

" श्रीशिवराज्याभिषेक सोहळा "

" श्रीशिवराज्याभिषेक सोहळा "

" श्रीशिवराज्याभिषेक सोहळा "

" श्रीशिवराज्याभिषेक सोहळा "

" श्रीशिवराज्याभिषेक सोहळा "

" श्रीशिवराज्याभिषेक सोहळा "

" श्रीशिवराज्याभिषेक सोहळा "

******************************************


लेखन / छायाचित्रण
- गणेश पावले

प्रतिक्रिया

विशाल कुलकर्णी's picture

1 Jun 2015 - 12:26 pm | विशाल कुलकर्णी

वाह अप्रतिम प्रचि आणि वृत्तांत !
चार वर्षांपूर्वी एकदा हजेरी लावायचा योग आला होता. त्यानंतर दरवर्षी काही ना काही कारणाने राहूनच जाते. :(
धन्यवाद !

चौथा कोनाडा's picture

1 Jun 2015 - 12:30 pm | चौथा कोनाडा

व्वा, व्वा ! सुरेख प्रचिंमुळे एका स्फुरणीय दैदिप्यमान सोहळ्यात सहभागी झाल्याचा अनुभव आला !

वेल्लाभट's picture

1 Jun 2015 - 12:59 pm | वेल्लाभट

क्या बात है गणेश....
वा वा वा वा वा !
मजा आली फोटो बघून आणि मी तिथे का नव्हतो असं वाटत राहिलं. एकदा जायचंय या सोहळ्याला पण योग येत नाही. असो.

सुंदर. तुमच्या मुलाचा फोटो विशेष भारी ! स्वालिट !

मालोजीराव's picture

1 Jun 2015 - 1:20 pm | मालोजीराव

सुंदर सोहळा आणि क्षणचित्रे…छान सोहळा झाला, पाऊस नव्हता बरे झाले…६ जून लाही नसावा हि अपेक्षा

ganeshpavale's picture

1 Jun 2015 - 2:55 pm | ganeshpavale

जय भवानी, जय शिवाजी!!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Jun 2015 - 12:45 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर सोहळा, मस्त प्रकाशचित्रे !

मोदक's picture

2 Jun 2015 - 12:58 pm | मोदक

सुंदर सोहळा, मस्त प्रकाशचित्रे !

हेच बोल्तो..!!!

ganeshpavale's picture

2 Jun 2015 - 1:15 pm | ganeshpavale

धन्यवाद !

सुहास झेले's picture

2 Jun 2015 - 1:45 pm | सुहास झेले

अप्रतिम... ह्या सोहळ्याला हजर राहता न आल्याची खंत थोडीफार दूर झाली :) :)

अनुप७१८१'s picture

2 Jun 2015 - 1:52 pm | अनुप७१८१

खुप छान ... एक्दा तरि येणारच हा सोहळा बघायला

एक प्रश्न्....अशा सर्व पालखी सोहळ्यांनंतर सहभागी लोकांसोबत आलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या, निर्माल्य, खाण्याच्या वस्तू, पिशव्या यांची विल्हेवाट कोण लावतं?

ganeshpavale's picture

2 Jun 2015 - 5:25 pm | ganeshpavale

किल्ल्याची साफसफाई हा नेहमीच मोठा प्रश्न असतो.
यावेळी राज्याभिषेकाला येणाऱ्या मंडळानी स्वताहून या मध्ये सहभाग घेतला होता

दुर्गवीर प्रतिष्ठान
कोकण कडा
शिवदुर्ग प्रेमी वांद्रे
श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान
राज्याभिषेक समिती

या संघटनांनी किल्ल्याची साफसफाई अबाधित राहील यासाठी यशस्वी प्रयत्न केला.
आपण हा देदिप्यमान सोहळा साजरा करण्यासाठी आलो आहोत. याची जाणीव प्रत्येकाला करून दिली.
आणि एवढ्या लांबहून येणारे लोक हे पर्यटक म्हणून न येत हा सोहळा आपल्या घरचाच आहे या भावनेने आले होते
त्या मुळे किल्ल्यावर कचरा झाला नाही
आणि गड उतरताना वरील सर्व संघटनांनी तो गोळा करून खाली आणून टाकला.

