चिकन क्रिस्पी

कोकण कन्या's picture
कोकण कन्या in पाककृती
15 May 2015 - 12:18 pm

नमस्कार .....मंडळी ...मी मिपा ची नियमित वाचक असून सुद्धा कधी काही लिहिले नव्हते ....पण मुळातच,,,पदार्थ बनवण्याची आणि पक्की खवैय्ये(खादाड)असल्याने आज एक नवीन पाककृती सांगते....
बघा आवडतंय का.....पहिलीच पाककृती मांसाहारी टाकतेय....शाकाहार्यान्साठी क्षमस्व ...

चिकन क्रिस्पी

साहित्य:
अर्धा किलो चिकन(बर्यापैकी बोनेलेस असलेले),
एक अंड ,
एक चमचा काळी मिरी पूड,
आलं लसूण पेस्ट एक ते दीड चमचा ,
मीठ,एक चमचा लाल तिखट,अर्धे लिंबू
एक ते दोन चमचे कॉर्नफ्लोर
कॉर्नफ्लेक्स मोठा बाउल .

कृती:
सर्वप्रथम तर चिकन धुवून त्यला आलं लसूण पेस्ट ,लिंबाचा रस ,मीठ,लाल तिखट,काळी मिरी पूड ,आणि अंड फोडून घालावे आणि हे मिश्रण २ तास फ्रीज मध्ये मरिनेट होऊ द्यावे .मधल्या वेळात कॉर्नफ्लेक्स मिक्सर मधून काढून भरड होईपर्यंत बारीक करून घ्या.दोन तासांनी चिकन मध्य कोर्नफ्लोउर मिक्स करून घ्यावे.मग चिकन कॉर्नफ्लेक्स च्या चुऱ्यात घोळून सोनेरी होई पर्यंत डीप फ्राय करून घ्या .झाल..अरॆए हाय काय नाय काय....झटपट starters तयार......

(....घरी केलेल्याचा फोटो नाही आहे आता..नेट वर चिकन क्रिस्पी टाकल्यावर ज्या काही images येतील तसेच होतात हे क्रिस्पी......नक्की करून बघा.....)

प्रतिक्रिया

फ्लॉवर क्रिस्पि

सामान्यनागरिक's picture

19 May 2015 - 9:30 pm | सामान्यनागरिक

आपणा सर्वांना कळवण्यास अत्यंत हर्ष होत आहे की वरील पाककृती करून बघीतली आणि ती ऊत्तम झाली. अर्थात आमचे कलत्र अत्यंत सात्विक आणि कर्मठ असल्याने आमच्या नशिबी फ्लावरचेच क्रिसपी आले. पण चिकनचे कसे लागत असतील याची कल्पना करूनच आम्ही जीव्हासूखाच्या परमोच्च बिंदू पर्यंत पोचलो. पाककृती पाठविणार्या व्यकतीस धन्यवाद. पाककृतीदाता सूखी भव !

सामान्यनागरिक's picture

19 May 2015 - 9:39 pm | सामान्यनागरिक

तळल्या नंतर त्यावर चाट मसाला भुरभूरल्यास लछ्जत अजुनच वाढते! इति आमचे कलत्र ! अगदीच काही वाईट नाही हो!!! म्हणजे आमचे कुटूंब म्हणतो मी !

फोटु नाहीत त्याचा फाऊल...
तरीही आज करुन पाहिल जाईल..

मस्त्.चिकनचे छोटे तुकडे केले तर के एफ सि च्या पण तोडात मारेल असे छान होतात.

कोकण कन्या's picture

16 May 2015 - 1:11 pm | कोकण कन्या

हो हो अगदि....तसेच होतात यात काही शंकाच नाही....मी स्वतः बऱ्याचदा करते

नीलमोहर's picture

16 May 2015 - 2:12 pm | नीलमोहर

पण चिकन असल्यामुळे पास !!

माम्लेदारचा पन्खा's picture

16 May 2015 - 7:49 pm | माम्लेदारचा पन्खा

क्षमस्व ही कोणती डिश बुवा??? काय घालतात त्यात??

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

17 May 2015 - 7:29 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

शेखसाहेब आले की घालतील हां करुन तुम्हाला मा.पं.

माम्लेदारचा पन्खा's picture

18 May 2015 - 12:22 pm | माम्लेदारचा पन्खा

सही..........पण तुम्ही इतक्या डिश मागितल्या तर ते येणेच नको रद्द करायला !!

उमा @ मिपा's picture

17 May 2015 - 3:42 pm | उमा @ मिपा

खूपदा करते हा प्रकार, मस्तच होतो.
कोकण कन्या हे नाव आवडलं (मला का सुचलं नाही?)

कोकण कन्या's picture

18 May 2015 - 11:50 am | कोकण कन्या

धन्यवाद ...!

कविता१९७८'s picture

19 May 2015 - 11:20 am | कविता१९७८

मस्त रेसिपी