१२ वी नंतर करिअर संबंधी मार्गदर्शन

टवाळ कार्टा's picture
टवाळ कार्टा in काथ्याकूट
14 Apr 2015 - 12:10 pm
गाभा: 

१२ वी नंतर करिअर संबंधी मार्गदर्शन

माझ्या ओळखीत असणार्या एका जेवण बनवण्यासाठी येणार्या बाईंच्या मुलाने सध्ध्या १२ वीची परिक्षा दिली आहे. त्याला १२वी नंतर मेडिकल अथवा इंजिनीअरींगला नाही जायचे तर त्याला कोणते दुसरे पर्याय सुचवता येतील?

मुलगा आत्तापर्यंत कणकवलीला शिकला आहे. १२ वी सायन्स ला होता (PCMB).
१०वीत स्वत: अभ्यास करून ८५% मिळवलेले होते आणि मुलगा अभ्यासू आहे
घराची आर्थिक परिस्थिती फार बेताची आहे

शक्यतो असे पर्याय सुचवावे वाटतात जे थोडे हटके आहेत जसे

मरीन इंजिनीअरींग
मर्चंट नेव्ही
शिपिंग फिल्ड

समस्त मिपाकरांना आवाहन आहे की जर उपयुक्त माहिती असेल तर या धाग्यावर लिहावी…माहिती त्याच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी माझी

अवांतर -
जसा मी दुसर्यांच्या धाग्यावर दंगा करतो तसा या धाग्यावर जर कोणाला दंगा करायचा असेल तर माझी ना नाही …अट फक्त एकाच की दंगा घालायच्या आधी १ तरी प्रतिसाद असा लिहावा ज्यामुळे त्या मुलाला करिअरसाठी उपयोग होईल

प्रतिक्रिया

असे पर्याय सुचवावे वाटतात जे थोडे हटके आहेत
हे जरा जपून.काही ओळखी/गाईडन्स/लींक असतील तर असले धाडस करावे. aircraft maintenance चांगल्या मार्काने पास होऊनही ४-५ वर्षापासून वैतागलेला १ मित्र आता परत MBA करतोय.
अशा कोर्सेसना जॉब ओपनिंग कमी असते. exception ही आहेत. बाकी रिस्क जास्त असेल तिथे बार्याचदा फायदेही जास्त असतात. पण जपून.

टवाळ कार्टा's picture

14 Apr 2015 - 12:41 pm | टवाळ कार्टा

हो म्हणूनच इथे धाग्यावरच चर्चा होउन जाउदे

खंडेराव's picture

14 Apr 2015 - 12:42 pm | खंडेराव

IISER हा एक पर्याय होउ शकेल.
माझी एक नातेवाईक चांगल्या शासकिय अभियांत्रिकी महाविद्यालयात होती, पण तिथे मन लागत नव्हते. शेवटी IISER ला प्रवेश मिळवला, आत अगदी खुश आहे. पाच वर्षांचा BS-MS अभ्यासक्रम आहे, आणि महिना ५००० ( बहुधा ) शिक्षणभत्ता मिळतो. जर विज्ञानात रुची असेल तर विचार करा.
http://www.iiseradmission.in/

कपिलमुनी's picture

14 Apr 2015 - 1:20 pm | कपिलमुनी

सायन्स होता का १२ वी ला ?
ग्रुप कोणता होता ?
कंपनी सेक्रेटरी हा एक उत्तम कोर्स आहे.
बी एससी नर्सिंग हा एक चांगला पर्यात आहे ( गल्फमध्ये खूप जॉब्स आहेत).
बी एससी इन मेडिकल टेक्नॉलॉजी ( सिटी स्कॅन , कलर डॉप्लर , कॅन्सर संदर्भामधल्या टेस्ट्स ईई) या संदर्भामधल्या तंत्रज्ञ असे जॉब असतात.

बी एससी इन फोरेन्सिक सायन्स हा देखील उत्तम कोर्स आहे.

बाकी मुलाचा कल , आर्थिक क्षमता या बाबी कळाल्या असत्या तर अजून माहिती देता आली असती.

