पनीर /चीझ/मटार गुजिया /करंजी

पियुशा's picture
पियुशा in पाककृती
9 Feb 2015 - 4:47 pm

णमस्कार्स मिपाकर्स ....

आज खुप दिवसानी मिपावर जिलबी पाडु योग आलाय ;)

नेहमी मी जे ठरवील ते बनेलच असा काही नियम नाही ( म्हणजे माझा नेम नाही )
म्हणजे यु के जाना था जापान और पहुच गये चीन अस वरचेवर माझ्या बाबतीत तरी घडत असत
बनवायला घेतला होता पनीर चीझ रोल अन झाली मटार पनीर चीझ करंजी / गुजिया ईत्यादी ईत्यादी .
दिमाखात किचन मध्ये प्रवेश केला होता आज काही झाल तरी मी पनीर चीज रोल बनवणारच !
पण भाजी तयार झाल्यावर पहिला रोल बनवला तर भाजी इकडून तिकडून बाहेर डोकावू लागली मग कडा पाणी लावून बंद केल्या तर आतली बाजू कच्ची राहिली , मग आधी पोळी बनवून ती एका बाजून शेकून घेतली शेकलेल्या बाजूने सारण घालून बंद करायला गेले तर मेली पोळी वातड झाली काही केल्याने बंद होइना :(
तो पर्यंत असे २ रोल नासवल्यावर रोल्स चा नाद करायचा नाही असे मनोमन ठरवून (स्वताला मनातल्या मनात २-४ शिव्या घालून ) आहे त्या साहित्यात हा प्रकार बनवून टाकला अन माझ नशीब थोर म्हणून आवडला सगळ्यांना ;)

साहीत्य :
१.वाफावलेला मटार - १ वाटी.
२. चीझ - ३ क्युब्स
३. पनीर (किसलेल )- १ वाटी.
४. फ्लॉवर (बारीक चिरलेला ) - १ वाटी.
५. लाल तिखट तुम्हाला झेपेल तितक , मी २ छो. चमचे घेतल
६.आमचुर पावडर - १ चमचा
७. गरम मसाला - २ चमचे
८. मीठ चविनुसार
९. कांदा २ मोठे ( बारिक चिरलेले )
१०. २ सिमला मिरची ( बारिक चिरुन )
११. चाट मसाला ( ऐच्छीक )
१२. मैदा
१३. तेल तळन्याकरीता
१४. ओवा १ छो चमचा (ऐच्छीक)
१५. भाजलेली बडीशेप १ छो चमचा( ऐच्छीक)
१६. रवा २ चमचे
कृती :
मैद्यात १ चमचा तेल , २ चमचा रवा अन चविपुरत मीठ घालुन कणीक भिजवतो तसा भिजवुन मौ मळुन घेणे
आता कढैत ३ चमचे तेल घेउन त्यात बारिक चिरलेला कांदा घालावा तो हलका परतला की फ्लॉवर घालावा कारणफ्लॉवर आपण वाफवलेला नाही , मग त्यात अनुक्रमे सिमला मिरची अन वाफावलेला मटार घालावा सगळे
छान परतले की त्यात लालतिखट अन गरममसाला घालावा चविनुसार मीठ घालाव भाजी छान एकजीव
परतली की त्यात किसलेल पनीर अन चीझ घालाव वरतुन आमचुर पावडर, ओवा ,बडीशेप, चाट मसाला. घालावा हेझाल आपल सारण तय्यार !
आता मैद्याच्या छोट्या पुर्या लाटाव्या त्यात हे सारण भरुन कडा व्यवस्थीत बंद करुन मंद आचेवर खरपुस तळुन घ्याव्यात . गरमा गरम सर्व कराव्यात गार झाल्यावर नरम पड्तील बहुदा !

(स्टेप बाय स्टेप फाटू काढ्याच्या नादात आम्ही क्यामेरा तेलात तळून काढला असता म्हणून …. जाऊ दे आपल्याला नै जमणार दिपक भाऊ अन सानिका सारख स्टेप बाय स्टेप :)

आपली नम्र

जिल्बुषा :)

gujiya

प्रतिक्रिया

नितीन पाठक's picture

9 Feb 2015 - 4:49 pm | नितीन पाठक

मस्त पाक़कृती. एकदम कडक. फोटो बघून पटकन उचलून खाव्याशा वाटतात.

रेशिपी बरी आहे, फोटु कुठल्या साईटवरनं चोप्यपस्ते केलाय?

