मला प्रश्न पडतो कि भाजपचा खरेच बुडबुडा आहे का, मला तरी हे पटत नाही. आजच्या घडीला आर्धाच्या वर भारताला कवेत घेणारा पक्ष खरेच बुडबुडयाच्या स्वरुपात आहे काय ? मला वाटते 'आप' आणि भाजप यामध्ये निवड करताना बर्याच जणांची द्विधा मनस्थिती झाली असावी. मला वाटते दिल्लीतील भाजपच्या अवस्थेला तीन प्रमुख मुद्दे असावेत
१. राष्ट्रपती शासनाचा मोठा काळ
हा निर्नायकी काळ भाजपच्या माथी मारण्यात केजू यशस्वी झाला.
२. किरण बेदी यांची मुखमंत्री पदाचा उमेदवार म्हणून निवड (आतिशय कर्कश्य उमेदवार)
३. कॉग्रेसचे खच्चीकरण
भाजपचे मला न पटलेले (अजून तरी) दोनच मुद्दे आहेत
१. जमीन अधिग्रहण कायदा (अजून कायद्यात रुपांतर झाले नाही तरी)
२. मोदिजीचा महागडा सुट, आगदी खासगी बाब असली तरी.
असो, पण या गलबलाटात चारासम्राट लालू, लबाड नितिश, कर्कश्य ममता, उत्तरप्रदेशचे राजपुत्र अखिलेश, महाराष्ट्राचे उधोजीराजे या सर्व्वांच्या प्रतिक्रिया वाचून मौज वाटली. या मध्ये फक्त आपचे योगेंद्र यादवांची प्रतिक्रिया खूपच सयंत होती.
पाहू बिहार मध्ये काय होते ते?
प्रतिक्रिया
12 Feb 2015 - 11:31 am | सुनील
आणखी एक बुडबुडा धागा!! ;)
(पयला) सुनील
12 Feb 2015 - 11:44 am | डॉ सुहास म्हात्रे
चलायचेच ! भारतिय राजकारणात जनता अत्यंत मूर्ख आहे हे गृहित धरून वस्तुस्थितीचा विपर्यास करणे आणि ओढूनताणून बनवलेले मत अंतिम सत्य असल्याच्या अविर्भावात सांगणे नेहमीचे आहे. फक्त त्याची री ओढणार्या मिंध्या पाठीराख्यांची आणि माध्यमांची फौज असली की झाले. लालू, दिग्विजय सिंग, इ तर विदूषक म्हणुन प्रसिद्ध आहेतच ! तेव्हा चिल् !!
पण गेल्या काही महिन्यातला काही भाजपतल्या/भाजपप्रेमी उपद्रवी तत्वांच्या वागणूकीकडे पाहता त्यांना हा झटका आवश्यकच होता असेच वाटत नाही काय ?
स्वतः वेडे चाळे केल्यावरही विरोधी पक्ष कौतूकच करतील काय ?! :)
12 Feb 2015 - 12:48 pm | आनन्दा
खरेच.. मला हा पराभव म्हणजे ब्लेसिंग इन डिस्गाईझ वाटतोय.
12 Feb 2015 - 4:04 pm | पिंपातला उंदीर
लालू, दिग्विजय सिंग, इ तर विदूषक म्हणुन प्रसिद्ध आहेतच
विदुषक अशी आपली इमेज लालू ने मोठ्या प्रयत्नाने बनवली आहे आणि बिहार च्या बाहेरच पब्लिक पण त्याला फसत . बिहारसारख्या कट थ्रोट राजकारण असणाऱ्या राज्यात सतत ४० वर्ष टिकून (आणि त्यातली अनेक वर्ष सत्तेत ) राहाण म्हणजे खाण्याची गोष्ट नाही . अभिजात वर्ग लालू ला हसत असला तरी खालच्या वर्गात आणि जातीत लालू ची पाळमुळ घट्ट आहेत . लोकसभा निवडणुकी मध्ये झालेल्या पराभवानंतर मागची सगळी कटुता विसरून त्याने नितीश कुमार यांच्याशी युती केली यावरून तो राजकारणी म्हणून किती हुशार आहे हे कळत . भाजप आणि मोदी यांना पहिला झटका आप ने दिलेला नाही . मोदी लाट जेन्वा परमोच्च बिंदूवर होती तेंव्हा बिहार मध्ये १६ जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीत लालू आणि नितीश यांनी मोदी लाट पहिल्यांदा जिरवली होती . लालू भ्रष्ट , आत्मकेंद्रित , स्वार्थी राजकारणी आहे पण त्यामुळे त्याच्या राजकीय 'शहाणपणावर ' कोणी हसू शकत नाही . बाकी यादव मंडळीना आपण कितीही हसत असलो आणि त्यांच्याकडे तुच्छतेने बघत असलो तरी आपल्याकडच्या तथाकथित हृदय सम्राट , मोठे काका मंडळींपेक्षा जास्त वर्चस्व त्यांनी आपल्या राज्यात ठेवलं आहे .