टवाळ कार्टा's picture

14 Apr 2015 - 1:43 pm | टवाळ कार्टा

हो
१२ वी सायन्स

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

14 Apr 2015 - 2:00 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

इंजिनिअरिंग ला गव्हर्मेंटला मिळाली अ‍ॅडमिशन तर उत्तम होईल. त्याचा कल कुठे आहे त्याप्रमाणे साईड निवडायला सांग.

इंजिनिअरिंग नको असेल तर सायन्स ग्रॅजुएट होउन सरकारी परिक्षा द्यायला सांग. अधिक माहिती मिपाकर चिगो ह्यांच्याकडुन मिळु शकेल.

तेही नको असेल तर मग अ‍ॅनिमेशन वगैरे फिल्ड पण ओपन आहेतचं हातामधे कला असेल तर.

__________

दंगा:

मला वाटलं परत बारावी दिलीस का काय ;)

चार्टर्ड अकाउंटंसी हाही एक चांगला पर्याय होऊ शकतो.

एकतर फी कमी असते. दुसरं म्हणजे "कमवा आणि शिका" हा पर्याय जवळजवळ लगेच उपलब्ध होतो. प्रॅक्टिस करणारे सीए हुशार, कामसू मुलाच्या शोधात असतातच.

मुलगा हुशार+अभ्यासू असेल तर दनादन पास होत जाईल आणि वयाच्या २१/२२व्या वर्षी सीए होऊन आत्मनिर्भर होऊ शकेल. पुढे नभस्पर्शम् दीप्तम् असं पोटेन्शियल आहे.

प्रतिकूल परिस्थितीतून सीए झालेले अनेक लोक माझ्या परिचयाचे आहेत. बारावीच्या सुमाराला सीए करायचा निर्णय परिस्थिती अनुकूल असतानाही अवघड असतो. तो मुलगा पुण्यात असेल तर काही मदत मी नक्की करू शकेन. व्यनि कर.

टवाळ कार्टा's picture

14 Apr 2015 - 2:29 pm | टवाळ कार्टा

मुलगा १२ वी सायन्स आहे

आदूबाळ's picture

14 Apr 2015 - 4:39 pm | आदूबाळ

सीए करायला कॉमर्स ब्याकग्राउंडच असली पाहिजे असं नसतं. माझ्या माहितीचे अनेक प्रतिथयश सीए सायन्स किंवा आर्ट्समध्ये डिग्री घेतलेले आहेत.

एक मित्र सीओईपीतूनच विंजिनेर व्हायचं म्हणून हट्ट धरून बसला होता. सीईटी / बारावीच्या मार्कांवर काही अ‍ॅडमिशन मिळाली नाही. मग चिडून त्याने सीए करायचं ठरवलं आणि तसा झालाही. त्याच्यामते क्रिटिकल थिंकिंग येण्यासाठी बारावीपर्यंत सायन्स शिकणं अनिवार्य आहे. (मी सहमत नाही या भाग वेगळा...)

दुसरा एक बॉस/मित्र इतिहास घेऊन बीए झाला आहे. त्याला व्यावसायिक क्रिकेटर व्हायचं होतं, पण अनेक कारणांनी ते जमलं नाही. मग बीए होऊन कुठेतरी नोकरी करायची म्हणून एका सीए फर्ममध्ये चिकटला. त्या सीएने याला साधं डेबिट-क्रेडिटही कळत नाही म्हणून हिंदुस्थान लिव्हरचा स्टॉक टॅली करायच्या कामावर नेमलं. (या कामाला फक्त बेरीज वजाबाकी आली म्हणजे झालं.) ते काम याने व्यवस्थित पार पाडलं, आणि त्या सीएचा विश्वास संपादन केला. तो अधिक जबाबदार्‍या टाकत गेला आणि हा त्या नीट पार पाडत गेला. मग त्यानेच कधीतरी याला सीए करायला सांगितलं. त्यात हा बॉस/मित्र नोकरी सांभाळून, टल्ले खात खात पास झाला. त्या सीएने याला पार्टनरशिप देऊ केली. पण याला आता मोठी क्षितिजं दिसत होती. त्याने एका मल्टिनॅशनल ऑडिट फर्ममध्ये नोकरी धरली. आता तो चांगल्याच मोठ्या पदावर आहे.