इतक्या गर्दीचं जायला मन होत नाही. त्यापेक्षा गर्दी टाळून कधीही जावं.
शिवसमाधीपाशी, राजसिंहासनापाशी बसून नुसतंच शांतपणे शिवरायांच्या कथा आठवत बसावं.

स्वच्छंदी_मनोज's picture

2 Jun 2015 - 6:42 pm | स्वच्छंदी_मनोज

वल्लीशी एकदम सहमत.

अजून पर्यंत ह्या सोहोळ्यात सहभागी झालो नाही हे खरे असले तरी पुर्वी एकदातरी भाग घ्यावा असे वाटे पण गेली काही वर्षे जमणारी आणी दरवर्षी वाढणारी गर्दी बघता जायला मन होत नाही.

शिवसमाधीपाशी, राजसिंहासनापाशी बसून नुसतंच शांतपणे शिवरायांच्या कथा आठवत बसावं. >>> हेच खरंतर मनापासून वाटत असल्याने ह्या गर्दीच्या सोहोळ्यात भाग घेतला नाही.

मस्त पोर्णीमेची रात्र असावी आणी समाधी समोरच्या प्रांगणात किंवा जगदीश्वराच्या आवारात किंवा राजदरबारात किंवा अगदी भवानी टोकावरही अगदी रात्र सरेपर्यंत निसर्गाचा अनुभव घ्यावा यासारखे सुख नाही (नशीबाने हे सुख मि कित्येकवेळा घेतलेय :) ).

पावसाळ्यानंतर मिपाकरांचा एखादा ट्रेक रायगडाला करावा काय?
रच्याकने: मिपाकरांचा एखादा ट्रेक ग्रूप आहे का?

मस्त पोर्णीमेची रात्र असावी आणी समाधी समोरच्या प्रांगणात किंवा जगदीश्वराच्या आवारात किंवा राजदरबारात किंवा अगदी भवानी टोकावरही अगदी रात्र सरेपर्यंत निसर्गाचा अनुभव घ्यावा यासारखे सुख नाही

मिपाकरांबरोबरच अशा रात्री जागवल्यात. :)

रायगडावर नक्कीच जाऊयात. मिपाकरांचा ठराविक असा ट्रेक ग्रुप नाही. मिपाकरांच्या बर्‍याच भटकंती ह्या मिपाबाह्य चर्चेतून ठरतात.

नाखु's picture

2 Jun 2015 - 7:07 pm | नाखु

एखाद्या गडावर ह्या द गड्याला सोबत घेणे ही विनंती.

रानडेंचा ओंकार's picture

2 Jun 2015 - 8:12 pm | रानडेंचा ओंकार

मला पण सांगा नक्की...

खरा रायगड अनुभाववायचा असेल तर निवांत गर्दी नसताना अनुभववावा....
रायगड संबंधीचे काही ग्रंथ / पुस्तके सोबत घेवून अभ्यासावा,,,
अस बोलतात कि रायगड एकांतात आपल्याशी खूप काही बोलून जातो....तो आपल यथार्थ दर्शन घडवतो (माझा असा अनुभव)

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
पण राज्याभिषेक सारखे सोहळे कायम येत नसतात आणि ते गर्दीतच पहायचे असतात.
आपल्यासारख्या विचारसरणीच्या लोकांमुळे रायगडची खरी ओळख होत नाही.
रायगड हि आपली पंढरी, आपले तीर्थस्थान आणि अशा ठिकाणी गर्दी होते म्हणून जाणे टाळणे हे ......... लक्षण.... (हो खरच )

इतर तीर्थक्षेत्राला गर्दी असते म्हणून आपण जाने टाळतो का? नाही ना !

