रावण राज

अमेयहसमनीस's picture
अमेयहसमनीस in काथ्याकूट
20 Aug 2008 - 1:05 pm
गाभा: 

>:) शैक्षणिक संस्थांमध्ये वारंवार होणाऱ्या गोळीबाराच्या घटनांवर उपाय म्हणून शिक्षकांनीच बंदूक घेऊन वर्गात सज्ज राहावे, असा ठराव टेक्‍सास राज्यातील एका शाळेच्या मंडळाने मंजूर केला आहे.
असा निर्णय घेणारी ही अमेरिकेतील पहिलीच शाळा असून, वर्गात येणाऱ्या कोणत्याही प्रसंगाला तोंड देण्यासाठी एकमताने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे, या निर्णयाला पालकांनीही आक्षेप घेतला नाही. ~X(

"हॅरॉल्ड इंडिपेंडंट स्कूल' असे या शाळेचे नाव आहे. शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आल्याचे शाळेचे अधीक्षक डेव्हिड थ्वेट यांनी सांगितले. शाळेत कॅमेरे बसविण्यात आले आहेत, इतर सुरक्षा व्यवस्थाही आहे; मात्र ही सुरक्षा भेदून हल्लेखोर शाळेत आलाच, तर अशा आणीबाणीच्या परिस्थितीचा विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या शाळेत ११० विद्यार्थी शिकत असून, मोठी रहदारी असणाऱ्या महामार्गाजवळ ही शाळा आहे. त्यामुळे शाळेवर हल्ला करणे सहजशक्‍य आहे. या सर्व गोष्टींचा विचार करूनच हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. अनेक शिक्षणतज्ज्ञांनीही या निर्णयाचे समर्थन केले आहे. :))

शाळेत होणाऱ्या गोळीबाराच्या घटनांमुळे अमेरिकी कॉंग्रेसने देशभरातील शाळांत शस्त्रे नेण्यास बंदी घातली होती; मात्र सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय रद्दबातल ठरवला; मात्र टेक्‍सास राज्यात आजही शाळेच्या प्रशासनाच्या परवानगीशिवाय शाळेत शस्त्र नेण्यास बंदी आहे. थ्वेट म्हणाले, ""केंद्र सरकारने शाळांचा परिसर शस्त्रास्त्रमुक्त करण्याचे जाहीर केले होते, त्यानंतरच गोळीबाराच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. अशा प्रकारे निःशस्त्र लोकांच्या गटाचे संरक्षण कोण करणार?'' या धोरणावर एक वर्षापासून विचार करण्यात येत होता, असेही त्यांनी सांगितले; मात्र शाळेतील किती शिक्षकांकडे शस्त्र असेल, हे सांगण्यास त्यांनी नकार दिला. :$

शिक्षकांना शाळेत बंदूक घेऊन येण्यापूर्वी परवाना घ्यावा लागणार आहे; तसेच या शिक्षकांना आणि शाळेतील अधिकाऱ्यांना आपत्ती निवारणाचे प्रशिक्षणही देण्यात येणार आहे.
>:)

प्रतिक्रिया

वैद्य's picture

20 Aug 2008 - 1:10 pm | वैद्य (not verified)

अमेरिकेच्या घटनेतील दुसरी घटनादूरुस्ती वाचा.

-- वैद्य

पिवळा डांबिस's picture

21 Aug 2008 - 1:34 am | पिवळा डांबिस

ती त्यांनी वाचली असती तर वरील मजकूर लिहिलाच नसता हो, वैद्यबुवा! :)
ते सोडून देऊया, घटना आणि घटनादुरुस्ती! मोठ्या गोष्टी आहेत त्या!!!

वर दिलेली बातमी(?) बारकाईनं वाचा. न्यूज एकांगी कशी लिहावी याचं जणू प्रशिक्षणच आहे हे!
ही शाळा, ती जिथे आहे ते टेक्सास राज्य, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, वगैरे सर्व काही सखोल लिहिलं आहे पण....
ज्या शाळेने हे केलं आहे तो हॅरॉल्ड स्कूल डिस्ट्रीक्ट हा टेक्सास मध्ये 'विचिटा फॉल्स' सारख्या ठिकाणी आहे, डलास किंवा ह्यूस्टन सारख्या कुठल्याही मोठया शहरात नव्हे. या शाळेत केजी ते बारावी या सर्व इयत्ता मिळून फक्त ११० (अक्षरी- एकशेदहा) विद्यार्थी आहेत (रेफरन्सः डलासन्यूज). ही माहिती देण्याचं लेखकाने टाळलंय!!

हे म्हणजे भारतातल्या कुठल्यातरी खेड्यात शिक्षकाने विद्यार्थिनीवर अत्याचार केला म्हणून सगळे भारतीय शिक्षक अत्याचारी आहेत असं ध्वनित करण्यापैकी आहे!!! एपिडेमिक आणि पोलिटिकल स्टेटमेंट यातला फरक उमजलेला दिसत नाहीये लिखाणात!!

