मिनेसोटा लँडस्केप आर्बोरेटम

जुइ's picture
जुइ in भटकंती
24 May 2015 - 9:20 pm

नमस्कार,

बऱ्याच वर्षांपासून आमच्या शहरातील लॅंडस्केप आर्बोरेटम पाहायचे ठरवत होतो. मात्र काहीना काही कारणामुळे ते मागे पडत होते. या लांब विकांताला मात्र आर्बोरेटम पाहायचा योग जुळून आला. मिनेसोटा विद्यापीठातील एक विभाग म्हणजेच लॅंडस्केप आर्बोरेटम. आर्बोरेटम जवळजवळ १,१३७ एकरांमध्ये पसरले आहे. १९०७ साली आर्बोरेटमच्या आजच्या जागेवर हॉर्टिकल्चर संशोधन केंद्र सुरू झाले.

आर्बोरेटम चे संस्थापक आहेत Dr. Leon C. Snyder. १९५८ साली आर्बोरेटम लोकांसाठी खुले करण्यात आले. तोपर्यंत इथे सुमारे पाच हजार वेगवेगळ्या प्रजातींची झाडे लावण्यात आली होती. हे आर्बोरेटम शास्त्रज्ञ मंडळींनी चालवलेले उद्यान आहे, त्यामुळे लौकिकार्थाने ते आखीव रेखीव मात्र नाही.

व्हिजिटर सेंटर समोरील या आकर्षक मोराने आमचे स्वागत केले.
Lego Peacock

आर्बोरेटम वर्षातून केवळ २ दिवसच (क्रिसमस व थँक्सगिविंग डे) बंद असते. तुम्ही येथे केव्हा जाता याला खूप महत्त्व आहे कारण वेगवेगळ्या झाडांच्या बहरण्याचे ऋतू वेगवेगळे असतात. आम्ही खास करून येथे ट्यूलिप्स पाहायला गेलो होतो. तरीही थोडासा उशीरच झाला जायला असे वाटले कारण की काही ट्यूलिप्स सुकू लागले होते. मात्र मोठ्या संख्येने बरेच ट्यूलिप अगदी ताजे दिसत होते. त्यांची झलक

Tulips 1

Tulips 2

Tulips 3

Tulips 4

Tulips 5

ट्यूलिप्सच्या बागेतून फिरताना बाळगोपाळांचा उत्साह तर जाणवत होताच पण दुसरे बालपण सुरू असलेल्यांचाही काही कमी नव्हता.
Tulips 6

ट्यूलिप बरोबरच असंख्य प्रकारची गुलाबाची झाडे रोझ गार्डनमध्ये होती. मात्र ती बाग अजून बहरली नव्हती. तिथेच असलेली काही कारंजी मात्र खूपच मोहक होती.

Fountain

Fountain

रोझ गार्डनमधील हा एक गझीबो
Gazibo

Temple like structure

ट्यूलिप्स व रोझ गार्डनव्यतिरिक्त इतर अनेक गार्डन्स आहेत जसे स्वयंपाकात वापरल्या जाणाऱ्या विविध हर्ब्जचे गार्डन, चायनीज, जॅपनीज गार्डन इत्यादी.

Benches

Greenery

दीड दोन तास भटकून झाल्यावर आम्ही खुल्या ट्राममधून मिळणारी तासाभराची गायडेड टूर घेतली. या ट्रामचा चालक अन टूर गाईड एक सत्तरीतला उमदा तरुण होता. त्याचे सहजशैलीतील वर्णन ऐकता ऐकता एक तास कसा निघून गेला ते कळले नाही.

Tour Guide

या टूरदरम्यान काढलेले फोटोज

Curved trail

Pink Trees

Colorful Trees

Girls near fountain

येथे स्कल्पचर गार्डन आणि सध्या अमेरिकेतील बाळ गोपाळांचे आवडते असे लेगो वापरून तयार केलेल्या आकर्षक आकृत्या जागोजाग दिसल्या.

Sculpture Garden

नातवाला बागकाम शिकवणारे एक आजोबा.

Grandpa grandson

Butterfly

Hummingbird

Turtle

व्हिजीटर सेंटरमधील गिफ्ट शॉपीमधून souvenirs खरेदी करून आमच्या या भेटीची सांगता झाली.

Souvenir

एकंदरीतच ही जागा खूप आवडल्याने येथे परत फॉल सीझनमध्ये परत जायचा मानस आहे. येथे विनामोबदला काम करणाऱ्या शेकडो हौशी स्वयंसेवकांना मन:पूर्वक धन्यवाद.