वेल्लाभट's picture

3 Jun 2015 - 11:04 am | वेल्लाभट

एकांतातच बघावेत किल्ले अशा मताचा मीही आहे. आय लुक फॉर पीस. अ फ्यू फ्रेंड्स अँड अ लॉट ओफ टॉकिंग कॅन ऑल्सो बी पीस.

पण तरीही. राजाभिषेकाचा सोहळा, तो माहोल अनुभवायला त्या गर्दीचा एक भाग होण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे तसंही एकदा जायचंय. जावंच, कारण एकटं बसून आपण 'ते' अनुभवू शकत नाही.

वेल्लाभट's picture

3 Jun 2015 - 11:05 am | वेल्लाभट

तरीही;
तीर्थक्षेत्रांचं म्हणाल तर मी तरी गर्दी टाळतो.

प्रचेतस's picture

3 Jun 2015 - 11:51 am | प्रचेतस

हो. मी टाळतो.
मी पंढरी, तुळजापूर आदि ठिकाणी गेलो नाहिये. कोल्हापूरला फ़क्त मंदिर बघायला जातो. गणेशोत्सवात तर अजिबातच जात नाही

आपल्यासारख्या विचारसरणीच्या लोकांमुळे रायगडची खरी ओळख होत नाही.

म्हणजे नेमकी कसली विचारसरणी?

वेल्लाभट's picture

3 Jun 2015 - 12:38 pm | वेल्लाभट

एकदम स्येम !

मी ही अशा पॉप्ल्युलर्र तीर्थक्षेत्रांना गेलेलो नाही. शेगाव सोडल्यास. आणि जिथे जिथे गेलोय तिथे तिथे भांडण केलंय. वैष्णोदेवीलाही दारातून परत फिरलोय सिक्युरिटी वाल्याशी नडून. सेम विथ सम मोअर सच ठिकाण्स.

त्यापेक्षा आडिव-यातलं महांकालीचं देऊळ, किंवा एखाद्या गडावरचं छोटंसं देऊळ जास्त भावतं. स्वतःशी वोलता येतं.

वेल्लाभट's picture

3 Jun 2015 - 12:39 pm | वेल्लाभट

भांडण होतं हे भूषण नाही दुर्दैव आहे. पण होतं माझ्या बाबतीत समहाऊ.

स्वच्छंदी_मनोज's picture

3 Jun 2015 - 12:43 pm | स्वच्छंदी_मनोज

मीही गर्दी असलेल्या तिर्थक्षेत्राला जाणे टाळतो म्हणूनच अजूनपर्यंत तुळजापूर, पंढरपूर ह्या आणी अश्या अनेक ठीकाणी एकदाही गेलेलो नाहीये..

ज्याचा त्याचा दृष्टीकोन, पण रायगडावर निवांत क्षणी जे अनुभवलेय (आणी अनेकवेळा) ते गर्दीच्या वेळे अनुभवायला मिळेल असे वाटत नाही.

आपल्यासारख्या विचारसरणीच्या लोकांमुळे रायगडची खरी ओळख होत नाही.
रायगड हि आपली पंढरी, आपले तीर्थस्थान आणि अशा ठिकाणी गर्दी होते म्हणून जाणे टाळणे हे ......... लक्षण.... (हो खरच )

>>> कसली विचारसरणी जरा स्पष्ट करणार का? कुठल्या विचारसरणीने रायगडची खरी ओळख होईल असे तुम्हाला वाटतेय? तिन तिन राज्याभिषेक सोहळे करून?

अजून पर्यंत ह्या सोहोळ्यात सहभागी झालो नाही हे खरे असले तरी पुर्वी एकदातरी भाग घ्यावा असे वाटे पण गेली काही वर्षे जमणारी आणी दरवर्षी वाढणारी गर्दी बघता जायला मन होत नाही.