12 Feb 2015 - 9:18 pm | श्रीगुरुजी
>>> लोकसभा निवडणुकी मध्ये झालेल्या पराभवानंतर मागची सगळी कटुता विसरून त्याने नितीश कुमार यांच्याशी युती केली यावरून तो राजकारणी म्हणून किती हुशार आहे हे कळत .
पोटनिवडणुकीसाठी युती करण्यासाठी पुढाकार लालूने घेतलेला नसून तो नितीशकुमारांनी घेतला होता. लोकसभा निवडणुकीत धुव्वा उडाल्यावर काळाची पावले ओळखून ज्या लालूच्या जंगलराज विरूद्ध १८ वर्षे झुंज दिली व ज्या लालूला ५ वर्षे तुरूंगवासाची शिक्षा झालेली आहे त्याच लालूशी नितीशकुमारांनी युती केली. त्याच्याआधी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यायचे नाटक करून त्याजागी मांझीसारख्या एक कळसूत्री बाहुला बसवायलचा प्रयत्न केला. अर्थात मांझीने नितीशकुमारांच्या छायेत राहण्यास नकार देऊन आपला खमकेपणा दाखवून दिल्यामुळे आता नितीशकुमारांची पंचाईत झाली आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी लालूला ५ वर्षांची शिक्षा झाली होती. त्यामुळे लालूला निवडणुकीला उभे राहता येत नाही. लोकसभा निवडणुकीत लालूची बायको व मुलगी या दोघांचाही पराभव झाला. राजद हा पक्ष बिहारमध्ये जवळपास संपला होता. त्याच पक्षाशी पोटनिवडणुकीत युती करून नितीशकुमारांनी अजून एक घोडचूक केली. पोटनिवडणुकीचा खरा फायदा लालूला झाला. लालूने ४ पैकी ३ जागा जिंकल्या. संजदने ४ पैकी २ तर काँग्रेसने २ पैकी १ जागा जिंकली. भाजपविरोधाच्या स्पेसमध्ये आपली स्पेस कमी करून लालूला देणे हे अंतिमतः नितीशकुमारांना महागात पडणार आहे कारण लालू उरलीसुरली स्पेसही बळकावून बसेल. आपण विरोधात असताना आपणच केवळ एकमेव विरोधक म्हणून राहणे व इतरांना आपला पर्याय होऊन देऊ नये हे सुद्धा राजकारणात महत्त्वाचे असते. काँग्रेसने आआपला दिल्लीत गुपचूप मदत करताना हीच चूक केली आणि आता दिल्लीत काँग्रेस पूर्ण संपलेली आहे. ९० च्या दशकात भाजपविरोधात कधी सप तर कधी बसप बरोबर युती करताना काँग्रेसने स्वत:लाच संपविले आणि ती जागा इतरांना मोकळी करून दिली.
नितीशकुमारांनी राजदशी युती करून मृतवत झालेल्या या पक्षाला नवसंजीवनी दिली तीच त्यांना महागात जाणार आहे. बिहारमध्ये डिसेंबर २०१५ मध्ये विधानसभा निवडणुक आहे. युती होताच लालूने तातडीने योजना आखून मांझीला हटविण्यासाठी नितीशकुमारांवर दबाव आणला. एकदा नितीशकुमार परत मुख्यमंत्री झाले की राजदला सरकारमध्ये स्थान मिळून त्यात लालूची मुलगी उपमुख्यमंत्री असेल व पुढील १० महिने निवडणुक जिंकण्यासाठी वापरता येतील. मुलीच्या रूपात बिहारमध्ये नवे नेतृत्व तयार झालेले असेल.