टीप: फोटो मोठे करुन पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करावे.

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

24 May 2015 - 9:57 pm | पद्मावति

वेगळ्याच ठिकाणाची छान माहिती मिळाली. फोटो तर फारच मस्तं....

धर्मराजमुटके's picture

24 May 2015 - 10:01 pm | धर्मराजमुटके

दिल गार्डन गार्डन हो गया !

मधुरा देशपांडे's picture

24 May 2015 - 10:10 pm | मधुरा देशपांडे

मस्त फोटो.

आह्ह ! सुरेख फोटो आणि माहिती :)

चित्रगुप्त's picture

24 May 2015 - 10:51 pm | चित्रगुप्त

अप्रतिम फोटो आणि माहिती. 'लेगो' म्हणिजे काय, मज निरोपावे.

श्रीरंग_जोशी's picture

24 May 2015 - 11:33 pm | श्रीरंग_जोशी

भारतात आता काय म्हणतात ते ठाऊक नाही पण माझ्या लहानपणी ते मेकॅनो या नावाने ओळखले जायचे. इथली लहान मुले विविध लेगो गेम्स अन पझल्स खेळताना तासन तास घालवतात.

लेगो हे कंपनीचे नाव आहे. कॉपियर यंत्राला जसे झेरॉक्स म्हंटले जाते तसे आता अमेरिकेत लेगोबाबत होऊ लागले आहे. लेगोलँड थीमपार्क्स पण प्रसिद्ध आहेत.

गेल्या वर्षीचा द लेगो मूव्ही हा अ‍ॅनिमेशनपट इथे खूप चालला.

आमच्या शहरातील मॉल ऑफ अमेरिका (अमेरिकेतील सर्वात मोठी मॉल) येथे लेगो कंपनीचे भव्य दालन आहे. त्याचे मी काढलेले दोन फोटोज.

Lego Copter

Lego Showroom

सुबोध खरे's picture

24 May 2015 - 11:01 pm | सुबोध खरे

फोटो फार छान आहेत

अत्रुप्त आत्मा's picture

24 May 2015 - 11:13 pm | अत्रुप्त आत्मा

अफाट सुंदर पुष्पमालिका
कुठे द्वयी ती, कोठे एका
गूज सांगते हासून लाजून
हळूच जाऊन कौतुक ऐका

http://www.sherv.net/cm/emo/happy/happy-spring-smiley-emoticon.gif

सानिकास्वप्निल's picture

25 May 2015 - 1:20 am | सानिकास्वप्निल

खूप सुंदर फोटोज आणि उत्तम माहिती :)

फार सुंदर फोटो आणि माहिती.

सविता००१'s picture

25 May 2015 - 2:43 pm | सविता००१

अप्रतिम फोटो आणि लेखनही झक्कास

कपिलमुनी's picture

25 May 2015 - 3:12 pm | कपिलमुनी

कलरफुल्ल फोटो !

मदनबाण's picture

25 May 2015 - 3:44 pm | मदनबाण

झकास्स्स... :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Knight Rider (2015) Official Fan Movie Trailer

प्रीत-मोहर's picture

25 May 2015 - 7:46 pm | प्रीत-मोहर

दिल गार्डन गार्डन हो गया!!!

मस्त फोटू. निसर्गाचे फोटो आवडलेच पण लेगोज वापरून तयार केलेल्या प्रतिक्रुतीही आवडल्या. लेगो हा मुलांचा अगदी आवडीचा खेळप्रकार आहे. क्यालिफोर्नियातील लेगोलँड नंतर या चित्रांमध्येच प्रतिकृती पहावयास मिळाल्या.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

25 May 2015 - 9:06 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

फोटो खुप अप्रतिम :)

फोटो सौजन्य: मिपाकर श्रीरंग जोशी.

अमेरीकेत राहणार्‍या बर्‍याच मिपाकरांच्या घरी त्यांची शाळेत जाणारी मुले लेगोमय झाली असतील असा अंदाज आहे. त्यापैकी कुणी लेगोवर तपशीलवार लेख टाकल्यास आनंद वाटेल.

पैसा's picture

26 May 2015 - 9:41 am | पैसा

खूपच छान!

मितान's picture

26 May 2015 - 10:12 am | मितान

फोटो कित्ती सुंदर !!!!

लेगोवर तपशीलवार लेखाच्या प्रतीक्षेत....