गर्दीमुळे अशा सोहळ्यांना न जाणे. हे जरा विचित्र वाटत…
आपण अशा सोहळ्यांना पर्यटक म्हणून जायचच नसत…
पर्यटक म्हणून जायचं असेल तर निवांत जेंव्हा गर्दी नसेल तेंव्हा निवांत जावे.…
जे लोक गर्दीचा विचार करतात ते पर्यटक असतात…. अस मला स्पष्ट वाटत
आणि पर्यटक विचारसरणीमुळे आज इतिहास मागे राहिला…

येथे तीन जयंत्या आणि २ राज्याभिषेकाचा प्रश्न येत नाही
मही म्हणतो तुम्ही दररोज राज्याभिषेक करा…. रोज पारायणे करा शिवचरित्राची, रोज जयंती साजरी करा राजांची…।
पण ती मनोभावे असुदे.

खर सांगू का?
यावर्षी दरवर्षी पेक्षा दुप्पट गर्दी होती. पण त्रास झाला नाही तर हुरूप आला…
पुढील वर्षी राजांच्या राज्याभिषेकाला यापेक्षाही गर्दी असुदे अस मागणेच मागितलं भवानीकडे

*************************

तरीही माझ्या विचारसरणी या शब्दाचा राग आला असल्यास क्षमस्व !

मीपण होतो यावेळी गडावर ११:३० च्या दरम्यान या पालखी वाल्या लोकानी दर्शन रांगेत लोक उभी आहेत याचा विचार ही न करता रांग अडवुन गरज नसताना आरती करुन मागच्या लोकाना त्रास दिला त्या बद्दल काय?

(जगदीश्वराच दर्शन न घेता आलेला)विशाल

ganeshpavale's picture

5 Jun 2015 - 9:32 am | ganeshpavale

जगदीश्वराच दर्शन घ्यायला खूप मोठी लायीन होती. पालखी जेंव्हा होळीच्या माळावर होती तेंव्हा मी दर्शन घ्यायला गेलो होतो.

आत जायला एकच दरवाजा त्यामुळे दरवाजातूनच आत जायला २० मिनिटे लागली तीही भयंकर चेंगरा चेंगरीत.
दर्शन घ्यायला जाणारया लोकांसाठी प्रवेश घेताना बिलकुल सुविधा नाही त्यामुळे असा प्रकार घडतो.
मी कसाबसा आत गेलो. माझा मुलगा तर रडकुंडीला आला होता. आत गेल्यावर प्रशस्त जागेत थोडा मोकळा श्वास घेतला. उन्ह तर भयंकर तापल होत. रंगेतीलाच लोकांनी मला पुढे जावून दर्शन घ्या (लहान मुल असल्याने) मला सरळ मंदिरात प्रवेश मिळाला. व दर्शन घेवून बाहेर आलो.
पुन्हा बाहेर येतानाही गर्दीशी कसरत करावी लागली. पण दर्शन झाल्याचे समाधान होते त्यात.

रांगेबद्दल तक्रार नाही भाऊ मी ८ वर्षापासून जातोय (६ जूनला जातो तिथि प्रमाणेच्या याच वर्षी गेलो)पण असला गोंधळ पहिल्यांदा पाहिला.

नूतन सावंत's picture

2 Jun 2015 - 8:06 pm | नूतन सावंत

गणेश,अप्रतिम,अप्रतिम, अप्रतिम.

अजून पर्यंत ह्या सोहोळ्यात सहभागी झालो नाही हे खरे असले तरी पुर्वी एकदातरी भाग घ्यावा असे वाटे पण गेली काही वर्षे जमणारी आणी दरवर्षी वाढणारी गर्दी बघता जायला मन होत नाही.