या युतीची खरी मजा जागावाटपाच्या वेळी येईल. सध्या राजदकडे २४३ पैकी १२२ आमदार आहेत, लालूकडे फक्त २४ आहेत. निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपद मिळविण्यासाठी दोन्ही पक्षांना दुसर्यापेक्षा जास्त जागा मिळवाव्या लागतील व त्यासाठी जास्तीत जास्त जागा लढवाव्या लागतील. संजदकडे १२२ आमदार असताना ते फक्त तेवढ्याच जागा लढवून उर्वरीत १२१ जागा राजदला देणे अशक्य आहे. संजद किमान १५० जागा तरी लढवेल. पण त्यामुळे लालूसाठी फक्त ९३ जागा राहतात. सलग १५ वर्षे बिहारमध्ये सत्ता राबविलेला लालू जेमतेम ३८ टक्के जागांवर समाधान मानणे अशक्य आहे. इतक्या कमी जागा लढवून संजदपुढे जाताच येणार नाही. लालू कमीतकमी निम्म्या जागांचा हट्ट धरेल व संजद हातात १२२ आमदार असताना फक्त तेवढ्याच जागा लढविणे अशक्य आहे. त्यात भर म्हणजे काँग्रेस या युतीत आली तर काँग्रेसला किमान ४० जागा तरी द्याव्या लागतील.
जरी पोटनिवडणुकीत युती झाली होती तरी प्रत्यक्ष विधानसभा निवडणुकीत ही युती होणे अशक्य आहे. दोघे वेगळेच लढतील व काँग्रेस कोणत्यातरी एकाबरोबर युती करेल.
>>> भाजप आणि मोदी यांना पहिला झटका आप ने दिलेला नाही . मोदी लाट जेन्वा परमोच्च बिंदूवर होती तेंव्हा बिहार मध्ये १६ जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीत लालू आणि नितीश यांनी मोदी लाट पहिल्यांदा जिरवली होती . लालू भ्रष्ट , आत्मकेंद्रित , स्वार्थी राजकारणी आहे पण त्यामुळे त्याच्या राजकीय 'शहाणपणावर ' कोणी हसू शकत नाही . बाकी यादव मंडळीना आपण कितीही हसत असलो आणि त्यांच्याकडे तुच्छतेने बघत असलो तरी आपल्याकडच्या तथाकथित हृदय सम्राट , मोठे काका मंडळींपेक्षा जास्त वर्चस्व त्यांनी आपल्या राज्यात ठेवलं आहे .
पोटनिवडणुक १६ जागांवर नसून १० जागांवर होती. त्यात भाजपने ४, राजदने लढविलेल्या ४ पैकी ३, संजदने लढविलेल्या ४ पैकी २ व काँग्रेसने २ पैकी १ जागा जिंकली होती. राजद + संजद + काँग्रेस अशी युती होती. ही केवळ तात्पुरती व सोयिस्कर युती होती. डिसेंबर २०१५ मधील निवडणुकीत ही युती प्रत्यक्षात होणे अशक्य आहे.
अशीच तात्पुरती आणि छुपी युती सप व बसप मध्ये २०१४ मधील ११ जागांच्या पोटनिवडणुकीत झाली होती. ११ पैकी ८ सपने व ३ भाजपने जिंकल्या होत्या. सपने ८ जागा जिंकल्या कारण बसपने आपले उमेदवार उभेच केले नव्हते व आपली मते सपकडे वळविली होती. परंतु फेब्रुवारी २०१७ मधील विधानसभा निवडणुकीत बसप अनुपस्थित राहणे किंवा सपशी युती करणे अशक्य आहे.
12 Feb 2015 - 11:14 pm | अर्धवटराव
भाजपाचे निवडणुक मॅनेजर्स या भ्रमात नसावे अशी अपेक्षा करतो.
13 Feb 2015 - 8:21 am | पिंपातला उंदीर
नसावेतच . विशफुल थिंकिंग हि आंतरजालीय समर्थकांना परवडणारी चैन त्यांना परवडणारी नाही . हे राजकारण आहे आणि इथे काहीच अशक्य नाही हे त्याना चांगल माहित असत .
13 Feb 2015 - 2:27 pm | श्रीगुरुजी
रा़जद + संजद किंवा राजद + संजद + काँग्रेस अशी बिहार विधानसभा निवडणुकीसाठी युती होऊन ही युती भाजपला धूळ चारेल या भ्रमात भाजप विरोधक नसावेत अशी अपेक्षा करतो.
