रेल्वे तिकीटाची नावात बदलाची सोय : फायदा कुणाचा ?

दा विन्ची's picture
दा विन्ची in काथ्याकूट
15 Apr 2015 - 10:25 am
गाभा: 

रेल्वे तिकीटाची नावात बदलाची सोय : फायदा कुणाचा ?

सध्या असे ऐकले आहे कि आधी आरक्षित केलेले तिकीट, काही कारणास्तव आपण प्रवास करू शकत नसू तर आपल्या रक्ताच्या नात्यातील इतरांना तसेच एकाच कार्यालयातील इतर सहकाऱ्याला सुद्धा वापरता येईल . खालील लिंकवर हि बातमी आहे. http://timesofindia.indiatimes.com/city/allahabad/Now-you-can-transfer-y...
वर वर पाहता हि एक अतिशय चांगली सुविधा आहे आणि आपला बराच त्रास आणि मनस्ताप कमी करणारी आहे.

पण एक दात शक्यता अशी पण आहे कि प्रवाश्यांच्या सोयीपेक्षा आता बुकिंग दलालच वर कमाईची संधी सध्तिल.

प्रतिक्रिया

कपिलमुनी's picture

16 Apr 2015 - 3:13 pm | कपिलमुनी

एजंट लोकांची चांगली सोय झाली आहे.

दा विन्ची's picture

16 Apr 2015 - 3:31 pm | दा विन्ची

कपिल मुनीजी, वाचने दीड हजार पण प्रतिसाद शुन्य म्हणून जरा पहिलाच प्रयत्न चुकला कि काय म्हणून धास्तावलो होतो. आता जीव जरा थंड झाला

कपिलमुनी's picture

16 Apr 2015 - 3:43 pm | कपिलमुनी

थोडासा मोदीं सरकारचा तडका मारला असता तर सेंचुरी झाली असती. नेक्स्ट टाइ़म सुपारी द्या

अखिल भारतीय प्रतिसाद्प्रसव खफ मंडळ

प्रकाश घाटपांडे's picture

16 Apr 2015 - 3:40 pm | प्रकाश घाटपांडे

काही तरी गडबड आहे. बातमी ४ वर्षापुर्वीची आहे. अजूनतरी अशी सुविधा ऐकीवात नाही.

कपिलमुनी's picture

16 Apr 2015 - 3:44 pm | कपिलमुनी

भारीच की !

म्हणजे तुम्ही धागे वाचता तर ;)

प्रकाश घाटपांडे's picture

16 Apr 2015 - 3:47 pm | प्रकाश घाटपांडे

योगायोगाने वाचला.

कपिलमुनी's picture

16 Apr 2015 - 3:48 pm | कपिलमुनी

http://www.indianrail.gov.in/change_Name.html

शिवाय जानेवारी २०१५ मधे पण ही बातमी होती
http://timesofindia.indiatimes.com/city/patna/Policy-on-transfer-of-rail...

पण सध्या कोणी ही सुविधा वापरल्याचे दिसत नाही

प्रकाश घाटपांडे's picture

16 Apr 2015 - 3:58 pm | प्रकाश घाटपांडे

खरच की ! ऑन लाईन असा अर्ज करण्याची सुविधा आहे का? अप्रवासी असल्याने त्यातील तांत्रिक बाबी फारशा समजत नाहीत.

दा विन्ची's picture

16 Apr 2015 - 4:00 pm | दा विन्ची

जूनमध्ये पुण्याला येणार आहे तेव्हा हि सुविधा वापरण्याचा विचार आहे.

दा विन्ची's picture

16 Apr 2015 - 4:02 pm | दा विन्ची

अर्ज ऑन लाईन करता येत नाही . पण गाडीच्या वेळेआधी २४ तास संबंधित स्टेशन मास्तरला अर्ज करून ही सुविधा वापरता येते (म्हणे)

ही। सोय काहीजणांसाठी फार पूर्वीपासूनच होती आता थोड़ी व्यापक सुधारणा केली असेल.
इथे रूलस दिले आहेत