गर्दीमुळे अशा सोहळ्यांना न जाणे. हे जरा विचित्र वाटत…
आपण अशा सोहळ्यांना पर्यटक म्हणून जायचच नसत…
पर्यटक म्हणून जायचं असेल तर निवांत जेंव्हा गर्दी नसेल तेंव्हा निवांत जावे.…
जे लोक गर्दीचा विचार करतात ते पर्यटक असतात…. अस मला स्पष्ट वाटत
आणि पर्यटक विचारसरणीमुळे आज इतिहास मागे राहिला…

येथे तीन जयंत्या आणि २ राज्याभिषेकाचा प्रश्न येत नाही
मही म्हणतो तुम्ही दररोज राज्याभिषेक करा…. रोज पारायणे करा शिवचरित्राची, रोज जयंती साजरी करा राजांची…।
पण ती मनोभावे असुदे.

खर सांगू का?
यावर्षी दरवर्षी पेक्षा दुप्पट गर्दी होती. पण त्रास झाला नाही तर हुरूप आला…
पुढील वर्षी राजांच्या राज्याभिषेकाला यापेक्षाही गर्दी असुदे अस मागणेच मागितलं भवानीकडे

*************************

तरीही माझ्या विचारसरणी या शब्दाचा राग आला असल्यास क्षमस्व !

माझे ही असेच मत आहे.. रायगड हा माझा सर्वात आवडता.. सर्वात चांगला मित्र आहे...
जेव्हडा निवांत बघावा.. तेव्हडाच राज्यभिषेक दिनाचा सोहळा अनुभवा वा...

६ जुन म्हणजे एक खरी पर्वणीच .. पण या वेळेस मित्र घरी येत असल्याने जाता येइना.. खुप वाईट्ट वाटते आहे...

@ वल्ली
म्हणने बरोबर आहे.. पण या सोहळ्याच्या अंतरंगात भिजले की.. ती गर्दी रहात नाही... वारकर्यांची वारी बनुन जाते ती.. निस्सिम भक्तीचे एक प्रेरणा स्थान..

अवांतर :

या वेळेस ट्रेक ची सुरुवात रायगडा पासुन पुन्हा... पुन्हा पुन्हा जावुन हितगुज करुन यावे वाटनारा हा माझा आवडता गड ...

चिगो's picture

3 Jun 2015 - 1:08 pm | चिगो

ह्या नाही, पण "टाईम ट्रॅव्हल" जर खरंच कधी खरोखरच अस्तित्वात आली तर शिवरायांच्या खर्‍या़खुर्‍या राज्याभिषेकाला हजेरी लावाची इच्छा आहे.. अशीच आपली एक फँटसी..

नशिबवान आहात की अशा सोहळ्याला तुम्ही जाउ शकले. आणि तुमचं खरोखर कौतुक. यासाठी की तुमच्या पिल्लाला सुद्धा तुम्ही बरोबर घेऊन गेलात हा सोहळा बघायला. लहानपणापासून अशा उत्तम गोष्टी मुलांना आपल्याबरोबरीने अनुभवायला देत आहात, हे आवडले.

ganeshpavale's picture

4 Jun 2015 - 3:09 pm | ganeshpavale

धन्यवाद !

नमकिन's picture

9 Jun 2015 - 9:00 am | नमकिन

सोहळा खूपच चांगला झालेला असणार . छायाचित्रे सुरेख आहेत.
अशा निमित्ताने आपल्या पूर्वइतिहासाला उजाळा मिळत राहतो.
तुम्ही पुढच्या पिढीला इतिहासाची ओळख करून देत आहात या बद्दल अभिनंदन.