12 Feb 2015 - 12:06 pm | मृत्युन्जय
योगेंद्र यादवची प्रतिक्रिया संयत होती हे मान्य पण त्याला थोडा तुच्छतेचा फ्लेवर लागला होता असे वाटते. उत्तर देताना ते कुत्स्तिपणे हसत आहेत असा भास होत होता. पण त्यांच्या प्रतिक्रियेतला शब्द न शब्द खरा होता. शिवाय आपने किती योजनाबद्ध तयारी केली होती हे ही दिसुन येते.
बाकी लालू बद्दल काय बोलावे आधी त्यांच्याखाली काय जळते आहे ते बघा म्हणाव. त्यांचा तर बुडबुडा पण नाही उरलेला
12 Feb 2015 - 12:50 pm | सोत्रि
मृत्युन्जया, असे तुला का वाटले? मला तर अतिशय मॅच्युअर्ड बोलणे वाटले.
- (संयत) सोकाजी
12 Feb 2015 - 1:58 pm | टीपीके
काय बोलले योगेंद्र यादव? लिंक आहे का?
12 Feb 2015 - 2:02 pm | मृत्युन्जय
मी फक्त वाचले हो सोत्रि. त्या उत्तरांना तसा वास येत होता. यात पुर्वग्रह वगैरे काही नाही. जस्ट असे वाटले. मी असे म्हणत असताना त्यांच्यावर टीका वगैरे काही करत नाही आहे कारण खुपच मुद्देसूस विवेचन होते ते.
12 Feb 2015 - 3:34 pm | हाडक्या
त्या भाषणाची लिंक मिळेल काय ?
12 Feb 2015 - 3:59 pm | गणेशा
खुप शोधले, पण काही मिळाले नाही, तरी ही खालील लिंक आहे का ती
https://www.youtube.com/watch?v=gbO80bdOPZw
12 Feb 2015 - 4:31 pm | राही
तुच्छपणा अजिबात नाही. अतिशय सहृदयता होती.
उलट क्वचित काही ठिकाणी क्षमाकर्त्याची भूमिका वाटली. सारे काही विसरून जाऊ अशा प्रकारची.
12 Feb 2015 - 4:45 pm | असंका
मृत्यंजय शेट, मी जे बघितलं त्यात तो एन डी टी व्ही वर आला होता आणि खरंच फार व्यवस्थित बोलला. फक्त शेवटी एकदा त्याचा चेहरा हताश झाला असं वाटलं. की किती मी संयमाने सांगतोय आणि तरीही हे लोक तेच ऐकत आहेत जे ऐकायची त्यांची इच्छा आहे.
(आप ही कम्युनिस्ट विचारसरणीला जवळ जाणारी आहे असं एकाचं मत होतं त्याला त्याने समर्पक उत्तर दिलं की अश्या वॉटर टाइट कॅटेगरी (बॉक्स) करणे आता योग्य नाही, तरी त्या एकाने आपलं मत सोडलं नाही, तेव्हा योगेंद्र यादवने एक हताश असं एक्स्प्रेशन दिलं एवढंच).
12 Feb 2015 - 1:08 pm | कैलासवासी सोन्याबापु
लालू लोकसभेच्या वेळी बी "ही लाट नाही" असे बादली भरून पाणी स्वतःच्या मुखावर शिंपडत "पाऊस पाऊस" करत होते!!!,
उरता उरला बिहार चा प्रश्न, तर सद्ध्या ड्यूटी इकडेच असल्या कारणे मी डिटेल सांगू शकतो
मुळात् बिहार मधे "जनता दल" ह्या विचारसरणी चे दोन जातीय गट भोक्ते आहेत, नितीश च्या मागे कुर्मी अंन लालुजी च्या मागे यादव लोकं आहेत, मांझी एपिसोड मुळे २७℅ दलित/ महादलित गट हा ह्या दोघा विरोधी चालला आहे,त्यातही यादव अं कुर्मी समाजात विस्तव जात नाही, अर्थात लोकसभेत ह्या पाई लोकांनी मोदींस कौल दिला असल तरीही विधानसभा पोटनिवडणुकित जातीय समीकरणावर मते गेलीत हे नजरअंदाज करणे घोड़चूक ठरेल
12 Feb 2015 - 1:42 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
राष्ट्रपती शासनाचा मोठा काळ हा निर्नायकी काळ भाजपच्या माथी मारण्यात केजू यशस्वी झाला.