हां, आता सुरु होऊ द्या अमेरिका बॅशिंग!!!!:)

वैद्य's picture

21 Aug 2008 - 3:22 am | वैद्य (not verified)

http://www.visionofhumanity.org/gpi/results/rankings.php

नुसार, खुनांचे प्रमाण (दर १००,००० लोकांत):

मलेशिया : २
अमेरिका : २
भारत : २

हिंसेचे प्रमाणः (१ ते ५, १ = खूप कमी, ५ = खूप जास्त)

मलेशिया: २
अमेरिका: १
भारतः ३

-- वैद्य

भडकमकर मास्तर's picture

21 Aug 2008 - 12:44 am | भडकमकर मास्तर

काही वर्षांनंतर प्रत्येक अमेरिकन शाळेचं स्वतःचं सैन्य असेल....
पायदळ, घोडदळ, तोफखाना,रणगाडे, कोस्टल शाळांसाठी आरमार ,मिसाईल्स , विमाने वगैरे अगदी सुसज्ज....
खरंय ना...संरक्षण करायला शस्त्रे नकोत?

अवांतर : रावणाच्या राज्यात शिक्षकांनी शाळेत बंदुका आणायला परवानगी होती की काय ? ....

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

सखाराम_गटणे™'s picture

21 Aug 2008 - 8:48 am | सखाराम_गटणे™

शाळेचा तोफखाना,रणगाडे, कोस्टल शाळांसाठी आरमार ,मिसाईल्स

हा हा हा,

रावणाच्या राज्यात शिक्षकांनी शाळेत बंदुका आणायला परवानगी होती की काय ? ....
मला पण हे जाणुन घ्यायचे आहे.

सखाराम गटणे

हा घ्या दुसर्‍या घटनादुरुस्तीचा दुवा.

ही घटनादुरुस्ती नीट वाचली तर असे लक्षात येते की ज्या कारणाने ती केली ते कारण आता खरेतर अस्तित्वात नाही.
पण अमेरिकन राज्यकर्त्यांवर असलेल्या शस्त्रास्त्र निर्मात्यांच्या पकडीचे राजकारण अशा स्तराला पोचलेले आहे की अशा रोगापेक्षा इलाज भयंकर अवस्थेतून त्यांची सुटका नाही!

चतुरंग

वैद्य's picture

21 Aug 2008 - 2:58 am | वैद्य (not verified)

ही घटनादुरुस्ती नीट वाचली तर असे लक्षात येते की ज्या कारणाने ती केली ते कारण आता खरेतर अस्तित्वात नाही.

असे तुमचे मत आहे. सर्वोच्च न्यायालयाला असे वाटत नाही. त्यांचे मत महत्वाचे.

दोनच महिन्यांपूर्वी डी सी विरुद्ध हेलर खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने "स्टेट रेग्युलेटेड मिलिशिया" ह्याचा अर्थ लावून, त्यात तुम्ही आम्ही सर्वच अंतर्भूत आहोत असा निर्णय दिला.

http://en.wikipedia.org/wiki/District_of_Columbia_v._Heller

-- वैद्य

धनंजय's picture

21 Aug 2008 - 3:26 am | धनंजय

सर्वोच्च न्यायालयाने हल्लीच या वाक्याचा अर्थ "प्रत्येक व्यक्तीपाशी बंदुकी बाळगण्याचा हक्क आहे" असा लावला आहे. हा खटला वॉशिंगटन डी.सी. येथील बंदुकींचे नियंत्रण करणार्‍या कायद्याविरुद्ध होता.

पण सर्व शहरातले बंदुकींचे नियंत्रण करणारे कायदे बाद झाले आहेत की नाहीत याबद्दल दुमत आहे.

मला वाटते, काही दशकांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने वेगळा अर्थ लावला होता. हल्लीचा अर्थ लावणारे सर्व न्यायाधीश (त्या मानाने) तरुण असल्यामुळे, हा नवीन अर्थही अनेक दशके टिकेल अशी अपेक्षा आपण करू शकतो.

ऍडीजोशी's picture

21 Aug 2008 - 11:23 am | ऍडीजोशी (not verified)

वेगवेगळ्या बंदुका चालवायला शिकवण्याचे क्लासेस कधी सुरु होतायत?

वैद्य's picture

21 Aug 2008 - 11:30 am | वैद्य (not verified)

हे इथे कशाला, बिंद्राला विचारा. त्याच्या बाबांनी त्याला एक कोटीची शूटिंग रेंज बांधून दिली अहे. तो घेईल की क्लासेस.

-- वैद्य

प्रियाली's picture

21 Aug 2008 - 5:49 pm | प्रियाली

या चर्चेतील सर्व अनावश्यक प्रतिसाद काढून टाकले आहेत. हमरीतुमरीवरच्या मारामार्‍या करण्यासाठी इतर मार्ग चोखाळावे.