कविता१९७८'s picture

14 Apr 2015 - 3:32 pm | कविता१९७८

<<<<मुलगा हुशार+अभ्यासू असेल तर दनादन पास होत जाईल>>>

सी.ए. करताना मुलगा / मुलगी हुशार + अभ्यासु असुनही बर्‍याचदा दणादण पास होत नाही, सी.ए. ची एन्टरंस सी.पी.टी. चा रीझल्ट जवळपास २५% इतका लागतो, आय. पी. सी. सी. चा रीझल्ट साधारण ७-८% लागतो आणि फायनलचा रीझल्ट या वर्षी ६% लागला होता त्याच्या आदल्या वर्षी साधारण ३% लागला होता. त्यामुळे अगदी दणादण पास होईल अशी अपेक्षा ठेवु नये पण हुशार आणि अभ्यासु मुले / मुली पास होतात

सहमत आहे. दणादण पास होण्याची शक्यता हुशार+अभ्यासू असल्यास जास्त आहे असं म्हणूया.

संदीप डांगे's picture

14 Apr 2015 - 3:29 pm | संदीप डांगे

जर भारतीय सेनेत जाण्याची इच्छा असेल तर. एनडीएत जाऊ शकतो. एनडीए प्रवेशानंतर अभ्यासक्रम सरकारकडून मोफत, पुर्ण झाल्यावर सायन्स असल्याने एअरफोर्स वा नेवी असे पर्याय आहेत. बाकी त्याबद्दल माहिती इथे मिळेल. तयारी चांगली केल्यास प्रवेश मिळून आयुष्य बदलून जाईल.

एखादी फॉरेन लँग्वेज शिकावी.

टवाळ कार्टा's picture

14 Apr 2015 - 3:52 pm | टवाळ कार्टा

ते तर सांगणारच आहे...पण ते बाजूबाजूने

कविता१९७८'s picture

14 Apr 2015 - 4:09 pm | कविता१९७८

BAF - Bacholour of Accounts and Finance हा ही चांगला पर्याय आहे. पण मुंबईत खुप कमी कॉलेजेस मधे ही डीग्री आहे आणि अ‍ॅडमिशन कट ऑफ लिस्ट ही ८५% च्या वर आहे. मुंबई बाहेर चौकशी करण्यास हरकत नाही.

मुलगा पुण्यात राहून शिकणार आहे की कणकवलीत शिक्षण घेणार आहे?

(पुण्यात शिक्षण घेणार आहे असे ध्वनीत होते असले तरी एकदा खात्री करावी म्हणून विचारत आहे)

वेल्लाभट's picture

14 Apr 2015 - 5:34 pm | वेल्लाभट

शक्यतो काही सल्ले देऊ नका. पर्याय सांगा, माहिती सांगा. निवड त्याची त्याला करू द्या, आवडीनुसार.

टवाळ कार्टा's picture

14 Apr 2015 - 6:57 pm | टवाळ कार्टा

माझेपण हेच मत आहे

अतरंगी's picture

15 Apr 2015 - 6:03 pm | अतरंगी

There are colleges in pune offering these courses. Diploma courses available in Pune. Degree courses in Mumbai, dhule, Jalgaon

कविता१९७८'s picture

16 Apr 2015 - 12:41 pm | कविता१९७८

There are colleges in pune offering these courses. Diploma courses available in Pune. Degree courses in Mumbai, dhule, Jalgaon

सरफेस कोटींग टेक्नोलोजी जर इंडस्ट्रीयल प्रीपेंटेड कलर कोटींग शीट्स (स्टील शीट्स) बद्दल म्हणत असाल तर त्याला जास्त स्कोप नाही कारण स्टील पेंट मॅनुफॅक्चरीं कंपन्या पुर्ण भारतात मोजुन ५-६ आहेत त्यामुळे नोकरीसाठी प्रॉब्लेम होतो आणि मग बाकीच्या क्षेत्रात ही फारसा वाव नाही.

अतरंगी's picture

17 Apr 2015 - 12:34 pm | अतरंगी

़अ

कविता,

हे क्षेत्र त्या पेक्षा खुप मोठे आहे. नोकरी आणि व्यवसायाच्या खुप संधी आहेत.