अंथरुणातील कामात बिझी असणाऱ्या मित्रांना

पगला गजोधर's picture
पगला गजोधर in जे न देखे रवी...
27 Apr 2015 - 1:37 pm

संध्या होता मिलनाची खाट सजवली सख्यांनी …
दारी दुग्धकेशर घेऊनी बावरते सौभाग्यकांक्षिणी…
श्वासही तापले काया झंकारीली भानही हिरावले मग त्या कामीनी…
जाणवावी कवेत तिच्या तनुतील शिरशीरी हरलाजऱ्या चुंबनी….
अश्व दौडवता यौवनाचे अनुभवावी गुलाबी श्वासांची जोडी बिलगूनी…
पहाटजाग येई अलगद पिचलेला चुडा कुस्कारला गजरा ओलांडुनी…
फितुरी विस्कटलेलं कुंकू, अन मोकळे केस ओरडून संगती सर्वा कहानी …
गीत असे माधुरी सहसखी मोहिनी तुझ्यासवे गात रहावे हरदिनी हरदिनी….

मुक्तक

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

27 Apr 2015 - 2:16 pm | टवाळ कार्टा

;)

अत्रुप्त आत्मा's picture

27 Apr 2015 - 2:34 pm | अत्रुप्त आत्मा

डीपरेशन आलय का हो? ;)

टवाळ कार्टा's picture

27 Apr 2015 - 2:50 pm | टवाळ कार्टा

डीपरेशन नै डेस्परेशन ;)

पॉइंट ब्लँक's picture

27 Apr 2015 - 2:58 pm | पॉइंट ब्लँक

ही ही.

अत्रुप्त आत्मा's picture

27 Apr 2015 - 6:34 pm | अत्रुप्त आत्मा

अक्षरांवर गेलास!
अर्थावर कधी जाशील बा ल का!?

वपाडाव's picture

30 Apr 2015 - 3:22 pm | वपाडाव

डीपरेशन = खोलवर जौन आणलेले रेशन
असेच ना गुर्जी

टवाळ कार्टा's picture

30 Apr 2015 - 4:12 pm | टवाळ कार्टा

का खोलवर पोहोचवलेले ;)

पगला गजोधर's picture

30 Apr 2015 - 10:21 pm | पगला गजोधर

मित्रांनो इथे कसलाही रेशनिंग नाही, इथे कस, सगळं भरभरून- सढळपने ;)

अत्रुप्त आत्मा's picture

1 May 2015 - 3:03 pm | अत्रुप्त आत्मा

@खोलवर जौन आणलेले रेशन>>> इतक्यात रेशनवर आलात??? अर्थात हल्ली मिपावर यायला लागलायत यातच सगळं आलय म्हणा! ;)

http://www.sherv.net/cm/emoticons/object/bubbles-smiley-emoticon-emoji.gif
असो! ;)

पॉइंट ब्लँक's picture

27 Apr 2015 - 2:59 pm | पॉइंट ब्लँक

एकदम शृंगाररसाने भरलेली कविता. "छु ले दो नाजुक ओंठोंको" ची आठवण झाली.

द-बाहुबली's picture

27 Apr 2015 - 3:13 pm | द-बाहुबली

अंथरुणातील कामात बिझी असणाऱ्या मित्रांना

_/\_

गुड.

Vimodak's picture

27 Apr 2015 - 6:10 pm | Vimodak

शीर्षक ओळखीचं वाटतंय... ; )

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

27 Apr 2015 - 6:40 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

विडंबन आहे. पण फक्कड जमलयं.

कपिलमुनी's picture

27 Apr 2015 - 6:44 pm | कपिलमुनी

सौभाग्यकांक्षिणी असताना दारी दुग्धकेशर घेऊनी कशी जाईल हो ती ?
सौभाग्यवती हवी

पगला गजोधर's picture

27 Apr 2015 - 7:23 pm | पगला गजोधर

सौभाग्यकांक्षिणी म्हणजे, पतिसौख्य भरपूर व शेवटपर्यंत मिळो अशी इच्छा असणारी स्त्री..

असे मिपावरील ऐका लेखात वाचल्याचे स्मरते आहे, मुनिवर्य :)

माम्लेदारचा पन्खा's picture

27 Apr 2015 - 6:59 pm | माम्लेदारचा पन्खा

"ए" पिल्सची गरज आहे असं राहून राहून वाट्लं !!!!!

पगला गजोधर's picture

27 Apr 2015 - 7:27 pm | पगला गजोधर

.

नाखु's picture

29 Apr 2015 - 12:15 pm | नाखु

तुझ्यासवे गात रहावे हरदिनी हरदिनी….

हेच रहावे

असे तुझ्यासवे गात रहावे हरदीनी हरदीनी…. होऊ नये या करीता "प्रपंच करा नेटका"

पगला गजोधर's picture

29 Apr 2015 - 1:29 pm | पगला गजोधर

परंतु माझ्यामते 'हरदीनी हरदीनी'…. हेच योग्य …. परंतु त्याबरोबरच मनीमात्र भाव असावा …"भोगी म्हणुनी उपहासा मी योगी कर्माचा"…… असा.
जर कोणी तुम्हाला सेक्स हे पाप आहे असे जर सांगत/दर्शवत असेल , तर तुकोबांच्या खालील ओळी जरूर ध्यानी घ्याव्या …

ऐसे कैसे जाले भोंदू, कर्म करोनि म्हणति साधु
अंगी लावूनियां राख, डोळे झांकुनी करिती पाप
दावुनि वैराग्याची कळा भोगी विषयांचा सोहळा
तुका म्हणे सांगों किती जळो तयांची संगती