ऑनलाईन खरेदीवर पैसे कसे वाचवाल ?

भक्त प्रल्हाद's picture
भक्त प्रल्हाद in तंत्रजगत
20 Feb 2015 - 11:57 am

तुम्हाला माहित आहे का कि काही साध्या गोष्टी वापरून तुम्ही बरेच पैसे वाचवू शकता?

१. किमतीची तुलना करून : एकाच वस्तूची किंमत वेगवेगळ्या साईट वर वेगळी असते. त्यांची तुलना केल्यावर तुम्हाला सर्वात कमी किंमत माहित पडू शकते. (जसे कि buyhatake किंवा makkhichoos plugin)
२. किंमत रोज चेक करुन : फ्लिपकार्ट आणि अमेझॉन रोज त्यांच्या वस्तूंच्या किमती बदलतात. तुम्ही त्या रोज चेक केल्या तर तुम्हाला नक्कीच किमतीमधील फरक दिसून येईल. (एका आठवड्यात आम्हि लक्ष ठेवुन असलेल्या १००० पैकि ३०० वस्तुंच्या किंमती त्यांनी बदलल्या)

आम्ही या गोष्टी पहिल्या आणि जरी पहिल्या प्रकारासाठी काहि पर्याय असले तरी दुसर्या प्रकारचे काम करणार्या वेबसाईट फक्त ईमेल पाठवतात. (तेसुद्धा काही खास काम करत नाही.). यासाठीच आम्ही एक नवीन मोबाईल अ‍ॅप बनवले आहे, ज्याचं नाव आहे buckasur.
या अ‍ॅप वर तुम्ही वस्तू शोधा आणि तुमच्या आवडत्या वस्तूंच्या यादीत टाका. जेव्हा वस्तूची किंमत कमी होईल तेव्हा हे अ‍ॅप तुम्हाला सांगेल.

तुम्ही हे अ‍ॅप इथे टीचकी मारुन डाऊनलोड करू शकता.

आमच्या अनुभवानुसार थोडे थांबले तर अनेक वस्तुंवर १०% सुट तर सहजच मिळुन जाते.

मी हे अ‍ॅप सध्या TV आणी फोनच्या किमती चेक करण्यासाठी वापरतो. (पण अगदी डायपर सारख्या वस्तुवर सुद्धा मला २०% पेक्षा जास्त सुट मिळालि आहे.)
अगदी सोप्प आनि उपयुक्त अ‍ॅप!

आमच्या मित्रांचे आतापर्यंतचे अनुभव तुम्ही इथे टिचकी मारुन वाचू शकता.

तुम्हालाहि ऑनलाईन खरेदीवर पैसे वाचवण्याचे असे इतर प्रकार माहित असतीलच ते प्रतिसादांमध्ये नोंदवावेत हि अपेक्षा.

प्रतिक्रिया

भक्त प्रल्हाद's picture

20 Feb 2015 - 12:49 pm | भक्त प्रल्हाद

आत्ता चालु असनार्या ऑफर तुम्ही या धाग्यावर पाहु शकता.
http://buckasur.com/flipkart-coupons-amazon-coupons.php

जसी आज अतिशय छान ऑफर आहे टीव्ही वर.
http://goo.gl/Hiy6tH

मदनबाण's picture

20 Feb 2015 - 4:45 pm | मदनबाण

http://www.mysmartprice.com/
http://www.pricedekho.com/
या संकेस्थळांचा वापर करुन देखील कुठे स्वस्तात मिळेल ते कळते.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
HTTP/2 finished, coming to browsers within weeks
HTTP/2 Frequently Asked Questions

हाडक्या's picture

20 Feb 2015 - 4:51 pm | हाडक्या

अरे बाणा, ही त्यांची झैरात आहे. तुझ्या माहितीत त्यांना विंटरेष्ट असेलच असे नाही.. :))))
असो तरीही चांगली माहिती ..
आयफोनसाठी तुमचे अ‍ॅप असल्यास सांगा आम्ही नक्की वापरु (आमचेकडे आयफोन आहे याची झैरात ;) ).