अत्रुप्त आत्मा's picture

9 Feb 2015 - 9:53 pm | अत्रुप्त आत्मा

@फोटु कुठल्या साईटवरनं चोप्यपस्ते केलाय?>> ह्येच म्हननार हुतो! ;-)
पण मग म्हटलं,आपण कशाला बोला! =))

========================

जिल्बुचा जिल्बुचा, रेशी पि करुक्क्षा! ;-)
करायला गेली गंपुशा,पण छान झाला मारुतिशा! :-D

पियुशा's picture

10 Feb 2015 - 11:01 am | पियुशा

my

अत्रुप्त आत्मा's picture

10 Feb 2015 - 10:14 pm | अत्रुप्त आत्मा

बरं! बरं! बरं! खले ख्लेच फ़ोतु गं जिल्बुचा! http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing002.gif

सविता००१'s picture

9 Feb 2015 - 4:59 pm | सविता००१

छानच केल्यात की.
मैद्यात कडकडीत गरम मोहन घालायचं आणि न कंटाळता मंदाग्नीवर तळायचं की मग नाही पडत नरम करंज्या.
पण तेच फार अवघड असतं. गम धरवत नाही घरातल्यांना आणि आपल्यालाही. ;)
असो. खमंग पाकृ.

सानिकास्वप्निल's picture

9 Feb 2015 - 5:09 pm | सानिकास्वप्निल

वाह ! वाह !
खुसखूशीत दिसातायेत करंज्या :)
फोटो पण मस्तं मस्तं

दिपक.कुवेत's picture

9 Feb 2015 - 7:10 pm | दिपक.कुवेत

काय तोंपासू दिसतायेत गुजिया /करंजी. फोटोत त्यांचा खुशखुशीतपणा पुरेपुर उतरलाय. नुसत्या मटार करंज्या खायचा कधी कधी कंटाळा येतो पण हा मिक्स भाज्यांच्या पर्याय छान आहे. नक्किच करुन बघीन आणि चहा बरोबर हादडिन...
एक शंका - चीज घातल्यावर तळताना ते बाहेर येत नाहि ना?

पैसा's picture

9 Feb 2015 - 7:13 pm | पैसा

केला गणपती अन झाला मारुती! असो, पण फटु मस्त आलाय! मात्र मैदा घालून करण्यापेक्षा कणकेचा हेल्दी पर्याय वापरला पाहिजे.

स्वाती दिनेश's picture

9 Feb 2015 - 7:22 pm | स्वाती दिनेश

करंज्या मस्त दिसत आहेत ग..
(एंड प्रॉडक्ट छान झाले ना.. बास!
बाकी नाम और आकार मे क्या रख्खा है? करंजी काय गुजिया काय आणि पनिर चीज रोल काय? तपशिलातला बारीकस्सा तर फरक.. ;) )
स्वाती

रेवती's picture

9 Feb 2015 - 7:24 pm | रेवती

पाकृ व फोटू छान आहेत.

पियुशा इज बॅक!मस्त पाकृ आणि फोटो तर झकासच.

आनन्दिता's picture

9 Feb 2015 - 8:04 pm | आनन्दिता

काहीतरी इंटरेस्टींग प्रकार वाटतोय. करंज्या दिसतायत पण छान.

ती मधली तुळशीची पानं पाहुन फार्फार सात्विक वाटलं.
:)

किसन शिंदे's picture

10 Feb 2015 - 3:16 am | किसन शिंदे

नक्की??

मला तर ती पुदिन्याची पाने वाटताहेत. :)

जुइ's picture

9 Feb 2015 - 8:29 pm | जुइ

झकास दिसत आहेत करंज्या!!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

9 Feb 2015 - 8:38 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

a

ह्या करंज्या प्रचंड आवडतं असल्यानी असं झालेलं आहे. मातोश्रींकडे तात्काळ आर्डर फार्वर्ड झालेली आहे.
=))

मस्त दिसतायत करंज्या. नक्कीच करुन बघेन.

स्वाती राजेश's picture

10 Feb 2015 - 1:49 am | स्वाती राजेश

जिथे जायचे आहे तिथेच पोचलिस फक्त व्ह्याया...युके जापान... :)
फोटोच सांगतोय... खमंग न कुर्कुरीत....झाल्यात...
नक्क्की करुन पाहीन...