शिवरायांना सादर नमन .
या भूमंडळाचे ठाई - धर्मरक्षी ऐसा नाही |
महाराष्ट्रधर्म राहीला काही - तुम्हां कारणे |

कशासाठी आणि जगावे कसे मी
विचारा स्वताला असा प्रश्न नेहमी
जगू पांग फेडावया माय भू चे
जगू पांग फेडावया धर्म भू चे
आम्ही मार्ग चालू जिजाऊ सुताचे…

नमकिन's picture

9 Jun 2015 - 12:11 pm | नमकिन
नमकिन's picture

9 Jun 2015 - 12:13 pm | नमकिन

राज्याभिषेक सोहळा पहायचाच या वर्षी हे ठरवूनंच शुक्रवार रात्री (३०-५-१५) निघालो, ३० सवंगड्यांसोबत, सर्वात तरुण सदस्य वय वर्ष ३ महिने (मित्राची चिमुकली), ढगाळ वातावरणात चढण ट्रेक मार्ग सुकर झाला. १ दिवस आधी पोचण्याचे कारण मागील वेळी (३४० वा)सलग पाऊस असल्याने व गणेश प्रमाणे नेमक्या दिवशी पोहोचल्याने राज्याभिषेकाचा नेत्रदीपक सोहळा पाहता आला नव्हता.
किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक दिन समिती तर्फे याही वर्षी चहा, पाणी, नाष्टा, २ वेळेचं जेवण, प्रथमोपचार शिवभक्तांसाठी मोफत सोय केली होती. सांगण्याचा हेतु फक्त प्रामाणिक प्रयत्नपूर्वक वाटचाल कयणा-या शिवभक्तांची मेहनत, सेवाभाव, समर्पित व्रतस्थ परिचालन हे नक्कीच वाखाणण्याजोगे आहे नव्हे अनुकरणीय आहे. एक शिवभक्त म्हणून पोशाखात येणारेंची संख्या ही ऊत्तरोत्तर वाढतंच चाल्लीय व पुढील वर्षी १६ सहस्र शिवभक्त सोहळ्यास उपस्थित राहतील व सर्वांगपूर्ण सोय करण्याचा प्रयास करण्याचा संकल्प सोडलाय.
आदल्या दिवशी छत्रपति शंभूराजे यांची जयंती, शिवतुला, गोंधळ, पेण येथील कलाकारांतर्फे स्वराज्याची सिंहगर्जना हा २ तासांचा कार्यक्रम व संपूर्ण रात्र शाहिरांचे शिवपराक्रमाचे पोवाडे असा भरगच्च संचित लाभले.
पुरातत्व खाते, रायगड जि.प., पोलिस दल व समितीचे कार्यकर्ता सर्व शिवभक्तांच्या सोयीसाठी झटत होते. ३० जण व इतर अनेक परिचित शिवभक्त हे नेहमीच उत्साही दिसले कुणी Exclusively माझे मी करणारा दिसला नाहीं, सर्व मुखी महाराजांचे , भवानी मातेचे जयजयकार दिसले व थोडेतरी कर्तृत्व आपल्या अंगी बाणवावे हीच भावना घेउन हरेक शिवभक्त पुढील वर्षी परतण्याचा मानस ठरवुन निघाला.
गैरसोय कुणी कुणाची कशाला करेल? प्रत्येकाने आपल्याला काय साध्य करायचे आहे हे योजुन स्वयं सक्षम राहील्यास अपेक्षितहुन अधिक मिळेल. कच-याचे विल्हेवाट हा गहन प्रश्न प्रबोधन व वैयक्तिक सहभाग , जबाबदारीने, स्थानिक लोकांत पर्यावरण जागरूकता यांतुन सर करता येईल. रज्जु मार्गे ये/जाने सहकारी शिवभक्तांचा वेळ रांगेत (३-५ तास) गेला (टोकन असुन) तरीही कुणाही तोंडी गैरसोय कवन ऐकले नाहीं, आरती घेणे हा पूर्व निर्धारित व सर्वत्र आढळणारा प्रकार येथेही होतो व शिवभक्तांस भाग्याचे प्रणिपात भासतात, आता संख्या व उपलब्ध जागा यावर मात करुन सर्व पुलकित जाहले.
बाकी रोज अभिषेक घालण्याचा प्रतिवाद बिनतोड