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

20 Feb 2015 - 8:44 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

तुमच्याकडे आयफोन आहे?

फोनस्क्रीन अनलॉक करायला प्रत्येक वेळी ५० सेंट्स लागत असतील नै? =))
चार्जिंग चालु बंद करायला पण म्हणे दर वेळी एखादा डॉलर दान करायला लागतो जॉब्स ला =))

हाडक्या's picture

20 Feb 2015 - 11:11 pm | हाडक्या

आम्ही पौंड देतो बुवा आणि मोजित नै कधी, जॉब्स म्हणे मोजता मोजताच गेला.. (अता वस्तीला आंग्लदेशात असल्याचीपण झैरात!)

कल्ला काव ?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

20 Feb 2015 - 11:13 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

बाबौ!! अजुन म्हाग!!! आमचा खिडकी फोन बरायं =))

भक्त प्रल्हाद's picture

20 Feb 2015 - 10:04 pm | भक्त प्रल्हाद

अरे हाडक्या,

जर दुसर्याचा माल चांगला असेल तर लोक तेच वापरतील ना.
केवळ जाहिरात न करता त्याबरोबर थोडी माहितीहि मिपाकरांना व्हावी हा हेतु आहे या धाग्याचा.
तुका म्हणे त्यातल्या त्यात, स्वार्थाबरोबर थोडा परमार्थ.

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Feb 2015 - 10:08 pm | डॉ सुहास म्हात्रे

"अरे हाडक्या" वाचून माईसाहेब, डूआयडी वेग्रे, वेग्रे नकळत मनात आले ;)

हाडक्या's picture

20 Feb 2015 - 11:15 pm | हाडक्या

हा हा हा.. अगदी अगदी एक्कासाहेब.
बादवे, माईसाहेब आहेत ना अजून ?
नै तर उद्या कळायचे "हे" गेले वरती, म्हणून त्यापण गेल्या वरती.. *biggrin*

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Feb 2015 - 11:16 pm | डॉ सुहास म्हात्रे

:)

पैसा's picture

20 Feb 2015 - 10:09 pm | पैसा

अजून कसली कसली अ‍ॅप्स बनवली तुम्ही?

मी जेव्हा ऑनलाईन खरेदी करते तेव्हा "मला आत्ताच पाहिजे" अशीच असते. त्यामुळे थांबायला वेळ नसतो. मग फ्लिपकार्ट, अमेझॉन, स्नॅपडील, शॉपक्लूज आणि इबे सगळीकडे किंमती चेक करते. क्रेडिट कार्डावर काही डिस्काउंट ऑफर आहे का बघते आणि घेऊन टाकते.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

21 Feb 2015 - 11:47 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

अवांतर होईल इथे. पण शॉपक्लुज वरुन वस्तु घेणं टाळा आणि शक्यतो ऑनलाईन पेमेंट टाळा. एक म्हणजे चक्क बनावट वस्तु मिळतात. दुसरं म्हणजे त्यांचा पेमेंट गेटवे भरवसा ठेवायच्या लायकीचा नाही.

आपल्याला काही वाईट अनुभव आलाय का ?
ते आपण थोडी काळजी घेतली तर फसवणूक नाही होत
म्हणजे ५००० ची वस्तू जर ते अगदी ५०० ला देत असतील तर आपणच सावध व्हावे कि वस्तू बनावट असेल.

दुसरी गोष्ट shopclues वर अनेक products geniune पण असतात .
product च्या खाली जे review दिलेले असतात ते वाचूनच खरेदीचा निर्णय घ्यावा .
आणि ते reviews geniune असतात हा माझा वैयक्तिक अनुभव आहे .