किसन शिंदे's picture

10 Feb 2015 - 3:15 am | किसन शिंदे

नगरकर ईज बॅक !! जिल्बी, आपलं ते हे करंजी आवडल्या गेली आहे.

छान करंज्या आणि छान कल्पकता. माझे रोल फसले असते तर मी त्या फ्रेन्ड्स मध्ये जोई करतो ना कूक करताना मला भूक लागली म्हणून मी चीझ खाल्लं आणि मग मला तहान लागली म्हणून क्रीम पिऊन टाकलं, तसं मी आधी जमत नाही म्हणून टप्प्याटप्प्याने आधी वैताग मग चिड्चिड मग अश्रूपात मग एवढं सगळं करून कम्फर्ट फूड म्हणून तेच चीज आणि मटर उडवलं असतं. करंज्या बिरंज्या तळत बसण्याचं सुचलंच नसतं.

श्रीरंग_जोशी's picture

10 Feb 2015 - 6:13 am | श्रीरंग_जोशी

वाह, एकदम चविष्ट वाटत आहेत करंज्या.

आमच्या गेल्या भारतवारीमध्ये यासारखा एक पदार्थ डॉमिनोजमध्ये खाल्ला होता. अमेरिकन डॉमिनोजच्या तुलनेत भारतीय डॉमिनोज खूपच उजवे वाटले होते त्यामुळे.

स्पंदना's picture

10 Feb 2015 - 9:53 am | स्पंदना

खुसखुषीत करंज्या!! चविष्त वर्णन!! आणि बहारदार फोटो!!
आणि काय लागतय जगायला पियु?

प्रचेतस's picture

10 Feb 2015 - 4:28 pm | प्रचेतस

जबरी पाकृ गो पिवशे.

स्वाती२'s picture

11 Feb 2015 - 4:14 am | स्वाती२

मस्त दिसतायत!

मदनबाण's picture

11 Feb 2015 - 11:21 am | मदनबाण

क्या ट्वीटी... अपुनको एक पार्सल भेजने को भूल गयी क्या ? ;)
मस्त ! :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Ek दो Teen चार Otthukkadi... ;) :- { Anjaan }

मस्त पदार्थ ग पियुषा...फोटो तर फारच सुंदर !!

खूप छान आलाय फोटो...कल्पकता पण आवडली...मैद्याचे प्रमाण किती घ्यायचे?

सर्व प्रतिसादकर्त्याचे आभार :)
@ दिपक कुवेत - गरम भाजीत चिझ घालतो तेव्हाच ते वितळुन जात त्यामुळे तळताना बाहेर वैगेरे येत नाही.
@ मोनु - तु भाजी जित्क्या प्रमाणात बन्वशील त्याच्या सारणाला पुरेल इतकाच मैदा घे मी अन्दाजेच घेतलाय

बनवायला घेतला होता पनीर चीझ रोल अन झाली मटार पनीर चीझ करंजी

क्या बात , मस्त आहे पाकृ. आणि पियुशा ची शैली पण अगदी तशीच पहिल्या सारखी ..

अवांतर :
तळताना पण फोटो .. नक्की तुम्ही फोटो काढत होतात .. की दुसरे कोणी करत आणि तळत होते ?

पियुशा's picture

13 Feb 2015 - 10:47 am | पियुशा

तळताना पण फोटो .. नक्की तुम्ही फोटो काढत होतात .. की दुसरे कोणी करत आणि तळत होते ?
मी किचन मध्ये असताना बाकी कुणी हिम्मत करत नाहीत तिथे डोकावयाची ;)
हा फक्त धावा करत असतील देवाकडे , जे आहे ते पटकन बनु दे , खाणेबल बनु दे , अन पिवशीनी केलेला पसारा तिला स्वतः च आवरायची सुबुद्धी दे देवा :)

सस्नेह's picture

12 Feb 2015 - 8:43 pm | सस्नेह

आरसपानी करंज्या. अगदी मस्तानीच्या विड्याचा रंग करंजीतून डोकावतोय !
नगरकरांचा चकली ते करंजी प्रवास करंजीसारखाच भरीव असल्याचे जाणवते आहे +)
बाकी सारणाच्या जिन्नसा वाचून पिवशीचा सुगरणी स्टॅमिना वाढल्याचे दिसोन आले

करंजी उचलून तोंडात टाकावीशी वाटते. पार्सल करुन पोचवणे..

गौरी लेले's picture

13 Feb 2015 - 2:48 pm | गौरी लेले

सुरेख :)