भाजपावाले निवड्णूका गंमत म्हणून घेत नव्हते असे म्हणायचे आहे का तुला कंदिला?कॉन्ग्रेसवाले निवडणूका हरायचे कारण त्यांच्याकडे कार्यकर्त्यांचा अभाव आहे. संघाने मोदी निवडून आणण्यासाठी प्रचंड शक्ती देशभर पणाला लावली होती.ह्यावेळी मात्र आपने गेल्या सहा महिन्यांत बाजी मारली होती.
नरेण्द्रचा दहा लाखाचा कोट्,अरविण्दचा मफलर्,ओबामाची भेट...ह्याचा काहीही संबंध नाही.
12 Feb 2015 - 2:20 pm | आनन्दा
संघाने यावेळी बाहेर राहणे मान्य केले असे वाटते. मला यामध्ये एक दीर्घकालीन षड्यंत्र दिसत आहे.
दिल्लीची निवडणूक आपल्याला दिसते तेव्हढी सरळ नाही. काँग्रेस आणि भाजपा यामध्ये खूप मोठे राजकारण खेळले आहेत असे दिसते. आता या राजकारणातून आप बाहेर पडते का ते पहायचे.
12 Feb 2015 - 3:05 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
हरलेल्या पक्षांना दिलासा देण्यासाठी असे बोलले जाते असे ह्यांचे मत.अमित शहा व मोदी ,भाजपा व कॉन्ग्रेस मुद्दामूनच हरले असेही काहींना वाटत आहे.काय बोलणार ह्यावर आनंदा?
जि़ंकले तर पद्धतशीर प्रचार्,उत्तम व्य्वस्थापन्,तंत्रज्ञानाशी जवळीक...हरले तर उच्च डावपेच्,जबरदस्त राजकारण..
15 Feb 2015 - 9:55 pm | पारा
हरले किंवा जिंकले तरी भाजप बरोबर हा विचार मी आधीही वाचला होता. काही नाही तरी भाजप ची जनमानसावरची पकड़ अजूनही शाबूत आहे हेच प्रतीत होते. अपनी जीत का इतना गुरुर न कर ऐ जीतनेवाले,दुनिया में मेरे हार के चर्चे ज्यादा है. हे वाक्य तंतोतंत लागू पडत आहे.
12 Feb 2015 - 4:16 pm | आकाश कंदील
आपले उधोजीराव दिल्लीला 'आपच्या' शपथविधी कार्यक्रमाला जाणार म्हणतात, त्यांना एक माहित नाही मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकात 'आप' भाग घेणार आणि उधोजीरावना हरवण्याचा प्रयत्न करणार. हे माहित नसणे भविष्याबद्दलचे अज्ञान कि अजून काही. हे लोक कधी हुशार होणार
12 Feb 2015 - 7:32 pm | आनन्दा
असे पक्ष प्रस्थापितांसाठी नेहमीच चांगले असतात. मुंबई पालिकेच्या निवडणूकीत आप मते खाणार हे खरय, पण ते अँटीइन्कम्बसी मते खाणार. दिल्लीत देखील आपण बघितले असेल, भाजपाची व्होट बँक शाबूत आहे. त्यामुळे आप मुंबईत आल्यामुळे शिवसेनेचाच फायदाच होऊ शकतो.
14 Feb 2015 - 12:06 am | आबा
फक्त टक्केवारी सारखी असल्याने वोट बँक शाबूत असणे सिद्ध होत नाही,
उलट भाजपाच्या बालेकिल्ल्या मधून बेदी पडल्या, भाजपाने मते खाण्याचे काम केले
12 Feb 2015 - 9:08 pm | विकास
एक व्हॉट्सअॅप विनोद आठवला...
एकदा पुणेकर लेले खूप खुष होऊन मित्राला सांगतात, "शेजारच्या जोशींना लॉटरी लागली!" मित्र विचारतो, "मग तुम्ही का इतके खुष?" लेले म्हणतात, "कारण त्यांचे ते लॉटरीचे तिकीट हरवले आहे म्हणून!"
इतके बोलून मी रजा घेतो. ;)