त्यामुळे सरसकट site ला दोष देण्यात काही अर्थ नाही .
हे मी स्वानुभवाने सांगतो कारण मी या site चा दीड वर्षापासून नियमित ग्राहक आहे .
महिन्याला किमान ३०-३५ transactions त्या site वर होतात .
आणि payment gatway बद्दल म्हणाल तर माझ्या pincode वर त्यांची COD नसतेच
त्यामुळे online payment करावे लागते .
पण म्हणून कधी मनस्ताप नाही झाला अजून मला .
अगदी return / refund चे claim पण वेळेवर मिळालेत .
अर्थात ही site amazon / Flipkart सारखी सुनियोजित आणि तत्पर नाहीये पण ठीक आहे .

सतिश गावडे's picture

7 May 2015 - 11:36 pm | सतिश गावडे

मला कसलातरी वास येतोय. :)

जरा स्पष्ट सांगितलत तर बरं होईल .
हा आणि वासाचच म्हणाल तर कधी कधी स्वतःचाच वास आपल्यालाही येतो .
त्यामुळे कुठल्याही गोष्टी स्वच्छ होऊन वाचलेल्या ,ऐकलेल्या आणि लिहिलेल्या बऱ्या .
नाही का ?

भक्त प्रल्हाद's picture

21 Feb 2015 - 1:44 am | भक्त प्रल्हाद

तत्काळ खरेदिसाठी वर सांगितलेले २ वेबसाईट वापरता येतील.

buyhatke.com

You will love it!

सतिश गावडे's picture

21 Feb 2015 - 11:42 pm | सतिश गावडे

buyhatke.com वर सर्च बटनच्या क्लिकचा कोड लिहायचा बाकी आहे का?

भक्त प्रल्हाद's picture

23 Feb 2015 - 10:52 am | भक्त प्रल्हाद

सतिश,
कदाचित ते बटन तुझ्या ब्राउजर वर चालत नसेल.
अनेकदा सिस्टम अपडेट करताना असे बग येउ शकतात.
खात्री आहे कि ते सॉल्व करतील.

जेपी's picture

27 Feb 2015 - 6:32 pm | जेपी

माई मोड ऑन-
अरे प्रल्हादा,छानच केलेस हो. पण आमचे हे म्हणतात ऑनलाईन कशाला खरेदी करायचे ,जरा बाजारात भटकावे माणसाने..
बाई..बाई..वय झाल तरी हिरवट पणा जात नाही अजुन..ह्यांचा *wink*

-माई मोड ऑफ

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

27 Feb 2015 - 6:51 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

आले मोडवाले आले....!!! =))

हाडक्या's picture

27 Feb 2015 - 7:32 pm | हाडक्या

घाला तुम्ही पाणी घाला लगेच.. ;)

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Feb 2015 - 7:43 pm | डॉ सुहास म्हात्रे

काय हो, तुम्ही का त्यांच्या म्हणण्यात मोड-ता घालताय ? आँ ;)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

27 Feb 2015 - 9:14 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

मोडवाले गायब होते ३-४ दिवस. मग चुकचुकल्यासार्खं वाटायला लागलं. च्यामारी. हे जेपी बुवा एवढा हुबेहुब मोड फॉलो करतात की कधीकधी मोड-आयडी त्यांचाच असावा असा भास होतो =))

चौकटराजा's picture

1 Mar 2015 - 10:01 am | चौकटराजा

मला पण अश्शीच शंका आहे !

रॉजरमूर's picture

7 May 2015 - 11:08 pm | रॉजरमूर

बाय हटके चा प्लगिन गेले दोन वर्ष वापरतोय खूपच मदत होते याची .
product ची daywise price History कळते .
त्यामुळे आधीच जी आपण वस्तू ठरवलेली आहे घ्यायची ती यावर सेट केली की
निर्णय सोपा होतो .

चोम्परोमेतेर's picture

14 Aug 2017 - 11:59 am | चोम्परोमेतेर (not verified)

Comparometer is best price comparison website provide you best online platform where you can Compare products, check out latest deals, offers, discounts and get best online prices from popular online shopping sites

sanafreen's picture

21 Sep 2017 - 4:11 pm | sanafreen

I totally agree with the content. We should definitely use the price comparison websites especially when we are planning to buy any mobile or other electronic gadgets.

Try this one https://bestpriceon.in/mobile-price-list-india
This site is providing exact information.